घन टमी..
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे.
घन टमी,पँट बघ घट्ट करी
रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी
ये बाहेरी व्यायाम करुनी
शुद्ध मोकळ्या हवेत
का बसशी,कोचातच रुतुनी
रे! मार बैठका जोर तरी
जड झाले, अति गोड खादले
स्नायु नुरे,बेढब तनु डुले
मेद जमे,बघ पोटही सुटले
का मरणाशी खेळ चाले
मना,वृथा का भीशी जगण्या
दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा
वसुंधरा पाहे वाट मना
पसरोनी शेला हिरवा परी
मूळ कविता:-
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना,बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
हीहीहीही!!!!
सॉल्लीड!
नंदनला भेटला
मस्त जमलीय !!!
अरारारा!
+१
ह्म्म जमलंय.
हीहीही!
स्वाक्षरी
सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन
प्यान्टा म्हणा की सरळ! उगा
मराटीत ईजार लिवतंत मरे!! काय
वरचे कोङ्कणीसदृश बघोन
कोकणी खंयसून इली? मालवणीत
कोंकणीसदृश म्हणालो रे मेल्या!
आठवणीमै बातां : रंगाकाकाची
धमाल !
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने ....
घन टमी,पँट बघ घट्ट करी
तिमांचा विडंबिक अभ्यास बाकी
मस्त
ठ्ठो =))
धन्यवाद
काय वजन आहे राव काव्याला !
भन्नाट !
ग्रेट
"तुमची सही" या कवितेतल्या
मीटरमंदी बसवायचा छोटासा प्रयत्न !! ;)