पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे.
घन टमी,पँट बघ घट्ट करी
रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी
ये बाहेरी व्यायाम करुनी
शुद्ध मोकळ्या हवेत
का बसशी,कोचातच रुतुनी
रे! मार बैठका जोर तरी
जड झाले, अति गोड खादले
स्नायु नुरे,बेढब तनु डुले
मेद जमे,बघ पोटही सुटले
का मरणाशी खेळ चाले
मना,वृथा का भीशी जगण्या
दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा
वसुंधरा पाहे वाट मना
पसरोनी शेला हिरवा परी
मूळ कविता:-
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना,बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7666
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीहीहीही!!!!
सॉल्लीड!
नंदनला भेटला
In reply to सॉल्लीड! by विकास
मस्त जमलीय !!!
अरारारा!
+१
In reply to अरारारा! by पैसा
ह्म्म जमलंय.
हीहीही!
In reply to ह्म्म जमलंय. by सूड
स्वाक्षरी
In reply to ह्म्म जमलंय. by सूड
सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन
In reply to ह्म्म जमलंय. by सूड
प्यान्टा म्हणा की सरळ! उगा
In reply to सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन by यसवायजी
मराटीत ईजार लिवतंत मरे!! काय
In reply to सूड्राव्, अहो मराठीत अनेकवचन by यसवायजी
वरचे कोङ्कणीसदृश बघोन
In reply to मराटीत ईजार लिवतंत मरे!! काय by सूड
कोकणी खंयसून इली? मालवणीत
In reply to वरचे कोङ्कणीसदृश बघोन by बॅटमॅन
कोंकणीसदृश म्हणालो रे मेल्या!
In reply to कोकणी खंयसून इली? मालवणीत by सूड
आठवणीमै बातां : रंगाकाकाची
धमाल !
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने ....
घन टमी,पँट बघ घट्ट करी
तिमांचा विडंबिक अभ्यास बाकी
मस्त
ठ्ठो =))
In reply to मस्त by नंदन
धन्यवाद
काय वजन आहे राव काव्याला !
भन्नाट !
ग्रेट
"तुमची सही" या कवितेतल्या
In reply to ग्रेट by अमेय६३७७
मीटरमंदी बसवायचा छोटासा प्रयत्न !! ;)