एक लाईन चेक करायला हवा. हत्ती बी-५ मधे आणला मॅग्नसने तर तो जी प्याद्याला आधार देईल नि त्याच वेळी जी पट्ट्यातल्या दुसर्या हत्तीला बी-३ प्यादे मटकावून आनंदच्या राजाशी सलगी करण्याची संधी देईल. अॅडवांटेज मॅग्नस.
मै कौन हूँ, मै कहाँ हूँ? ये क्या हो रहा है? साडेपाच तास चालू आहे राव. नुसतं पाहताना माझ्या डोक्याची मंडई झाली. त्यांचं काय होत असेल.
मला आता असं वाटतंय आनंद लेकाचा पेशन्स तपासणार मॅग्नसचा. तरुण, व्हायब्रंट मंडळींचा पेशन्स कमी असतो असं म्हणतात. म्हणूनच त्या वयात एकदम झटपट क्रांती बिंती व्हावी वाटतं, लग्गेच प्रॉब्लेम सॉल्व्ड. :) दीर्घकालीन, चिकाटीची योजना त्या वयात फारशी आवडत नसते.. तेव्हा आनंद बहुधा असे घामटं काढणारे दीर्घ सामने खेळण्याचा प्रयत्न करणार असं दिसतंय.
इतर कोणी असता तर ते ही कदाचित शक्य झालं असतं पण मॅग्नुस स्वतःच लांबलचक चालणारे गेम्स आवडीने खेळतो. त्याची स्टाईल थोडी कार्पोवसारखी आहे. दबाव टाकत खेळत रहायचं कुठेतरी प्रतिस्पर्धी चुकतोच! इंटरेस्टिंग होणार पण प्रत्येक लढत कारण दोघेही चिवट आहेत!!
प्रत्येक खेळीला किती प्रकारच्या थ्रेट्स ते जनरेट करत होते आणि उधळून लावत होते. बापरे, मी थक्क झालोय!
प्रत्येक पुढचा डाव अधिकाधिक थरारक होत चालला आहे. आधी कोण जिंकेल हे बघणे काळजाचा ठोका चुकवणारे असणार.
उद्या विश्रांतीचा दिवस आहे. पाचवा डाव शुक्रवारी होणार!
मी बुद्धीबळाच्या नियमावलीच्या भाषांतराचा दुवा दिलेला आहे तो बघा.
http://www.misalpav.com/node/26100
या धाग्यावर शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत दुवा आहे. त्या पुस्तिकेमधे सगळे नियम आहेत.
तरीही थोडक्यात - प्रत्येकी २ तासात प्रत्येकी ४० खेळ्या झाल्याच पाहिजेत (डावाचा निकाल आधीच लागला नसेल तर),त्यानंतर पुढे १ -१ तास वाढवून मिळतो त्यात २०-२० खेळ्या झाल्याच पाहिजेत, त्यानंतर्ही डाव चालू राहिल्यास १५ - १५ मिनिटे मिळतात आणि त्यात प्रत्येक खेळी बरोबर ३० सेकंदाचा वाढीव वेळ दिला जातो.
टाईमट्रबल मधे येऊन वेळ संपली तर फ्लॅग पडतो आणि तो खेळाडू डाव गमावतो - मग पटावरची स्थिती काय आहे याला महत्त्व नाही!
हे बरे आहे राव. आम्ही असे सामन्यांचे धागे काढलेच तर आनंद नेमका त्या दिवशी १७ व्या चालीला कार्ल्सनला झोपवेल की आमचा धागा पण मग अभिनंदनाच्या (आनंदच्या. आमचे कोण करतय अभिनंदन मरायला) ४०-५० प्रतिसादात गार पडेल.
संपादकांना विनंती.
या खेळाशी संबंधित प्रकाशित धागे "दखल"मध्ये एके ठिकाणी देता येतील का? जसे (अनुवादित) नियमपुस्तिका, मागच्या स्पर्धेच्या वेळचे धागे इत्यादी. त्याचा उपयोग होईल माझ्यासारख्या अज्ञ वाचकाला!
अशी सोय केली आहे.
कालचा डाव अफलातून होता. जादूगाराने हातातून एकामागोमाग एक वस्तू काढत राहव्यात तसे दोघे खेळ्या शोधून काढत होते. एकाहून सरस दुसरी. कार्लसनने आनंदचे ए२ प्यादे मारले आणि ए, बी अशा स्तंभातून सरकून बी१-एफ५ असा सपाटा मारुन उंट बरोब्बर बाहेर काढला! एक प्याद्याने कमी असलेला आनंद नंतर काही काळ अडकल्यासारखा झाला होता. आनंदची ३५ वी खेळी Ne4 ही मास्टरपीस होती त्याखेळीमुळे आनंद परत डावात राहिला इतकी ती खेळी सुंदर होती! मॅग्नुसची ५६ वी खेळी Re6 तशीच सुंदर. शिवाय संपूर्ण डावभर अनेक करामती आणि मेटिंग थ्रेट्स सुरुच होत्या.
आजच्या डावावरुन एक नक्की झाले की खेळाच्या कौशल्याचा भाग हा दोघांचा तोडीसतोड आहे. आता सायकॉलॉजिकल बॅटल आणि शारीरिक व मानसिक स्टामिना यांच्या लढतीत कोण सरस ठरेल तो डावात सरस ठरणार. कारण उत्तम खेळ्या हुडकून काढायची शक्ती हळूहळू कमी पडत गेली की कोणत्यातरी क्षणी पेचात अडकणार हे नक्की.
सर्वसाधारणपणे बरोबरी झालेले डाव कंटाळवाणे असतात परंतु हा डाव नि:संशय अपवाद! शेवटच्या काही खेळ्यांपर्यंत अंदाज येत नव्हता की काय होणार आहे. अगदी क्रिकेट वन्डेची आठवण व्हावी असे. शेवटच्या बॉलला एक रन हवी आहे आणि एकच फलंदाज उरलाय आणि धाव न काढता फलंदाज बाद मॅच ड्रॉ- तशी अवस्था झाली.
आता डोळे परवाच्या डावाकडे लागलेत. पहिल्यांदा जो जिंकेल त्याचा मानसिक दबाव दुसर्यावर जबर येणार त्यामुळे पाचवी लढत अत्यंत निकराची होणार, मॅग्नुस पांढरी मोहोरी घेऊन येतोय त्या डावात.
पण तोवर वाट बघणे आले.
प्रतिक्रिया
काल
दोघांचे
हत्ती इ५ मध्ये आला - काय
हम्म
अर्थात
मोबाईल मधे बघितलं तर...... ५०
हत्ती ई - ५ जबरदस्त मूव्ह आहे
आनन्द वेळेच्या दबावाखाली. १५
आनंद हळू हळू बकलअप
:(
के सि ६
आनंदने चेक दिला डी ६ मधे
मै कौन हूँ
हो ना
आता प्यादे ई८ आणि वजीर होण्याची
चेक
आनंदने डी मध्ये हत्ती दुहेरी
आनंदला ७ खेळ्यांसाठी फक्त ५ मिनिटे राहिली आहेत
आता
९० सेकंदात
आनन्द आर डि ५
बाबौ
इ ७ ल आधार नाही....
ड्रा
झाला ड्रॉ
परत ड्रॉ
मी ठार झालो रे बाबांनो
अंमळ हळवं केलंत मालक!
तुम्ही
सायेब, तुमच्यासाटी कायपन
तुमच्या पायावर तुम्ही उभे असतात तरी मयखान्याने तुम्हाला
हॅ हॅ हॅ
ड्रॉ
अमेझिंग!
*****
अगदी. पूर्णपणे सहमत.
हे वेळेचं काय गणित असतं? किती
आधीच्या धाग्यात
धन्यवाद!
वा वा
चला!!
हे बरे आहे राव. आम्ही असे
तसं
+१११.
हो
गुरुजी म्हणतात तसं!
तुमच्यासाटी
होउ दे खरचं
विनंती
वरती डाव खेळून बघता येईल