✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सच्याचे शंभर.........

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Fri, 03/16/2012 - 16:27  ·  लेख
लेख
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :) सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
Sachin-Tendulkar
[छा. जालावरुन साभार]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27055 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

मलाही तसच वाटतं

दादा कोंडके
Fri, 03/16/2012 - 16:32 नवीन
अवांतरः खुद्द संपादकाचाच (शतकी प्रतिसादाच्या लोभाने काढलेला) एकोळी धागा बघून कुणा-कुणाला एक मिपाकर म्हणून शरम वाटली, त्यांनी हात वर करा बघू! :)
  • Log in or register to post comments

भर घालतो रे बाबा अन्य संपादकाला सांगून

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/16/2012 - 16:41 नवीन
सच्याचे अभिनंदन.......! :) सच्याच्या नावावर कोणी काहीही लिहिलं (भलं बुरं ) तरी शंभर प्रतिसाद येतील. सच्याविषयी सर्वांनाच खूप बोलायचे असणार आहे. एकाच विषयावर असे खूप धागे येऊ नये म्हणून मी पुढाकार घेतला. अर्थात अन्य कोणीही धागा काढला तरी माझी कै हरकत असणार नाही. असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

भर घालतो रे बाबा अन्य

दादा कोंडके
Fri, 03/16/2012 - 18:46 नवीन
भर घालतो रे बाबा अन्य संपादकाला सांगून
धपमन्यवाद! उद्या वृत्तपत्रांमध्ये बजेटच्या ऐवजी याच बातम्यांनी पानं भरतील. शेवटी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. (असा एक अकारण हिणकस शेरा मारून मधल्या आळीचं नाव सार्थ करीत हा प्रतिसाद पूर्ण करतो.) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

100

यकु
Fri, 03/16/2012 - 16:37 नवीन
100 !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

झाले एकदाचे. सुटला बिचारा.

धन्या
Fri, 03/16/2012 - 16:38 नवीन
झाले एकदाचे. सुटला बिचारा.
  • Log in or register to post comments

तो कसला आपण सुटलो. आता सचिन ६

मृत्युन्जय
Fri, 03/16/2012 - 16:43 नवीन
तो कसला आपण सुटलो. आता सचिन ६ वर बाद झाल्यावर सचिन फिर एक बार १०० वे शतक से चूके वगैरे हास्यास्पद विधान ऐकायला मिळणार नाही याचा प्रचंड आनंद होतो आहे. १०० बे शतक काय हो तो करणारच होता. त्याने नाही करायचे तर अजुन कोणी करायचे बाकी देवाचे काय अभिनंदन करायचे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सुटतोय कसला? आता वनडेतल्या ५०

मेघवेडा
Fri, 03/16/2012 - 17:26 नवीन
सुटतोय कसला? आता वनडेतल्या ५० व्या शतकाचा पाठलाग! आता "फिर एक बार ५० वे शतक से चूके!" चूकना इज डेस्टिनी! आणि स्टार न्यूज्/इंड्या टीव्ही (आणि तत्सम मानसिकतेची लोकं) बरोब्बर तेच पकडणार! तू असो, मी असो, देव असो, कुणी असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अखेर जमले तर

कापूसकोन्ड्या
Fri, 03/16/2012 - 16:39 नवीन
सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन दुसरे नावच येत नाही काय करू????
  • Log in or register to post comments

सुटला गं बाई सुटला...शतक करून

बॅटमॅन
Fri, 03/16/2012 - 16:43 नवीन
सुटला गं बाई सुटला...शतक करून सच्या गं बाई सुटला...हुश्श्श्श्श्श्श्श..................
  • Log in or register to post comments

ह्येच म्हणेन! शेवटी

स्पंदना
Fri, 03/16/2012 - 16:51 नवीन
ह्येच म्हणेन! शेवटी बांगलादेशात जाउन च कराव लागल का? जरा नामवंता समोर ठोकाय्च होत दणक्यात. पण काही का असेना आम्हाला त्याच अभिनंदन करायला अतिशय आनंद होतोय. उगा कोणी का कळमळतेस अस म्हणायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कसं का असेना....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/16/2012 - 17:01 नवीन
मी मागे कोणत्या तरी एका धाग्यात प्रतिसादात म्हटलं होतं की सच्याच्या महाशतकासाठी बांगलादेश किंवा नेदरलँड्शी एकदिवसीय सामने आयोजित करावेत. आणि नेमकं सच्याने आज आशिया चषकाच्या अंतर्गत बांग्लादेशविरुद्ध शतक पूर्ण केले. च्यायला, माझं म्हणनं इतकं खरं ठरेल असं वाटलं नव्हतं. ;) अर्थात सच्या बाद झाला तो फटका तर लैच वाईट होता. असो... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

बांगला विरूद्ध असले म्हणून काय झाले

फारएन्ड
Fri, 03/16/2012 - 17:02 नवीन
याआधीची पाच - आफ्रिका, इंग्लंड, आफ्रिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध आहेत. आता टेन्शन फ्री झाल्यावर पूर्वीसारखा खेळला तर मजा येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

+ १

मेघवेडा
Fri, 03/16/2012 - 17:47 नवीन
बांगला विरूद्ध असले म्हणून काय झाले
+१. मी जरी बोलिंग टाकली तरी त्याला रन्स स्कोअर करावेच लागतात! माझ्यासारखा टुकार बोलर आहे म्हणून १०० फुकट मिळत नाहीत! नाही, आणि शतकांची आकडेवारी बघाच : वि. ऑस्ट्रेलिया - २० वि. श्रीलंका -१७ वि. द. आफ्रिका - १२ वि. इंग्लंड -९ वि. झिंबाब्वे - ९ (नव्वदच्या दशकात दरवर्षी पाडवा, बैसाखी, मोहरम, गणपती, रमजान ईद, दसरा, दिवाळी, नाताळ सगळं साजरं करायला झिंबाब्वे आपल्याकडे यायची हे लक्षात घ्यावं!) वि. पाकिस्तान - ७ (आपण सामनेही कमीच खेळलोत पाकिस्तानसोबत. तरी ७!) वि. विंडीज - ७ आणि बांग्लाविरुद्ध ६! त्यातही वनडेतलं पहिलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

बांग्लादेशने पकिस्तानला या

विजुभाऊ
Fri, 03/16/2012 - 18:31 नवीन
बांग्लादेशने पकिस्तानला या अगोदर दण्का दिलाय हे विसरताय वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

पण ...

शेखर काळे
Mon, 03/19/2012 - 00:46 नवीन
बांगलादेशाच्या विरुद्ध हे त्याचे पहिलेच शतक आहे .. ते कधीतरी करायलाच पाहिजे होते. ते नेमके शंभरावे झाले. आणि नामवंत म्हणजे कसं ? बांगलादेशाने देखील भारताला हरवलेच ना ? - शेखर काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

ब्वर्र

स्पा
Fri, 03/16/2012 - 16:44 नवीन
चला सचिन ची ब्रांड व्यालू परत वाढेल.. अजून खर्बो रुपये कमवेल. .चालुन्द्यात
  • Log in or register to post comments

क हो? दुधात मिठाचा खडा?

कापूसकोन्ड्या
Fri, 03/16/2012 - 17:02 नवीन
चला सचिन ची ब्रांड व्यालू परत वाढेल.. अजून खर्बो रुपये कमवेल. .चालुन्द्यात का हो असे? वाढूदेत की ब्रांड व्यालू तुम्हाला काय ती द्यावी लागते. उगाच काहीतरी किफलक बदवताय? इनो घ्यायला सुद्धा माणूस बरोबरीचा असावा लागतो असो! अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+११११११११११११११११११११११११११११११११

पिलीयन रायडर
Fri, 03/16/2012 - 17:39 नवीन
इनो घ्यायला सुद्धा माणूस बरोबरीचा असावा लागतो
मला इतकं आवडलय म्हणुन सांगु हे वाक्य...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

काको आणि पिरा, स्पावड्‍यानं

यकु
Fri, 03/16/2012 - 17:46 नवीन
काको आणि पिरा, स्पावड्‍यानं मुद्दाम खवचटपणा केलाय हो... तो पण तिकडे फटाके फोडत असेल.. ;-) पण 'इनो घ्यायला पण माणूस बरोबरीचा लागतो' या मौक्तिकाची भर घातल्याबद्दल थँक्यू.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

येश्या लेका.. तू पण लगेच

स्पा
Sat, 03/17/2012 - 08:59 नवीन
:) येश्या लेका.. तू पण लगेच कशाला स्पष्टीकरण देत बसतोस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

@तू पण लगेच कशाला स्पष्टीकरण

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/17/2012 - 09:26 नवीन
@तू पण लगेच कशाला स्पष्टीकरण देत बसतोस >>> बघा बघा यक्कूशेठ ,कोणाकोणाला कुठेकुठे फटाके फोडायची इच्छा असते ते... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरे वा!

sneharani
Fri, 03/16/2012 - 16:46 नवीन
सचिनचे अभिनंदन १०० व्या शतकासाठी!!मस्त वाटलं ऐकून! बिरुटे काका धागा अपडेट करा प्रतिसाद लिहून!!! ;) :)
  • Log in or register to post comments

खरचं सुटला....एकदाचा....

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 17:12 नवीन
खरचं सुटला....एकदाचा.... अभिनंदन त्याचे.. :-) Image removed. Image removed. Image removed. Image removed. पण अता खरोख्खर सुटतील त्या सगळ्या वाहिन्या...अनेकांनी आपापली तळी ट्यार्पी वाढायच्या मळीने भरुन ठेवली असतील..
  • Log in or register to post comments

रैना......

इरसाल
Fri, 03/16/2012 - 16:51 नवीन
आता आपल्या नातु पणतूंना सांगेल कि जेव्हा सच्याचे १००चे १०० झाले तेव्हा मीपण त्याच्या बरोबर मैदानात होतो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन . सचिनची ही घौडदौड

अमोल केळकर
Fri, 03/16/2012 - 16:54 नवीन
अभिनंदन . सचिनची ही घौडदौड अशीच कायम रहावी अमोल केळकर
  • Log in or register to post comments

'अशीच' कायम

श्रीरंग
Fri, 03/16/2012 - 18:09 नवीन
'अशीच' कायम रहावी?? अरेरेरे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

हुश्श!! झाले एकदाचे शतकाचे

मोहनराव
Fri, 03/16/2012 - 16:57 नवीन
हुश्श!! झाले एकदाचे शतकाचे शतक!! बजेटच्या दिवशी लोकांना एक चांगली बातमी!!
  • Log in or register to post comments

सच्याची सेंच्युरी झाली

पिलीयन रायडर
Fri, 03/16/2012 - 16:57 नवीन
सच्याची सेंच्युरी झाली रे....!!!
  • Log in or register to post comments

है..

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 03/16/2012 - 17:08 नवीन
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
  • Log in or register to post comments

चला शेच्युरी झाली ते बर झालं

प्रीत-मोहर
Fri, 03/16/2012 - 17:08 नवीन
चला शेच्युरी झाली ते बर झालं आता सच्या रैवारच्या हाय प्रोफायल म्याच ला मस्त टेंशन फ्री खेळेल :)
  • Log in or register to post comments

सचिन आता १११

विसुनाना
Fri, 03/16/2012 - 17:09 नवीन
बॉटलनेक/ मेगाब्लॉक सेंचुरी झाली एकदाची. टेन्शन संपले. आता १११ सेंच्युर्‍या होईपर्यंत निवांत खेळ रे.
  • Log in or register to post comments

ओह्ह नो...

श्रावण मोडक
Fri, 03/16/2012 - 17:14 नवीन
ओह्ह नो... ;) इनफ इज इनफ! आता एकदाची निवृत्ती जाहीर कर म्हणावं, बास्स झालं. विसुनानांच्या प्रतिसादाचा सूर कळला आहे. पण तरीही हे लिहिलं, धागा गाजत राहिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

वो नाना....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/16/2012 - 17:16 नवीन
>>>>>>आता १११ सेंच्युर्‍या होईपर्यंत निवांत खेळ रे. अरे बाप रे......! आज नै बोलणार या विषयावर. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

ह्यॅह्यॅह्यॅ

विसुनाना
Fri, 03/16/2012 - 17:22 नवीन
मला वाटलं होतं की तुम्ही अभिनंदनासाठी हा धागा काढला. पण हा तर समारोपाचा निघाला. ;) पक्के धोरणी आहात. (संदर्भ : लेखाचे विषय -धोरण + अभिनंदन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/16/2012 - 17:38 नवीन
सच्या जेव्हा रिटायर व्हायचा तेव्हा होईन पण आज तुम्ही कितीही शब्दांच्या पसार्‍यात मला गुंतवा. सच्यानं आता निवृत्तीची घोषणा करायला हवी असे मी आजच्या दिवशी तरी अजिबात म्हणनार नाही. :) सर्व देश जेव्हा सच्याच्या महाशतकामुळे आनंदी झाला आहे. (महागाईच्या बजेटकडे दुर्लक्ष करुन ) तेव्हा तो आनंद आपण सर्वांनी आज साजरा करावा. कोणीही चर्चेला सच्याच्या निवृत्तीकडे आणि बजेटकडे घेऊन जाऊ नये, असे वाटते. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

तेंडुलकर उवाचः Tendulkar

मोहनराव
Fri, 03/16/2012 - 17:28 नवीन
तेंडुलकर उवाचः Tendulkar speaks: "It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)." क्रिकेटच्या देवाला आपला सलाम!!
  • Log in or register to post comments

खिक्...

श्रावण मोडक
Fri, 03/16/2012 - 17:44 नवीन
Tendulkar speaks: "It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)." पण जाऊ दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

>>> पण जाऊ दे... जाऊ कसं

यकु
Fri, 03/16/2012 - 17:51 नवीन
>>> पण जाऊ दे... जाऊ कसं द्यायचं? जाऊ कसं द्यायचं ? त्यानं सगळ्यांना भो. जा. सांगायचं होतं का? म्हणजे त्याचे 50 किलो ‍गेले नसते? की सचिन झाला म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षांचं ओझं, ती अपेक्षा पूर्ण करण्‍याची शिरशिरी येतच नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गल्लत

विसुनाना
Sat, 03/17/2012 - 11:47 नवीन
It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos.
-या वाक्याचा अर्थ लावताना रवी शास्त्रीचीही (संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा लेख) गल्लत झालेली दिसते. पण बरोबर अर्थ सौरव गांगुलीला लागलेला आहे.(संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा - म्हणजे गांगुलीचा लेख). 'हे शंभरावे शतक झाल्यानंतर मला कापसासारखे हलके वाटत आहे' हा सचिनच्या म्हणण्याचा मराठी भावार्थ आहे. शंभरावे शतक करण्याच्या काळजीने माझ्या शरीराचे वजन घटले असा त्याचा अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गल्लत झालीय खरी, तरीही की

यकु
Sat, 03/17/2012 - 12:42 नवीन
गल्लत झालीय खरी, तरीही
की सचिन झाला म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षांचं ओझं, ती अपेक्षा पूर्ण करण्‍याची शिरशिरी येतच नाही?
अधोरेखित शब्दातून अभिप्रेत अर्थ आपोआप आलाय.. घटनानुसारी . शब्द दगा देऊ शकतील, पण घटनेतून निघणारा आशय पुरेसा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अच्छा

श्रावण मोडक
Sat, 03/17/2012 - 14:28 नवीन
मी त्या वाक्याचा अर्थ 'मणामणाचं ओझं उतरलं' असा घेतला. शारीरिक वजन हा अर्थ अभिप्रेत नाहीच. ते म्हणजे अगदीच मेहता पुस्तकीय भाषांतर झालं असतं. कसेही असो, माझे मत थोडं अधिक मांडतो. माझ्या मते, "हो, मला हे शंभरावे शतक करायचे होते" असे सचिनने म्हणायला हवे. त्याला तो अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची मर्यादा त्याच्याकडून उल्लंघली गेलेली नाहीये अद्याप तरी. वर्षभर शतकासाठी लागलं हे खरंय. पण मधल्या काळात तो काही कशीबशी फलंदाजी करत नव्हता. तो शतक करू शकला नाही, पण लौकिकाला साजेसा खेळला नाही, असे अपवादात्मकच घडले आहे. शतक हे लक्ष्य होते, हे सचिननं म्हटलं असतं तर बिघडलं नसतं. पण त्यासाठी अंगातून टीशर्ट काढून गरागरा फिरवण्याची वृत्ती हवी. ती सचिनकडे नाही (ही त्याची मर्यादा, आणि तरीही व्याप्ती आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

हाहा..मी पन्नास किलो वजन

यकु
Sat, 03/17/2012 - 15:00 नवीन
हाहा.. मी पन्नास किलो वजन कमी झालं आणि हा बाबा खेळतोय कसा असं ओझरतं वाटलं होतं काहीतरी.. पण त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. विस्तृत प्रतिसाद आवडला. नुसती काही विसंगत वाक्ये हायलाईट आणि खाली "पण जाऊ दे " फारच क्रिप्टीक झालं होतं. आणि हो, ( एफवायआय - आपल्या दयाळू माहितीसाठी) मी मेहताचा भाषांतरकार नाहीय, सध्या आम्ही गुगल, याहू आणि विंडोजची वाट लावतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

:)

श्रावण मोडक
Sat, 03/17/2012 - 15:19 नवीन
नुसती काही विसंगत वाक्ये हायलाईट आणि खाली "पण जाऊ दे " फारच क्रिप्टीक झालं होतं.
मोरे अवगुण चित ना धरो! ;) आणि, मेहता हे तुमच्यासाठी नव्हतं मालक. आम्ही गुगल, याहूच्या वाटेलाही जात नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ऐन मार्च अखेरीस जाहिरातींचा

श्रीरंग
Fri, 03/16/2012 - 17:32 नवीन
ऐन मार्च अखेरीस जाहिरातींचा पूर येणार. सर्व व्रुत्तपत्रं खूष!! :)
  • Log in or register to post comments

मानल.. सलाम

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/16/2012 - 17:32 नवीन
मानल.. सलाम
  • Log in or register to post comments

मानल.. सलाम

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/16/2012 - 17:33 नवीन
मानल.. सलाम
  • Log in or register to post comments

आता बजेट विसरा.........

स्वातीविशु
Fri, 03/16/2012 - 17:42 नवीन
झाले एकदाचे शतकी शतक. :) :party: जीयो सचिन.
  • Log in or register to post comments

:)

अस्मी
Fri, 03/16/2012 - 17:56 नवीन
खरंच..झाली एकदाची सेंचुरी!!! सचिनचे अभिनंदन..!!! :) Image removed.
  • Log in or register to post comments

आम्ही

तिमा
Fri, 03/16/2012 - 17:58 नवीन
आकडेमोडीला भाव देत नाही. ९९ व्या शतका नंतर त्याच्या ९० ते १०० मधल्या अनेक खेळ्या मी शतकासमानच मानतो. सचिन, मनापासून अभिनंदन रे!
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

चिगो
Fri, 03/16/2012 - 17:59 नवीन
सचिनचे अभिनंदन... बाकी हिंदी न्युजवाल्यांचे ज्योतिषी पावरबाज झालेयत वाटतं.. नाही, काल "महाशतका"चं भाकीत करत होते म्हणून म्हटलं..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा