"यमाची वरात"
लेखनविषय:
"यमाची वरात"
पाहिला मी तयास डोकावुनी दारात
उंब-यापाशी होती यमाची वरात
मंदावली मज बुबुळांची वळणे
भयाची कळ आली हऴव्या उरात
जरी शांतता होती चोहोबाजूंनी
रेड्याचे हंबरने झाले कर्कश सुरात
जाता कटाक्ष माझा देवघराकडे
पणतीचे फडफडणे झाले उगी जोरात
अजुनही उचलला नव्हत माझा देह
त्याची पाऊले फिरत होती घराघरात
आठवूनी आल्या मज मागच्या स्मृती
पुरता वाहून गेलो मी अश्रूंच्या पुरात
जाता शून्य नजर समोरच्या भिंतीकडे
माझाच फोटो मज दिसला हारात
येता समीप समय जाण्याचा तो
यमाचे तांडव झाले मोठ्या भारात
मंदावता आता हृदयाची धडधड
शरीर लुळे पडले एका क्षणात
गिळता कडवट आवंढा शेवटचा तो
माझाच प्राण गेला माझ्या घरात
वाचने
1837
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
R.I.P.
माझाच प्राण गेला माझ्या घरात!
In reply to माझाच प्राण गेला माझ्या घरात! by संजय क्षीरसागर
मग कविता केंव्हा केली?
In reply to मग कविता केंव्हा केली? by वैभवकुमारन
हा प्राण असा सारखा ये जा करतो का?
In reply to हा प्राण असा सारखा ये जा करतो का? by संजय क्षीरसागर
आणि बाय द वे, रोज "कविता केल्याशिवाय अंघोळ करणार नाही" असं व्रत
छान
(लिलाध्रा.. ये रे ये.. तुझा
घरातल्या नातेवैकाचे काय ते
हाहाहा
In reply to हाहाहा by सोनल कर्णिक वायकुळ
मस्त कल्पना. पण असल्या कल्पना जगता तुम्हि ? :ऑ
In reply to मस्त कल्पना. पण असल्या कल्पना जगता तुम्हि ? :ऑ by वैभवकुमारन
जो जगतो तोच लिहतो