✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

व
वेल्लाभट यांनी
Sun, 01/12/2014 - 13:50  ·  लेख
लेख
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे. सर्वांगाला व्यायाम देतानाच कार्डिओ म्हणजेच ह्रुदयाला व्यायाम देणारा, किंवा स्टॅमिनाचाही कस लावणारा असा हा व्यायाम, `बर्पी'. केवळ हाच व्यायाम आणि जोडीला स्ट्रेचिंग, किंवा काही योगासनं, असाही दिनक्रम ठेवून तुम्ही तुमचं फिटनेस चं उद्दिष्ट साध्य करू शकता. हे काय असतं ब्वा, कसं करायचं?... ते असं. १. ताठ उभं रहा. नजर समोर. २. पुढे खाली वाकून पावलांच्या बाजूस (अगदी बाजूस नसले तरी किंचित पुढे, फार नको) दोन्ही हात ठेवा. (इथे गुडघ्यात वाकल्यास हरकत नाही.) ३. दोन्ही पाय मागे फेकत `पुशअप पोजिशन' मधे या. ४. एक पुशअप करा. (न जमल्यास ही स्टेप वगळा) ५. पाय पुन्हा उडी मारून हाताजवळ आणा. (स्टेप २) ६. हात उंच करत बसल्या स्थितीतून उडी मारून स्टेप १ च्या स्थितीत या. a तूनळी वर याचे अनेक व्हिडियो मिळतील, आंतरजालावर बरीच माहिती मिळेल. हा सुद्धा साधारण सगळ्या वयोगटांना जमू शकणारा व्यायाम आहे. तेंव्हा वेळ कमी असेल, फिटनेस तरीही महत्वाचा असेल, तर बर्पीसाधना करायला हरकत नाही. हमखास फरक जाणवेल, तुम्हाला आणि पर्यायाने इतरांनाही. एक बर्पी चॅलेंज म्हणून प्रकार करतात काही जण. १ बर्पी पासून सुरुवात करून रोज १ अशा प्रकारे संख्या वाढवत न्यायची आणि १०० दिवसा अखेर तुम्ही न थांबता एका दमात १०० बर्पी करायच्या. .... ऐकायला कदाचित कठीण वाटेल पण ट्राय करायला हरकत नाही ना! १०० नाही ५० तरी होतीलच एका दमात. मुद्दा काय, आपला स्टेमिना आहे त्यापेक्षा चांगल्यापैकी वाढला पाहिजे... त्यातच विजय आहे..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत
माहिती

प्रतिक्रिया द्या
19436 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

बर्पी

तिमा
Sun, 01/12/2014 - 14:38 नवीन
नियमित बर्पी केल्यावर बर्फी खाल्ली तर चालेल का ?(डायबिटिस नाही असे धरुन) नवीन व्यायामप्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नवीन व्यायामप्रकार

आयुर्हित
Sun, 01/12/2014 - 20:29 नवीन
नवीन व्यायामप्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद. मुद्दा काय, आपला स्टेमिना आहे त्यापेक्षा चांगल्यापैकी वाढला पाहिजे... त्यातच विजय आहे.. १००% सहमत. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments

:)

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 15:05 नवीन
थँक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

व्यायाम उत्तमच !

इन्दुसुता
Sun, 01/12/2014 - 21:34 नवीन
शरीराला ज्याप्रमाणे वेगवेगळ्या न्युट्रींअट्सची गरज असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यायामाची देखील. वर दिलेला व्यायाम चांगला आहे तो कोअर साठी.. एरोबिक म्हणण्यासाठी तेव्हढा विदा उपलब्ध नाही. याशिवाय माझ्यामते 'बर्पी' ने सर्वांगाला व्यायाम होत नाही. जागा आणि वेळ याची शहरी जीवनात घालावी लागणारी सांगड लक्षात घेता हा एक चांगला पर्याय आहे नक्की !! :)
  • Log in or register to post comments

कोअर साठी उत्तम आहे हे मान्यच

वेल्लाभट
Sun, 01/12/2014 - 22:44 नवीन
कोअर साठी उत्तम आहे हे मान्यच. नक्कीच. बॉडी बॅलन्स मस्त सुधारतो याने. पण कसं आहे, की दुसर-या स्टेप मधे हॅमस्ट्रिंग्स ना स्ट्रेच, पुशअप पोजिशन मधे शोल्डर, पुशअप ने पेक्स म्हणजे चेस्ट, ट्रायसेप्स, शोल्डर्स, काही अंशी लॅट्स, तसंच पुढे स्क्वॉट थर्स्ट मधे क्वाड्रासेप्स, काफ्स, ग्लूट्स....असं सगळंच अ‍ॅड्रेस होतं की.... झालंच ना सर्वांग ! :) काय, बरोबर ना? चुकलं तर सांगा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता

पूर्ण सहमत

srahul
गुरुवार, 07/09/2020 - 15:12 नवीन
पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सूर्यनमस्कारापेक्षा फार

काकाकाकू
Sun, 01/12/2014 - 23:09 नवीन
वेगळं नाहि असं वाटतं. "आपल्याकडे आधीच शोध लावलाय" छाप प्रतिक्रिया द्यायचा उद्देश नाही!! खरंच फार वेगळम नाही वाटतंय. याला 'बर्पी' हे का बुवा नाव आहे?
  • Log in or register to post comments

तेच म्हणायला आलो

अनिरुद्ध प
Mon, 01/13/2014 - 13:34 नवीन
होतो +१ काकाकाकु यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकाकाकू

याला 'बर्पी' हे का बुवा नाव आहे?

srahul
गुरुवार, 07/09/2020 - 15:15 नवीन
रॉयल एच बर्पी या माणसाने हा व्यायाम प्रकार शोधला म्हणून त्याचे नाव बर्पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकाकाकू

सहा जमले मला !!!

खटपट्या
Sun, 01/12/2014 - 23:33 नवीन
सहा जमले मला !!!
  • Log in or register to post comments

गुड!

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 15:05 नवीन
गुड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

इथे वाचले आणि टूब नळीवर

देव मासा
Mon, 01/13/2014 - 02:11 नवीन
इथे वाचले आणि टूब नळीवर विडेओ पहिले, माझ्या सारख्या स्थुल लोकांना पटकन जमेल असे वाटत नाही, शरीराच्या भार मुळे होणारा अपघात टाळता यावा म्हणून तोंडा समोर खाली उशी ठेवीन म्हणतो
  • Log in or register to post comments

हेहेहे... ठेवा ठेवा. सावकाश.

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 15:06 नवीन
हेहेहे... ठेवा ठेवा. सावकाश. धडपडू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा

सुपरलाईक देवमाशा

चंबा मुतनाळ
गुरुवार, 01/16/2014 - 20:30 नवीन
सुपरलाईक देवमाशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा

जिममध्ये ज्यादिवशी जाणं शक्य

सूड
Mon, 01/13/2014 - 10:43 नवीन
जिममध्ये ज्यादिवशी जाणं शक्य नसेल तेव्हा करायला बराय. व्यायामप्रकारांसोबत तुमच्या आणखी काही हेल्दी रेसिपीज असतील तर त्याही देत चला. पीनट बटर तर भारीच आहे आणखी काही पाकृ असतील तर त्याही येऊद्या.
  • Log in or register to post comments

जरूर ... धन्यवाद

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 15:06 नवीन
जरूर ... धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यालाच सपात्या असेही म्हणतात..

सुखी
Mon, 01/13/2014 - 14:36 नवीन
यालाच सपात्या असेही म्हणतात... बहुतेक पुण्याचे पेशवे यान्नी हा प्रकार आधी सान्गितला होता. (चुभुदेघे)
  • Log in or register to post comments

अच्छा या सपात्या होय !

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 15:08 नवीन
असेल असेल :D खिखिखि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

यालाच सपात्या असेही म्हणतात...

srahul
गुरुवार, 07/09/2020 - 15:17 नवीन
सपाटे हा व्यायाम प्रकार बर्पी सारखाच आहे पण त्यात जोर आणी बैठक एकत्र येते , बर्पीत बरेच प्रकार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

सूर्यनमस्कार अधिक सोपे आहेत

मंदार दिलीप जोशी
Mon, 01/13/2014 - 18:27 नवीन
सूर्यनमस्कार अधिक सोपे आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

आवडला, सोप्पाय,

शैलेन्द्र
Mon, 01/13/2014 - 19:07 नवीन
आवडला, सोप्पाय, माझ्या आवडीचा अजून एक प्रकार सांगतो, १ बैठक/९ जोर- २ बैठका/८ जोर- ३ बैठका/७ जोर......... असं ९ बैठका/१ जोर पर्यंत करायच.. मग २० सीट अप्स, असा एक सेट.. तो झाला की २ मिनिट विश्रांती, मग पुन्हा उलट रिपीट,, (१ जोर/९ बैठका).. असे तीन चार सेट २०-३० मिनीटात मारून होतात.. सर्वांगाला व्यायाम घडवणारी इतकी छान पद्धत दुसरी नाही ..
  • Log in or register to post comments

जोर म्हणजे?

सूड
Mon, 01/13/2014 - 19:57 नवीन
जोर म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अरे पुशपसारखाच प्रकार की. पण

बॅटमॅन
Mon, 01/13/2014 - 20:00 नवीन
अरे पुशपसारखाच प्रकार की. पण फरक आहे. पुशपसदृश ज्या स्टेप सूर्यनमस्कारात आहेत तसेच करायचे. पण दॅट असाईड, त्याला अख्ख्या म्हाराष्ट्रभर जोरच म्हणतात. तुला ही संज्ञा ठौक नसावी याचे परमाश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुश अप्स माहितीये. जोर ऐकलंय

सूड
Mon, 01/13/2014 - 20:10 नवीन
पुश अप्स माहितीये. जोर ऐकलंय पण म्हणजे काय हे माहिती नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

याला ही लोकं इंडीयन पुशअप

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 22:35 नवीन
याला ही लोकं इंडीयन पुशअप म्हणतात बर का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

http://www.youtube.com/watch

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 22:35 नवीन
http://www.youtube.com/watch?v=Ljx5XQqq6rQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

`ये पी एस पी ओ नही जानता.....

वेल्लाभट
Mon, 01/13/2014 - 22:51 नवीन
`ये पी एस पी ओ नही जानता.........' वाल्या अ‍ॅड सारखं म्हणावसं वाटलं मला हा प्रतिसाद वाचून. असो. अहो आपल्या आधीच्या पिढ्याच्या पिढ्या जोर आणि बैठका मारूनच बलसाधना करायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओक्के काका !!

सूड
Tue, 01/14/2014 - 01:30 नवीन
ओक्के काका !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बर्‍याच ठिकाणी 'सूर्यनमस्कार'

प्यारे१
Tue, 01/14/2014 - 01:37 नवीन
बर्‍याच ठिकाणी 'सूर्यनमस्कार' असा प्रतिशब्द ऐकलाय 'जोर' साठी. वेल्लाभटसेठ्चा सौम्य णि षे ढ. नस्तंय एखाद्याला माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वोके!

वेल्लाभट
Tue, 01/14/2014 - 09:14 नवीन
बरं.... मान्य. णिषेढ स्वीकारला... पण नसतोय एखाद्याला विश्वास बसत त्या माहित नसण्यावर... चालायचंच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>पण नसतोय एखाद्याला विश्वास

सूड
Tue, 01/14/2014 - 14:26 नवीन
>>पण नसतोय एखाद्याला विश्वास बसत त्या माहित नसण्यावर एकच मार्‍या पण लै सॉलिड मार्‍या !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जोर आणि सूर्यनमस्कार हे एकच

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 14:37 नवीन
जोर आणि सूर्यनमस्कार हे एकच आहेत असा महान शोध लावलेले लोक कोण म्हणे ते???? ऐकावं ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अनेक जण आहेत रे. इन फॅक्ट

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/16/2014 - 18:53 नवीन
अनेक जण आहेत रे. इन फॅक्ट,अनेक वर्षे मी कुणाला जोर म्हणताना ऎकले नव्हते. त्याला सर्रास सूर्यनमस्कार म्हणतात लोकं. सुधारुन सुधारुन थकलो. शेवटी कुठले सूर्यनमस्कार, १२ चे की १ चे असे विचारतो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म, धिस मे बी अ रीजनल थिंग

बॅटमॅन
गुरुवार, 01/16/2014 - 18:56 नवीन
हम्म, धिस मे बी अ रीजनल थिंग देन. किमान सांगली-कोल्हापूर-सातारा-सोलापूर इकडे तरी जोरच म्हटलेले ऐकले आहे. चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पश्चिम महाराष्ट्र

कपिलमुनी
गुरुवार, 01/16/2014 - 19:00 नवीन
हाच खरा महाराष्ट्र ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाही हो

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 01/16/2014 - 19:13 नवीन
सुर्यनमस्कार म्हणजे वेगळे. http://www.youtube.com/watch?v=hxbrUpVk03U सुर्यनमस्कारमधल्या ३-४ स्टेपच जोर या प्रकारात येतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो 'खरे' मेहेंदळे ,

प्यारे१
Fri, 01/17/2014 - 02:53 नवीन
अहो 'खरे' मेहेंदळे , आम्हाला माहिती आहे सूर्यनमस्कार म्हणजे काय ते! संघाच्या शिबीरात १०१ वगैरे घातले आहेत. १० वाले पण माहिती आहेत नि समितीवाल्या बायका घालतात ते १२ आकड्याचे पण ठाऊक आहेत. त्या 'खोट्या' मेहेंदळेंनी दिलेलं स्टेटमेंट नि माझं स्टेटमेंट बरंचसं सारखं आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

>>अहो 'खरे' मेहेंदळे

सूड
Fri, 01/17/2014 - 14:17 नवीन
>>अहो 'खरे' मेहेंदळे पुरषांनी दोन आडनावं लावायची फेसबुकी फ्याशन मिपावर पण सुरु झाली काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फेसबुकावर १ सोडले तर असे

बॅटमॅन
Fri, 01/17/2014 - 14:26 नवीन
फेसबुकावर १ सोडले तर असे कुणालाही करताना पाहिले नाही. म्यारिड म्हैलांची तर अजूनच येगळी फ्याशन. स्वतःचं आणि नवर्‍याचं अशी दोन दोन नावे लावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

श्री वेल्लाभट

विटेकर
Tue, 01/14/2014 - 10:08 नवीन
श्री वेल्लाभट यांना " मिपा चे रामदेवबाबा " हा पुरस्कार द्यावा का ?
  • Log in or register to post comments

नाही; मला प्रात्यक्षिकं करून

वेल्लाभट
Wed, 01/15/2014 - 07:11 नवीन
नाही; मला प्रात्यक्षिकं करून दाखवायला सांगाल तर जमायची नाहीत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

दोनशे मिटरस दुरच्या

कंजूस
Wed, 01/15/2014 - 07:28 नवीन
दोनशे मिटरस दुरच्या विहिरीवरून पाणी सांधून दोन घागरी घेऊन येणे हा सर्वांगाला चांगला व्यायाम आहे (होता). चमचमित खाऊन ,टुविलरने(अथवा ऑटो) प्रवास करून वाचवलेली चरबी आणि शक्ती चकाचक एसीजिम मध्ये दृष्टिसुख घेत महिना हजार रूपये देऊन खर्च करणे हा सर्वांगसुंदर नवीन प्रकार आहे .
  • Log in or register to post comments

व्यायाम

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 01/15/2014 - 22:08 नवीन
पण करतो कोण लेकाचा, सा X कळत पण वळत नाही ("वळत" मध्ये कायतरी मराठी व्याकरणातील कायसस आहे )
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
गुरुवार, 01/16/2014 - 09:35 नवीन
सूर्यनमस्काराचा जुळा भाऊ दिसतोय.
  • Log in or register to post comments

बरोबर, सुर्यनमस्करामधुनच

खटपट्या
Fri, 01/17/2014 - 00:17 नवीन
बरोबर, सुर्यनमस्करामधुनच काढलेला पाश्चिमात्य प्रकार वाटतोय. चांगला आहे पण. सध्या चालू आहे. आणि नियमित केल्यास बरेही वाटते. स्वानुभवावरून एक सूचना - थोडेही दमल्यासारखे वाटल्यास जरूर थांबा. चक्कर येयिपर्यन्त करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

धन्यवाद, नविन माहिती.

अबोल बाहुली
गुरुवार, 01/16/2014 - 16:26 नवीन
धन्यवाद, नविन माहिती.
  • Log in or register to post comments

हं......

सुदर्शन काळे
गुरुवार, 01/16/2014 - 16:47 नवीन
करुन बघायला हवा हा व्यायाम..
  • Log in or register to post comments

सूर्यनमस्काराशी तुलना

वेल्लाभट
गुरुवार, 01/16/2014 - 20:22 नवीन
सूर्यनमस्कार फार वेगळे आहेत, त्यात १२ स्थितींमधे ठहराव असतो, ज्यायोगे स्नायू आकुंचन - प्रसरण पावतात. जोरांमधे ठहराव कमी असतो. Vigour जास्त असतो. आणि बर्पीज हा तुलनेने पटापट करायचा प्रकार आहे. न थांबता एका मागोमाग आवर्तनं केली की याची खरी गंमत कळते.
  • Log in or register to post comments

मला एक विचारायचंय

Atul Thakur
गुरुवार, 01/16/2014 - 21:56 नवीन
कुठलाही व्यायाम सांगतात्य्तो कुणी करु नये हे देखिल सांगतात. वेल्लाभटजी, ज्याला बीपी आहे, स्लीप डीस्क किंवा स्पाँडीलॉसीस आहे त्याने हा व्यायाम करावा काय?
  • Log in or register to post comments

मला तरी वाटते डॉक्टर चा

खटपट्या
Fri, 01/17/2014 - 00:40 नवीन
मला तरी वाटते डॉक्टर चा सल्ल्याशिवाय आजिबात करू नये. बाकी वेल्लाभट सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Atul Thakur
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा