Skip to main content

"घन आज तो कठोर आहे"

लेखक वैभवकुमारन यांनी मंगळवार, 10/12/2013 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
"घन आज तो कठोर आहे" कीती फोडशील हंबरडा तू घन आज तो कठोर आहे ना थांबे तुझ रानापाशी कोणाशी तरी फितूर आहे तुझाच अश्रू तुझ्याच रानात गळण्यासाठी आतुर आहे कोरडी गर्जना ऐकवत कानी घन आज तो कठोर आहे आसुसलेली नजर तुझे ती नभापाशी का लाचार आहे नभी कडाडी वेजेची ती अर्थहीन पण वाचाळ आहे तुझेच काळीज पेटवायला पाणी हे एक हत्यार आहे दु:ख आपले गीळत बस तू घन आज तो फितूर आहे
लेखनविषय:

वाचने 1630
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आवडल .

माफ करा, पण विशेष भावली नाही. अनेक शुद्धलेखनाच्या चुका खटकल्या. तसंच अनेक ठिकाणी बरं का, मीटर बसलं नाहीये असं मला वाटलं.

>>अर्थहीन पण वाचाळ आहे >>