'जा तुझ्या त्या राजुजवळ जा, थांबु नकोस,राजु राजु खुप करतेस ना, जा आता मी केली नवि नवरी, जा', दारु नशेत रमेश बाबु म्हणाला व तो हासु लागला, त्याच्या पाठोपाठ ती नवि नवरी ही हासु लागली.
हे पाहुन तिला आश्चर्यचा धक्का बसला, त्या रात्री ती घराबाहेर बसली, तो रात्रभर काकंणाचा आवाज तिला नकोसा वाटला व तीने आपले कान बंद केले.
दुसर्या दिवशी ती भराभर चालत ती त्या पिर साहेबाच्या दर्ग्याकडे जाऊ लागली, कधी एकदा राजुला पाहतोय आसे तिला झाले. तिला राजुचा आधार इतका वाटु लागला की त्याच्या शिवाय ती जगुच शकत नव्हती .
शेवटी त्या दर्ग्याच्या दारात आली, राजुला इकडे तिकडे पाहु लागली पण राजु कोठेच दिसत नव्हता, तीचा कंठ दाटुन आला व तिला रडु कोसळले.
ती पळत जाऊन दर्ग्याच्या पिर साहेबाच्या कब्र वर ती कोसळली व जोर जोरात रडु लागली डोके आपटु लागली, तिचे ते रक्ताने माखलेले कपाळ खुप काही सांगत होते, मोठ्याने ओरडत ती म्हणाली,'कोठे आहे माझा राजु, मी तुझ्या स्वाधीन केले होते त्याला, तो कोठे आहे सांग तुला माहीती आहे, सांग माझा राजु कोठे आहे?,'
आणि ती अगांतील कपडे फाडु लागली तीने ती लाल साडी काढुन टाकत होती तेवढ्यात , तेथील एका फकीराने तीच्या अगंावर चादर टाकली व तिला झाकत तो तिला म्हणाला ,'मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,'
*
प्रेम आणि ममता ....... भाग दोन शेवटचा
वाचने
4602
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला.....
ढँट ट ढँट
आता लेख वाचतो..
आयला लगेच दुसरा भाग टाकला पण....
जबरदस्त.....
कथा आवडली...
पण ती बरीच छोटी आहे. दोन भाग कशाला केले?
एकच भाग केला असता तरी चालले असते.
दुसर्या
दुसर्या भागाने फार निराशा केली. कथाविस्तार वाढवला असता तर त्यावर एक चांगला चित्रपट काढता आला असता.
कथेची लांबी वाढवायला मकलेंचा क्लास लावा!
In reply to दुसर्या by तिमा
आणि राजू सापडेपर्यंत चालू ठेवा.
हजेरी लावली आहे. आता कथा
हजेरी लावली आहे. आता कथा वाचतो.
छान आहे.
मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,'छान आहे.
शी.......अतीशय तद्दन कथा
जीवनभौच्या ईतक्या अशक्यप्राय कथांमधे ह्या कथेनी दारुण अपेक्षाभंग केला. प्रेमासाठि आई आपल्या पोटच्या मुलाचा त्याग करु शकते हि कल्पनाच पचनी पडायला कठिण आहे! असो......कथा आपल्याला आवडली किंवा नावडली काय जीवनभौ काय लिहायचे थांबायचे नाहित!
त्यांच्या लेखात...
In reply to शी.......अतीशय तद्दन कथा by दिपक.कुवेत
फार गहन विचार नसतात आणि ते अनावश्यक शाब्दिक खर्च पण करत नाहीत, हे ही नसे थोडके...
मग तुम्ही सत्यापासुन दुर आहात
In reply to शी.......अतीशय तद्दन कथा by दिपक.कुवेत
मग तुम्ही सत्यापासुन दुर आहात वाटत...... कारण तुम्हाला तलवार दापत्याविषयी माहीत नाही का?
जीवनभौ हे मिपावरचे नवे
जीवनभौ हे मिपावरचे नवे "श्रीकृष्ण सामंत काका" आहेत
मिपा वरचा लेख आधी वाचुन मग
मिपा वरचा लेख आधी वाचुन मग लेखकाचं नाव वाचायची अत्यंत वाईट सवय आहे मला. ती सोडवण्या साठी तुमची खुप मदत होते आहे भौ.
प्रत्येक लेखानंतर ओफिस मध्ये असुन पण कपाळावर हात मारुन घेतेय.
कपाळावर हात मारण्याची सवय
In reply to मिपा वरचा लेख आधी वाचुन मग by शिल्पा नाईक
कपाळावर हात मारण्याची सवय लावून कशाला घेतला?
तेच चुकतेय हो साहेब. आता नाव
तेच चुकतेय हो साहेब. आता नाव वाचल्याशिवाय लेख वाचायचाच नाहि. अजिबात....
धन्यवाद .... तुमचे आणि
In reply to तेच चुकतेय हो साहेब. आता नाव by शिल्पा नाईक
धन्यवाद .... तुमचे आणि तुमच्या सवयीचे
तुम्ही लेख न पाडता नुसते
In reply to धन्यवाद .... तुमचे आणि by mohite jeevan
तुम्ही लेख न पाडता नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा ना. लै मस्त प्रत्युत्तरे देता. ;-)
सहमत
In reply to तुम्ही लेख न पाडता नुसते by अभ्या..
सहमत ;)
@नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा
In reply to तुम्ही लेख न पाडता नुसते by अभ्या..
@नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा ना>>>

