गपचिप
आमची आई येकदम वाईट.
च्या काय देत नाही कदी.
ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई.
आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”
त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं.
मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.”
आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी!
पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकला तो गपचिप.
येकदम झ्याक.
तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ...
प्या च्या.....
पावणे नाय आले तर?
म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान.
आई करतेच च्या.
म्याबी पिते.
उलिसा.
गपचिप.
* शतशब्दकथा
Book traversal links for गपचिप
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
कथा आवडली हाय .
लै भारी ! ही पोर लै चॅप्टर
एकदम खरं हाय.
कथा आवडली.
पोर लय गुणाची
(No subject)
आवडेश!
काय ट्याक्ट तरी
आंजीच हाय न्हव ही.
आंजी?
ढेप?
(No subject)
आवचिंदर
झ्याक हाये…
मस्त लिहिलंय!
आवडली गोष्ट
गपचिप. टाळी घ्या!!
लै भारी!!!
मस्त...
(No subject)
आंजी थोडी मोटी जाली की
आवड्ली
आवडली
एवढी छोटि का कथा अजुन जरा
धन्यवाद.
(No subject)
(No subject)
ओके माहितच न्हवत मला असाही
भारीच!
या पोरीचा..
वाटलं नव्ह्तं वं पोट्टे
इचक?
लई ऊचक वाचक करते पोट्ट!!!
आमच्या विदर्भात हा शब्द खुप
आमच्या विदर्भात हा शब्द खुप वापरला जातो बदमाश पोट्टे लोकाई साठी म्हनुनशान तसं म्हटलं:-) शब्द वापराबद्दल काहीच नाराजी नाही हो, शब्द मला माहिती नव्हता म्हणून त्याचा अर्थ विचारला इतकंच. शब्द या प्रसंगाला चपखल बसतो आहे हे वेगळे सांगायला नको :-)नाही हो, तुम्ही फक्त शब्दाचा
इचक..
अरे वा! एकदम बरेच नवीन शब्द
इचक हा शब्द नवीन होता. बाकी
मख्या..
इपितर मराठवाड्यात पण चालते.
गैबती
हाहाहा गहिन्या, गाबड्या हे
>>>इपित्तर
आवडली
आभार
:-)
बघा, आणि लोकांना उगीच शंका की
अर्थात तुमच्या एवढे काही
मस्त