✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सच्याचे शंभर.........

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Fri, 03/16/2012 - 16:27  ·  लेख
लेख
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :) सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
Sachin-Tendulkar
[छा. जालावरुन साभार]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27055 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

अता या धग्याला शंभरी

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/18/2012 - 00:58 नवीन
अता या धग्याला शंभरी भरवण्यासाठी कोण कोण खेळतं ते बघायचं,,! ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन ! आणि

केशवराव
Sun, 03/18/2012 - 04:51 नवीन
हार्दिक अभिनंदन ! आणि शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

सचिनचे अभिनंदन

पैसा
Sun, 03/18/2012 - 06:56 नवीन
आणि धाग्याची शंभरी होण्यासाठी बिरुटे सरांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कपिलचा सल्ला

रमेश आठवले
Sun, 03/18/2012 - 11:27 नवीन
कपिलदेव यानी सचिनने निव्रुत्त व्हावे असा सल्ला नुकताच दिला होता. कपिल यान्चिच एक प्रसिद्ध जाहिरात आहे- कपिलदा जवाब नही. त्याचे उत्तर सचिनने दिले आहे-- कपिलदा जवाब है !
  • Log in or register to post comments

प्रामाणिक शंका

उदय
Sun, 03/18/2012 - 12:01 नवीन
सचिनने शतक केले म्हणून त्याचे अभिनंदन. मला क्रिकेटबद्दल फारसे काही माहीत नाही, म्हणून लेखात दिलेला दुवा बघितला आणि शोधताना रेकॉर्डचे स्थळ दिसले. त्यावरून मला पडलेले काही प्रश्न. कसोटी सामन्यात व वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा म्हणून सचिन सर्वप्रथम स्थानावर आहे. तसेच सर्वाधिक शतके म्हणून सुध्दा सचिन पहिला आहे आणि त्याची कारकीर्द १९८९ पासून सुरू झाली असे दिसते. रिकी पोंटिंग व कालीस यांची ४१ व ४२ कसोटी शतके झाली आहेत आणि ते १९९५ पासून खेळत आहेत. मग ते सचिन इतके सरस नाहीत का? किंवा सचिनपेक्षा अजून ५-६ वर्षे खेळले तर त्याचे रेकॉर्ड ते मोडू शकणार नाहीत का? इतर अनेक कॅटेगरी मध्ये सचिन पहिल्या ३ खेळाडूंमध्ये नाही. उदा. एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा, सामन्यात सर्वाधिक धावा, सिरीजमध्ये सर्वाधिक धावा, एका षटकात सर्वाधिक धावा, एका दिवसात सर्वाधिक धावा, सर्वाधिक धावा सरासरी वगैरे. असे असताना सचिन म्हणजे क्रिकेटचा देव वगैरे इतका उदो उदो का होतो? त्याचे इतर काही विक्रम आहेत का जे तुटण्याची शक्यता नगण्य आहे? (ब्रायन लाराने केलेला ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला, तर त्याने ४०० धावांचा विक्रम केला जो मोडणे कठीण आहे, असे मला वाटते. सचिनचे असे काही विक्रम आहेत का? ) मी विकिपिडीया बघीतला पण अशी काही माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर विक्रम म्हणजे सर्वाधिक धावा/शतके यांचे sub-records आहेत असे वाटले. मी प्रामणिकपणे शंका विचारली आहे. सचिन काय फालतू खेळाडू आहे किंवा इतर किती भारी खेळाडू आहेत, असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments

कैनै १ रन कमी पडत होता. तुमचं

गणपा
Sun, 03/18/2012 - 12:58 नवीन
:) कैनै १ रन कमी पडत होता. तुमचं चालुद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

सच्याचे झाले धाग्याचे कधी?

नावातकायआहे
Sun, 03/18/2012 - 12:49 नवीन
सच्याचे झाले धाग्याचे कधी? ९९ वर अडकलाय धागा!
  • Log in or register to post comments

या धाग्याची - सेंचुरी.... अभिनंदन....

शशिकांत ओक
Sun, 03/18/2012 - 12:55 नवीन
प्रा.डॉ. विरुटे सर, ही घ्या या धाग्याची शंभरावी प्रतिक्रियेची (धावा) धाव.... झाली. झाली आपली पण सेंचुरी.... अभिनंदन....
  • Log in or register to post comments

आता सगळ्या प्रतिसादकांनी

यकु
Sun, 03/18/2012 - 12:56 नवीन
आता सगळ्या प्रतिसादकांनी निवृत्त व्हावे काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

काय यशवंता शेंचुरी झाल्यावर

गणपा
Sun, 03/18/2012 - 13:00 नवीन
काय यशवंता शेंचुरी झाल्यावर गोलंदाज निवृत्त होतो होय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

धन्यवाद. दोस्तहो.....!!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/18/2012 - 21:56 नवीन
माझ्या आंतरजालावरील वावराला अनेक वर्ष झाली. किरकोळ लेखनाला किरकोळ प्रतिसादही तसे येतच असायचे. पण अशात मी जिथे गेलो तिथे माझे मित्र म्हणायचे शंभरी गाठणारा धागा कधी काढणार ? परंतु मी जे काही पाच पंचवीस प्रतिसाद मिळवणारे धागे यापूर्वी काढले त्याबद्दल कोणी कधी कौतुकानं बोलले नाही. प्रत्येकाला अशा शंभर प्रतिसादांचा मोह होता. आज यानिमित्तानं माझ्यावरील मणामणाचं दडपण कमी झालंय. माझ्याबद्दल कोण काय बोलतं त्याचा मी विचार करीत नाही. एका आंतरजालीय व्यक्तिमत्त्वानं म्हटलं होत़ं की, नेटाचं कनेक्शन एकदा डिसकनेक्ट झालं की आभासी जगतातून बाहेर पडायचं अशा विचारांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. असो, यापुढेही मिपासाठी मी अधिकाधिक मरमर करायचा प्रयत्न करीन. ;) असो, सच्याच्या कौतुकाच्या निमित्तानं सहभागी होऊन आपापली मतं टाकत धाग्याला शंभर प्रतिसादाच्या पुढे नेणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.......!!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दोन सुपुत्र

चौकटराजा
Sun, 03/18/2012 - 22:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आता तो १०० फिफ्टीज च्या मागे लागला आहे..

मोदक
Mon, 03/19/2012 - 09:25 नवीन
सगळ्या सचिन द्वेष्ट्यांसाठी नवीन प्वाईंट.. "आता तो १०० फिफ्टीज च्या मागे लागला आहे." म्हणून बहुदा ५२ / ५५ अशा रन काढतो आहे.. होवून जावूद्या यावरही काथ्याकूट... ;-)
  • Log in or register to post comments

फक्त?

श्रावण मोडक
Mon, 03/19/2012 - 11:17 नवीन
फक्त एवढंच? नाही हो... एक दिवसीय सामन्यातील शतकांचे अर्धशतक, अर्धशतकांचे शतक, टी-२० तील एकेक अर्धशतक आणि शतक, कसोटीतील बळींचे अर्धशतक... किती तरी बाकी आहे. लेट हिम प्ले... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

लेट हिम प्ले.. मीन ही डझ नॉट डिझर्व टू प्ले अ‍ॅट ऑल..??

मोदक
Mon, 03/19/2012 - 18:59 नवीन
लेट हिम प्ले.. मीन ही डझ नॉट डिझर्व टू प्ले अ‍ॅट ऑल..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अभिनंदन सच्याचे..

चिगो
Mon, 03/19/2012 - 12:17 नवीन
ह्या महाशतकानंतर दिलेल्या मुलाखतीत सचिन बराच सडेतोड बोलला.. त्यातला एक मुद्दा मला खरंच आवडला. सचिन म्हणाला, "तुम्ही चांगलं खेळत असतांनाच तुम्ही निवृत्त व्हावं, असं बरेचजण सांगतात. मला वाटतं, की देशासाठी चांगलं खेळत असतांना आणि खेळू शकत असतांना वैयक्तिक स्वार्था-समाधानासाठी निवृत्त होणं मला पटत नाही. आणि तसंही, मी कसा खेळू शकतो हे मला इतरांपेक्षा जास्त चांगल्याने कळतं.." तेव्हा सल्ले बंद व्हावेत, असं वाटतं.. मी स्वतः अख्ख्या आयुष्यात १० धवाही काढल्या नाहीत, उगाच कशाला सचिनला अक्कल शिकवावी मग, नाही का? ;-)
  • Log in or register to post comments

अश्विनसारखे गोलंदाजही सहज शतक

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 09:46 नवीन
अश्विनसारखे गोलंदाजही सहज शतक करून जातात आणि सचिनसारखे महान खेळाडू कसेबसे १० धावा काढत बसतात तेव्हा निवृत्तीची योग्य वेळ केव्हाच टळून गेली आहे असे वाटते. आता उरलाय तो फक्त सोपस्कार.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. पण त्याने विविध कंपन्यांशी करार केले असल्यामुळे खेळणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 09:55 नवीन
आता एकच म्याच सहन करायचा आहे आपल्याला सच्या.आणि सच्या पुराण कायमचं इतिहासात जमा होईल. आता काळ विराट, रोहित,यांचा सुरु होईल. बाप रे, काय काय सहन करावं लागतंय सच्याच्या निमित्तानं. काय ते लाड. सच्याच्या त्यागाने मुंबईला म्याच काय ? पॅव्हिलियनला सचिन रमेश तेंडुलकर नाव काय ? आणि अजून काय काय ! देवा ही टेष्ट लवकर जिंकून लवकर मुंबईची म्याच सुरु होऊन पाच पन्नास रन सच्याचे होऊ दे, वाटल्यास शेवटच्या म्याचला शतक होऊ दे... आणि आम्हा रसिकांना शांतपणे झोप घेऊ दे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 09:58 नवीन
किती ते कटाऔट्स, प्रत्येक तिकिटावर सच्याची छबी. भगवंता. सोडव रे आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणून तर

पैसा
Fri, 11/08/2013 - 10:10 नवीन
बिशनसिंग बेदीने विचारले ना, ही काय सचिन बेनिफिट सीरिज आहे का म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

योग्यच बोललाय तो बेदी.

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 10:15 नवीन
=)) योग्यच बोललाय तो बेदी, नैतर सौथ आफिकेची टफ सिरीज अशी कातरली नसती त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो ना!

पैसा
Fri, 11/08/2013 - 10:21 नवीन
पाकिस्तानचे काय हाल चाल्लेत बघा एकदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्याचं बोलणं कै मनावर घ्यायचं?

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 10:20 नवीन
सिंग वॉज नेव्हर एव्हर अ किंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओय होय!

पैसा
Fri, 11/08/2013 - 10:23 नवीन
डावर्‍या स्पिनर्सचा राजा होता तो! आणि डिप्लोमॅटिक बोलायला कधीच जमत नै त्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अगदी

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 10:30 नवीन
कटू सत्यच बोलतो तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 10:33 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कप्पाळ! सरदार वगैरे ठीके.

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 10:33 नवीन
कप्पाळ! सरदार वगैरे ठीके. राजा कसला? बुद्रुक भटींडाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजय जडेजासारखा महान (फिक्सर)

सौंदाळा
Fri, 11/08/2013 - 11:41 नवीन
अजय जडेजासारखा महान (फिक्सर) खेळाडु समोरच्या संघाचा कप्तान होता तेव्हाच सचिनच्या अखेरच्या रणजीचा शेवट नाट्यमय होणार असे वाटत होते आणि तसा तो झालादेखिल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, प्राडॉ., तुमचे बार

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 10:08 नवीन
वल्ली, प्राडॉ., तुमचे बार फुसके निघाले हो! =))
  • Log in or register to post comments

आम्ही कसले फुसके...तो तुमच्या सच्या फुसका निघाला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 10:15 नवीन
आम्ही कसले फुसके तो तुमचा सच्या फुसका निघाला. काल आम्ही अंघोळ पांघोळ करुन सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली पण तो सच्या फुसका निघाला दहा धावावर बाद झाला आत तो बादच नव्हता अशी वकिली सुरु झाली. क्रिकेटमधे काही फलंदाज असे बाद होतात पण चोवीस वर्ष खेळुनही ज्याच्या प्याडवर बॉल जातो याचा अर्थ त्याची बॉलवरची नजर कमी झाली, हे मान्य केलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 10:18 नवीन
सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली >> तुमची प्रार्थना मनापासून नव्हती राव! नै तर असं व्हईलच कसं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी सचिनसेठ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 10:25 नवीन
सच्यानं प्रार्थना मनापासून केली नै असं म्हणा. सच्याचा ब्याटीपेक्षा सत्यसाईबाबावर जास्त विश्वास आहे, असे मी म्हणनार नाही. सच्याचे गुरु सत्यसाईबाबा म्हणुन आम्ही रसिकांनी प्रार्थनेचा ट्राय मारुन पाहिला होता. आता सत्यसाईबाबाला आमची पार्थना नै पोहचली त्याला आम्ही करायचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 10:27 नवीन
च्यायला, गेला तुमच्या कटकटीने आमचार रोहीत शर्मा...१७७ व्वा. क्या ब्याटींग है. ऑफसाईडला बॉल चालला होता. पण दिला त्याला पायचित पण आम्ही अजिबात पंचाच्या नावानं रडणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 10:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्याला कारण नसताना शिव्या

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 10:32 नवीन
सच्याला कारण नसताना शिव्या घालताय ती तुमची पापं भोवली त्या शर्माला. आता तरी सुधरा! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाऊद्या ताई! विझती काडी जळती

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/08/2013 - 12:37 नवीन
जाऊद्या ताई! विझती काडी जळती ठेवायचा केविलवाणा प्रयत्न बघून भरून आलं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सचिन शेवटी विझती काडी आहे हे

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 12:40 नवीन
म्हणजे सचिन शेवटी विझती काडी आहे हे बिपिनदांना पटले तर एकदाचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्राध्यापक डॉ. बरुटेसर एक प्रश्न आहे ? ? ?

बाबा पाटील
Fri, 11/08/2013 - 12:32 नवीन
सचिनला शिव्या घालुन झाल्या असतील तर एक विचारु का ? तुम्ही शेवट्ची बॅट कधी हातात घेतली होती ? का कधीच नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिव्या नाही त्याच्या उतरत्या काळाचं कौतुक चालु आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 12:43 नवीन
२०११ ला शेवटची फलंदाजी केली. पुढे नोकरी मुळे माझा नियमित सराव सुटला. & पाच पंचवीस प्रत्येक सामन्यागणिक धावा आणि ओफ़्स्पिनर गोलंदाज म्हणून गोलंदाजी आणि माझ्या तालुक्यात उत्तम क्रिकेटचा पंच असे नावही मिळवले आहे. आता आपण किती क्रिकेट खेळला ते सांगा ? दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

अरेरे...

ब़जरबट्टू
Fri, 11/08/2013 - 12:57 नवीन
थोडक्यात तुमची चुकामुक झाली प्रा.डॉ... त्यांनी २०१२ ला सुरुब्वात केली दिसतेय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बर्‍यापैकी.

बाबा पाटील
Fri, 11/08/2013 - 13:00 नवीन
या वर्षी जी.पी.ए करंड्कला डिसें. च्या शेवटी फर्ग्युसन ग्राउड्ंला तसेच्,जाने.१०१४ ला डॉ.प्रिमिअर लिगला पुना क्लबला तुम्हाला निमंत्रण पाठवतो. नक्की या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार्स

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 13:09 नवीन
निमंत्रणा बद्दल आभार. आता धावणे होत नाही, चेंडू मागे पळु शकत नाही. चार षटकं गोलंदाजी करता येणं शक्य नाही, फलंदाजी ला शेवट पर्यन्त चेंडू वर नजर ठेवू शकत नाही. थोडक्यात क्रिकेट मधून निवृत्त झालो आहे. उभं केले तर जमेल पण सच्यासार्ख हसू करून घेण्यात काही मतलब नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आता काय बोलु.

बाबा पाटील
Fri, 11/08/2013 - 13:13 नवीन
म्हणुनच तर सचिन सारखा दुसरा होणे नाही. या सम हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिनचे तरी फुटवर्क राहिले काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 13:18 नवीन
सच्याने वयोमानाने निवृत्त व्हायला पाहिजे होतं आता मैदानावर विनाकारण उभं राहान्यात काय हशील होतं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बरुटे सर्,वायावरुन एक महत्वाची गोष्ट..

बाबा पाटील
Fri, 11/08/2013 - 13:19 नवीन
मागच्या वर्षी डी.पी. एल.पुना क्लबच्या हिरव्यागार पिचवर पहिल्याच षटकात पहिल्याच बॉलवर माझा ऑफ स्टंफ उखडणार्‍या पुणे साउथ झोनच्या डॉक्टरांच वय होत फक्त ४८ वर्ष.साला बाप फिटनेस होता माणसाचा,त्यामुळे मला नाही वाटत वयाचा खेळावर काही परिणाम होत.शेवटी पिंडी ते ब्रम्हांडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

मीही लोकल क्ल्ब कडून खेळणारे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 13:27 नवीन
मीही लोकल क्ल्ब कडून खेळणारे वयस्थ गृहस्थ पाहिले आहेत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत परफेक्ट. मुद्दा आहे सच्याचा. अनेक खेळाडूची कारकीर्द आणि स्वत:चा पर्फोर्म्स यासाठी निवृत्तिची वेळ होती वर्ल्ड कप. पैसे, विविध कंपन्याशी करार, क्रिकेट नियामक मंडलाचा धंदा, क्रिकेटचे बाजारिकरणासाठी सच्या क्रिकेट ला आवश्यक होता त्याला रडत पडत खेळायला लावले, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बजेटच्या दिवशी झाल्ते का शंभर

खटासि खट
Fri, 11/08/2013 - 11:03 नवीन
बजेटच्या दिवशी झाल्ते का शंभर ? काँग्रेसचा हात दिसतोय, उगाच एमपी केलं का ? आँ ? पांग फेडलेस रे बाबा
  • Log in or register to post comments

म्हातारा तितुका मेळवावा

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 11:53 नवीन
म्हातारा तितुका मेळवावा फोटू आंतरजालावरून Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद वल्ली! मस्त काम केलेस! :P

यशोधरा
Fri, 11/08/2013 - 12:03 नवीन
Now you know why he is Almighty GOD!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचे हेच म्हणणं आहे.

प्रचेतस
Fri, 11/08/2013 - 12:24 नवीन
=)) आमचे हेच म्हणणं आहे. त्याला उगा देव बनवून देव्हार्‍यात बसवू नका. नव्या रक्ताला वाव द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा