Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/02/2014 - 14:21
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
तंत्र
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? रविवारचे जेवण कसे झाले? वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच. कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली. तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे. वार : शनिवार दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४ वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल. भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस पहायच्या गोष्टी , काळा घोडा फेस्टिवल आणि मग फोर्ट मधल्या सुंदर आणि भव्य इमारती. आणि हे सगळे दाखवायला आपले मार्गदर्शक आहेत. श्री. रामदास काका. तर आता वेळ दवडू नका.आपापला कार्यक्रम आखून ठेवा आणि चला रामदास काकांबरोबर फोर्ट दर्शनाला. कळावे, लोभ आहेच तो अशा निमित्ताने वाढावा, ही विनंती. आपलाच एक मिपाकर, मुवि. (ता.क. हा कट्टा दिवस भर चालेल, त्यामुळे आपण कुठूनही हा कट्टा जॉइन करू शकता आणि केंव्हाही ह्या भमणातून रजा घेवू शकता.खर्च आपला आपणच करायचा आहे.)
  • Log in or register to post comments
  • 7070 views

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Sun, 02/02/2014 - 14:27

Permalink

वा!

कट्टा जोरदार होणार यात शंकाच नाही. रामदासकाकांबरोबर फोर्टमध्ये भटकणं म्हणजे जवळजवळ थेट कृष्णाच्या तोंडून गीता ऐकण्यासारखंच! शक्य झाल्यास, ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आलं त्यांच्या माहितीचं; तर फारच उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/02/2014 - 14:35

In reply to वा! by नंदन

Permalink

ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग....

.....करता आलं त्यांच्या माहितीचं; तर फारच उत्तम. असा प्रयत्न नक्कीच करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 02/02/2014 - 15:52

Permalink

अरे वा! आणखी एक कट्टा!

मुक्त विहारि, या वेगाने तुम्ही एका मागोमाग एक मुंबई कट्टे आयोजित करत राहिलात तर, मला अशी भिती वाटते आहे कि, लवकरच मुंबईबाहेरचे मिपाकर त्यांच्या नेहमीच्या मिपा स्टाइलमध्ये तुमच्यावर स्नेह प्रकट करतील. तेव्हा कृपया योग्य ती काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 02/02/2014 - 16:01

In reply to अरे वा! आणखी एक कट्टा! by भाते

Permalink

हाहाहा.

हाहाहा. अजिबात नाही. उलट डायहार्ड कट्टेकरी मुवि बघून अंमळ हेवाच वाटतोय. बाकी आम्ही काही पुणेकर लवकरच घारापुरी लेणी भ्रमंतीचा प्लान आखत आहोत. मुवि तेथे कट्टा जमवणारच यात काहीच शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/02/2014 - 16:19

In reply to हाहाहा. by प्रचेतस

Permalink

@ वल्ली....

कधी आहे कट्टा? कारण, दिपक कुवैत पण पुढच्या महिन्यांत येत आहेत. त्याच सुमारास काढला तर एकाच तिकीटांत आणि जवळ पास तितक्यांच दिवसांत २ही कट्टे होतील. जमल्यास सकाळी घारापुरी आणि संध्याकाळी दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर पक्षी आणि तीर्था सकट संध्याकाळ साजरी करू. दुसर्‍या दिवशी पुणेकर आपापल्या ठिकाणी जायला मोकळे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 02/02/2014 - 16:27

In reply to @ वल्ली.... by मुक्त विहारि

Permalink

फेब्रुवारी मध्ये जमल्यास

फेब्रुवारी मध्ये जमल्यास शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च मध्ये असा बेत आहे. सकाळी सिंहगड ने थेट सीएसटी ला उतरून गेटवे ऑफ़ इंडिया वरून घारापुरी. मग संध्याकाळी फोर्ट ला चक्कर मारून रात्री ८ च्या महालक्ष्मी ने पुणे. मुक्कामाचा बेत नाही. आणि बहुधा शनिवारीच येऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 02/02/2014 - 19:02

In reply to फेब्रुवारी मध्ये जमल्यास by प्रचेतस

Permalink

@ मुवि/वल्ली

घारापुरी असेल तर उत्तम. माझ्या घराजवळ आहे. आय मीन मी जीथे राहतो (उरण) तीथुन खुप जवळ आहे फक्त तिकडुन मचवे सुटतात का ते चेक करायला हवं. अर्थात जर तारीख पक्कि झाली तर आल्यावर तेहि चेक करीन. अगदि काहिच सोय नसेल तर गेटवे ऑफ़ इंडिया वरुन तुमच्यासोबत जॉईन होईन पण येणार हे नक्कि. मी २२ फेब्रुवारीला येतोय. घारापुरी बघुन झाल्यावर "पक्षी आणि तीर्थप्राशनासाठि" आपण एका पायावर तैयार.........तर होउन जौदे मग!........चलो घारापुरी.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 02/02/2014 - 20:10

In reply to @ मुवि/वल्ली by दिपक.कुवेत

Permalink

@मुक्त विहारि

तुमच्यासाठी आणखी एका कट्टा नियोजनाचे काम. सर्वसमंतीने, होऊन जाऊद्या एक 'घारापुरी मुंबई कट्टा' दिपक.कुवेत यांच्यासाठी. शक्य असल्यास १,२ मार्चला. लगेच काढा धागा या कट्टयाचा. पुणेकरांनो, जमल्यास कट्टयाला येण्याचा प्रयत्न करावा. च्यायला, या पुणेकरांना विनंती करायची म्हणजे… बघुया तरी भन्नाट पाकृ टाकणारा हा प्राणी दिसतो तरी कसा? (सापांसारख्या भयानक प्राण्यांशी खेळणारा एक माणुस आधीच याची देही याची डोळा पाहिला आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 02/04/2014 - 21:28

In reply to फेब्रुवारी मध्ये जमल्यास by प्रचेतस

Permalink

हाता-तोंडाशी आलेला घास.

फेब्रूवारी २३.२४.२५,२६ ला मी मुंबईत असण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर पुन्हा २८ मार्च ते ०९ एप्रिल मुंबईत असेन. तारीख नक्की झाली की इथेच घोषणा करा. पाहूया काय आणि कसे जमते ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 02/02/2014 - 16:37

In reply to @ वल्ली.... by मुक्त विहारि

Permalink

पक्षी आणि तीर्था सकट

पक्षी आणि तीर्था सकट संध्याकाळ साजरी करू
=))
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 02/02/2014 - 16:30

Permalink

मुवि नीं स्वत:चा आयडी

मुवि नीं स्वत:चा आयडी मुक्तविहारी च्या जागी कट्टाविहारी (कवि) असा करुन घ्यावा . काळाघोडा कट्ट्यास शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 02/02/2014 - 16:36

Permalink

च्यायला, गप्राव जरा!

च्यायला, गप्राव जरा! जरा काय ती अमुकची नसली तरी तमुक ची बाळगा! किती छळ किती छळ???? कट्टे आयोजित करायचे, कट्टे यशस्वी करायचे, त्या कट्ट्याचा वृत्तांत टाकायच्या आधी दुसर्‍या कट्ट्याचं आयोजन करायचं.... नंतर आधीच्या कट्ट्याचे फोटो टाकायचे, नाकं(मुरडून) दाखवायची, आणि हात भर वृत्तांत लिहून जळवायचं.... हा हा ही ही करत किती माज (ते मजा लिहायचं होतं, असो)केला ते जगाला दाखवायचं. मी एकटाच करतो आता कट्टा.... :( मुविंच्या बैलाला हो.....! (हलकं घ्या म्हणवत नाही ;) ) -आत्यंतिक जळजळग्रस्त
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 02/02/2014 - 18:35

In reply to च्यायला, गप्राव जरा! by प्यारे१

Permalink

सहमत सहमत!!

सहमत सहमत!!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 02/02/2014 - 18:20

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 02/02/2014 - 19:03

In reply to (No subject) by अजया

Permalink

ऐला, पायनॅपल फ्लेवर ?

ऐला, पायनॅपल फ्लेवर ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 02/02/2014 - 19:05

In reply to (No subject) by अजया

Permalink

@ अजया......आँ ईनो कशाला?

तु तिथेच आहेस कि.......यायचा प्लॅन करु शकतेस!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 02/02/2014 - 20:52

Permalink

ते ईनो माझ्यासाठी नाही,जळजळ

ते ईनो माझ्यासाठी नाही,जळजळ वाल्या पब्लीकसाठी आहे! घारापुरीला उरणहुन मचवे जातात.आम्हालाही उरणच जवळ पडते. पण तिथले मचवे लई डेंजर दिसतात्,गेट वे पेक्षा!दोन्,तीन वर्षात बदलले असले तर नाही माहिती.बाकी कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by भ ट क्या खे ड वा ला on Sun, 02/02/2014 - 21:36

Permalink

काळा घोडा कट्टा

रामदास काकांबरोबर नक्क्की यायला आवडले असते, आज सकाळच्या कट्ट्यात ओळख झाली, म्हणजे "पर्तेक्ष" भेट झाली. ०७ ला रात्री कोस्टल ट्रेक साठी जात आहे ३ दिवस त्यामुळे येऊ शकत नाही. दुधाची तहान ताकावर भागवू या कट्ट्याचा वृत्तांत रामदास काका नि लिहिला तर मजा येईल. ताका ऐवजी मठठा मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sun, 02/02/2014 - 21:52

Permalink

अरे वा!

फोर्टात भटकंती आणि रामदासशेठ बरोबर! मग यायलाच पाहिजे. रामदासशेठ, ८ तारखेला सकाळी ७.३० ला न्यायला घरी येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 02/04/2014 - 13:14

Permalink

८ तारखेला मी मुंबईमध्येच असेन

८ तारखेला मी मुंबईमध्येच असेन. पण दुर्दैवाने सकाळचे कार्यक्रम घट्ट लागलेले आहेत. उशीरा दुपारी किंवा संध्याकाळी कट्टा चालू असेल तर नक्की यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/04/2014 - 13:19

In reply to ८ तारखेला मी मुंबईमध्येच असेन by राजेश घासकडवी

Permalink

हा कट्टा तसा संध्याकाळी ४/५ वाजपर्यंत

आणि फोर्ट विभागातच असल्याने तुम्ही कधी पण हा कट्टा जॉइन करु शकता. चरता आणि फिरता कट्टा असल्याने, मिपाकरांना शोधायला फारसा त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 02/04/2014 - 20:49

Permalink

वाह!! सलग दुसर्‍या वर्षीही

वाह!! सलग दुसर्‍या वर्षीही काळाघोडा फेस्टिवलला कट्टा भरवताय तर. कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 02/06/2014 - 15:44

Permalink

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा असता तर नक्कि येउ शकलो अस्तो बाकी रामदास काकाना फोर्ट मधिल ईमारतीचा भरपुर अभ्यास आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/06/2014 - 16:30

In reply to शनिवार ऐवजी रविवारी कट्टा by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

खरे तर रविवारीच कट्टा करायचा होता...

पण येता रविवार हा फेस्टिवलचा शेवटचा दिवस असल्याने, गर्दीची शक्यता जास्त होती, म्हणून शनिवार ठरवला.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Fri, 02/07/2014 - 14:07

In reply to शनिवार ऐवजी रविवारी कट्टा by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा असता तर नक्कि येउ शकलो अस्तो बाकी रामदास काकाना फोर्ट मधिल ईमारतीचा भरपुर अभ्यास आहे
रविवार केला तर नक्की येऊ शकतो शनिवार पेक्षा रविवार मोठ्या प्रमाणात रस्ते रिकामे असतात
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 02/07/2014 - 15:00

In reply to शनिवार ऐवजी रविवारी कट्टा by माझीही शॅम्पेन

Permalink

शनिवार पेक्षा रविवार मोठ्या प्रमाणात रस्ते रिकामे असतात

ते इतर वेळी... फोर्ट फेस्टीवलच्या वेळेस रविवारी जास्त गर्दी असते.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Fri, 02/07/2014 - 15:21

In reply to शनिवार पेक्षा रविवार मोठ्या प्रमाणात रस्ते रिकामे असतात by मुक्त विहारि

Permalink

ओके बर तर मग कट्ट्याला

ओके बर तर मग कट्ट्याला शुभेच्छा !!! आमच्या नशिबात सध्या तरी रामदास योग नाही !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Fri, 02/07/2014 - 18:19

In reply to ओके बर तर मग कट्ट्याला by माझीही शॅम्पेन

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा !!!

"आमच्या नशिबात सध्या तरी रामदास योग नाही !!!" :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 02/06/2014 - 17:49

Permalink

नाईट आहे...पण नक्की प्रयत्न

नाईट आहे...पण नक्की प्रयत्न करेन... :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिप्लुन्कर on गुरुवार, 02/06/2014 - 17:57

Permalink

नक्की यायला आवडेल

कोणाला कसा संपर्क करायचा ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/06/2014 - 21:44

In reply to नक्की यायला आवडेल by चिप्लुन्कर

Permalink

तुम्हाला व्य.नि. केला आहे.

जरूर या. जमल्यास तुमचा मो.नं. मला व्य.नि. करा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 02/07/2014 - 13:45

Permalink

ठाण्यातून कुणी येणार आहे का?

श्री. रामदास गाडी घेवून येणार आहेत.अजून २ जणांची त्यांच्या गाडीत सोय होवु शकते. ज्यांना यायचे असेल त्यांनी श्री.रामदास ह्यांना व्य.नि. करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चिप्लुन्कर on Fri, 02/07/2014 - 18:03

In reply to ठाण्यातून कुणी येणार आहे का? by मुक्त विहारि

Permalink

मी ठाण्यातून येणार आहे

मी ठाण्यातून येणार आहे पण दुपारी येत असल्यामुळे येताना माझी सोय झाली तर फार बरे होइल
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com