✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चार विनोद

न
निमिष सोनार यांनी
Sun, 11/17/2013 - 20:48  ·  लेख
लेख
विनोद: लेखक- निमिष सोनार 1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो. काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो, "आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका " तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो, "मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही " पेटीत टाकतो आणि निघून जातो. 2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती, "रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका. खात्री नसली तर हात लावाच. रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. " 3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात, "आपण पहात आहात आकाशवाणी " 4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका, "कटौती बीजली की " प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24515 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

प्रचंड कष्टून देखील हसायला

प्यारे१
Wed, 11/20/2013 - 13:21 नवीन
:) प्रचंड कष्टून देखील हसायला जमेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हो!! पझ्न आम्हाला तुमचा

शिल्पा ब
Wed, 11/20/2013 - 13:24 नवीन
हो!! पझ्न आम्हाला तुमचा निरागस प्रश्न वाचुनच हसु आलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ए माझे पण माझे पण ...

पियुशा
Tue, 11/19/2013 - 16:52 नवीन
ए माझे पण माझे पण ... १ एकदा हत्ती लोकांची बास्केटबॉलची मॅच चाललेली असते. एक मुंगी मधेच उभी असते. असे का...? उत्तर: कारण ती रेफरी असते. २ एकदा एक मुंगी झाडावर बसलेली असते आणि हत्ती खालच्या तलावात पोहत असतो. तर ते त्यांच्या पोसिशन्स कश्या इंटरचेंज करतील...? उत्तर: मुंगी पाण्यात उडी मारेल आणि त्यामुळे जोरदार पाणी उडून हत्ती त्या पाण्याबरोबर उडून झाडावर जाऊन पोहोचेल. ( बस्स का अजुन बोरे म्रु ? ;) )
  • Log in or register to post comments

आमचाही हातभार...

नानबा
Tue, 11/19/2013 - 17:01 नवीन
एका माणसाच्या घरी अचानक पाहुणे येतात. तो आपल्या बायकोला पाहुण्यांसाठी लिंबू सरबत बनवायला सांगतो. पण बायको सांगते, "घरातली लिंबं संपलीयेत" नवरा म्हणतो, "अगं, तो भांडी घासायचं व्हिम लिक्वीड आहे की. त्यात आहे १०० लिंबांची शक्ती. टाक दोन थेंब" ;)
  • Log in or register to post comments

(स्वाक्षरीसाठी +१)

आदूबाळ
Wed, 11/20/2013 - 05:17 नवीन
:)) (स्वाक्षरीसाठी +१)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

आमच्या अभियांत्रिकीच्या प्रथम

सौंदाळा
Tue, 11/19/2013 - 17:29 नवीन
आमच्या अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी सुतारकाम कार्यशाळेत घडलेला खरा विनोद. २१-४० रोल नंबर्सची बॅच होती. मास्तरने हजेरी चालु केली. ट्वेंट्वी वन, ट्वेंट्वी टु, ट्वेंट्वी थ्री... 'ट्वेंट्व' ऐकुनच आम्ही पुढे होतो ते हळुहळु मागे जाउन टेबलखाली वाकुन भरपुर हसलो. हजेरी चालुच होती. ट्वेंट्वी एट, ट्वेंट्वी नाईन आणि नंतर कहर ट्वेंट्वी टेन म्हटल्यावर जो हास्याचा स्फोट झाला..टर्म्-वर्कला वाट लावली मास्तरने बरोबर..
  • Log in or register to post comments

अभियांत्रिकीवरून आठवलं...

नानबा
Wed, 11/20/2013 - 09:50 नवीन
आम्ही इंजिनियरींगच्या तिसर्‍या वर्षात असताना घडलेला किस्सा - ५ सप्टेंबरला, शिक्षक दिन म्हणून कॉलेजच्या मेन गेटवर उभे राहून येणार्‍या प्रत्येक शिक्षकाला एक गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. आमचेच मेकॅनिकलचे एक सर आले. एका विद्यार्थ्याने त्यांना गुलाब दिला आणि म्हणाला, "हॅप्पी टीचर्स डे सर". त्यावर सर उत्तरले, "सेम टू यू". पोरं खिदळून खिदळून पागल. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आमचीही एक..

ब़जरबट्टू
Mon, 12/09/2013 - 14:00 नवीन
अभियांत्रिकीच्या वर्षाच्या व्हायवा मधील अगदी खरा किस्सा… मास्तरले विचारले - पेन मध्ये कोणत्या टाईपचा स्प्रिंग असतो ? आमचे टापर… - सर, आय थिंक इट्स लिफ स्प्रिंग … यानन्तर मास्तरले परत कधीच स्प्रिंगचा विषय काढला नाही.. :)) टिप :- ज्योक टेकनिकल हाये… :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

१०० लिंबांची शक्ती ... हा हा हा हा ...

निमिष सोनार
Tue, 11/19/2013 - 17:50 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

आमचाबी एकः

आदूबाळ
Wed, 11/20/2013 - 05:19 नवीन
आमचाबी एकः एक चिमणी आकाशातून उडत असताना शी करते. पण ती जमिनीवर पडत नाही. का? . . . कारण चिमणीने चड्डी घातलेली असते...
  • Log in or register to post comments

एक चिमणी आकाशातून उडत असताना

परिंदा
Wed, 11/20/2013 - 16:17 नवीन
एक चिमणी आकाशातून उडत असताना शी करते. ती शी एका माणसाच्या डोक्यावर पडते. माणूस वैतागून चिमणीवर ओरडतो. "चिमणे, तुला चड्डी घालायला काय होते?" चिमणी: "गधड्या, तू तरी चड्डी घालून शी करतोस का?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

:)

sagarpdy
Wed, 11/20/2013 - 17:32 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

(No subject)

आदूबाळ
Fri, 11/22/2013 - 12:54 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

चड्डी???

ज्ञानव
Sun, 12/08/2013 - 14:31 नवीन
शी-शु वर्गातला किस्सा (खर्रा खुर्रा )नाव बदलून हं पण ..... बंड्या : टीचर....(करंगळी वर करून दाखवतो ) टीचर : जा जाऊन ये थोड्या वेळाने बंड्या परत आला बंड्या : टीचर सापडत नाहीये टीचर : अरे सरळ जाऊन लेफ्टला कोर्नरलातर आहे टोयलेट जा लवकर जाऊन ये बंड्या परत येतो बंड्या : बाई सापडत नाही ये दाखवा ना घाई आहे.... टीचर : गंपू जारे दाखव ह्याला टोयलेट कुठे आहे ते... थोड्या वेळाने गंपू : टीचर,झाली एकदाची.....त्याने चड्डी उलटी घातली होती ना म्हणून सापडत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

एकदा एक साप आणि एक नाग

sagarpdy
Wed, 11/20/2013 - 10:08 नवीन
एकदा एक साप आणि एक नाग जोरजोरात भांडत असतात. भांडण्याच्या नादात नाग : ए, सापड्या ! साप (लगेच): ए, नागड्या ! :D :P
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Fri, 11/22/2013 - 14:43 नवीन
एकदा एक साप आणि एक नाग जोरजोरात भांडत असतात. भांडण्याच्या नादात नाग : ए, सापड्या ! साप (लगेच): ए, नागड्या ! हॅ हॅ हॅ... हाच जोक मी जरा वेगळ्या वर्जन मध्ये ऐकला होता. साप आणि नाग याऐवजी (प्रसिद्ध) जुळ्या मुलांची नावे होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सिता-राम...!!!

शिद
Fri, 11/22/2013 - 16:25 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

काय नाव होती ती?

परिंदा
Fri, 11/22/2013 - 17:26 नवीन
काय नाव होती ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

प्रसिद्ध जुळे.

प्रभाकर पेठकर
Sun, 12/08/2013 - 14:57 नवीन
लव-कुश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

अगागा..

ब़जरबट्टू
Mon, 12/09/2013 - 13:50 नवीन
हसून हसुन मरतय आज.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

:-)

सरल मान
Sat, 11/01/2014 - 17:42 नवीन
जुळ्या मुलांची नावे...लय भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सापवरचा अजून एक विनोद वरचा विनोद

वाह्यात कार्ट
Wed, 11/20/2013 - 12:42 नवीन
एक सापाचं पिल्लू पळत पळत आई कडे जातं आणि म्हणतं "आई आई, आपण विषारी कि बिन-विषारी " आई म्हणते "बिन- विषारी" तर ते पिल्लू हुश्श!! म्हणतं. आई म्हणते "का रे की झालं ?" तर पिल्लू म्हणतं "अगं मी माझी जीभ चावली ..!!!" अजून एक सापाचं पिल्लू पळत पळत आई कडे जातं आणि म्हणतं "आई आई, आपण विषारी कि बिन-विषारी " आई म्हणते "विषारी" तर ते पिल्लू "अॅक !!" करून मरतं !!!
  • Log in or register to post comments

अरेरे..

प्रभाकर पेठकर
Wed, 11/20/2013 - 13:43 नवीन
आईवरील 'अंधश्रद्धा'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

आयला....

नानबा
Wed, 11/20/2013 - 17:09 नवीन
सापाला लहानपणी पाय असतात?? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

सापाचे पाय बिळात दिसतात ते

बॅटमॅन
Wed, 11/20/2013 - 18:03 नवीन
सापाचे पाय बिळात दिसतात ते असेच काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

२ झुरळ ICU मधे बेडवर..

यसवायजी
Wed, 11/20/2013 - 18:20 नवीन
२ झुरळ ICU मधे बेडवर.. पहिला दुसर्‍याला विचारतो:- काय 'बेगॉन' का? दुसरा:- नाही राव, 'पॅरेगॉन'.. :D
  • Log in or register to post comments

जुना पण चांगला आहे.

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 17:08 नवीन
जुना पण चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मजा आली बरं का!!

निमिष सोनार
Wed, 11/20/2013 - 18:34 नवीन
खुप छान ..
  • Log in or register to post comments

CHEMISRY LAB मध्ये

देशपांडे विनायक
Wed, 11/20/2013 - 19:05 नवीन
CHEMISRY LAB मध्ये DEMONSRATER मागील आठवड्यात आणलेला बर्फ सापडत नाही म्हणून इतका पेटला होता की आम्ही सारे थिजून उभे राहिलो होतो
  • Log in or register to post comments

T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र

देशपांडे विनायक
Wed, 11/20/2013 - 19:09 नवीन
T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र विनंती
  • Log in or register to post comments

T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र

नानबा
गुरुवार, 11/21/2013 - 09:19 नवीन
T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र विनंती
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक

//_टॉमी_//

जय - गणेश
गुरुवार, 11/21/2013 - 11:37 नवीन
मि. केळकरांन कडे एक कुत्रा असतो त्याच नाव टॉमी. हा टॉमी त्याचा लाडका कुत्रा आसतो. एकदा मि. केळकरांन कडे मि. पाटील चहाला जातात. तेव्हा मि. केळकर आपल्या टॉमी ची स्तुती करतात. आमच्या टॉमीला हे येत, ते येत वैगरे वैगरे. मि. पाटील : काय सागंता. मि. केळकर : मग काय, अहो हे तर काहीच नाही, आमच्या टॉमीला इंग्रजी पण समजते. तुम्ही बोला त्याच्याशी आणी खात्री करा. मि. पाटील टॉमीला एक बिस्कीट हातात घेवुन : टॉमी टेक. टॉमी जातो आणी भींतीला जावुन टेकतो.
  • Log in or register to post comments

एकदा धर्मेंद्र बसलेला असतो

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 17:09 नवीन
एकदा धर्मेंद्र बसलेला असतो असाच, जवळ बरीच बिस्किटे असतात. एक कुत्रे येते आणि बकाणा भरून बिस्किटे नेऊ लागते तेवढ्यात धर्मेंद्र काहीतरी बोलतो आणि ते कुत्रे बिचारे सगळी बिस्किटे टाकून एकच बिस्किट नेते. धर्मेंद्र असा काय बोलला असेल???? . . . . . . . . . . कुत्ते....कमी ने!!!!!!!!
  • Log in or register to post comments

रावणाच्या लंकेला सोन्याची

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/21/2013 - 18:25 नवीन
रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात? कारण रावणाला त्याच्या लहानपणी सगळे सोन्या म्हणायचे =))
  • Log in or register to post comments

(No subject)

sagarpdy
गुरुवार, 11/21/2013 - 20:04 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

//_रावण_//

जय - गणेश
Fri, 11/22/2013 - 10:12 नवीन
रावण दाढी कसा करीत असेल ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

रावण दाढी कसा करीत असेल ??

नानबा
Fri, 11/22/2013 - 10:34 नवीन
रावण दाढी कसा करीत असेल ??
ते राहीलं... तो रथात कसा बसत असेल?? आणि कधी ड्रायव्हर सीट वर बसायची वेळ आली म्हणजे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

रावणाचा पासपोर्ट साईज फोटो

परिंदा
Sat, 11/23/2013 - 14:10 नवीन
रावणाचा पासपोर्ट साईज फोटो कसा असेल त्याची खुप उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

सार्वजनिक स्वच्छतागृहात रावण

sagarpdy
Fri, 11/22/2013 - 10:38 नवीन
सार्वजनिक स्वच्छतागृहात रावण !!! हसून पुरेवाट झाली कल्पना करूनच :D =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

//_दहा रुम_//

जय - गणेश
Fri, 11/22/2013 - 11:32 नवीन
दहा रुम ची एक चाळच बांधली असेल, चाळीच्या बरोबर मध्यभागी एक कमोड बसवला असेल, पण त्याला जेव्हा अजीर्ण होत असेल, आणी संडासला जेव्हा भयंकर असा दर्प येत असेल, तेव्हा तो दहा पैकी कोणत नाक दाबुन धरीत असेल ? - या प्रश्ना मुळे हल्ली मला वामकुक्शी सुध्धा घेता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

एक नाक हाताने दाबून ठेवत असेल

परिंदा
Sat, 11/23/2013 - 14:09 नवीन
एक नाक हाताने दाबून ठेवत असेल, उरलेली ९ नाक कपडे वाळवताना ज्या क्लिपा वापरतात ना त्यांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

हाताने....रेझरने...न्हावी

टवाळ कार्टा
Fri, 11/22/2013 - 19:16 नवीन
हाताने....रेझरने...न्हावी असेलच ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

मालकांनी 'अनाहिता' सारखा एक '

सुहास..
Fri, 11/22/2013 - 11:50 नवीन
मालकांनी 'अनाहिता' सारखा एक ' बाल-विभाग' सुरु करायच हे मनावर घ्यावे... हि नम्र विनंती !! एक विनोद ... . . . . . . नको च ...काही मृदु बाल मनावर परिणाम होतील .
  • Log in or register to post comments

आमच्या पण २ समिधा... फालतु पिजे

शिद
Fri, 11/22/2013 - 16:34 नवीन
तो: जिना सिर्फ मेरे लिये... जिना सिर्फ मेरे लिये... ती: ठीक आहे, मी लिफ्ट ने जाते… तू ये जिन्याने... --------------- मास्तर: अमेरिकेने चंद्रावर पाणी व बर्फाचा शोध लावला… आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात? गण्या: आता आपल्याला फक्त दारु आणि चखना घेवून जावे लागेल.
  • Log in or register to post comments

Lol

सरल मान
Sat, 11/01/2014 - 17:47 नवीन
Lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

एका मठावर गेलो होतो .सात साधू

काळा पहाड
Sat, 12/07/2013 - 19:39 नवीन
एका मठावर गेलो होतो .सात साधू सात चटयांवर बसले होते,मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु? . . . . ... बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले . . . . . . . . . .गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा...
  • Log in or register to post comments

बाळू जोशी काकूंच्या दारावर

काळा पहाड
Sat, 12/07/2013 - 19:45 नवीन
बाळू जोशी काकूंच्या दारावर टकटक करतो. जोशी काकू : कोण आहे ? बाळू : मी आहे ? जोशी काकू : मी कोण ? बाळू : तुम्ही जोशी काकू!
  • Log in or register to post comments

घटस्फोटाचा खटला चालू होता.

काळा पहाड
Sat, 12/07/2013 - 19:45 नवीन
घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं , ' तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे ?' पत्नी : ते , माझा मानसिक छळ करतात. न्यायाधीश : कसा काय ? पत्नी : आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात आणि मी उत्तर देऊ लागले , की श्रवणयंत्र बंद करून ठेवतात!
  • Log in or register to post comments

प्रतिसादातले विनोद वाचून

विजुभाऊ
Sat, 11/01/2014 - 16:38 नवीन
प्रतिसादातले विनोद वाचून पुन्हा एकदा मस्त हसलो........
  • Log in or register to post comments

विनोद चार और प्रतिसाद सौ बहोत ना इन्साफे है !

मारवा
Sat, 11/01/2014 - 20:36 नवीन
एक विनोद माझा हजार प्रतिसादाच्या ताकदिचा परी अल्प प्रतिसाद पाहता मला वेगळीच शंका येते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा