Skip to main content

प्रेम आणि ममता ....... भाग दोन शेवटचा

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 14/12/2013 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
'जा तुझ्या त्या राजुजवळ जा, थांबु नकोस,राजु राजु खुप करतेस ना, जा आता मी केली नवि नवरी, जा', दारु नशेत रमेश बाबु म्हणाला व तो हासु लागला, त्याच्या पाठोपाठ ती नवि नवरी ही हासु लागली. हे पाहुन तिला आश्चर्यचा धक्का बसला, त्या रात्री ती घराबाहेर बसली, तो रात्रभर काकंणाचा आवाज तिला नकोसा वाटला व तीने आपले कान बंद केले. दुसर्या दिवशी ती भराभर चालत ती त्या पिर साहेबाच्या दर्ग्याकडे जाऊ लागली, कधी एकदा राजुला पाहतोय आसे तिला झाले. तिला राजुचा आधार इतका वाटु लागला की त्याच्या शिवाय ती जगुच शकत नव्हती . शेवटी त्या दर्ग्याच्या दारात आली, राजुला इकडे तिकडे पाहु लागली पण राजु कोठेच दिसत नव्हता, तीचा कंठ दाटुन आला व तिला रडु कोसळले. ती पळत जाऊन दर्ग्याच्या पिर साहेबाच्या कब्र वर ती कोसळली व जोर जोरात रडु लागली डोके आपटु लागली, तिचे ते रक्ताने माखलेले कपाळ खुप काही सांगत होते, मोठ्याने ओरडत ती म्हणाली,'कोठे आहे माझा राजु, मी तुझ्या स्वाधीन केले होते त्याला, तो कोठे आहे सांग तुला माहीती आहे, सांग माझा राजु कोठे आहे?,' आणि ती अगांतील कपडे फाडु लागली तीने ती लाल साडी काढुन टाकत होती तेवढ्यात , तेथील एका फकीराने तीच्या अगंावर चादर टाकली व तिला झाकत तो तिला म्हणाला ,'मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,' *
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4589
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

कथा आवडली... पण ती बरीच छोटी आहे. दोन भाग कशाला केले? एकच भाग केला असता तरी चालले असते.

दुसर्‍या भागाने फार निराशा केली. कथाविस्तार वाढवला असता तर त्यावर एक चांगला चित्रपट काढता आला असता.

मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,' छान आहे.

जीवनभौच्या ईतक्या अशक्यप्राय कथांमधे ह्या कथेनी दारुण अपेक्षाभंग केला. प्रेमासाठि आई आपल्या पोटच्या मुलाचा त्याग करु शकते हि कल्पनाच पचनी पडायला कठिण आहे! असो......कथा आपल्याला आवडली किंवा नावडली काय जीवनभौ काय लिहायचे थांबायचे नाहित!

In reply to by दिपक.कुवेत

फार गहन विचार नसतात आणि ते अनावश्यक शाब्दिक खर्च पण करत नाहीत, हे ही नसे थोडके...

In reply to by दिपक.कुवेत

मग तुम्ही सत्यापासुन दुर आहात वाटत...... कारण तुम्हाला तलवार दापत्याविषयी माहीत नाही का?

मिपा वरचा लेख आधी वाचुन मग लेखकाचं नाव वाचायची अत्यंत वाईट सवय आहे मला. ती सोडवण्या साठी तुमची खुप मदत होते आहे भौ. प्रत्येक लेखानंतर ओफिस मध्ये असुन पण कपाळावर हात मारुन घेतेय.

In reply to by mohite jeevan

तुम्ही लेख न पाडता नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा ना. लै मस्त प्रत्युत्तरे देता. ;-)