"घन आज तो कठोर आहे"
"घन आज तो कठोर आहे"
कीती फोडशील हंबरडा तू
घन आज तो कठोर आहे
ना थांबे तुझ रानापाशी
कोणाशी तरी फितूर आहे
तुझाच अश्रू तुझ्याच रानात
गळण्यासाठी आतुर आहे
कोरडी गर्जना ऐकवत कानी
घन आज तो कठोर आहे
आसुसलेली नजर तुझे ती
नभापाशी का लाचार आहे
नभी कडाडी वेजेची ती
अर्थहीन पण वाचाळ आहे
तुझेच काळीज पेटवायला
पाणी हे एक हत्यार आहे
दु:ख आपले गीळत बस तू
घन आज तो फितूर आहे
मस्त.
****
धन्यवाद
कडक स्ट्रेटड्राइव्ह!
माफ करा, पण विशेष भावली नाही.
Point is noted sir:)
जमली नाही