✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

उ
उद्दाम यांनी
Fri, 12/06/2013 - 12:43  ·  लेख
लेख
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते. दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल. हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी. मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) ) हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) ) शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37329 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

.

उद्दाम
Sat, 12/07/2013 - 13:20 नवीन
आरम म्हणजे पाय एकमेकांपासून थोडेसे दूर ठेवलेले. ( आणि हात मात्र अंगालगत असावेत, मागे बांधलेले नव्हेत. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

महानुभाव

राही
Fri, 12/06/2013 - 17:16 नवीन
महानुभावांतही मृतदेह जमिनीत पुरण्याची पद्धत आहे/होती. ऊर्जेचा वापर आणि व्यय कमीत कमी होईल अशा पद्धतीने दहन व्हावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. गंमत म्हणून कोणी

मृत्युन्जय
Fri, 12/06/2013 - 17:40 नवीन
सहमत आहे. गंमत म्हणून कोणी काय लिहावे याला थोड्या मर्यादा हव्यात. एखाद्या कारकूनाने लिहिले असते तर ठीक होते. डो़टरच्या तोंडी शोभत नाही. "पाणी नाही तर आता काय मुतु का?" हे एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या तोंडी शोभत नाही तसेच. असो. तो वेगळा मुद्दा. एका डो़क्टरसाठी संवेदनाहीन असला तरी त्यांनी विनोद करायचा प्रयत्न केला होता हे स्पष्टीकरण ग्राह्य धरुन सोडुन देउयात. बाकी दहन करण्याच्या पद्धतीतत लाकडे वाया जातात हा प्रॉब्लेम आहेच. त्यासाठी दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो. भारताची लोकसंख्या आणि जागेचा अभाव लक्षात घेता १० वर्षांनी तीच जागा परत वापरता येइल असे गृहीत धरुनही प्रचंड जागा लागेल. ते बॉर्डर मधले "इतनी लाशी गिरा दुंगा की तुम्हारे देश की जमीन कम पडेगी" वगैरे डायलॉग आठवला. हे असले उफराटे उद्योग करण्यापेक्षा विद्युत दाहिन्यांची सोय करणे जास्त योग्य राहिल. शिवाय ब्यांमॅ म्हणतात त्याप्रमाणे हस्तिदंती शवपेटी, लाकडी शवपेटी, प्लॅटिनम शवपेटी वगैरे असले प्रकार सुरु होतील. शिवाय मोठ्या माणसांच्या मढ्यांचे चोचलेही मोठे याप्रमाणे त्यांच्यासाठी खाजगी दफनभूमी, एक बेडरुमचा बंगला वगैरे प्रकार सुरु होतील (पिरेमिड त्याचीच पुढची आवृत्ती).
  • Log in or register to post comments

दफनाचा अजून एक प्रॉब्लेम

पुष्करिणी
Fri, 12/06/2013 - 19:27 नवीन
दफनाचा अजून एक प्रॉब्लेम म्हण्जे मोठ्या लोकांच्या दफना नंतर समाध्या बनायला लागतील, परत जे पुतळ्यांच्या बाबतीत होतय आजकाल तसंच कबरींबाबतही होण्याची शक्यता आहे; मग त्यावरून दंगे, मारामार्‍या ; महागड्या शवपेट्यांत काही ऐवज सापडतो का ते बघायला चोरांकडून शवपेट्या उचकणे; इ. गोष्टींसाठी कबरींना संरक्षण इ. इ. मी राहते तिकडे चर्चच्या दफनभूमीत दफन करण्यासाठी त्यांची जीवन्भर त्या चर्च्मधे मेंबर्शिप घेतलेली असते आणि मृत्यूनंतर जवळच्या नातवाईकाला पुढील ३५ वर्ष त्या कबरीची काळजी ( स्वच्छता, फूलं वगैरे ठेवणं दर रविवारी इ. )घेणं बंधनकारक असतं. आणि ही जागा ३५ वर्ष वापरण्यासाठी दरमहा काही रक्कम जीवनभ्र द्यावी लागते. हे फार खर्चिक आहे ( दफन किंवा दहन काहीही असलं तरी शवपेटी असतेच ); त्यामुळे ख्रिश्चन लोकंसुद्धा आजकाल दहनच करतात इकडे आणि मग नातेवाईक मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार उरलेली रक्षा घरात दिवाणखान्यात सुबक भांड्यात ठेवतात अथवा आवडत्या जागी नेउन विखुर्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय

गवि
Fri, 12/06/2013 - 18:30 नवीन
जाळण्यापेक्षा पुरणे हा उपाय तुलनेत कमीतकमी टप्प्यांमधे निसर्गाला शरीरातली मूलतत्वे परत देणारा उपाय आहे. पण जागेचा प्रश्न आहेच. पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
  • Log in or register to post comments

गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली

सुबोध खरे
Fri, 12/06/2013 - 19:35 नवीन
आमचे सासरे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. यात पनवेल, लातूर बार्शी इ महापालिका येतात. यात एका माणसाला पूर्ण जाळण्यासाठी एका सिलिंडर चा खर्च येतो. व्यवसायिक सिलिंडर साधारण नऊशे रुपयात मिळतो.(सरकारने जर सबसिडी चा सिलिंडर दिला तर हेच काम ४४० रुपयात होऊ शकेल) यात एकावेळेस आठ ते बारा सिलिंडर वापरले जातात म्हणजे मध्येच गैस गेला आणि पार्थिवाचे अर्धवट दहन झाले असे होत नाही. या खर्चात धूर काजळी न होता कमीत कमी प्रदूषणात स्वच्छपणे हे काम होते. आपल्याला किती पातळीपर्यंत जाळायचे आहे त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. पूर्ण भस्म करायचे कि अस्थि शिल्लक ठेवायच्या ते आपल्यावर आहे. तसे लिहून दिल्यावर अस्थि मिळण्याची व्यवस्था होते. यात अजूनही सर्व लोक सहभागि होत नाहीत. बर्याच लोकांना लाकडाच्या तिरडीवर जाळणे पसंत आहे. असो समाज प्रबोधन केल्यावर त्याला जास्तीत जास्त मान्यता मिळेल. दफनभूमी मध्ये दफन करण्यासाठी याहून जास्त खर्च येतो. याचे कारण शहरात दफनभूमी साठी जागा कमी पडत आहेत. सर्वसाधारण दफन भूमीतील पार्थिव विशिष्ट कालावधी नंतर उकरून काढले जाते आणि त्या जागी दुसर्या पार्थिवाची सोय केली जाते. जर आपल्याला आपल्या नातेवाईकाचे थडगे उकरू नये वाटत असेल तर त्या धर्माच्या दफनभूमी ट्रस्ट ला पैसे मोजावे लागतात. जर हिंदू लोकांनी दफन करायला सुरुवात केली तर सर्वच लहान मोठ्या शहरात अशी परिस्थिती उद्भवेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

माझ्या

अनिरुद्ध प
Fri, 12/06/2013 - 19:58 नवीन
वाचना नुसार विद्युत दाहिनी हा सर्वात कमी खर्चिक प्रकार आहे आणि वर एका प्रतिसादात म्हट्ल्या प्रमाणे तो जर सौर उर्जेवर चालवला तर अजुनही खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@जळणाच्या गैसवर मृतदेह

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 22:44 नवीन
@जळणाच्या गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली विकसित करून ती बर्याच सरकारी स्मशानभूमी मध्ये बसविली आहे. >>> वैकुंठ स्मशानभूमी(पुणे) इथे निकतीच अशी दाहिनी कार्यान्वित झाली आहे. पण ती बहुतेक गोबरगॅसवर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 22:46 नवीन
हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य समजतो. कालमानानुसार...विद्युत/गॅस दाहिनी वरील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

येकदम सहमत

चौकटराजा
Sat, 12/07/2013 - 09:44 नवीन
बाडीस ! ( काये रे जुन्या मिपाकरानो शब्द बराबर हाय ना ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली

सुबोध खरे
Sat, 12/07/2013 - 20:20 नवीन
गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली तयार करणारे बरेच लोक भारतात आणि जगात आहेत.शिवाय त्यात एक तासात मृताच्या नातेवाईकांना अस्थि देता येतात. त्यात मृताच्या नातेवाईकाला स्वतः अग्नी देता येतो. (हि सोय विजेच्या प्रणालीत आहे काय हे मला माहित नाही). दोनही प्रणाल्या एक हजार सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाला चालत असल्याने कोणताही धूर आणि प्रदूषण होत नाही. फक्त कार्बन डाय ओक्साईड आणि वाफ हा हवेत ३ मीटर उंचीवर धुराड्याने सोडला जातो(प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे). एल पी जी वर चालणारी प्रणाली हि विजेवर चालणार्या प्रणाली पेक्षा बरीच कमी खर्चाची आहे. एल पी जी वर चालणारी प्रणाली हि १२ ते १४ किलो गैस वापरते म्हणजे सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो. हा खर्च दफनापेक्षा खूपच कमी आहे. दफन करण्याचे नक्की काय कायदे आपल्याकडे आहेत ते माहित नाही परंतु फारसे कोणी खोलवर दफन करीत नाहीत. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचे जंतू आणि प्रदूषण करणारी द्रव्ये( कीटक नाशके इ) भूजलात(ground water) मिसळून प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर नदीकाठी किंवा विहिरींच्या जवळ पुरत असतील तर हि शक्यता अगदी नक्कीच आहे. हा सर्व विचार वास्तववादी आहे पण एखादया माणसाच्या धार्मिक श्रद्धांपुढे खर्च हा मुद्दा अतिशय गौण आहे. दहनासाठी ६०० व दफनासाठी अगदी सहा हजार जरी खर्च येत असेल तरी माणसाच्या आयुष्याच्या किमतीपेक्षा हि किंमत काहीच नाही. (एक दिवस हॉटेलात राह्लात तरी एवढा खर्च येतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एकतर्फी प्रश्न

विकास
Fri, 12/06/2013 - 19:52 नवीन
चर्चेतील प्रश्न एकतर्फी आहे. वर आधी एका प्रतिसादात त्या संदर्भात म्हणलेले आहेच. पण जर एखाद्या मुस्लीम अथवा ख्रिस्ती व्यक्तीस दहन करायचे असेल तर ते भारतात शक्य आहे का? कदाचीत याच्या मुळाशी पण समान नागरी कायदा नसणे हे असू शकेल. आज अमेरीकेत अनेक ख्रिस्ती (गोरे) लोकं अगदी त्यातील कॅथलीक्सपण दहन करणेच पसंद करतात, कारण कदाचीत खर्च असेल आणि तसेच काहींच्या बाबतीत पर्यावरणवादी असणे देखील असेल.
  • Log in or register to post comments

जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन

खटपट्या
Sat, 12/07/2013 - 01:04 नवीन
जर कोणी मुस्लिम किवा ख्रिश्चन त्यांच्या नातेवाईकांचे दहन करू इच्छित असेल तर तर त्यांना कोणी अडवेल असे वाटत नाही. कारण बहुतेक स्मशान भूमी स्थानिक महापालिकांच्या ताब्यात आहेत. आणि तिथे फक्त हिंदुनीच यावे असा नियम असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

१.पेतांची जाळून अन्तक्रिया

विवेकपटाईत
Fri, 12/06/2013 - 20:05 नवीन
१.पेतांची जाळून अन्तक्रिया करणे ही सर्वात उत्तम विधी आहे. स्मशानात एका प्लेटफार्म (१०x १० फूट) वर वर्षात ८० - १०० प्रेतांची अन्तक्रिया करता येते. जर हिंदुधर्मात दफन विधी असती तर दफन भूमी साठी जागा उपलब्ध करणे अशक्य प्राय झाले असते. कल्पना करा दरवर्षी ८०-१०० प्रेतांसाठी किती जागा लागेल. २. लाकडांची कमी जास्त झाडेलाऊन पूर्ण केल्या जाऊ शकते. विजेवर चालणारे स्मशान ही बांधता येतील. एकट्या दिल्लीतील ५० लाख वाहने एका महिन्यात जेवढे पेट्रोल जाळतात. तेवढ्या उर्जेवर देशातल्या सर्व प्रेतांची अन्तक्रिया होऊ शकते. ३. दफन साठी जागेची मागणी वाढत चालली आहे. शिवाय समाजातले श्रीमंत आणि उच्च लोक थडगी ही बांधणारच. दफनभूमीच्या जागेसाठी आपल्या देशात पुष्कळ ठिकाणी वाद होतात. त्यात बहुसंख्यक समाजाने ही प्रेतांना दफन करणे सुरु केले तर निर्माण होणार्या परिस्थितीची कल्पना करणे अशक्य. ४. युरोप मध्ये विशेषत: UK इथे आता लोक जागेच्या कमतरतेमुळे प्रेतांना जाळू लागले आहेत. ५. शिवाय प्रेतांची चोरी इत्यादी प्रकाराना जाळल्या मुळे आळा बसतो. ६. संपूर्ण शरीर दान दिले तरी ही, गरज नसलेल्या शरीराच्या भागांना जाळूनच नष्ट केल्या जाते. ७. शेवटी दफन करण्याचा खर्च जाळण्यापेक्षा कित्येकपट जास्त असतो. ८. आरोग्याच्या दृष्टीने ही जाळणे उत्तम.
  • Log in or register to post comments

अतिशय चान विचार...

मुक्त विहारि
Sat, 12/07/2013 - 06:52 नवीन
विशेषतः "शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते." हा तर एकदम योग्य.... असो....
  • Log in or register to post comments

व्यावहारिक बाजू विरुद्ध भावनात्मक बाजू.

अत्रन्गि पाउस
Sat, 12/07/2013 - 09:42 नवीन
व्यावहारिक बाजू (जागा/खर्च/पर्यावरण) वगैरे हा एक भाग झाला .. परंतु हिंदू अन्त्यासंस्कारांचा जो दृश्य परिणाम आहे तो मी आधी म्हटल्या प्रमाणे 'भेसूर' वाटतो...भडक्क वाटतो .. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचे वियोगाचे दुखः + इतक्या सार्या प्रोटोकोल चे ओझे अति होत असावे..त्यात काही बदल करणे धुरिणांना शक्य नही का? त्या मानाने ख्रिश्चन अंत्यसंस्कार (३ इदिओत , प्रहार सिनेमात बघितलेले) फार सौम्य आणि दिलासा दायक वाटतात. माझ्या एका जैन मित्राच्या आईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पहिले कि १ -२ हार घालून घरून तडक विद्युत दाहिनीत नेले..सर्व उपस्थित 'नमो अरीहान्ताय' मंत्र पुटपुटत होते..बस्स इतकेच..तिथेही औपचारिकता कमी असल्याने ताण कमी जाणवत होता...
  • Log in or register to post comments

असेच करतात

राही
Sat, 12/07/2013 - 12:30 नवीन
आजकाल निदान मुंबईतल्या मराठी सुशिक्षित वर्गात तरी असेच करतात. मृत व्यक्तीला बिछान्यावरून उचलून खाली चटईवर किंवा चादरीवर ठेवतात. (अलीकडे नुसत्या जमिनीवर ठेवत नाहीत.) आंघोळ वगैरे घालीत नाहीत. सर्व नातेवाईक आले आणि खाली तिरडी बांधण्याचे काम पूर्ण झाले की प्रेत खाली आणून थोडा वेळ तिरडीवर ठेवतात. घरात कोणाचे हार वगैरे घालायचे राहिले असतील तर इथे घालतात. शेवटचा नमकार वगैरे घरातच होतो. तिरडी लगेचच उचलली जाते. स्मशाने दूर असतात आणि रस्त्यावरच्या गर्दीतून अंत्ययात्रा नेणे कठीण असते, म्हणून शववाहिका बोलवली जाते. स्मशानातले विधीही आटोपशीर असतात. धनिक कच्छी दात्यांच्या कृपेने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतली पुष्कळशी स्मशाने स्वच्छ आणि सुविधायुक्त असतात. बाग असते, हिरवळ असते, बसायला बाके असतात, आंघोळीसाठी स्नानगृह, स्वच्छतागृहही असते. शंकराचे छोटेसे देऊळ असते, कुठेकुठे दशक्रियाविधीसाठी छोटासा हॉल किंवा चौथराही असतो. प्रसन्न वातावरण असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

प्रसन्न वातावरण असते.

अर्धवटराव
Sat, 12/07/2013 - 14:51 नवीन
मेलो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या

प्यारे१
Sat, 12/07/2013 - 15:22 नवीन
मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या हिंदू स्मशानभूमीत केला आहे. लई भारी आहे. खरंच प्रसन्न वाटतं. - दहावीला ८९ टक्के मिळून नंतर एक्स्पोनेन्शियल डिके कर्व्ह वाला ;) प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे

विद्युत् बालक
Sat, 12/07/2013 - 15:37 नवीन
सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात ! ----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्हाला बहुतेक दहावीच्या

विद्युत् बालक
Sat, 12/07/2013 - 15:41 नवीन
तुम्हाला बहुतेक दहावीच्या पेपरात कोण्या पिशाच्या ने मदत केली असेल पुढे पण तुम्ही तिथेच अभ्यास करायला हवा होता :) सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात ! ----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

किती हि प्रखर ज्ञानलालसा

अर्धवटराव
Sat, 12/07/2013 - 15:57 नवीन
धावीला असता कंची फीहेचडी केली म्हन्न्ता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो कसलं काय?

प्यारे१
Sat, 12/07/2013 - 18:28 नवीन
अहो कसलं काय? रट्टा मारायचं तेवढं जमायचं तेव्हा. नंतर काहीच जमेना ;) असो, दहन केलेले नि दफन झालेले असे दोन्ही साईडचे आत्मे कावतील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आत्मे कावतील

यसवायजी
Sat, 12/07/2013 - 18:45 नवीन
आत्मे कावतील
:)) आत्मा कावतोय गा ग्रुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

होय

राही
Sat, 12/07/2013 - 15:27 नवीन
निदान भेसूर तरी नसते. मृताच्या जवळच्या नातेवाईकांचे दु:ख हलके होईल इतपत प्रसन्न वातावरण असते. आणि तसेही, अगदी जवळचे नातेवाईक सोडून बाकी गर्दीमध्ये गांभीर्य नसतेच. आपल्याकडे लोक शांततेने उभे राहू शकत नाहीत. त्यांना काही ना काही तरी बोलायला/चघळायला हवे असते. फक्त ती हलकी कुजबूज असते इतकेच. एखादा बरासा तरूण मुलगा दिसला तर कोण,कुठला अशी स्थळविषयक चौकशीसुद्धा होते. 'स्मशानशांतता' हा शब्द आता कालबाह्य होऊ घातला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/07/2013 - 16:07 नवीन
स्मशानशांतता आता तशी गेली आहे. जवळचे नातेवाईक मित्र तेवढे दु:खी असतात बाकीचे औपचारिकता किंवा हजेरी लावणारे असतात तसे ते बळजबरी आल्यासारखे वाटतात. बाकी,स्मशानात आता फुलझाडे, आरामशीर टेकून बसायला बाके वगैरे असतात तेव्हा प्रसन्न वातावरण असते याच्याशी सहमत. हलक्या फुलक्या गप्पा, लक्षात येईल असे खदखदुन हसणारेही पाहिले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

पोचली प्रसन्नता.

अर्धवटराव
Sat, 12/07/2013 - 16:12 नवीन
स्थळाच्या चौकशीचं कौतुक वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे

यसवायजी
Sat, 12/07/2013 - 17:42 नवीन
सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे मंगळसुत्र तोडणे/बांगड्या फोडणे.. विधवा स्त्रीची त्यावेळची मानसीक अवस्था पाहता हा खुपच भयानक प्रकार वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे

तुमचा अभिषेक
Sat, 12/07/2013 - 12:08 नवीन
आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे वगैरे खुळचट(??) कल्पनांमधून सर्वच समाज (मग तो कोणत्याही धर्माचा असो) एकाचवेळी बाहेर पडू शकत नसल्याने असे पर्यायी मार्ग सुचले तरी ते अंमलात किती प्रमाणात येतील हा एक प्रश्न किंवा अडसर असल्याने शेवटी हि चर्चा कागदावरच राहणार. माझे म्हणाल तर माझ्या मरणाच्या वेळी समाज आजच्यास्थितीपेक्षा फार पुढे गेला नसेल तर माझा देह दान करायलाच आवडेल. त्यातून जे मिळेल ते मिळेल, त्याउपर त्याची विल्हेवाट कोणीही कशीही लावली तरी माझा आत्मा तळमळणार नाही.. किंबहुना तळमळायचे नाही असे मी आधीच स्वताच्या आत्म्याला बजावले आहे.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/07/2013 - 16:02 नवीन
माहितीपूर्ण चर्चा. वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आमच्यात म्हणे बायका

भाग्यश्री कुलकर्णी
Sun, 12/08/2013 - 14:17 नवीन
आमच्यात म्हणे बायका स्मशानभुमीत जात नाहीत. कदाचित प्रिय व्यक्तीचा विरह, स्त्री तिच्या कोमलस्वभावामुळे बघु शकत नाही ही धारणा असावी.पण आपली व्यक्ती दुर जाताना दारातुनच इतरांच्या खांद्यावर सोपवताना आपणही अजुन थोडावेळ त्याच्या पार्थिवदेहाकडे बघावे वाटतेच ना.आणी त्या व्यक्तीच्या देहाला अग्नी द्यायला बाईला अधिकार नाही.त्या वेळी भांडण्यापेक्षा दारातुन निरोप घेणेच इष्ट असे वाट्ते.असो. काहीसे अवांतर आहे हे.पण.... बाईचे मंगळसुत्र काढुन त्यातला मणी तिच्या नवर्‍याच्या तोंडात घालतात.आपले माणुस गेल्याचे दु:ख आणी त्यात या विधींचे अवडंबर....... नको वाटते हे सर्व.......
  • Log in or register to post comments

भाग्यश्री....

पैसा
Sun, 12/08/2013 - 14:46 नवीन
भाग्यश्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

ती एक मूर्खपणाची प्रथा आहे.

बॅटमॅन
Sun, 12/08/2013 - 15:06 नवीन
ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात? जायला नको वाटत असेल तर ठीके पण वाटत असेल तर इतरांनीही बाऊ करता कामा नये. अवांतरः स्मशानात गेल्यावर काय वाटते हे शब्दात सांगू शकत नाही- विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. काळाप्रमाणे अर्थातच हा सुन्नपणा पुढे कमी होतो पण आठवणी राहतात खर्‍या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

स्मशानवैराग्य

प्रसाद गोडबोले
Sun, 12/08/2013 - 15:50 नवीन
समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात?
मलाही लहानपणी असंच वाटायचं , मग नंतर काही वेळा स्मशानात जायचा 'योग' आला ... एकदातर अगदी माझ्या वयाच्या मित्रासाठी :( तेव्हा स्मशानवैराग्य हा काय प्रकार असतो ह्याचा अनुभव घेतला आहे ... कदाव्हित हे असे स्मशानवैराग्य येवु नये म्हणुन बायकांना मनाई असावी बहुतेक ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्मशानात मीही गेलेलो आहे.

बॅटमॅन
Sun, 12/08/2013 - 16:56 नवीन
स्मशानात मीही गेलेलो आहे. एकदा नैतर दोनदा. पण मनाई करण्यात कै अर्थ नाही असेच वाटते अजूनही. ते पाहून जो कै शॉक बसेल तो हँडल करण्याइतक्या समर्थ नक्की असाव्यात बैका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

विशेषतः गुलाबबाई अमृतलाल

बॅटमॅन
Sun, 12/08/2013 - 17:05 नवीन
विशेषतः गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी या महिला किरवंतांबद्दल वाचून तर वरील विचार अजूनच पक्के झाले. वडील किरवंत होते त्यांच्या पश्चात त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला-प्रचंड विरोध सोसून. लै खंबीर स्त्री. ते एक सोडा, अगदी तेवढे नसले तरी असले बिनबुडाचे नियम तरी किमान काढावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ विशेषतः मृतदेहाची राख

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/08/2013 - 23:30 नवीन
@ विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. >>> अगदी सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

....

प्यारे१
Sun, 12/08/2013 - 15:32 नवीन
:( ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/08/2013 - 15:47 नवीन
सहमत. तुम्ही सांगितलेल्या आणि इतर बर्‍याच बिनबुडाच्या प्रथा प्रत्येक समाजात धर्माच्या नावाखाली वेळोवेळी घुसडल्या गेलेल्या आहेत. पण त्या केवळ प्रथाच असतात. अनिष्ट अथवा केवळ वेडगळ प्रथांना विरोध करून त्या दूर करणे आपणच करायला हवे. हे काम नातेवाईक किती अंधश्रद्धाळू आहेत त्याप्रमाणे कमीजास्त कठीण आहेच. पण सुरुवात केल्याशिवाय ते आपोआप निश्चित होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

आपोआप निश्चित होणार नाही.

मुक्त विहारि
Sun, 12/08/2013 - 16:01 नवीन
पचंड सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असंही असतं...

अर्धवटराव
Sun, 12/08/2013 - 23:52 नवीन
एका नुकत्याच इंजीनीअरींग पूर्ण केलेल्या एका पंजाबी मुलीचे वडील वारले. अंतयात्रेच्यावेळी मुलीची आई बेशुद्ध पडली. मुलीने आईला उचलुन पलंगावर झोपवलं. वडीलांचा अंत्यसंस्कार स्वतः केला, चितेला अग्नी दिला. ( पुढेही अत्यंत हिमतीने त्या मुलीने प्रचंड कष्टाने लहान-सहान नोकर्‍यांपासुन सुरुवात करत हळुहळु आपलं करीअर व्यवस्थीत सेटल केलं, आपल्या बहिणींच्या शिक्षणाची सोय केली) तिच्या याच गुणांवर एक मराठी मुलगा फिदा झाला व आपलं सर्व आयुष्य तिच्या हाती सोपवुन स्वतः टगेगिरी करायला मोकळा झाला. आज ति मुलगी अर्धवटराव आणि ज्यु. अर्धवटराव अशा दोन टग्यांना सांभाळत आहे :) सौ रॉक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

तुमच्या सौं चे मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/09/2013 - 00:09 नवीन
तुमच्या सौं चे मनःपूर्वक अभिनंदन Image removed. केवळ स्पृहणिय ! आणि स्वतःची टगेगिरी भर चौकात मान्य केल्याबद्दल तुमचेही Image removed. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

पैसा
Mon, 12/09/2013 - 09:04 नवीन
+१ इस्पिक एक्का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अरे वा!

विकास
Mon, 12/09/2013 - 00:26 नवीन
तुमच्या सौं चे (सौ. आवडाबाईंचे ;) ) खरेच कौतुक आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

एक्का साहेब, विकास,

अर्धवटराव
Mon, 12/09/2013 - 01:06 नवीन
आयला... म्हणजे आमचं काहि कौतुकच नाहि होय ??? आपल्याला बिन्धास उडाणटप्पुपणा करायचा असेल तर अशी खंबीर जोडीदारच पाहिजे सोबतीला, हे आम्हि अगदी व्यवास्थीत ओळखलं होतं ;) ... स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मी :D शिवाय वाघिणीसोबत संसार करणं सोपं नाहि महाराज... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

स्वतःच्या पारखी नजरला अगदी

आनन्दिता
Mon, 12/09/2013 - 09:11 नवीन
स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मी
मान गये.... आपकी पारखी नजर और आपकी सौ. दोनोंको.....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/09/2013 - 10:18 नवीन
मान गये.... आपकी पारखी नजर और आपकी सौ. दोनोंको.....!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

ओहो क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/09/2013 - 10:16 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट

बॅटमॅन
Mon, 12/09/2013 - 12:20 नवीन
तुमच्या सौंच्या पायाची प्रिंट पाठवून देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

खिखिखि

अर्धवटराव
Mon, 12/09/2013 - 13:15 नवीन
चेपुवर आमची थोबाडछवी आहे कि :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा