आप की बदमाशियोंके....
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122894
वाचनखूण
केजरीवाल का iPhone अनलॉक कराने Apple के पास पहुंची ED, जानिए क्य
केजरीवाल, जेल मधुन राज्यशकट हाकू शकतील का?
In reply to केजरीवाल, जेल मधुन राज्यशकट हाकू शकतील का? by मुक्त विहारि
हीच बातमी, चक्क मराठी वर्तमान पत्रात पण आली....
#WFJ
केजरीवाल
In reply to केजरीवाल by चंद्रसूर्यकुमार
असहमत
In reply to असहमत by सर टोबी
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसाद
In reply to पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसाद by सर टोबी
>>>परंतू राम मंदिर आणि
In reply to पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसाद by सर टोबी
:) :)
In reply to केजरीवाल by चंद्रसूर्यकुमार
केजरीवाल आणि कंपनीवर, माझा कधीच विश्वास न्हवता.
दिल्ली उच्चन्यायालयात केजरीवालांना दिलासा नाही
In reply to दिल्ली उच्चन्यायालयात केजरीवालांना दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
तरुण मिपाकर
In reply to तरुण मिपाकर by सर टोबी
:)
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
केजरीवालांना तातडीने दिलासा नाही
In reply to केजरीवालांना तातडीने दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
आता केजरीवालांच्या याचिका
In reply to केजरीवालांना तातडीने दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
केजरीवालांनी आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे
In reply to केजरीवालांनी आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे by सर टोबी
त्यांच्यासाठी अपवाद करून
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by सुबोध खरे
त्यांच्यासाठी अपवाद करून
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
अस का लिहिलय ते सविस्तर लिहा.
In reply to अस का लिहिलय ते सविस्तर लिहा. by अमरेंद्र बाहुबली
खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून
In reply to खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून by सुबोध खरे
जोडगोळी
In reply to खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून by सुबोध खरे
आणि खुनशी जोडगोळीची यामुळे
In reply to आणि खुनशी जोडगोळीची यामुळे by अमरेंद्र बाहुबली
सुप्रीम
In reply to सुप्रीम by कांदा लिंबू
मी काही चुकीच लिहीलय असे वाटत
In reply to मी काही चुकीच लिहीलय असे वाटत by सुबोध खरे
खांद्याखाली आणि कमरेवर बळकट
मी अश्या देशात राहतो जिथे
In reply to मी अश्या देशात राहतो जिथे by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही स्वतः
In reply to तुम्ही स्वतः by वेडा बेडूक
अबा फसले.
In reply to अबा फसले. by कर्नलतपस्वी
+२ खिक्क खिक्क खिक्क
In reply to मी अश्या देशात राहतो जिथे by अमरेंद्र बाहुबली
अरेरे. म्हणूनच लेखमाला अर्धवट राहिलेली दिसते.
केजरीवालांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही
In reply to केजरीवालांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही by चंद्रसूर्यकुमार
शेवटी भविष्यात मिळू शकणाऱ्या
काल रात्री मला स्वप्न पडले.
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
रात्री ना मग काही उपेग नाही.
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
पुढील सत्यापना...
In reply to पुढील सत्यापना... by कर्नलतपस्वी
मागच्या विधानसभे वेळी मी
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
पुढील सत्यापना....
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
श्री योगेंद्र यादव ह्यानी
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
देशातले लाखो रुपये खर्चून
In reply to देशातले लाखो रुपये खर्चून by अमरेंद्र बाहुबली
मूळ धागा काय आहे? प्रतिसाद
In reply to मूळ धागा काय आहे? प्रतिसाद by सुबोध खरे
ते,
हाईकोर्ट ने कहा-शराब नीति केस में केजरीवाल की गिरफ्तारी सही:ED न
केजरीवाल को वकीलों से हफ्ते में 5 बार मुलाकात की क्यों नहीं मिली
राजकुमार आनंद यांचा राजीनामा
In reply to राजकुमार आनंद यांचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
गद्दार
In reply to गद्दार by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to राजकुमार आनंद यांचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
केजरीवालांनी स्वतःला अटक करून