"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
124047
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या
In reply to नारकॉटैक्स कायद्या नुसार अटक by जासुश
पोलिस
In reply to कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या by संजय क्षीरसागर
धन्यवाद संक्षी
In reply to कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या by संजय क्षीरसागर
मी तसा आआपचा विरोधक आहे!
In reply to धन्यवाद संक्षी by पुण्याचे वटवाघूळ
अपेक्षाभंग का?
बाकी आआप किंवा कोणताही पक्ष
In reply to अपेक्षाभंग का? by ऋषिकेश
सुशिक्षित मतदार योग्य त्या
In reply to बाकी आआप किंवा कोणताही पक्ष by बंडा मामा
?
In reply to सुशिक्षित मतदार योग्य त्या by पिशी अबोली
उमेदवार पण बघायला पाहिजे ना?
In reply to ? by ऋषिकेश
राष्ट्रीय पातळीवरील फरक
In reply to उमेदवार पण बघायला पाहिजे ना? by पैसा
राष्ट्रीय पातळीवर मतदान
In reply to राष्ट्रीय पातळीवरील फरक by ऋषिकेश
बाकी, आधीच्या प्रतिसादात
In reply to उमेदवार पण बघायला पाहिजे ना? by पैसा
विकासशेठ , चॅनेल बदलुन बदलुन
कंटाळा आला अभ्यासाचा आणि
In reply to विकासशेठ , चॅनेल बदलुन बदलुन by सुहास..
विकास यांना सांगितलेले
In reply to कंटाळा आला अभ्यासाचा आणि by बंडा मामा
मी इथे कुणाचीही प्रतिमा हनन
In reply to विकास यांना सांगितलेले by आनन्दा
जरा
शिवसेना आणि मनसे ह्यांचा
In reply to जरा by चिरोटा
सहमत.
In reply to जरा by चिरोटा
>>> ५)एन्रॉन अरबी समुद्रात
In reply to जरा by चिरोटा
हम्म
In reply to >>> ५)एन्रॉन अरबी समुद्रात by श्रीगुरुजी
त्याचे परीणाम
In reply to जरा by चिरोटा
आजच फेसबुक वर हे वाचलं..
आधीच्या लोकांनी कधी 'हा चला
In reply to आजच फेसबुक वर हे वाचलं.. by पिलीयन रायडर
सहमत आहे.
In reply to आधीच्या लोकांनी कधी 'हा चला by प्यारे१
मीडिया ला मुख्यमंत्री म्हणून
In reply to आधीच्या लोकांनी कधी 'हा चला by प्यारे१
जग बदलले, आपला देश सुद्धा
मला तरी आप चा एक ही निर्णय
+१
In reply to मला तरी आप चा एक ही निर्णय by प्रसाद१९७१
त्या काही दिवसात कॉंग्रेस
In reply to मला तरी आप चा एक ही निर्णय by प्रसाद१९७१
आआप
सह्मत
In reply to आआप by अर्धवटराव
पण दुर्दैवाने आआप फेल झालं तर सामान्य जनतेकरता तो एक मोठा सेटबॅक असेल.सह्मतपण दुर्दैवाने आआप फेल झालं तर सामान्य जनतेकरता
In reply to आआप by अर्धवटराव
अगदी चपखल उदाहरण. आम्हाला
In reply to आआप by अर्धवटराव
"आप" ही कोन्ग्रेसची "बी" टीम असेल तर मला वाटते शीला दिक्षीतना
असं काही असेल असं वाटत नाही हो...
ह्म्म
In reply to असं काही असेल असं वाटत नाही हो... by वडापाव
अरविंद केजरीवाल यांचा संक्षींनी डकवलेला इंटरव्ह्यू
In reply to ह्म्म by आनन्दा
कॉन्ग्रेसला या खेळी मूळे मिळणारा राज़कीय फायदा
In reply to असं काही असेल असं वाटत नाही हो... by वडापाव
एका दगडात बरेच पक्षी
बेजबाबदारपणा
फरक
In reply to बेजबाबदारपणा by श्रीरंग_जोशी
स्वतःला अॅनार्किस्ट म्हणून
In reply to फरक by विकास
ते अनार्किस्ट म्हणून घेणे हा
In reply to स्वतःला अॅनार्किस्ट म्हणून by बंडा मामा
उत्तम प्रतिसाद
In reply to ते अनार्किस्ट म्हणून घेणे हा by आनन्दा
सध्याची स्थिती पाहता, मोदींना
In reply to उत्तम प्रतिसाद by बंडा मामा
येडीयुरप्पा आणि गडकरी?
In reply to उत्तम प्रतिसाद by बंडा मामा
ये
In reply to येडीयुरप्पा आणि गडकरी? by श्रीरंग_जोशी
दिल्ली पोलिस
+१
In reply to दिल्ली पोलिस by हुप्प्या