✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन डाव ९

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 11/21/2013 - 15:01  ·  लेख
लेख
डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी. काय खेळणार आनंद? पहिली मूव कोणती? ई४ का?

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव ९

  • ‹ आनंद - कार्लसन डाव ८
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
22779 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

डी ४ आनंदने

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:02 नवीन
वजिराच्या प्याद्याने सुरुवात केली आहे.
  • Log in or register to post comments

आधी धागा उघडला आता म्याच ओपन करतो

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/21/2013 - 15:19 नवीन
डि4 ओपनिंग असेल तर आज डाव विशिच्या बाजूने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वाटच पाहत होतो धाग्याची.. दोन

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 15:04 नवीन
वाटच पाहत होतो धाग्याची.. दोन डावांपेक्षा वेगळी सुरवात
  • Log in or register to post comments

फिंगर्स क्रॉस्सड

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 15:07 नवीन
पुढच्या चार डावात ३.५ पॉईंट पाहिजेत जिंकायला .... कमॉन आनंद
  • Log in or register to post comments

चारातले दोन जिंकून + २ ड्रॉ

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 15:10 नवीन
चारातले दोन जिंकून + २ ड्रॉ असे ३ पॉइंही चालतील रे.. टायब्रेकरमध्ये बघु कमॉन .. आज जिंकच
  • Log in or register to post comments

आनंदने आक्रमक चाली सुरु केल्या आहेत.

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:11 नवीन
एका प्याद्याची मारामारी झाली आहे. सी ४ प्यादे खेळून मॅग्नुसने आनंदचा उंट डी ३ मधे येणार नाही याची काळजी घेतली आहे.
  • Log in or register to post comments

घोडा ई २ मधे आणलाय

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:15 नवीन
जी २ असा प्यादं पुढे घेऊन उंट कर्णात घ्यायची तयारी आनंदची. घोडा सी ६. मॅग्नुस लगोलग खेळला. वेळ घालवत नाहीये. कॅसल करेल असे वाटले होते. मॅग्नुस दरवेळी आनंदला निर्णय घ्यायला भाग पाडतोय. आणि त्यानुसार खेळी करतोय. आनंद जीई४ खेळलाय!
  • Log in or register to post comments

मॅग्नस एवढा काय विचार करतोय?

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 15:21 नवीन
मॅग्नस एवढा काय विचार करतोय? ही पोझिशन नवी नसावी
  • Log in or register to post comments

माताय!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:21 नवीन
विडो स्ट्रीम बोंबलतोय राव मधूनच. :(
  • Log in or register to post comments

दहाव्या खेळीला

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:29 नवीन
मॅग्नुस बराच वेळ घेतो़य. कॅसल केलाय. छोटा कॅसल. तो आधी लांबवायला बघत होता पण शेवटी आनंदने त्याला निर्णय घ्यायला भाग पाडले असे दिसते. अपेक्षेप्रमाणे आनंदचा पांढरा उंट कर्णात येऊन बसला जी २!
  • Log in or register to post comments

राजाच्या

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 15:30 नवीन
आनंदने राजाच्या बाजूने दुय्यम कर्णाला मोकळा केलाय. मॅग्नसचा काळा उंट आधीच पडलेला असल्याने त्याला वजीरानेच हल्ला करता येईल. हा काहीसा सापळा लावलाय का आनंदने?
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच मॅग्नुस

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 15:34 नवीन
एवढा विचारात पडलेला दिसतोय. त्याची २१ मिनिटे झाली आहेत आणि आनंदची फक्त साडेनऊ!
  • Log in or register to post comments

आज

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 15:35 नवीन
दोघांच्या भूमिका बदललेल्या दिसताहेत. आनंद पटापट खेळ्या करतोय तर मॅग्नस प्रत्येक खेळीला वेळ घेतोय.
  • Log in or register to post comments

पुन्हा घोडा नी उंटाचं

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 15:57 नवीन
पुन्हा घोडा नी उंटाचं एक्सचेंज का करत नाहिये मॅग्नस?
  • Log in or register to post comments

Live chess broadcast powered

sagarpdy
गुरुवार, 11/21/2013 - 16:00 नवीन
var cbeOptions = { layout: "2", room: "2013-wcc", game: "09-Anand_Viswanathan-Carlsen_Magnus", annotations: true };

Live chess broadcast powered by ChessBomb and Chessdom

  • Log in or register to post comments

आज काहितरी जबरदस्त बघायला

आनंद
गुरुवार, 11/21/2013 - 16:06 नवीन
आज काहितरी जबरदस्त बघायला मिळणार आहे अस वाटतय.
  • Log in or register to post comments

उत्तम!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:07 नवीन
इथेच डाव टाकलाय ते छान केलेत. मध्यंतरी नेट तब्बल दहा मिंटे बोंबलल्याने काहीच दिसत नव्हते.
  • Log in or register to post comments

मॅग्नुसचा प्लॅन हत्ती ए६ मधून

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:09 नवीन
पुढे काढून राजाच्या बाजूला आणायचा आहे. घोडा आणि उंट मारामारी झाली आणि मॅग्नुसने हत्ती आणला ए६ मधे.
  • Log in or register to post comments

मॅग्नुसचा प्लॅन हत्ती ए६ मधून

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:10 नवीन
पुढे काढून राजाच्या बाजूला आणायचा आहे. घोडा आणि उंट मारामारी झाली आणि मॅग्नुसने हत्ती आणला ए६ मधे.
  • Log in or register to post comments

एक्सचेंज नंतर पुढे काही

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 16:10 नवीन
एक्सचेंज नंतर पुढे काही चाल्लेय का? हाफिसात लिंक गंडलिये :(
  • Log in or register to post comments

शक्यता अनेक आहेत. पण हे

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 16:27 नवीन
शक्यता अनेक आहेत. पण हे दोघेही ताकही इतके फुंकून पिताहेत.. आम्ही मधल्यामधे आशेवर टागलेलो! काहितरी भन्नाट बघायला मिळेलसं वाट्टंय >> +१
  • Log in or register to post comments

आता मॅग्नुस

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:34 नवीन
बहुतेक जी६ खेळेल. कारण राजाच्या बाजूचा हल्ला थोपवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

+१ असेच वाट्टेय

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 16:40 नवीन
+१ असेच वाट्टेय पण मग ही मंडळी इतका वेळ का घेतायत का नेटवर्क गंडलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:42 नवीन
मॅग्नुस खरंच अवघड परिस्थितीत जाऊ शकेल अशी शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पोझीशन काँप्लिकेटेड

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:37 नवीन
करण्यात आनंद ला अजूनतरी यश आलेले आहे. मॅग्नुस घड्याळातही आनंदपेक्षा २० मिनिटे मागे पडलाय. एरवीचा तंगड्या पसरून बसणारा मॅग्नुस आज दिसत नाहीये! :)
  • Log in or register to post comments

घोडा सी७

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:44 नवीन
आणून आता मॅग्नुसची बी ५ अशी खेळायची धमकी आहे. प्याद्यांची मारामारी आणि नंतर हत्तींची मारामारी झाली तर घोडा ए६ मधे येऊन बी प्याद्याला सपोर्ट करु शकतो.
  • Log in or register to post comments

एफ४ आनंद

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:48 नवीन
आणि बी ४ खेळला मॅग्नुस.वजिराच्या बाजूला काउंटर प्ले जनरेट करायचा प्रयत्न आहे. आनंद राजाच्या बाजूला मेटिंग नेट लावतोय. त्याला ते यशस्वी करायलाच हवे, नाहीतर वजिराच्या बाजूची प्यादी रोखणे अवघड होऊन बसेल!
  • Log in or register to post comments

आता

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:51 नवीन
आनंदकडून एफ प्यादे पुढे जाण्याचीच अपेक्षा आहे. ई, एफ आणि जी प्याद्यांच्या रोलर्कोस्टर पुढे काळ्याला चिरडून टाकणे हेच गरजेचे आहे. या महत्त्वाच्या क्षणी वजिराच्या बाजूला आनंदने त्याचे मोहोरे वळवू नयेत.
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 16:52 नवीन
ए-४ कसे काय चालेल हे पाहणे आवडेल मला. यामुळे मॅग्नसच्या घोड्याला बी पट्टीत येण्यापासून रोखता येईल आणि त्याचे ए पट्टीतले प्यादेही निष्प्रभ होईल. आणि मॅग्नसचे बी प्यादे सरळ पुढे जाऊन हत्तीला त्रास देईल तरी हत्ती बी-२ मधे येऊन त्याला रोखता येईल. उलट त्या प्याद्याने आनंदचे सी प्यादे मारले तरी आनंदला लगेच काही करण्याची आवश्यकता नाही कारण तिथे वजीर नि हत्ती दोघेही त्याची पुढची पट्टी रोखून बसले आहेत.
  • Log in or register to post comments

नाही

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:01 नवीन
कारण तिकडून घोडा येऊन प्याद्यांवरुन उडी मारुन घुसू शकतो आणि बीप्यादे उघड्या बी स्तंभातून हत्तीच्या मदतीने घुसू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

नोप

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:08 नवीन
घोड्याची बी-५ ही जागाच नेमकी ते प्यादे अडवून धरत होते. डी-५ वर आधीच मॅग्नसचे प्यादे असल्याने तो घोडा सी पट्टीतच अडकून पडला असता. एनिवे. शेवटी आनंदने तिकडचा सगळा हल्लाच मोडून काढला. आता मॅग्नसला फक्त बी प्यादयावर अवलंबून रहावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ए स्तंभातली प्यादी

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 16:59 नवीन
एक्सचेंज झाली! हत्तीही गेले. आता फुलबाज्या, भुईनळे दिसायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments

वॉव

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:02 नवीन
आनंद इज रिअली डिटरमिंड टुडे!! एफ५ खेळलाय आनंद!! गोइंग ऑल सिलिंडर्स ऑन!!!
  • Log in or register to post comments

मॅग्नुस बी ३ असे प्यादे खेळून

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:09 नवीन
वजिराच्या बाजूला त्याचा रेटा चालू ठेवणार का? त्याची राजाची बाजू अगदी नाजूक झाली आहे. एफ प्यादे सहाव्या घरात आले तर अवघड आहे. कदाचित तो सी३ वरचे प्यादे घेऊन घोडा बी ४ मधे आणून ते प्यादे पुढे रेटेल! म्हणजे आनंदला काहीवेळ तरी वजिराच्या बाजूला लक्ष देणे भाग पडावे.
  • Log in or register to post comments

मॅग्नुस

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:14 नवीन
घड्याळात चांगलाच मागे पडलाय २७ मिनिटे कमी आहेत आनंदपेक्षा! हे क्रिटिकल ठरु शकते कारण डाव ओपन पोझीशन नाहीये. काँप्लिकेटेड असल्याने प्रत्येक मूवला मॅग्नुसला विचार करणे भागच आहे.
  • Log in or register to post comments

हे कारलं झोपलं का काय?

तिरकीट
गुरुवार, 11/21/2013 - 17:17 नवीन
हे कारलं झोपलं का काय?
  • Log in or register to post comments

वॉव

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:17 नवीन
मॅग्नसकाका लैच टाईम घालवताहेत. आता अठरा खेळ्यांना सुमारे ३५ मिनिटे आहेत. कदाचित पुढच्या चार-पाच खेळ्या महत्त्वाच्या असाव्यात. त्यांत त्याला सुटकेचा मार्ग सापडला तरच... म्हणून बहुधा तो चार-पाच खे़ळ्या अतिशय काळजीपूर्वक करेल असेल दिसते.
  • Log in or register to post comments

बी३!!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:21 नवीन
मॅग्नुस खेळलाच ती खेळी! तसा सोडणार नाहीच तो. आता आनंदची पुढची खेळी काय? पुढे वजीर ए५ मधे आणून प्यादे रेटायचे आणि आनंदचा हत्ती मागेच अडकवून ठेवायचा अशी अटकळ आहे. त्याला काहीही करुन आनंदचा वजीर एफ ४ आणि नंतर एच ४ असा जाऊ देणे परवडणारे नाही! आता अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वाची.
  • Log in or register to post comments

आता आनंद बहुतेक

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:22 नवीन
हत्ती एफ २ खेळेल म्हणजे बी२ ही रोखली जाईल आणि पुढच्या खेळीला वजीर एफ ४?
  • Log in or register to post comments

बी-३

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:24 नवीन
खेळून मॅग्नसने आपला घोडा निष्प्रभ झाल्याचे मान्यच केले आहे असे दिसते. जर बी आणि सी प्याद्यांची मारामारी झाली असती तर त्याला पुढे घुसायला संधी होती. आनंदने एफ पट्टीतील प्यादे आधी दामटल्याने त्याचे बी प्यादे घेणार नाही हे निश्चित झाल्याने मॅग्नसने ती आशा सोडून देऊन प्याद्याच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. लवकरच त्याचा वजीर बी०६ मधे येऊन त्या प्याद्याला पाठिंबा देईल असा अंदाज आहे. याच वेळी तो आनंदच्या पुढे सरकू पाहणार्‍या प्याद्यांवर लक्ष ठेवून शकेल.
  • Log in or register to post comments

हं!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:32 नवीन
बी प्याद्यामागे वजीर आणून ते रेटणे एवढेच मॅग्नुसच्या हातात आहे कारण घोडा डावातून बाहेर गेल्यातच जमा आहे, आत्तातरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुसचा

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:43 नवीन
वजीर बी ६ मधे येणार नाही कारण मग पांढरा उंट डी ५ प्यादे मारुन आत घुसतो! तो आला तर ए५ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

करेक्ट

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:48 नवीन
पण ए-५ हा दुसरा पर्यायही तितकाच त्रासाचा कारण मग उजव्या कोपर्‍यातील घडामोडींपासून वजीर किमान एक खेळी मागे पडतोय. ते अधिक धोकादायक ठरेल मॅग्नसला. कारण घोडा तसाही खेळाबाहेर आहे त्याचा. एका उंटाच्या बळावर राजाची बाजू सांभाळणे फारच तापदायक होते मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदसाठी

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:36 नवीन
मला वाटते एच ४ असा अ‍ॅटॅक चालू शकेल का? त्याला हल्ला थोडा रोखूनच धरावा लागेल असे दिसते कारण बी प्यादे डेंजरस आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

साहेबांना

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:47 नवीन
घड्याळ बघावे लागणार. बराच वेळ घेतलाय आनंदने या खेळीला. जवळपास २३ मिनिटे!!
  • Log in or register to post comments

काय चाल्लाय?

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:52 नवीन
आनंद जबरा विचारात पडलाय! मॅग्नुसने त्याचे टाईम प्रेशर आनंदवर ढकलण्यात यश मिळवले आहे.
  • Log in or register to post comments

बाबाजी

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:54 नवीन
परत ओवरथिंकिंग मधे अडकणार की काय? (नखं खाणारी स्मायली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो ना राव

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 17:58 नवीन
मला तीच चिंता लागून राहिली आहे. कारण शेवटी वेळ कमी पडला तर चांगल्या खेळ्या न हुडकता आल्यामुळे डाव ड्रॉ झाला तर गेलेच की सगळे मुसळ केरात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आज आनंदने डेरिंग ची गोळी खाल्ली होती....

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/21/2013 - 17:56 नवीन
बहुदा. त्याचा परीणाम संपायच्या आत चाली कर म्हणावे. यस यु कैन यस यु वील विन टुडे
  • Log in or register to post comments

येस यू कॅन

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 17:59 नवीन
येस यू कॅन.... येस यू कॅन... येस यू कॅन... -रमता ओबामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा