Skip to main content

डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३

डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३

Published on सोमवार, 11/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रिय मिपाकरांनो, ह्यावेळी दिवाळी कट्टा डोंबिवलीला करायचे नक्की झाले आहे. वेळ रात्री ८ वा. ठिकाण : नंदी पॅलेस रविवार असल्याने हॉटेल मध्ये गर्दी असणारच आहे.त्यामुळे ८ नंतर जागा मिळवायला खूप त्रास होतो.मी आणि प्रथम फडणीस जागा अडवून ठेवूच.जे येणार असतील त्यांनी व्य.नी. करावा.ह्यावेळी बिल ज्याचे,त्याने द्यायचे, असे ठरले आहे. साधारण दर माणशी ५००रु. खर्च येईल.
लेखनप्रकार

याद्या 7610
प्रतिक्रिया 51

मीपा इतिहासात पहिल्यादांच लातुर कट्टा आमी आयोजीत केला आहे .एक प्रतिसाद मिळाला आहे . बाकी डिट्टेल नंतर देईन . अंवातर : इथे बोलल्याबद्दल रागाऊ नका .

In reply to by जेपी

मग हरकत नाही... ज्यांनी डोंबिवलीला यायला जमत असेल, ते डोंबिवलीला येतील. आणि समजा डोंबिवली कट्टा चुकलाच तर, पाठोपाठ लातूर कट्टा आहेच...

मस्त वृत्तांत अवश्य येऊ द्यात. आमच्या शुभेच्छा आहेतच. सुट्टीचे जुगाड जमले तर यायचा नक्कीच प्रयत्न करतो.

आमच्या शुभेच्छा! :) जोरात कट्टा होउ द्या आणि फर्मास वृत्तान्त येउ द्या. :)

कट्ट्यासाठी शुभेच्छा!!!

In reply to by अग्निकोल्हा

व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो!
आँ!! नक्की का हो आगिनकोल्हा साहेब?? नाही कारण फेब्रुवारीतल्या फोर्टच्या कट्ट्यालाही आपण असेच म्हणाला होतात. :D

In reply to by किसन शिंदे

बोलणारे सगळे येत नाही, हा अनुभव तुला नवीन आहे का रे ?? शिवाय काही जणांना दर वेळेला हूल द्यायची हौस असतेच.

In reply to by मुक्त विहारि

येण्याचे नक्की झाले की कळवेन... तोपर्यंत कट्टावृतांतावर समाधान मानावे लागणार आहे. नाविलाजको क्या विलाज? :(

आस्मादिक येत्या मार्च मधे येत आहेत......येईल का कट्टा करता?

मु.वि., अंदाजे पक्की गणसंख्या शुक्रवार पर्यंत कळेल असं बघू. त्याप्रमाणे टेबलचं अ‍ॅड्व्हान्स बुकिंग करेन...

In reply to by नानबा

जाग चांगली, फक्त अभ्यागतांना सावित्रीबाई फुले मंदिराच्या बाजुने न येता पुढच्या बाजुने यायला सांगावे, म्हणजे डोंबिवली हे कचर्‍याचे आगर कसे आहे या विषयावर होवू घातलेली चर्चा टळेल..

In reply to by प्रचेतस

बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. किती वेळा आलास रे डोंबिवलीला? (फना काढलेली किंवा गविंच्या घुबडाची घुत्कारणारी स्मायली)

कोण तो आमच्या डोंबिवलीला नावे ठेवतोय? पुन्हा यायचे आहे ना डोंबिवलीत? हलके घ्या हो वल्लीशेठ.

In reply to by प्रचेतस

@तुम्हाला काय झालं भूताळी स्मायली टाकायला?>>> आ णंद!!! :-D एका महाकाय हत्ती'ला छळल्याचा. ........ आणं.....द! =))

In reply to by प्रचेतस

जुन्या मालकांनी ... (स्वतःच्या असाही एक प्रवाद आहे) दमड्या खर्च करुन खरडवह्यांची सोय दिली आहे की संपादक्स. ;)

दोन्ही मिपा कट्ट्यांना

प्रचंड शुभेच्छा !! एकदा कधीतरी मलाही यायला जमेल. आतुरतेनं वाट बघतोय त्या संधीची !!

In reply to by चौकटराजा

मुवि किंवा शैलेन्द्रांना फोन करायचात की. आम्ही ११.३०-११.४५ पर्यंत होतो...

मिसळपाव डोंबिवली दिवाळी कट्टा २०१३ .गप्पांचा फड जमला पण खाण्याची ऑर्डर काय द्यावी या विचारात मुक्तविहारी आणि विनोद१८ .फोटो http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5236_zpsad7cc6cd.jpg ॥ विपश्यना ,मनावर ताबा याविषयी एक मुद्दा समजावतांना डॉ. सुबोध खरे (खास मुलुंडहून आले),सोबत शैलेन्द्र .http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5237_zps57a1daa3.jpg ॥प्रथम फडणीस (मध्ये) याने पावणेआठला येऊन जागा बुक केली .पुढच्या त्याच्या शिक्षणाबद्दल सांगतांना http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5234_zpscbb447bf.jpg ॥शैलेंद्र स्थानिक आणि राज्यातील राजकारण यावर बोलतांना ,डावीकडे डॉ सुबोध खरे आणि कँजूस यांचा अर्धाफोटो ।