Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आयुर्हित on Mon, 01/27/2014 - 15:58
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
औषधोपचार
भूगोल
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माध्यमवेध
माहिती
विरंगुळा
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).
सप्तर्षींमधील ताऱ्यांचा आकाशातला (घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार-clockwise-सव्य)क्रम (α) क्रतु (β) पुलह (γ) पुलस्त्य (δ) अत्रि (ε) अंगिरस) (ζ) वसिष्ठ (शेजारी अरुंधती) आणि (η) मरीचि असा आहे. वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो. आपल्या नुसत्या डोळ्यांनी अरुंधती दिसते कि नाही हे पाहावे. दिसत असल्यास आपल्या डोळ्यांची नजर चांगली आहे असे आपले हुशार पूर्वज मानत असत. सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या वेळेला ध्रुव तारा शोधण्यासाठी होतो व वेळही कळते. ह्या सप्तर्षीच्या जवळ असलेल्या उत्तरमुकुट /बुमरंग उर्फ Corona Borealis असलेल्या तारका समुहात/नक्षत्रात परवाच २३ जानेवारीला एक नवीन कृष्णविवर सापडलेले आहे, जे आपल्या पृथ्वीपासून ३९००,०००,००० प्रकाश वर्षे दूर आहे. हे कृष्ण विवर शोधण्यासाठी चंद्रा क्ष किरण निरीक्षणयान ची मोलाची मदत लाभली आहे. हे फोटो पाहिल्यावर ह्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत, ह्याची कल्पना येते. (क्रमश:)
  • Log in or register to post comments
  • 15531 views

प्रतिक्रिया

Submitted by ऋषिकेश on Mon, 01/27/2014 - 16:13

Permalink

मोठ्या अपेक्षेने लेख उघडला

मोठ्या अपेक्षेने लेख उघडला होता. :( असो. लिहित रहा
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Mon, 01/27/2014 - 16:17

Permalink

छान

तसेच माहिती पुर्ण लेख पु ले शु
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Mon, 01/27/2014 - 17:19

Permalink

छोटा पुंजका

ह्या सप्तर्षींच्याच आकाराचा अगदी छोटा पुंजका असतो ना? त्याला / त्या नक्षत्राला काय म्हणतात? (आम्ही काहीतरी सप्तर्षींच्या बायका म्हणायचो बहुधा)
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on Mon, 01/27/2014 - 18:50

In reply to छोटा पुंजका by मी_आहे_ना

Permalink

ursa minor

ursa minor मराठीत काय म्हणतात ते माहित नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by भटक्य आणि उनाड on Mon, 01/27/2014 - 22:43

In reply to ursa minor by परिंदा

Permalink

त्याला म्हणतात..

क्रूत्तिका...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/28/2014 - 14:30

In reply to छोटा पुंजका by मी_आहे_ना

Permalink

कृत्तिका नक्षत्र. हे नक्षत्र

कृत्तिका नक्षत्र. हे नक्षत्र वृषभ राशीचाही भाग असल्याने त्याला त्या आभासी बैलाचं वशिंडही समजतात अनेकदा.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 01/27/2014 - 18:42

Permalink

आकार

छान लेख. हे तारे एकमेकांपासून कितीतरी प्रकाशवर्षे दूर आहेत. त्यांचा तसा काही परस्पर संबंध नाही. ते स्वतःभोवती तसेच त्यांच्या दीर्घीकेत फिरत असणार. मग त्यांचा दिसणारा "हा" आकार बदलायला किती वर्षे लागतील?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 01/27/2014 - 18:44

Permalink

रात्रीचा कट्टाही होऊ द्या .

रात्रीचा कट्टाही होऊ द्या .
  • Log in or register to post comments

Submitted by भटक्य आणि उनाड on Mon, 01/27/2014 - 22:46

In reply to रात्रीचा कट्टाही होऊ द्या . by कंजूस

Permalink

होतो ना..

रात्रीचा कट्टा.. खगोल मडळ.. वागणी येथे..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 01/30/2014 - 04:56

In reply to होतो ना.. by भटक्य आणि उनाड

Permalink

मी पण, मी पण.... तिथे जाऊन

मी पण, मी पण.... तिथे जाऊन कुडकुडत झोपायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 01/30/2014 - 12:15

In reply to मी पण, मी पण.... तिथे जाऊन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

स्टीफन हॉकिंग

मग फोटोत दाखवलेले कृष्ण विवर हे काय कृवि चे भूत आहे? थोडक्यात बिग बँग व्हायला कृ वि हेच तर कारण आहे. या मुद्द्यावर आपण मिपावर वादविवाद करायला आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on गुरुवार, 01/30/2014 - 21:44

In reply to स्टीफन हॉकिंग by आयुर्हित

Permalink

फोटोत दाखवलेले कृष्ण विवर

असले तरी माझ्या माहितीनुसार कृष्ण विवराचा फोटो काढता येत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Fri, 01/31/2014 - 00:00

In reply to फोटोत दाखवलेले कृष्ण विवर by टिवटिव

Permalink

फार महत्त्वाचे बोललात, धन्यवाद.

थोडक्यात तुम्हीहि "कृष्ण विवर"असते याला मान्यता दिली हे महत्त्वाचे आहे. फार महत्त्वाचे बोललात, धन्यवाद. कृष्ण विवराचा फोटो काढता येत नाही याचा अर्थ मी Optical view(प्रकाशमय दृश्य)असा घेतो, कारण कृवि च्या मुखातून प्रकाश किरणे बाहेर पडू शकत नाही.आणि म्हणूनच दिलेल्या फोटोत दोन काळे क्षेत्र (डार्क स्पॉट)दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/31/2014 - 01:00

In reply to स्टीफन हॉकिंग by आयुर्हित

Permalink

थोडक्यात बिग बँग व्हायला कृ

थोडक्यात बिग बँग व्हायला कृ वि हेच तर कारण आहे. या मुद्द्यावर आपण मिपावर वादविवाद करायला आहोत.
आपण थोर आहात, मी क्षुद्र आहे. मी हार कबूल करते.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Fri, 01/31/2014 - 05:12

In reply to थोडक्यात बिग बँग व्हायला कृ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

काहीतरी चुकीचा अर्थ काढलाय आपण!

काहीतरी चुकीचा अर्थ काढलाय आपण! अहो, येथे कोणाला कमी लेखायचा मुळीच उद्देश नाही. वादविवाद करायला म्हणजे व्यवस्थितपणे मुद्दा पटवून देणे हा होय. पण आपला "ब्रेकिंग न्यूज-कृष्णविवरं नाहीतच-स्टीफन हॉकिंग" हा लेख मिपावर नाही हे थोडे खटकलेच!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/31/2014 - 05:39

In reply to काहीतरी चुकीचा अर्थ काढलाय आपण! by आयुर्हित

Permalink

इश्श!

इश्श!
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 01/27/2014 - 19:11

Permalink

चांगली माहिती आहे. पण

चांगली माहिती आहे. पण लिंकांपेक्षा इथेच फोटो आणी जास्त माहिती द्यावी हि विनंती. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 01/27/2014 - 19:15

Permalink

अपेक्षाभंग.

अपेक्षाभंग.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/27/2014 - 19:33

Permalink

के एल पी डी.

के एल पी डी.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/27/2014 - 19:35

In reply to के एल पी डी. by बॅटमॅन

Permalink

आता कोणी फुलफॉर्म विचारलंन तर

आता कोणी फुलफॉर्म विचारलंन तर काय सांगशील?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/27/2014 - 19:43

In reply to आता कोणी फुलफॉर्म विचारलंन तर by सूड

Permalink

नो वरीज!

बहुत चर्चेअंती खास लम्हें पे धोका असा त्याचा लॉङ्गफॉर्म निश्चित करण्यात आला होता ;) अर्थ तोच पण टंकताना णो टेण्षण =))
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 01/27/2014 - 19:51

In reply to नो वरीज! by बॅटमॅन

Permalink

खास लम्हें पे धोका

:D यावर्न कालेजातल्या ग्रुपची आठवण झाली. GBGM Group.. ग्रेट बॉईज ऑफ ग्रेट माईन्ड्स.. आणी दुसरा अर्थ.. गोड बोलुन xx xx.. ग्रुप. :)) बाकी धागा खरच केएलपीडी झालाय :D
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/27/2014 - 19:56

In reply to खास लम्हें पे धोका by यसवायजी

Permalink

हा हा हा हा

हा हा हा हा =)) खरंच, गोड बोलणारे गामापैलवानच म्हटले पाहिजेत नैका ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/27/2014 - 20:18

In reply to हा हा हा हा by बॅटमॅन

Permalink

>>खास लम्हें पे धोका

>>खास लम्हें पे धोका __/\__ हे असं फक्त तुलाच सुचू शकतं रे बाबा !!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/27/2014 - 23:07

In reply to >>खास लम्हें पे धोका by सूड

Permalink

थोडी दुरुस्ती: मला नै सुचलं,

थोडी दुरुस्ती: मला नै सुचलं, मुसुशेठची क्रियेटिव्हिटी आ।ए ही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Mon, 01/27/2014 - 20:08

Permalink

छान माहीती

छान माहीती पण दोन शंका - १. हे सर्व तारे आहेत की ग्रह? २. अरुंधती हा तारा सहाव्या तार्‍याजवळ दिसतो तर सातवा तारा वसीष्ठ कसा?
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश सायगल on Mon, 01/27/2014 - 20:32

Permalink

कॉपि पेस्ट मारलेल दिसतय.http:

कॉपि पेस्ट मारलेल दिसतय. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 01/27/2014 - 22:45

In reply to कॉपि पेस्ट मारलेल दिसतय.http: by दिनेश सायगल

Permalink

+१

खरंच की! श्री. आयुर्हित, असा विकिवरचा मजकूर कॉपी पेस्ट करू नका प्लीज. नवे स्वतंत्र काही लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 01/27/2014 - 23:08

In reply to कॉपि पेस्ट मारलेल दिसतय.http: by दिनेश सायगल

Permalink

हा एक माहितीवजा लेख आहे!

अहो ह्या साऱ्या शास्त्रीय संज्ञा/नाम आहेत, त्या बदलणार थोडीच?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 01/27/2014 - 23:25

In reply to हा एक माहितीवजा लेख आहे! by आयुर्हित

Permalink

फक्त संज्ञाच नव्हे

लेखच तिथून अख्खा कॉपी केला आहे. आणि मग पुढे कृष्णविवराची माहिती दिली आहे. ती ओरिजिनल आहे का ते कृपया सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 01/27/2014 - 23:34

In reply to फक्त संज्ञाच नव्हे by पैसा

Permalink

लेखकाने उत्साहाच्या भरात

लेखकाने उत्साहाच्या भरात तिकडून चोप्य पस्ते केलेलं दिसतंय. =))
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 01/27/2014 - 23:49

In reply to फक्त संज्ञाच नव्हे by पैसा

Permalink

ओरिजिनल कृष्णविवराची ओरिजिनल माहिती!

"कृष्णविवराची माहिती ओरिजिनल आहे का? " पण असा प्रश्न का पडावा बरे? कुठलाही लेख परत कॉपी करावा लागू नये म्हणूनच तर एवढ्या लिंक्स टाकल्यात! तरी शंका कसली घेत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/30/2014 - 12:52

In reply to ओरिजिनल कृष्णविवराची ओरिजिनल माहिती! by आयुर्हित

Permalink

कॉपी नकोच

लिंक्स सुद्धा आम्हाला गुगलच्या मदतीने शोधता येतात. तिथल्या लेखांवर तुमची काही मौलिक टिप्पणी किंवा इंग्लिश लेख असेल तर त्याचे भाषांतर असे काही अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 01/30/2014 - 13:11

In reply to कॉपी नकोच by पैसा

Permalink

सूचना मान्य.

सूचना मान्य. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 01/27/2014 - 23:34

In reply to हा एक माहितीवजा लेख आहे! by आयुर्हित

Permalink

(No subject)

:))
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Mon, 01/27/2014 - 20:36

Permalink

इन्सुलिन काका... जरा विस्तृत

इन्सुलिन काका... जरा विस्तृत माहीती द्या की नुसत्या लिंका कसल्या देता?.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 01/27/2014 - 20:50

In reply to इन्सुलिन काका... जरा विस्तृत by आनन्दिता

Permalink

विस्तृत माहीती

इन्सुलिन काका???? कोण आहेत हे? कृष्ण विवर चे फोटो बघितले काय? (माझ्या मते लिंक्समध्ये खरोखर विस्तृत माहीती आहेच, आपल्याला कोणती माहिती हवी आहे, जी लिंक्स मध्ये मिळाली नाही?) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on Tue, 01/28/2014 - 11:13

Permalink

सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या

सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या वेळेला ध्रुव तारा शोधण्यासाठी होतो व वेळही कळते.
सप्तर्षीचा उपयोग करुन वेळ कशी कळते? यावर कोणी प्रकाश टाकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/28/2014 - 14:45

In reply to सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या by परिंदा

Permalink

पोलॅरिस म्हणजे ध्रुव तारा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on गुरुवार, 01/30/2014 - 14:42

In reply to पोलॅरिस म्हणजे ध्रुव तारा by ऋषिकेश

Permalink

सप्तर्षींवरुन ध्रुव तारा

सप्तर्षींवरुन ध्रुव तारा (पर्यायाने दिशा) कळते हे माहिती आहे, पण वेळ (म्हणजे किती वाजले) हे कसे समजते? आयुर्हित भौ, जरा समजवाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 02/03/2014 - 11:25

In reply to सप्तर्षींवरुन ध्रुव तारा by परिंदा

Permalink

नेमक्या वेळेचे माहिती नाही

नेमक्या वेळेचे माहिती नाही मात्र बराच सराव असेल तर त्याच्या त्या त्या महिन्यातील उगवण्याच्या वेळेवरून ढोबळ वेळेचा अंदाज करता येऊ शकावा. जेव्हा सप्तर्षी आकाशात नसतात तेव्हा इंग्रजी एम आकाराची शर्मिष्ठा आकाशात असते. तिच्यावरूनही ध्रुव ओळखता येतो. सूर्यास्त होताना आकाशात काय आहे (शर्मिष्ठा की सप्तर्षी?) व कुठे आहे वगैरे वरून काळ (कोणता महिना) अंदाज करता यावा महिना माहिती असेल तर या दोघांपैकी जे काही आकाशात दिसते आहे त्याच्या स्थानावरून (त्यातील किती व कोणते तारे दिसताहेत वगैरेवरून) वेळेचे अंदाज सरावाने करता येईल. मात्र या दोन तारकासमुहावरून तरी वेळ शोधायचा तुम्हाला अपेक्षित असा ठोस फॉर्म्युला अस्तित्त्वत नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/28/2014 - 14:43

Permalink

एक गंमतः वशिष्ठ आणि अरूंधती

एक गंमतः वशिष्ठ आणि अरूंधती हे डोळ्यांना दिसते तितके साधे प्रकरण नाहिये. लग्नाच्या वेळी जोडप्याचे प्रतीक म्हणून ज्या तार्‍याकडे दाखवले जाते त्यापैकी वशिष्ठ हा जुळा तारा आहे. म्हणजे प्रत्यक्षात तो एक तारा नसून ती चार तार्‍यांची एकमेकांभोवती फिरणारी सिस्टिम आहे. थोडक्यात अरूंधती सोबत चार वशिष्ठ आहेत ;) आता लग्नाळु जोडप्यासमोर असा आदर्श ठेवल्यानंतरही सचोटीने संसार करावा हे कुठल्या तोंडाने बोलतात ते वशिष्ठ-अरूंधतीच जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 01/28/2014 - 14:55

Permalink

बाकी सगळं ठीक पण

हे फोटो पाहिल्यावर ह्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत, ह्याची कल्पना येते
बाकी सगळं ठीक पण ह्या वरील विधाना मागील तर्क काही लक्षात येत नाही ... उगाच काहीतरी मोठ्ठी गोष्ट दिसली म्हणुन आपण क्षुद्र कसे ठरतो ? उगाचच काहीही ... असो . तो वर हे पहा .... काहीतरी रीलेट झाले तर कळवा किं ज्योतिस्तवभानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं | स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे | चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने| किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ||
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 01/30/2014 - 01:19

In reply to बाकी सगळं ठीक पण by प्रसाद गोडबोले

Permalink

खरे आहे तुमचे!

अहं ब्रम्हास्मि|
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on गुरुवार, 01/30/2014 - 17:15

In reply to खरे आहे तुमचे! by आयुर्हित

Permalink

आयुर्हित

साहेब अवकाश या विषयाची विस्त्रुत मराठी माहीती खाली मिळेल . . . http://www.avakashvedh.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/31/2014 - 01:04

In reply to आयुर्हित by अनिरुद्ध प

Permalink

विस्तृत?

तिथे माहिती आहे हे मान्य, पण विस्तृत?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Fri, 01/31/2014 - 13:22

In reply to विस्तृत? by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ज्याचा त्याचा

नजरिया दुसरे काय?कारण मला तरी आयुर्हित यानी दिलेल्या लिन्क्स पेक्षा ईथली माहिती जास्त विस्त्रुत वाटली ती सुद्धा मराठी भाषेतली.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/31/2014 - 01:15

In reply to बाकी सगळं ठीक पण by प्रसाद गोडबोले

Permalink

भारी श्लोक आहे बे. कुठला आहे

भारी श्लोक आहे बे. कुठला आहे म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 02/09/2014 - 00:45

In reply to भारी श्लोक आहे बे. कुठला आहे by बॅटमॅन

Permalink

श्रीमदाद्यशंकराचार्य कृत

श्रीमदाद्यशंकराचार्य कृत एकश्लोकि http://sanskritdocuments.org/all_pdf/ekashloki.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 02/09/2014 - 01:48

In reply to श्रीमदाद्यशंकराचार्य कृत by प्रसाद गोडबोले

Permalink

ओह अच्छा, धन्यवाद!

ओह अच्छा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com