✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन - डाव ४

आ
आनन्दा यांनी
Wed, 11/13/2013 - 15:13  ·  लेख
लेख
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30993 वाचन

💬 प्रतिसाद (251)

प्रतिक्रिया

काल

कपिलमुनी
Wed, 11/13/2013 - 20:10 नवीन
काल सरळ सरळ ड्रॉ दिसत असून सुद्धा आनंदने ऑफर केलेला ड्रॉ नाकारला ...आणि २ स्टेप नंतर ड्रॉ केला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

दोघांचे

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:13 नवीन
दोन दोन हत्ती आणि पुढे सरकलेली प्यादी आहेत तोपर्यंत खेळ सुरु राहणार. असे एंडगेम्स फार इंटरेस्टिंग असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

हत्ती इ५ मध्ये आला - काय

आतिवास
Wed, 11/13/2013 - 20:13 नवीन
हत्ती इ५ मध्ये आला - काय विचार आहे मॅग्नुसबाबाचा?
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:14 नवीन
एक लाईन चेक करायला हवा. हत्ती बी-५ मधे आणला मॅग्नसने तर तो जी प्याद्याला आधार देईल नि त्याच वेळी जी पट्ट्यातल्या दुसर्‍या हत्तीला बी-३ प्यादे मटकावून आनंदच्या राजाशी सलगी करण्याची संधी देईल. अ‍ॅडवांटेज मॅग्नस.
  • Log in or register to post comments

अर्थात

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:16 नवीन
आनंदला त्याचे सातव्या फळीतले प्यादे पुश करण्याची संधी न देता... इंट्रेस्टिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मोबाईल मधे बघितलं तर...... ५०

तिरकीट
Wed, 11/13/2013 - 20:14 नवीन
मोबाईल मधे बघितलं तर...... ५० चाली झालेल्या दाखवतायत... काही ठरावीक चाली झाल्यानंतर प्रत्येक चालीला वेळेची मर्यादा होती ना?
  • Log in or register to post comments

हत्ती ई - ५ जबरदस्त मूव्ह आहे

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 20:15 नवीन
हत्ती ई - ५ जबरदस्त मूव्ह आहे
  • Log in or register to post comments

आनन्द वेळेच्या दबावाखाली. १५

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 20:17 नवीन
आनन्द वेळेच्या दबावाखाली. १५ मिनिटात १० मूव्ह्ज करायच्या आहेत. मॅग्नसकडे ३० मिनिटे आहेत
  • Log in or register to post comments

आनंद हळू हळू बकलअप

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:19 नवीन
होतोय असे वाटतंय! हत्ती ई५ ही मॅग्नुसची चांगली खेळी आहे.
  • Log in or register to post comments

:(

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:23 नवीन
बाबाजी चांगलेच अडकलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

के सि ६

राघवेंद्र
Wed, 11/13/2013 - 20:23 नवीन
के सि ६ ही मॅग्नुसची खेळी आहे.
  • Log in or register to post comments

आनंदने चेक दिला डी ६ मधे

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:24 नवीन
राजा सी ६ मधे हलला. आणि आनंदने हत्ती डि स्तंभात दुहेरी केले. इंटरेस्टिंग. इतक्या ताणाखाली हे लोक इतके रिसोर्सफुल राहू शकतात. मी थक्क झालो आहे!
  • Log in or register to post comments

मै कौन हूँ

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:31 नवीन
मै कौन हूँ, मै कहाँ हूँ? ये क्या हो रहा है? साडेपाच तास चालू आहे राव. नुसतं पाहताना माझ्या डोक्याची मंडई झाली. त्यांचं काय होत असेल. मला आता असं वाटतंय आनंद लेकाचा पेशन्स तपासणार मॅग्नसचा. तरुण, व्हायब्रंट मंडळींचा पेशन्स कमी असतो असं म्हणतात. म्हणूनच त्या वयात एकदम झटपट क्रांती बिंती व्हावी वाटतं, लग्गेच प्रॉब्लेम सॉल्व्ड. :) दीर्घकालीन, चिकाटीची योजना त्या वयात फारशी आवडत नसते.. तेव्हा आनंद बहुधा असे घामटं काढणारे दीर्घ सामने खेळण्याचा प्रयत्न करणार असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो ना

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:35 नवीन
इतर कोणी असता तर ते ही कदाचित शक्य झालं असतं पण मॅग्नुस स्वतःच लांबलचक चालणारे गेम्स आवडीने खेळतो. त्याची स्टाईल थोडी कार्पोवसारखी आहे. दबाव टाकत खेळत रहायचं कुठेतरी प्रतिस्पर्धी चुकतोच! इंटरेस्टिंग होणार पण प्रत्येक लढत कारण दोघेही चिवट आहेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आता प्यादे ई८ आणि वजीर होण्याची

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:26 नवीन
धमकी आहे! आता फक्त जी स्तंभातला हत्ती ई३ मधे येऊन ते रोखू शकतो
  • Log in or register to post comments

चेक

राघवेंद्र
Wed, 11/13/2013 - 20:30 नवीन
आनन्दची आर डि ८ आणि त्याला उत्तर मॅग्नुसची आर जि ३ परत आनन्द आर डि ६
  • Log in or register to post comments

आनंदने डी मध्ये हत्ती दुहेरी

अमेय६३७७
Wed, 11/13/2013 - 20:30 नवीन
आनंदने डी मध्ये हत्ती दुहेरी केले हे भारीच. ड्रॉ होणार. आनंदने वाचवला डाव.
  • Log in or register to post comments

आनंदला ७ खेळ्यांसाठी फक्त ५ मिनिटे राहिली आहेत

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:31 नवीन
मॅग्नुसकडे २३ मिनिटे आहेत!
  • Log in or register to post comments

आता

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:34 नवीन
चार पेक्षाही कमी. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

९० सेकंदात

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 20:44 नवीन
३ खेळ्या करायच्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आनन्द आर डि ५

राघवेंद्र
Wed, 11/13/2013 - 20:37 नवीन
मस्त चाल आहे. मॅग्नुसने मस्त डोक्याला हात लावुन बसला आहे.
  • Log in or register to post comments

बाबौ

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:44 नवीन
खतरा मूव घेतली बे मॅग्नुसने. साले हे स्टँडर्ड लाईन तपासणारे एकदम मुंडक्यावर पडले.
  • Log in or register to post comments

इ ७ ल आधार नाही....

तिरकीट
Wed, 11/13/2013 - 20:45 नवीन
मॅग्नुस ते उचलु शकतो...
  • Log in or register to post comments

ड्रा

राघवेंद्र
Wed, 11/13/2013 - 20:54 नवीन
:(
  • Log in or register to post comments

झाला ड्रॉ

सागर
Wed, 11/13/2013 - 20:54 नवीन
झाला ड्रॉ
  • Log in or register to post comments

परत ड्रॉ

मालोजीराव
Wed, 11/13/2013 - 20:55 नवीन
परत ड्रॉ
  • Log in or register to post comments

मी ठार झालो रे बाबांनो

रमताराम
Wed, 11/13/2013 - 20:55 नवीन
आज आपल्या पायावर उभा असतो तर साला जौन मयखान्यात बसलो असतो. आजची झोप गंडली खंप्लिट.
  • Log in or register to post comments

अंमळ हळवं केलंत मालक!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/13/2013 - 20:56 नवीन
अंमळ हळवं केलंत मालक! तुमच्यासाटी कायपन! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तुम्ही

रमताराम
Wed, 11/13/2013 - 21:00 नवीन
तुम्ही 'आमच्यातले' नसल्याने काही तुमच्या सदिच्छेचा काय उपयोग नाय. नायतर म्हटलं असतं या गाडी घेऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सायेब, तुमच्यासाटी कायपन

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/13/2013 - 21:53 नवीन
सायेब, तुमच्यासाटी कायपन म्हन्ल्यावं त्ये पन क्येलं आस्तं ना! आता तुमी होऊ दे खर्चं म्हन्ल्यावं खर्च करून घेतलाच आस्ता ना! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तुमच्या पायावर तुम्ही उभे असतात तरी मयखान्याने तुम्हाला

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 21:03 नवीन
परत 'बसवलंच' असतं की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हॅ हॅ हॅ

रमताराम
Wed, 11/13/2013 - 21:12 नवीन
त्ये बी खरंच, पण म्हन्ल अस्तं होऊ दे खरचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ड्रॉ

तिरकीट
Wed, 11/13/2013 - 20:55 नवीन
ड्रॉ
  • Log in or register to post comments

अमेझिंग!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 21:02 नवीन
प्रत्येक खेळीला किती प्रकारच्या थ्रेट्स ते जनरेट करत होते आणि उधळून लावत होते. बापरे, मी थक्क झालोय! प्रत्येक पुढचा डाव अधिकाधिक थरारक होत चालला आहे. आधी कोण जिंकेल हे बघणे काळजाचा ठोका चुकवणारे असणार. उद्या विश्रांतीचा दिवस आहे. पाचवा डाव शुक्रवारी होणार!
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Wed, 11/13/2013 - 21:44 नवीन
मस्त समालोचन केल तुम्ही लोकांनी . जबरदस्त .
  • Log in or register to post comments

अगदी. पूर्णपणे सहमत.

प्रचेतस
Wed, 11/13/2013 - 22:14 नवीन
अगदी. पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हे वेळेचं काय गणित असतं? किती

अनुप ढेरे
Wed, 11/13/2013 - 23:10 नवीन
हे वेळेचं काय गणित असतं? किती मिंटात किती मूव करायच्या अस्तात?
  • Log in or register to post comments

आधीच्या धाग्यात

चतुरंग
गुरुवार, 11/14/2013 - 12:09 नवीन
मी बुद्धीबळाच्या नियमावलीच्या भाषांतराचा दुवा दिलेला आहे तो बघा. http://www.misalpav.com/node/26100 या धाग्यावर शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत दुवा आहे. त्या पुस्तिकेमधे सगळे नियम आहेत. तरीही थोडक्यात - प्रत्येकी २ तासात प्रत्येकी ४० खेळ्या झाल्याच पाहिजेत (डावाचा निकाल आधीच लागला नसेल तर),त्यानंतर पुढे १ -१ तास वाढवून मिळतो त्यात २०-२० खेळ्या झाल्याच पाहिजेत, त्यानंतर्ही डाव चालू राहिल्यास १५ - १५ मिनिटे मिळतात आणि त्यात प्रत्येक खेळी बरोबर ३० सेकंदाचा वाढीव वेळ दिला जातो. टाईमट्रबल मधे येऊन वेळ संपली तर फ्लॅग पडतो आणि तो खेळाडू डाव गमावतो - मग पटावरची स्थिती काय आहे याला महत्त्व नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

धन्यवाद!

अनुप ढेरे
गुरुवार, 11/14/2013 - 12:34 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा वा

मोहन
गुरुवार, 11/14/2013 - 10:21 नवीन
सुपर बुद्धिबळ , सुपर समालोचन !
  • Log in or register to post comments

चला!!

आनन्दा
गुरुवार, 11/14/2013 - 12:01 नवीन
माझी शतकी धाग्याची इच्छा अश्या प्रकारे सुफळ संपूर्ण झाली :)
  • Log in or register to post comments

हे बरे आहे राव. आम्ही असे

मृत्युन्जय
गुरुवार, 11/14/2013 - 12:12 नवीन
हे बरे आहे राव. आम्ही असे सामन्यांचे धागे काढलेच तर आनंद नेमका त्या दिवशी १७ व्या चालीला कार्ल्सनला झोपवेल की आमचा धागा पण मग अभिनंदनाच्या (आनंदच्या. आमचे कोण करतय अभिनंदन मरायला) ४०-५० प्रतिसादात गार पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

तसं

रमताराम
गुरुवार, 11/14/2013 - 12:39 नवीन
घडणार असेल तर तुम्ही काढाच धागा. सतरा चालीत आनंद जिंकला तरीही आम्ही तुमच्या धाग्याचे त्रिशतक होईल याची ग्यारंटी घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१११.

प्यारे१
गुरुवार, 11/14/2013 - 12:50 नवीन
+१११. आम्हीही बुद्धीत बळ नसताना जातीनं हजर राहू. बाकी ररा, मृत्युंजयचा धागा त्रिशतकी करायचं काम फुकटात करायचं का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हो

रमताराम
गुरुवार, 11/14/2013 - 12:57 नवीन
फुकटात करायचं. त्या आनंदात ते नंतर आपल्याला प्यार्टी देतीलच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गुरुजी म्हणतात तसं!

प्यारे१
गुरुवार, 11/14/2013 - 13:26 नवीन
गुरुजी म्हणतात तसं! मृत्युंजय, आम्हाला फार 'होप्स' आहेत तुझ्याकडून. ;) उद्या आहे ना डाव? अनायासे सुट्टी आहेच. होऊ दे खरच खर्च (मृत्युंजयचा)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तुमच्यासाटी

चतुरंग
गुरुवार, 11/14/2013 - 12:51 नवीन
कायपन! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

होउ दे खरचं

रमताराम
गुरुवार, 11/14/2013 - 12:58 नवीन
होउ दे खरचं (ब्याण्डविड्थ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

विनंती

आतिवास
गुरुवार, 11/14/2013 - 13:30 नवीन
संपादकांना विनंती. या खेळाशी संबंधित प्रकाशित धागे "दखल"मध्ये एके ठिकाणी देता येतील का? जसे (अनुवादित) नियमपुस्तिका, मागच्या स्पर्धेच्या वेळचे धागे इत्यादी. त्याचा उपयोग होईल माझ्यासारख्या अज्ञ वाचकाला!
  • Log in or register to post comments

वरती डाव खेळून बघता येईल

चतुरंग
गुरुवार, 11/14/2013 - 14:15 नवीन
अशी सोय केली आहे. कालचा डाव अफलातून होता. जादूगाराने हातातून एकामागोमाग एक वस्तू काढत राहव्यात तसे दोघे खेळ्या शोधून काढत होते. एकाहून सरस दुसरी. कार्लसनने आनंदचे ए२ प्यादे मारले आणि ए, बी अशा स्तंभातून सरकून बी१-एफ५ असा सपाटा मारुन उंट बरोब्बर बाहेर काढला! एक प्याद्याने कमी असलेला आनंद नंतर काही काळ अडकल्यासारखा झाला होता. आनंदची ३५ वी खेळी Ne4 ही मास्टरपीस होती त्याखेळीमुळे आनंद परत डावात राहिला इतकी ती खेळी सुंदर होती! मॅग्नुसची ५६ वी खेळी Re6 तशीच सुंदर. शिवाय संपूर्ण डावभर अनेक करामती आणि मेटिंग थ्रेट्स सुरुच होत्या. आजच्या डावावरुन एक नक्की झाले की खेळाच्या कौशल्याचा भाग हा दोघांचा तोडीसतोड आहे. आता सायकॉलॉजिकल बॅटल आणि शारीरिक व मानसिक स्टामिना यांच्या लढतीत कोण सरस ठरेल तो डावात सरस ठरणार. कारण उत्तम खेळ्या हुडकून काढायची शक्ती हळूहळू कमी पडत गेली की कोणत्यातरी क्षणी पेचात अडकणार हे नक्की. सर्वसाधारणपणे बरोबरी झालेले डाव कंटाळवाणे असतात परंतु हा डाव नि:संशय अपवाद! शेवटच्या काही खेळ्यांपर्यंत अंदाज येत नव्हता की काय होणार आहे. अगदी क्रिकेट वन्डेची आठवण व्हावी असे. शेवटच्या बॉलला एक रन हवी आहे आणि एकच फलंदाज उरलाय आणि धाव न काढता फलंदाज बाद मॅच ड्रॉ- तशी अवस्था झाली. आता डोळे परवाच्या डावाकडे लागलेत. पहिल्यांदा जो जिंकेल त्याचा मानसिक दबाव दुसर्‍यावर जबर येणार त्यामुळे पाचवी लढत अत्यंत निकराची होणार, मॅग्नुस पांढरी मोहोरी घेऊन येतोय त्या डावात. पण तोवर वाट बघणे आले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा