Skip to main content

ऐक सखे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 28/11/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला उसासे हवे आर्जवांचे   नवी वागण्याची तर्‍हा ही कशी उगा श्वास श्वासांस जाळीत येतो  फिरे जो तुझा हात देहानिशी  तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या  मनासारखे चांदणे शिंपुदे  रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे  जरासे निखारे विखारास दे   प्रिये खेळ आहे खरा संयमाचा  कसे आवरावे कळेना तुला  अगे मंद चालीतली रागदारी  असे ही नव्हे हा स्वरांचा झुला  जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने  तसे वाढवूया निशेला सखी   हळू माधुरीचे भरू देत प्याले  उधाणास येऊ नको सारखी    -- अमेय
लेखनविषय:

वाचने 5023
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

लयीचं सुरेख भान आणि समर्पक शब्द योजना आहे. अनुभवानं अजून आषयघन करता येईल.

In reply to by शैलेन्द्र

तरलता आशय सघन करत नेते. मग कविता मिस्टीकल होते.

__/\__!!

मस्त प्रणयकविता! बाकी हा प्रियकर 'एवढा समजूतदार' कसा काय ब्वा? ;)

छान !! पण तुमच्या करुण रसाच्या कविता वाचताना जसं आपसूकच 'वाह !!' येतं तसं नाही वाटलं. बाकी करुण असो वा शृंगारीक, लयबद्धता वाखाणण्यासारखी आहे.

काय लिवलय...काय लिवलय...! वाक्या..वाक्याला मनातूनच सलाम ग्येला ना राव! ___/\___

सुंदर लिहिलंय!

पुन्हा एकदा वाचली! :) जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने तसे वाढवूया निशेला सखी हळू माधुरीचे भरू देत प्याले उधाणास येऊ नको सारखी >>> सलाम हाय राव सलाम! __/\__