Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गंगाधर मुटे on Mon, 02/03/2014 - 00:26
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी

                                         - गंगाधर मुटे
----------------------------------------------------
Amethi
*   *   *   *
Amethi
*   *   *   *
Amethi
*   *   *   *
Amethi

Submitted by आयुर्हित on Mon, 02/03/2014 - 01:03

Permalink

चांगला विषय, छान कविता

व्वा अभयजी, खुप छान कविता आहे. लेखणीला चांगली धार आहे आपल्या! खूप चांगले निरीक्षण व सर्वात महत्त्वाचे आहे ती तुमची संवेदनशीलता. आपल्या अन्नदात्याला मी विनंती करेन की सोडू नको कास्तकारी! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by भ ट क्या खे ड वा ला on Mon, 02/03/2014 - 09:48

Permalink

व्वा अभयजी,

कविता एकदम काळजाला भिडणारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 02/03/2014 - 09:51

Permalink

छान.

आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 02/03/2014 - 10:00

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 02/03/2014 - 10:10

Permalink

कविता आवडली...

कविता आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 02/03/2014 - 11:14

Permalink

छान कविता. कास्तकारी म्हणजे

छान कविता. कास्तकारी म्हणजे काय नेमके? त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे थोडा घोळ झाला. बाकी शेतकरी गोत्यात आहेतच. हाच प्रोब्लेम जिथे जिथे जमिनी विकून विकास झाला आहे तिथे पण दिसून येतो. स्थानिक माणूस मज्रुरीच करत राहीला. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Mon, 02/03/2014 - 20:36

In reply to छान कविता. कास्तकारी म्हणजे by llपुण्याचे पेशवेll

Permalink

कास्तकारी म्हणजे

कास्तकार = शेतकरी कास्तकारी = शेती कसणे हा ग्रामीण बोलीभाषेतला शब्द असावा. पूर्वी विदर्भात हा शब्द एवढा सर्रास वापरात होता की, तुलनेने शेती करणे हा शब्द केवळ काही ठराविक लोकच बोलीभाषेत वापरत असत. आता मात्र शिक्षणाच्या प्रसारामुळे शेती शब्दाचा वापर बोलीभाषेत वाढला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 02/04/2014 - 03:43

In reply to कास्तकारी म्हणजे by गंगाधर मुटे

Permalink

कास्तकारी

कष्टकरीच्या अपभ्रंष होऊन हा शब्द तयार झाला असेल काय? अवांतरः आता शरद साहेबांचे एकेकाळचे शिष्य राजु शेट्टी यंदा युतीच्या मंचावर जाऊन बसलेत. शेतकर्‍यांचे प्रश्न राजकारणाच्या लाल मातीत उतरुन सोडवण्याचे यांचे प्रयत्न शेतकर्‍यांना पसंत आहेत काय? विदर्भ, मराठवाडा या बाबतीत मागे का? तुमचे कॉ. घंगारे काका पण शेवटी साठ्यांचा प्रचार करुन विझले. सध्या परिस्थिती काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Tue, 02/04/2014 - 09:59

In reply to कास्तकारी by अर्धवटराव

Permalink

शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट

लोकशाहीप्रधान व्यवस्थेत राजकारण आणि राजकीय भुमिका टाळता येत नाही. म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची भुमिका स्विकारणे अपरिहर्य असते. राजू शेट्टींनी भाजपशी घरोबा केला. आमचा कल जरासा "आप" च्या बाजूने आहे. अंतिम निर्णय व्हायचा आहे. मात्र सत्तेतून शेतीचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 02/04/2014 - 11:15

In reply to शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट by गंगाधर मुटे

Permalink

अदृश्य बेरोजगारी

शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे
मान्य. पण अल्पभूधारक जरी कोट्यवधी असले तरी त्यांचा असा दबावगट बनत नाही हा अनुभव आहे. त्यासाठी संख्येने कमी पण प्रचंड जमीन बाळगणारे शेतकरी असायला हवेत. थोडक्यात शेतीवर थेट अवलंबून असणारांची संख्या कमी असायला हवी. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा उद्योग-धंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
हाच लोच्या आहे. शेत तेवढेच. घरातील पाच लोक राबली तर जेवढे उत्पादन येईल जवळपास तितकेच उत्पादन मिळण्यासाठी दहा राबतात. म्हणजेच पाच जणांचे राबणे निरर्थक आहे. ह्यालाच अदृश्य बेरोजगारी म्हणतात. ती कमी झाल्याशिवाय - त्या पाच अतिरीक्त जणांना दुसरा रोजगार मिळाल्याशिवाय - ही समस्या सुटणार नाही. (कागदोपत्री ७/१२ धारक शहरी) सुनील
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Wed, 02/05/2014 - 17:02

In reply to अदृश्य बेरोजगारी by सुनील

Permalink

- मुर्खासारखा अनियंत्रीत

- मुर्खासारखा अनियंत्रीत/नियोजन नसलेला कुठलाच व्यवसाय सफल ठरू शकत नाही. त्याला शेती अपवाद असण्याचे कारण नाही. - पण सर्वच शेतकरी "तसे"च आहे म्हणून शेती तोट्याची आहे, असे समिकरण तयार करणे फारसे उपयोगाचे नाही व तर्कसंगत ठरून शकत नाही. - शालेय/विद्यापिठीय अभ्यासक्रमाने व पुरातनीय/धार्मिक शास्त्राने शेतीबद्दल फारच असुसंगत अर्थशास्त्र समाजाला शिकविले आहे; जे की वास्तवाच्या सावलीलाही उभे राहत नाही. त्याचेच दुष्परिणाम शेती व्यवसाय भोगत आहे. - शेतीमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ कमी आहे. सध्याच्या मनुष्यबळापेक्षा दुप्पट-तिप्पट मनुष्यबळाला रोजगार पुरविण्याची क्षमता केवळ आणि केवळ भारतिय शेतीत आहे. फक्त अट एकच शेती फायद्याची व्हायला हवी. - "प्रचंड जमीन बाळगणारे" हे वाक्य आता कालबाह्य झालेले आहे.सिलिंग कायदा वाचा. - "जेवढी शेती जास्त, तेवढी उलाढाल जास्त,तितका तोटा जास्त" हे समिकरण "पगारी अर्थतज्ज्ञ" स्विकारत नसले म्हणून वास्तव बदलत नाही. असो. वेळ मिळाल्यास हे वाचा. http://www.misalpav.com/node/17878 http://www.baliraja.com/node/389
  • Log in or register to post comments

Submitted by मराठीच on Tue, 02/04/2014 - 10:08

Permalink

रावडी

रावडी
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 02/04/2014 - 11:15

Permalink

वा! क्या बात है!!

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी
मस्त! जियो!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 02/04/2014 - 13:19

Permalink

जबरदस्त..

जियो, मुटेकाका.. जबरदस्त कविता/ गझल..
कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
खाण्णऽऽकन कानफटीतच मारलीत की.. असो. दर सहा महीन्याला मोबाईल बदलणारा, एका शेतकर्‍याच्या वार्षिक उलाढाली (नफा नव्हे) किंमतीचा आयफोन खाटकन क्रेडीटकार्डने विकत घेणारा तरुण जेव्हा "ओनियन्स आर सो ब्लडी कॉस्टली, ड्युड.. ये गवर्नमेंट साली क्या कर रही है"? हे हजार रुपये प्लेटवाला बुफे खातांना सुस्कारतो, त्या विषमतेवर आणि हिपोक्रसीवर हसायला पण येत नाही आता.. (वावर असुनही कास्तकारी करायची हिंमत नसलेला सरकारी नोकर) चिगो
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/05/2014 - 00:33

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 02/05/2014 - 13:00

Permalink

सुंदर

सुंदर मुटेजीं , कविता फार आवडली.!!
  • Log in or register to post comments

Submitted by अजय जोशी on Wed, 02/05/2014 - 17:11

Permalink

छान कविता

कविता छानच आहे. पण, हा अभय कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 02/08/2014 - 18:33

Permalink

कविता अवडली

कविता, सोबतची चित्रे आणि चर्चा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 02/09/2014 - 11:52

Permalink

सुंदर कविता !

सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 9435 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com