✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऐक सखे

अ — अमेय६३७७, गुरुवार, 11/28/2013 - 22:21
कशाला उसासे हवे आर्जवांचे   नवी वागण्याची तर्‍हा ही कशी उगा श्वास श्वासांस जाळीत येतो  फिरे जो तुझा हात देहानिशी  तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या  मनासारखे चांदणे शिंपुदे  रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे  जरासे निखारे विखारास दे   प्रिये खेळ आहे खरा संयमाचा  कसे आवरावे कळेना तुला  अगे मंद चालीतली रागदारी  असे ही नव्हे हा स्वरांचा झुला  जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने  तसे वाढवूया निशेला सखी   हळू माधुरीचे भरू देत प्याले  उधाणास येऊ नको सारखी    -- अमेय

प्रतिक्रिया द्या
5014 वाचन

💬 प्रतिसाद (17)

(No subject)

जेनी...
गुरुवार, 11/28/2013 - 22:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लाजलेली स्मायली कुणाकडे असेल

जेनी...
गुरुवार, 11/28/2013 - 22:30 नवीन
लाजलेली स्मायली कुणाकडे असेल तर द्याना ...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

छान!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/28/2013 - 23:19 नवीन
लयीचं सुरेख भान आणि समर्पक शब्द योजना आहे. अनुभवानं अजून आषयघन करता येईल.
  • Log in or register to post comments

नक्की कोणत्या अनुभवाने आशय

शैलेन्द्र
Fri, 11/29/2013 - 00:11 नवीन
नक्की कोणत्या अनुभवाने आशय सघन होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहवासाची प्रदीर्घता आणि कवीमनाच्या संवेदनेची उत्तोरोत्तर वाढणारी

संजय क्षीरसागर
Fri, 11/29/2013 - 00:59 नवीन
तरलता आशय सघन करत नेते. मग कविता मिस्टीकल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

सुंदर रचना, आवडली..

शैलेन्द्र
Fri, 11/29/2013 - 00:11 नवीन
सुंदर रचना, आवडली.. :)
  • Log in or register to post comments

आहा सुरेख

अभ्या..
Fri, 11/29/2013 - 01:02 नवीन
आहा सुरेख
  • Log in or register to post comments

सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 11/29/2013 - 15:07 नवीन
__/\__!!
  • Log in or register to post comments

मस्त प्रणयकविता!

प्यारे१
Fri, 11/29/2013 - 15:13 नवीन
मस्त प्रणयकविता! बाकी हा प्रियकर 'एवढा समजूतदार' कसा काय ब्वा? ;)
  • Log in or register to post comments

छान !!

सूड
Fri, 11/29/2013 - 17:08 नवीन
छान !! पण तुमच्या करुण रसाच्या कविता वाचताना जसं आपसूकच 'वाह !!' येतं तसं नाही वाटलं. बाकी करुण असो वा शृंगारीक, लयबद्धता वाखाणण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments

काय लिवलय...काय लिवलय...!

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/29/2013 - 20:02 नवीन
काय लिवलय...काय लिवलय...! वाक्या..वाक्याला मनातूनच सलाम ग्येला ना राव! ___/\___
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 12/01/2013 - 15:03 नवीन
सुंदर लिहिलंय!
  • Log in or register to post comments

सुंदर !!

प्रसाद गोडबोले
Sun, 12/01/2013 - 15:14 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा वाचली!

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/01/2013 - 15:48 नवीन
पुन्हा एकदा वाचली! :) जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने तसे वाढवूया निशेला सखी हळू माधुरीचे भरू देत प्याले उधाणास येऊ नको सारखी >>> सलाम हाय राव सलाम! __/\__
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Sun, 12/01/2013 - 20:15 नवीन
छान लिहिलंय! :)
  • Log in or register to post comments

वाह... सुंदर !

विशाल कुलकर्णी
Mon, 01/15/2018 - 13:56 नवीन
वाह... सुंदर !
  • Log in or register to post comments

क्या बात!

प्राची अश्विनी
Tue, 01/16/2018 - 06:31 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा