"घन आज तो कठोर आहे"
कीती फोडशील हंबरडा तू
घन आज तो कठोर आहे
ना थांबे तुझ रानापाशी
कोणाशी तरी फितूर आहे
तुझाच अश्रू तुझ्याच रानात
गळण्यासाठी आतुर आहे
कोरडी गर्जना ऐकवत कानी
घन आज तो कठोर आहे
आसुसलेली नजर तुझे ती
नभापाशी का लाचार आहे
नभी कडाडी वेजेची ती
अर्थहीन पण वाचाळ आहे
तुझेच काळीज पेटवायला
पाणी हे एक हत्यार आहे
दु:ख आपले गीळत बस तू
घन आज तो फितूर आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1645
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
मस्त.
****
आवडल .
धन्यवाद
In reply to **** by जेपी
धन्यवाद
कडक स्ट्रेटड्राइव्ह!
कडक स्ट्रेटड्राइव्ह!
माफ करा, पण विशेष भावली नाही.
माफ करा, पण विशेष भावली नाही.
अनेक शुद्धलेखनाच्या चुका खटकल्या. तसंच अनेक ठिकाणी बरं का, मीटर बसलं नाहीये असं मला वाटलं.
Point is noted sir:)
In reply to माफ करा, पण विशेष भावली नाही. by वेल्लाभट
will take further
जमली नाही
>>अर्थहीन पण वाचाळ आहे >>