आजच ए.बी.पी. माझा वर एक मन सुन्न करणारी बातमी पाहिली. नांदेड लातूर या ठिकाणच्या कायम विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले. भारतामध्ये आज रोजगाराची फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. आज कौटुंबिक जबाबदारी किंवा परिवाराचे पालनपोषण या साठी लोकांचा परीस्थीतिशी, महागाईशी अविरत असा न संपणारा झगडा सगळीकडे सुरु असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रामध्येही रोजगाराचे चित्र फार आशादायक नाही हे वरील उदाहरणावरून लक्षात येते. मी काम करतो त्या भारती विद्यापीठामध्ये जाताना (धनकवडी ते कोथरूड ) प्रवासामध्ये मी रोज वारजे जकात नाका च्या पुलाखाली सकाळी अकुशल कामगारांचा (जवळ जवळ ५०० ते १००० कामगार असतील ) मेळा पाहत असतो, त्यांची ती जगण्याची धडपड पहिली कि मनाला वेदना होतात. तिन्ही ऋतूमध्ये ऊन, पाऊस, वारा, थंडी यांची पर्वा न करता हे लोक रोजच्या भाकरीसाठी, मुलांच्या पोटातील भूक भागवण्यासाठी एक दिवसाच्या रोजगाराची प्रतीक्षा करत उभे राहिलेले दिसतात. अश्या लोकांना तात्पुरता रोजगार देणारा ठेकेदार तिथे आला तर हे लोक एकदम त्याच्याकडे धाव घेतात. मग कमिशन (जे २० ते ३० टक्के असते ) ठरवून तो त्यातील जेवढ्या कामगारांची गरज आहे तेवढ्याच लोकांच्या हाताला काम देतो उरलेले बाकी कामगार कुणीतरी काम देईल या आशेवर दिवसभर तिथे आपल्या लेकरांना घेवून बसून राहतात. रोजच सर्व लोकांना काम मिळत नाही. काही लोक हताश उदास आपल्या डोळ्यापुढे भविष्याची चिंता घेऊन उद्याच्या रोजगाराची काळजी करत घरी परततात. लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावरील केविलवाणी निरागसता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील मूक आक्रोश माझ्या मनाला उद्विग्न करून जातो.
ईश्वराने बनवलेली आपण सर्व लेकरे एक ए. सी. मध्ये बसून काम करणारे आपण आणि दुसरे उन्हा मध्ये राबणारे त्यांचे कष्टकरी हात परिस्थितीचा किती विरोधाभास ! नामांकित शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्यांना त्यांनी मागताच पिज्झा बर्गर देणारे आपण या काबाडकष्ट करणाऱ्या लोकांच्या मुलांना जे शिक्षणापासून मैलो दूर आहेत त्यांना बालमजूर होण्यापासून रोखू शकतो का ?
वाचने
4224
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषय चान्गला घेतला आहे.
सहमत आहे.
In reply to विषय चान्गला घेतला आहे. by आनंदराव
सहमत आहे
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
कॉलेजमधील प्राध्यापक
अधिकची भाकरी नाही
शेतात काम केलं किंवा रिक्षा
कॉलेजमधील प्राध्यापक
पिज्झा बर्गर नाही दिले तर त्या हॉटेल च्या कामगारांचे काय होणार?
श्री. म्हैस . सहमत.
अमेरिकेत खोब्रागडे बाईंबरोबर
साधारण असंच काहीतरी...
In reply to अमेरिकेत खोब्रागडे बाईंबरोबर by सुबोध खरे
***
भावना चांगल्या मांडल्या आहेत....
मला एक कळत हे वरील जे काय.....
आत्मपरिक्षणाची गरज.
In reply to मला एक कळत हे वरील जे काय..... by psajid
तिची उलीशीच चोच तेच दात, तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोट....
ह्या पूर्ण कवितेवर आणि विशेषतः शेवटच्या कडव्यावर विचार करा. मग तुमची विषय मांडणीत चूक झाली आहे. तुमच्या लेखात प्राध्यापकांना पगार मिळत नाहीए ह्याचा उल्लेख नाहिए. वाचकांना अंतर्ज्ञानाने समजेल असे गृहीत धरू नका. आणि असेही प्राध्यापकांना हॉटेलात वेटरचे किंवा शेतीवर मजूराचे काम का करावे लागते? शिक्षण क्षेत्रात 'लातूर पॅटर्न' फेमस आहे. शिकवण्या घेणारे प्राध्यापक पगाराच्या कितीतरी जास्त कमवितात हे पाहिलेले आहे. नांदेड लातूरात विद्यार्थी मिळत नसतील तर हे प्राध्यापक स्थलांतर का करीत नाहीत. पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरात स्थलांतर करून शिकवण्या करून मुख्यतः स्वार्थ आणि किंचित पर्मार्थही साधता येईल. पुण्यात वातानुकुलीत शिकवणी वर्ग प्रत्येक कोपर्यावर दिसतात. शिकवण्या करणारा प्राध्यापक वर्ग घरात २-२ गाड्या बाळगून आहेत. स्वतःच्या मुलाला 'लाँच' करण्यासाठी चित्रपट निर्मितीही करतात. तुम्ही एम बी ए केले आहे, उत्तम आहे. त्या दरम्यान अकुशल कामगारांचे व्यवस्थापन यावर प्रोजेक्ट केला आहे, ह्याचेही कौतुक आहे. पण, म्हणून ज्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात कांही वेगळा अनुभव घेतला असेल तर त्याची किंमत कमी ठरते का? एम बी ए केले म्हणून अशा वेगळ्या अनुभवांना कमी लेखण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होतो का? पठाण साहेब, तुमच्या प्रोजे़क्ट दरम्यान तुम्ही काय पाहिलंत, काय निष्कर्ष काढलेत ह्यावर एक वेगळा धागा काढून सर्व मिपासदस्यांना उपकृत करावे ही विनंती. (ही गंभीर विनंती आहे, चेष्टा करत नाहीए.) पठाण साहेब, मिपावरचे बरेच सदस्य गवगवा न करता बरेच समाजकार्य करीत असतात. असे संवेदनशील आपण एकटेच आहात ह्या भ्रमात कृपया राहू नका. ही इतरांना तुच्छ लेखणारी विशेषणं वापरणं सोडून समानतेच्या पातळीवर येऊन लिहा. मर्जी तुमची. मिपा सदस्यांनी आपापले अनुभव मांडले आहेत. तुमच्या मनाविरुद्ध ते गेले म्हणून तुम्ही त्याला आसूड समजता आहात.पठाण साहेब … अगदी मुंगीच काय
याच विषयावर स्वतंत्र लेख
लेखन बंद करू नका.
In reply to याच विषयावर स्वतंत्र लेख by सुहास..