✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चार विनोद

न
निमिष सोनार यांनी
Sun, 11/17/2013 - 20:48  ·  लेख
लेख
विनोद: लेखक- निमिष सोनार 1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो. काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो, "आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका " तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो, "मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही " पेटीत टाकतो आणि निघून जातो. 2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती, "रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका. खात्री नसली तर हात लावाच. रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. " 3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात, "आपण पहात आहात आकाशवाणी " 4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका, "कटौती बीजली की " प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24515 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

अरे बापरे.........

विजुभाऊ
Sun, 11/17/2013 - 20:56 नवीन
अरे बापरे......... असले विनोद पूर्वी" स्वराज्य"नावाचे साप्ताहीक यायचे त्यात असायचे. हे विनोद वाचणार्‍यांचे मानसीक वय काय अपेक्षीत आहे?
  • Log in or register to post comments

निमिष'जी.. आपले या आधीचे उच्च

मृगनयनी
Sun, 11/17/2013 - 21:01 नवीन
निमिष'जी.. आपले या आधीचे उच्च दर्जाचे लिखाण आम्ही वाचले आहे.... आता अचानक काय झाले?...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

*

जेपी
Sun, 11/17/2013 - 21:01 नवीन
चेपुवरचे स्वत:चे स्टेटस इथे टंकले का? टुकार ज्योक्स .
  • Log in or register to post comments

हे विनोद वाचणार्‍यांचे मानसीक

विद्युत् बालक
Sun, 11/17/2013 - 21:02 नवीन
हे विनोद वाचणार्‍यांचे मानसीक वय तुमचे जेवढे स्वराज्य मासिक वाचताना होते तेवढेच ! =))
  • Log in or register to post comments

मनी वसे ते स्वप्नि दिसे!

अग्निकोल्हा
Sun, 11/17/2013 - 23:34 नवीन
पटाक करुंन आपले सदस्यनाव चुकुन अनेकदा विद्या बालन असे वाचले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

खी खी खी !

विद्युत् बालक
Sun, 11/17/2013 - 23:39 नवीन
खी खी खी ! आम्ही दोघेही शॉक देण्यास समर्थ आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

चहा आणी मारी

जेपी
Sun, 11/17/2013 - 21:04 नवीन
चहा आणी मारी पहिला प्रतिसाद माझा वाटला , टंकेपर्यत नंबर घसरला .
  • Log in or register to post comments

माफ करा, पण जोक अत्यंत सुमार

प्रचेतस
Sun, 11/17/2013 - 21:46 नवीन
माफ करा, पण जोक अत्यंत सुमार आणि फालतू आहेत.
  • Log in or register to post comments

अहो अगोबा

मी-सौरभ
Mon, 11/18/2013 - 13:20 नवीन
ते काय माफ करनार?? माफ करणारा एकच 'आकाशातला बाप' त्यांना पण आणि तुला पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/17/2013 - 23:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अश्याच धाग्यावर ... चंपक

गवि
Sun, 11/17/2013 - 23:18 नवीन
अश्याच धाग्यावर ... चंपक मासिक.. हसू नका बरे हे त्यातलं सदर... ठकठक.. यासम आठवण आणि प्रतिक्रिया असं देजावू फीलिंग का येतंय.. ? हा धागा आधी आलाय का ?
  • Log in or register to post comments

अजून दोन विनोद

चाणक्य
Sun, 11/17/2013 - 23:29 नवीन
१. विनोद खन्ना २. विनोद कांबळी
  • Log in or register to post comments

अजून दोन विनोद

विद्युत् बालक
Sun, 11/17/2013 - 23:36 नवीन
१. सनी देओल २. सनी लिओने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

सनी लिओने ?

चिगो
Sat, 12/07/2013 - 20:57 नवीन
सनी लिओने ? अहो, हा काय विनोदाचा विषय आहे? हा घ्या.. एकदा सनी लिऑने एका कपड्यांच्या दुकानात जाते. कपडे निवडल्यावर ती सेल्समॅनला विचारते, " ट्रायल रुम कुठेय?" सेल्समॅन म्हणतो, "मॅडम, घ्या की इथंच.. आपण पाहीलंय सगळं तसंही..." ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

आम्ही एक दुसरा विनोद ऐकला

बॅटमॅन
Sun, 12/08/2013 - 15:09 नवीन
आम्ही एक दुसरा विनोद ऐकला होता. सन्नी लिओने ने बॉलीवुड पिच्चरमध्ये अंगप्रदर्शनवाले शीन देणे म्हणजे आयायटीच्या परीक्षेत टॉप करून म्हाराष्ट्र सीईटीला पुन्हा बसण्यापैकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

सुरेख, अन ओरीजनल. कंटेट मात्र कमी आहे

अग्निकोल्हा
Sun, 11/17/2013 - 23:31 नवीन
शक्य असल्यास यात आपले अजुन जोक्स टाकुन हां धागा अपडेट करा.
  • Log in or register to post comments

शक्य असल्यास यात आपले अजुन

विजुभाऊ
Sun, 11/17/2013 - 23:45 नवीन
शक्य असल्यास यात आपले अजुन जोक्स टाकुन हां धागा अपडेट करा.
एकवेळ "ओन्जलीतील सूर ते निसतेले.ते मल कुन्वीत आहे " सारखी कविता लिहायची शिक्षा द्या. पण इथल्या स्टायलीचे विनोद लिहायला सांगु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

एक होता 'ट'. तो एकदा रसत्याने

sagarpdy
Sun, 11/17/2013 - 23:52 नवीन
एक होता 'ट'. तो एकदा रसत्याने चालला होत. मागून एक PMT आली, आणि 'ट' ला उडवून गेली . तर 'ट' चं काय हॊइल ? ऊ : टमरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मस्तच :)

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 01:24 नवीन
तुमचाही एक स्वतंत्र धागा का सुरु करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

(No subject)

sagarpdy
Mon, 11/18/2013 - 09:42 नवीन
:D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

भारी

अक्शु
Tue, 11/19/2013 - 09:48 नवीन
भारी.....खुपच मस्त..........भारीच हसु आलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

लय भारी !!!!!

बाहुली
Tue, 11/19/2013 - 14:11 नवीन
लय भारी !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अगागागागागागा =))

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 14:30 नवीन
अगागागागागागा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अरे विनोद मेहरा., एजन्ट विनोद

विजुभाऊ
Sun, 11/17/2013 - 23:39 नवीन
अरे विनोद मेहरा., एजन्ट विनोद , हे राहीलेच की. इतके विनोदु नका हो ;)
  • Log in or register to post comments

बालक विभाग

sagarpdy
Sun, 11/17/2013 - 23:47 नवीन
महिला विभाग आणि पुरुष विभाग राहूदेत. आधी बालक विभाग सुरु करावा हि विनंती.
  • Log in or register to post comments

सरदार नवी वही विकत का आणतो?

आदूबाळ
Mon, 11/18/2013 - 00:10 नवीन
सरदार नवी वही विकत का आणतो?
  • Log in or register to post comments

सरदार नवीन वही विकत आणतो कारण -

निमिष सोनार
Mon, 11/18/2013 - 11:31 नवीन
बघा . विनोदांवर आलेल्या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन झालेच ना सगळ्यांचे? सरदार नवीन वही विकत आणतो कारण - त्याला मिसळपाव वरचे माझे जोक घरी जावून त्या वहीत लिहायचे असतात ...
  • Log in or register to post comments

बघा . विनोदांवर आलेल्या

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 21:48 नवीन
बघा . विनोदांवर आलेल्या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन झालेच ना सगळ्यांचे?
'इट इज वेरी ऑप्टिमिस्टिक ऑफ यू.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

कार्लूचा ड्वायलॉक!

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 14:32 नवीन
कार्लूचा ड्वायलॉक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

बापरे! म्हंजे अजून येणारेत का

आदूबाळ
Tue, 11/19/2013 - 01:37 नवीन
बापरे! म्हंजे अजून येणारेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

चावरेपणाचा कळस......

मिनेश
Mon, 11/18/2013 - 13:21 नवीन
चावरेपणाचा कळस......
  • Log in or register to post comments

खि खि खि....

दिपक.कुवेत
Mon, 11/18/2013 - 13:22 नवीन
सॉलीड जोक (गडाबडा लोळणारी स्मायली)
  • Log in or register to post comments

"चार विनोद" हे शीर्षक

श्रीगुरुजी
Mon, 11/18/2013 - 19:26 नवीन
"चार विनोद" हे शीर्षक वाचल्यावर मला वाटले की 'चार विनोद' म्हणजे विनोद खन्ना, विनोद मेहरा, विनोद कांबळी आणि विनोद तावडे. पण इथे भलतेच विनोदी विनोद आहेत.
  • Log in or register to post comments

क्रमशः?

सुनील
Tue, 11/19/2013 - 08:55 नवीन
क्रमश: असे टंकायचे राहिले वाट्टं? ;)
  • Log in or register to post comments

मला असे विनोद आवडतात

अक्शु
Tue, 11/19/2013 - 10:07 नवीन
मला का माहिती नाही पण असे लहानपणिचे विनोद अगदी माहिति असले तरी ऐकायला आवडतात. त्यातली मजा इन्नोसण्ट असते आणि एखाद लहान मुल जर सान्गत असेल तर विनोदापेक्शा त्यान्च्या बोलण्याच जास्त हसु येत.
  • Log in or register to post comments

आणखी काहि विनोद!

सदासुखि
Tue, 11/19/2013 - 13:39 नवीन
१>(कपड्यांच्या दुकानात) महिला- मला गाऊन दाखवा. दुकानदार - पण मला गाता नाहि येत. २>(मेडिकल दुकानात) मुलगा - मुझे डोले मे डालने कि दवा दिजिये. दुकानदार - बेटा डोले मे नही आँख मे कहते हे. मुलगा - वही तो वो मेरे तोंड मे गलतिसे डोले आ गया.
  • Log in or register to post comments

अजुन १

यसवायजी
Tue, 11/19/2013 - 16:20 नवीन
अजुन १ पहायला आलेला मुलगः- गाउन दाखव मुलगी: वाळत घातलाय मुलगा:- (चिडुन)अस्स काय? वाळू दे, वाळू दे.. मुलगी:- (हातात वाळू देत) हि घे वाळू. मुलगी रोक्स.. मुलगा शॉक्स.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदासुखि

ऐकला होता हा जोक. भन्नाट आहे.

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 16:23 नवीन
ऐकला होता हा जोक. भन्नाट आहे. याची अजून एक खंग्री व्हर्जनही आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

इथे देण्यासारखा नसल्यास..

यसवायजी
Tue, 11/19/2013 - 16:42 नवीन
व्यनी प्लेअसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमचाही एक विनोद.

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 14:32 नवीन
आमचाही एक विनोद. एक प्रेग्नंट बै दवाखान्यात जाते. डॉक्टर विचारतो कितवा महिना. बै म्हणते आठवा. बराच वेळ डोके खाजवून खाजवून डॉक्टर म्हणतो, आठवत नै बॉ.
  • Log in or register to post comments

जमलय

सव्यसाची
Tue, 11/19/2013 - 16:43 नवीन
जमलय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्तच..

ब़जरबट्टू
Mon, 12/09/2013 - 13:43 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक सोनार की

पप्पु अंकल
Tue, 11/19/2013 - 14:46 नवीन
वाट आन आईडिया सरजी... एका गुगली वर एव्हढ्या विकेट्स
  • Log in or register to post comments

हे काय आहे? इतके प्रतिसाद?

परिंदा
Tue, 11/19/2013 - 14:49 नवीन
हे काय आहे? इतके प्रतिसाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पु अंकल

वाट आन आईडिया सरजी...

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 14:52 नवीन
वाट आन आईडिया सरजी... एका मजकुरावर वर एव्हढे प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पु अंकल

मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ?

निमिष सोनार
Tue, 11/19/2013 - 15:56 नवीन
एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो. त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? " संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो. बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! " (पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना! आजच, आताच घ्या आमची वडी...)
  • Log in or register to post comments

नाटीका शांपू

निमिष सोनार
Tue, 11/19/2013 - 15:57 नवीन
नाटीका शांपू एक बारा तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते : " माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे! मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते : " माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ... आं .... मी नाही सांगणार ! " ( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना! ही कमाल आहे आमच्या शांपूची... वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! )
  • Log in or register to post comments

पुस्तकी विनोद

निमिष सोनार
Tue, 11/19/2013 - 16:03 नवीन
एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना: या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही. तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही. तुमचा असल्यास तो एक योगायोग मानावा. हे पुस्तक खालील अटींसह विकले गेले आहे : या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकाधीन आहेत. या पुस्तकाचे इतरांसमोर वाचन, मनन, पठण, चिंतन करू नये. तसेच याची मनातल्या मनात झेरोक्स काढू नये. तसे कुणी करतांना आढळल्यास वाचकाचा मनाला लगाम घालण्यात येईल. हे पुस्तक फक्त आणि फक्त एकट्याने वाचावे. दुसऱ्या कुणाला वाचायला देवू नये. नाहितर ते जप्त करण्यात येईल. त्याऐवजी त्याला विकत घ्यायला उद्युक्त करावे. पुस्तक : योग आणि योगायोग (एका विनोदी आत्म्याचे चारित्र्यहीन आत्मचरीत्र) लेखक : श्री. सत्यव्रत सत्यवचने प्रकाशक : श्री. सत्यव्रत सत्यवचने मुद्रक : श्री. सत्यव्रत सत्यवचने विक्रेते : श्री. सत्यव्रत सत्यवचने
  • Log in or register to post comments

का पण?

प्यारे१
Tue, 11/19/2013 - 16:47 नवीन
का पण?
  • Log in or register to post comments

लोल अगदी मोठ्ठ्याने लोल !

शिल्पा ब
Wed, 11/20/2013 - 09:50 नवीन
लोल अगदी मोठ्ठ्याने लोल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा