तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत.
या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही. त्या बद्दल मी पहिल्यांदा सर्व रसिकांची क्षमा मागतो व त्यांच्या प्रतिभेने निर्माण केलेले हे गानपुष्प आपल्या चरणी विनम्र पणे अर्पण करतो. मी केवळ वाहकाची भुमिका करतो आहे याची सर्व वाचकांनी कृपया जाणीव ठेवावी.
गाणे ऐकल्यावर व पाहिल्यावर सगळे श्रोते सांत आणि असांत च्या पलिकडे जाउन श्रीसंत होतील याची मला खात्री वाटते.
आपल्या सगळ्यांचा लाडका सुपरहिरो ईस्पायडरमैन (हो हो ईस्पायडरमैनच) वर हे गीत चित्रीत झाले आहे. एक भारतिय नवयौवना आपल्या ईस्पायडीच्या प्रेमात पडली आहे आणि चक्क इस्पायडोबा सुध्दा तीच्यावर आशिक झालेला दिसतो. गाण्याच्या पार्श्र्वभूमीवर उसाचे शेत आहे. शेता जवळच्या मोकळ्या भागावर हे गाणे चित्रीत झाले आहे. अभिनेत्री शेतकरी कन्या असावी असे तिच्या वेशावरुन वाटते. अत्यंत मनमोहक अशा रंगाचे कपडे घालणारी ही लावण्यवती जेव्हा नृत्य करु लागते तेव्हा आपण तिचे नृत्य कौशल्य तिचे पदलालित्य पहाताना मुग्ध होउन जातो. आणि आपल्या इस्पायड्या (नीट वाचा इस्पायड्याच लिहिले आहे. नको तिकडे "व" घालुन वाचु नका) सुध्दा मग तिच्या सोबत नृत्य करु लगतो. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते.
संगीतकाराला तर केवळ लोटांगण घालणे इतकेच आपण करु शकतो. रहेमान सुध्दा त्यांच्या पुढे झक मारेल असे फाडु संगीत दिले आहे त्यांने या गाण्याला. गायक, अभिनेते, संगितकार, नृत्य दिग्दर्शक, कॅमेरामन या सगळ्यांनी मिळुन केलेल्या अचाट मेहनतीचा परिपाक म्हणूनच इतकी सुंदर कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते. सहस्त्रकातुन एखादीच अशी कलाकृती बनते. असे गुणी कलाकार आपल्या भारत देशात आहेत याचा मला फार म्हणजे फार अभिमान वाटतो.
आता गाण्या विषयी थोडेसे.
सगळ्या जगावर जाळे टाकणार्या इस्पायडरमैन ने एका भारतिय तरुणीवरपण गारुड केलं आहे. गावाकडली एक साधीभोळी तरुणी आपल्या इस्पायडरमैन च्या प्रेमात पडली आहे. व ती त्याला सांगत आहे. अरे माझ्या प्राणप्रिय छबुड्या तु माझ्या तनामनाची चोरी केली आहेस. तुझ्या त्या अचाट करामती बघुन मी पुरती घायाळ झाले आहे. आता फार वेळ न वाया दवडता तु सत्वर माझ्या समिप ये व माझ्या तनमनात जी आग भडकली आहे ती शांत कर. या सादरीकरणाच्या वेळी नायिकेने सादर केलेले विभ्रम म्हणजे अभिनयाचा एक अप्रतिम नमुना आहे. नायिका म्हणते
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन
देख के तेरे करतब यारा मै तो बन गयी तेरी फैन
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन हो हो
या ओळी ती म्हणत असतनाचा आपला इस्पायडी मागुन रुबाबदार पावले टाकत मोठ्या डौलाने एन्ट्री मारुन भाव खाउन जातो. भारतात आल्यावर त्याने आपला वेश जरासा बदलला आहे. पण तरी सुध्दा तो इस्पायडरमैन आहे हे आपण सहज ओळखु शकतो.
मधल्या संगीताच्या तुकड्यावर हात आकाशात उंच उचलुन तिने केलेला नृत्याविश्कारातुन ती माधुरी दिक्षीत, श्रीदेवी, वैजयंती माला, हेमामालिनी यांच्या पेक्षा कितीतरी वरच्या दर्जाची नृत्यांगना आहे हे सहजच अधोरेखीत होते.
आपल्या इस्पायडोबाचा विरह तीला सहन होत नाहीये. हा एकटेपणा तीला खायला उठला आहे. थंड हवेच्या झुळकीने सुध्दा तीच्या अंगावर एक गोड अशी शिरशिरी उठते आणि मग हि मोहरुन गेलेली नवयौवना इस्पायडरमैन बरोबर मुग्ध होउन नाचु लागते आणि तो सुध्दा तीच्या मागे मागे धावायला लागतो. आपला इस्पायडु पण नाचायला काही कमी नाही बरका.. पांढरे शुभ्र बुट, पांढरा मुखवटा आणि पांढरे हातमोजे घालुन त्या तरुणीच्या बरोबरीने तो नाचायला लागतो तेव्हा गोविंदा, मिथुन किंवा ॠशीकपुरची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मधेच तो अंगाला झटके देतो. हात लांब करुन, एक हात पुढे व एक हात मागे करुन नृत्य करतो तेव्हा त्या मुखवट्या मागे शम्मी कपुर तर नाहीना अशी एक शंका मनाला इस्पर्श करुन जाते. पण इस्पांडुरंगाच्या देहयष्टी कडे बघत आपल्याला तो प्रश्र्ण गिळावा लागतो. (हळुच गिळा नाहीतर पुढचे दृष्य बघताना ठसका लागेल)
तनहाई तडपाती है याद तुम्हारी आती है
थंडी थंडी पुरवई छेड के मु़झको जाती है
तेरी तारीफ लिख जो सके होSSS होSSS
तेरी तारीफ लिख जो सके नहि बन कोइ ऐसा पेन
खरच माझी सुध्दा अशी अवस्था झाली आहे किती लिहु आणि किती नको. पुढे ती छबकडी काय म्हणते बघा..........
तुम तो मेरे जान हो दिल का मेरे अरमान हो
हर लडकी जो खाना चाहे तुम वो मिठा पान हो
आपल्या इस्पांडोबाची तुलना ती पानाबरोबर करते आहे. आणि त्याला प्रेमाने खायचे आहे असे म्हणते आहे. प्रेमात माणुस अंधळा होतो हे खरच आहे. आपला इस्पायडु पण हे समजुन आहे. म्हणुन तो तिला प्रेमाने उचलतो आणि ह्वेत गरागरा फिरवतो.
मन मौजी चित्रपटातल "मै तो तुमसंग नैन मिलाके" हे गाणं आठवतय का? तोच दर्द तेच आर्जव पुढच्या ओळींमधे आहे. आणि साधना पेक्षाही सरस कसदार अभिनय आपल्याला या गाण्यात बघायला मिळतो. आणि त्या आलापी ताना ऐकताना तर आपण देहभान विसरुन जातो.
याद मे तेरी जाग जाग के होSSS होSSS
याद मे तेरी जाग जाग के थकने लगे ह मेरे नैन
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन
गाणे बघत बघत हा लेख लिहीताना माझ्या हृदयाची धडधड एक दोन वेळा इतकी जास्त वाढली की शेजारचे लोक घरी आले होते विचारायला. आमच्या हीने त्यांना पण गाणे बघायला जबरदस्तीने घरात बोलावुन घेतले आणि माझ्या शेजारी बसवले.त्या वेळी मी ३८३७व्यांदा गाणे बघत होतो. त्या दिवसा पासुन माझे शेजारी माझी नजर चुकवित पळत आहेत. मी दिसलो की लांबूनच रस्ता बदलून जतात. साले जळतात माझ्यावर.. जाउन दे जळो बापडे आपण गाण्याचा आनंद लुटुया.
शेवटच्या कडव्यात ती तरुणी अस्सल भारतिय नारी आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. सुपरहिरो इस्पायडेश्र्वराला ती आपल्या जाळ्यात कायमचा अडकवायला बघते. ती बाला शरीराच्या आकर्षक हलचाली करताना कॅमेरामनने पण त्या अचुक टीपल्या आहेत. मधेच ते दोघे आपल्या इस्पायड्याच्या सायकलवरुन रपेट मारतत तेव्हा डोळ्या समोरुन चटकन आमिर आणि आयेशाचे "पहेला नशा" हे गाण सरकत. आणि मग आपण नकळत या दोन गाण्यांची तुलना करायला लागतो. पण "पहेला नशाला" या गाण्याची सर येउच शकत नाही याची आपल्याला पुढच्याच सीनच्या वेळी जाणीव होते आणि मग आपण परत गाण्याच्या मागे फरपटतो.
मैतो तुम पे मरती हु पर दुनियासे डरतीहु
करनी चहु बात तुमस पर दिलसे अपने डरती हु
डोली मेरी जल्दिसे लेजा होSSS होSSS
डोली मेरी जल्दिसे लेजा गाडी लेके आ तू जान
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन
लग्न न झालेल्य तरुण तरुणींनी आपल्या होण्यार्या जोडीदराला हे गाणं जरुर म्हणजे जरुर दाखवावे. रोमान्स कशाला म्हणतात हे समजले की रोमन्सचा मजा आणखी वाढतो. लग्न झालेल्यांना तर काही सांगायची गरजच नाही. गाणे संपूर्ण पाहिल्यावर त्यांना समजेलच घरी गेल्यावर काय करायला पाहिजे ते.
माझ्या ऑफीस मधल्या स्वतःला अल्लड समजणार्या अडदांड बालीकेला मी हे गाणे दाखवले तेव्हा ती जोरजोरात किंचाळतच सुटली. माझा गालगुच्चा घेणेच तिने बाकी ठेवले होते. सगळा स्टाफ माझ्या कडे संशयाने (आणि सहानुभूतीने) बघायला लागला. पण मग जेव्हा रहस्यभेद झाला तेव्हा सगळ्यांनी ते गाणे कॉपी करुन घेतले. आता सकाळ संध्याकाळ कुठेना कुठे आमच्या हापिसात हे गाणे वाजतच असते. या गाण्याच्या प्रेरणेने हपिसातल्या दोन घोडनवर्यांची लग्ने झाली (पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही अर्थाने घोडनवर्यांची हा शब्द वापरला आहे. हो उगाच कोणी निराश व्हायला नको) आणि तिघा चौघांची मार्गावर आहेत. काही नाही इतकेच करयचे, फक्त समोरच्याला दम द्यायचा करतोस / करतेस की नाही लग्न? नाहीतर रोज सकाळी तुझ्या घरा समोर येउन हे गाणे मोठ्यांदा वाजविन.
इस्पाडुरंग इस्पांडुरंग
मुळ गाणे इथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=enOgueqnYOM
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गाणे कहर आहे. बाकी तुमचे
व्वा.
_/\_
__/\__
>>सांत कि असांत
आमचे डोळे खाडकन उघडले आज....
ईस्पायडर्म्यानचा पर्दाफाश फडात.
काका
चिरफाड आवडेश
काय भयानक प्रकार आहे!!
मागे उसाचे शेत दिसते आहे . हा
व्वा विजुभाऊ......
हाहाहा जबरदस्त रसग्रहण.
अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं
कहर अगदी....
निव्वळ अप्रतिम !!
बेक्कार
आपल्या इस्पायड्या (नीट वाचा
@माझ्या ऑफीस मधल्या स्वतःला
काय आहे हे.. तो ईस्पायडर मॅण
रसग्रहण
अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे
नाही पैजारबुवा आम्हाला या
हे हे ऑलटाईम हिट सोंग हे
akhu risbud आपण जर वेळात वेळ
याच गाण्याचा दुवा जोडणार होतो
हाहाहाहाहहाहा
तो एस्पायडर म्यान नक्की
हाहाहा!
खल्लास ....कल्ला शोध लावला
अवघड आहे
??
छे मला तर तिचा नाच एखाद्या
कोण कोण ?
ये कौन चित्रकार है ये कौन
अप्रतिम कलाविष्कार.
डवले पानावले
ब्रम्हानंदी टाळी
पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या
LOL!!
पुढचे रसग्रहण कधी?
आ गा गा गा....
आणि हे एक . भन्नाटेस्ट या
हसून पोट दुखू लागले,कैसे कैसे
नतमस्तक!
भारी परीक्षणं! गाणं ऐकलं होतं
जय जय राम लिला
सहस्त्रकातुन एखादीच अशी
सहस्त्रकातुन एखादीच अशी कलाकृती बनते.+१५१२२०२१ कमाल रसग्रहण, गाणे तर कहर आहे :=)मै तो तुम संग नैन मिला के हार गयी सजना ...