Skip to main content

घन टमी..

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 10/01/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे. घन टमी,पँट बघ घट्ट करी रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी ये बाहेरी व्यायाम करुनी शुद्ध मोकळ्या हवेत का बसशी,कोचातच रुतुनी रे! मार बैठका जोर तरी जड झाले, अति गोड खादले स्नायु नुरे,बेढब तनु डुले मेद जमे,बघ पोटही सुटले का मरणाशी खेळ चाले मना,वृथा का भीशी जगण्या दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा वसुंधरा पाहे वाट मना पसरोनी शेला हिरवा परी मूळ कविता:- घन तमीं शुक्र बघ राज्य करी रे खिन्‍न मना,बघ जरा तरी ! ये बाहेरी अंडे फोडुनि शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरशी आतच कुढुनी ? रे ! मार भरारी जरा वरी फूल गळे, फळ गोड जाहले बीज नुरे, डौलात तरु डुले तेल जळे, बघ ज्योत पाजळे का मरणि अमरता ही न खरी ? मना, वृथा का भीशी मरणा ? दार सुखाचे ते हरि-करुणा ! आई पाही वाट रे मना पसरोनी बाहु कवळण्या उरी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7680
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

In reply to by सूड

त्यांनी घागर चं घागरी होतं तशा प्रकारे लिहिलंय रे. त्यातून अर्थाचा अनर्थ झाला तरी विडंबन असल्याने चालून जाईल!

In reply to by सूड

सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन असंच अस्तय. उदा:- टेबल- टेबलं. प्लेट-प्लेटी. तसंच पॅन्ट - पॅन्टी. मराटीत लिवलंय.. तं मराटीत्लाच अर्त घ्याचा. ;)

In reply to by यसवायजी

मराटीत ईजार लिवतंत मरे!! काय तरी दिवस आले हत, हो कानडी येव्न माका मराटी शिकवताहां. ;)

In reply to by सूड

वरचे कोङ्कणीसदृश बघोन कानड्यांनी मराठी शिकविणे योग्यच आहे असा पैठणपीठाधिपतींचा आदेश आहे ;) (सीमाभागाभिमानी) ब्रूसण्णा वेनाप्पा.

In reply to by सूड

कोंकणीसदृश म्हणालो रे मेल्या!!! आम्हा देशावरच्यांना कोंकणी काय मालवणी काय सगळं सारखंच!

तुम्ही पँटी का घातलीत? पँटी हे एक स्त्रीजातीच्या मनुष्यांनी वापरावयाचे अंतर्वस्त्र असते ना? ;)

तिमांचा विडंबिक अभ्यास बाकी लैच जबराट बघा =)) अन्यत्र तिमांनीच बहुतेक स्ट्रेचलॉनला खेचलॉन हा शब्द वापरला होता. पण इथे फिनिश अंमळ कमी पडले असे वाटले. घन टमी वर सिक्सर मारून सुरुवात केली पण तिसर्‍या कडव्यातली फटकेबाजी चौथ्यात अंमळ मेडन ओव्हरीगत वाटली. हायलाईट म्हणजे घन टमी ही संज्ञा. याने अन तिसर्‍या कडव्यातील फटकेबाजीने मात्र आम्ही फ्ल्याट झालो ते अजून त्रिमित होतच आहोत =))

विडंबन आवडलं. पुरोगामी औदार्याच्या व्यथा अगदी नेमकेपणाने मांडल्या आहेत ;)

In reply to by नंदन

ठ्ठो =)) =)) =)) नंदनशेठ ने एक ही बात क्या बोली है...बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है =)) धन्य _/\_

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. प्रतिसाद पण मस्तच आहेत. विशेषतः नंदन यांचा 'पुरोगामी औदार्याचा'! पँटी लिहिल्याने अर्थाचा अनर्थ झाला हे मान्य. पण मराठी लेकरु हाय,समजून घ्यावा.

काय वजन आहे राव काव्याला ! आहाहाअहाहा ! बेस्ट लईच्च्च आवडलं. पण दुसरा तिसरा अंतरा तितका जमला नाही जितकं धृवपद आणि पहिला अंतरा जमला.... एनिवेज..... विडंबन जबरदस्त म्हणू मी तव प्रतिभा असे ही खरी

घन टमी, मेद बघ माज करी रे लाव आता जिम जरा तरी ये बाहेरी दंड ठोकूनि फिर मोकळ्या वातावरणी का तडमडशी खुर्चीत बसूनि रे मार सपात्या जरा वरी तितकंसं मनासारखं झालं नाही पण द्यायचा मोह आवरला नाही.