Skip to main content

प्रेमालाप

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 22/09/2008 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकर : प्रीये, तुझा चेहरा तर एखाद्या आरक्त कमळावर पडलेल्या दवबिंदू सारखा टवटवित दिसतो आहे. आणि मावळत्या सूर्याची कोवळी किरणे हलकेच त्याच्याशी लडिवाळपणा करीत आहे. आहाहा हा.. तुझ्याकडे पाहताना माझे भान कसे हरपून जाते आहे ! प्रेयसी : राजा, तुझे हे साहित्यिक बोलणे मला भारी आवडते. तुला या असल्या उपमा सुचतातच कश्या ते मला कळत नाही. प्रियकर : ते पहा प्रीये, तळ्यातल्या कमळफुलांनी कसा सुगंध या वातावरणात कोंदून भरला आहे. कमळाभोवती गुंजारव करणारे ते भ्रमर पहा कसे या कोमल समयाला उचित असा नाद करत आहेत. प्रेयसी : होय ना ! त्यांच्या पूर्वजावर कमळात अडकून रहायची वेळ आली होती आणि तुझ्यासारख्या कुणा साहित्यिकाने एका हत्तीला त्यात आणून ते कमळ तोडायला लावले. आता उगीच कुठेही हळहळ वगैरे वाटावी असे वाटले की नवसाहित्यिक त्यात या रुपकाचा वापर करुन आपण मोठे व्यासंगी असल्याचा आव आणत असतात. प्रियकर : खरंच प्रीये ! पण आजही हे भुंगे कमळाच्या सुगंधाने धुंद होऊन सायंसमयी त्या फुलातच शिरत असतात. प्रीये खरी प्रीति अशीच असते गं! पहा पहा, कमळदळावर विश्रांती घेत असलेल्या त्या बेडकाने आताच पाण्यात हलके सूर मारला आणि त्यामुळे उत्पन्न झालेले तरंग माझ्याच मनात जणू काही पसरत आहेत असा मला भास होतो आहे. हा संवाद पुढे वाढवाया की रखवालदाराला आणून या जोडप्याला वाटेस लावायचे ते तुम्ही ठरवा ;) --लिखाळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6756
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

http://vipravani.wordpress.com/ हे कुजन ३० मिनिटावर चालले असेल तर ह्या बुवाच्या **वर लाथ घालुन हाकलुन द्यावे. हे काम तिनेच करावे. रखवालदाराची गरज नाही. वि.प्र.

In reply to by विनायक प्रभू

खरंतर प्रियकर हे उठता लाथ बसता बुक्की या धोरणाच्याच लायकीचे असतात असे प्रख्यात स्त्रीवादी लढाऊ कार्यकर्त्या लवंगलतिका कुरतडकर बाई म्हणाल्या होत्या ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

लवंगलतिका कुरतडकर याच का त्या ज्यानी चार प्रियकर कुरतडुन खाल्ल्या होत्या

In reply to by विजुभाऊ

>>लवंगलतिका कुरतडकर याच का त्या ज्यानी चार प्रियकर कुरतडुन खाल्ल्या होत्या ही ही ही.. हे लै भारी :)

सहमत ++१ हे असले लाळघोटे बोलणे काय वाचणेही सहन करण्यापलिकडे एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत. तात्पर्य लग्न ठरवायचे असेल तर पायजम्यात निदान तीन चार नाड्या असाव्यात

In reply to by विजुभाऊ

त्याच्या नाड्याच्या गाठी जाम अडकल्या असतील मग सुटे पर्यंत काय बोलायाचे म्हणुन साहित्य चर्चा चालु एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत. तात्पर्य लग्न ठरवायचे असेल तर पायजम्यात नाडीच नसलेली बरी

In reply to by अवलिया

>>त्याच्या नाड्याच्या गाठी जाम अडकल्या असतील त्या साठीच ईलास्टिक वापरा म्हणुन सांगतोय. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

In reply to by सखाराम_गटणे™

त्यात विजूभाऊ म्हणतात की दोन नाड्या वापरा.. म्हणजे प्रेमालाप पहाटे पर्यंत चालू ठेवायला लागतील :)

In reply to by सखाराम_गटणे™

त्या साठीच ईलास्टिक वापरा म्हणुन सांगतोय. अरे खरेच तु लहान आहेस अजुन.... नाडी अडकली तर कात्रीने तोडता येते... ईलास्टिक काय नुसते कीती ताणले जाते हेच पहाणार रे तु? लुंगी वापरा लुंगी - सुटसुटीत अन वायुविजन पण चांगले होते

In reply to by विजुभाऊ

अहो प्रियकर लोकच ते... असलं काहीबाही बोलावं लागतं बर्‍याचदा... हे बघा... आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. तल्लीन होऊन गाणारा गायक , स्वत:च्याच नादात मग्न होऊन बाहुलीशी खेळणारी लहान मुले , स्वत: घडवलेल्या घाटदार माठाकडे तृप्तीने पहाणारा कुंभार ही त्या क्षणी एकदम सुंदर दिसत असतो. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आबाबाबाबाबाबाबाबाबाबा....आमी बा!!!!!!!!!!!स तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात प्यान्ट सावरणारा विजुभाऊ

In reply to by भडकमकर मास्तर

>>आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. वा वा .. हे मस्त ! फांदी गुणगुणते..भुंगे गुंजारव करतात.. एकंदर अब्यांच्या झाडाखाली 'गडबडच' जास्त ;)

In reply to by लिखाळ

नुसते अंबा शब्द आला तरी लिखाळांची 'अब्यांच्या' झाडाखाली भबेंरी उडाली! ;) चतुरंग

प्रेम करताना, साहीत्य चर्चा कसल्या डोबंलाच्या करतात काय माहीत? - नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

रखवालदाराला आणून या जोडप्याला वाटे लावावे. नवसाहित्यिक त्यात या रुपकाचा वापर करुन आपण मोठे व्यासंगी असल्याचा आव आणत असतात. आम्हाला यातला खालील प्रकार महाभयंकर वाटतो. १) : जी.ए. वाचला का ? २) : नाही बॉ ! १): जरुर वाच. पुढील भेटीत १): काय वाचत आहेस. २) : जी.ए. १) : कमाल आहे. जयवंत दळवी वाच. पुढील भेटीत २): जयवंत दळवी वाचत आहे. १) :वपु वाच काय लिहितो, जबरदस्त.... नंतर भेटूच नये असे वाटते, असे वार्तालाप करणार्‍यांना :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>१) :वपु वाच काय लिहितो, जबरदस्त...>>> ह्म्म ! वपुंचे नाव आले की मी सुद्धा पळच काढतो. बरं सर एक सांगा.. तुम्ही कौंतेय/मृत्युंजय वाचले आहे का? कर्णाबद्दल काय बाजू मांडली आहे. ते वाचल्या पासून मला कर्ण आवडायला लागला.. त्याच्या आयुष्यातले कारुण्य..... नसले वाचले तर वाचाच ! --लिखाळ.

http://vipravani.wordpress.com/ आपला तर झट म्हण्ता फट म्हण्ता ठ्यांव वर भयंकर विश्वास. आपला उगाच गुळ काढ्ण्याला विरोध. वि.प्र.

लिखाळकाका, संवाद मस्त आहेत... प्रियकरातला सखाराम गटणे आवडला! :) आपला, ('केतकी पिवळी पडली..'चा लेखक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळकाका?? ह्म्म ! 'केतकी पिवळी पडली..' हे आवडले. --लिखाळ कुडचेडकर.

ह्या प्रियकराला पण 'बोळायटीस' ह्या असाध्य व्याधीने ग्रासलेलं दिसतंय... रखवालदाराला बोलवून वाटेला लावण्याऐवजी तेवढा बोळा काढला की झाले. हाय काय अन् नाय काय. बिपिन.

ती त्याला प्रश्न विचारते, तो उत्तरे द्यायचे सोडून आपलेच चालू ठेवतो आहे... ती त्याला अजूनपर्यंत हाकलत नाही त्याची कारणे : १. ती त्याच्या मोटरसायकलवर डबलसीट बसून डबक्यापाशी आली आहे. बोलता बोलता बाईकची किल्ली कशी लंपास करावी, त्याला बेडकांसोबत सोडून एकटीनेच परत जावे असा कट ती करते आहे. २. फक्कड कोल्हापुरी मिसळ खिलवण्याच्या बोलीवर त्याने तिला रंकाळ्यावर आणले आहे. बकवासाने बकाबक-आस अजून मारलेली नाही. ३. १+२

प्रियकर : खरंच प्रीये ! पण आजही हे भुंगे कमळाच्या सुगंधाने धुंद होऊन सायंसमयी त्या फुलातच शिरत असतात. प्रीये खरी प्रीति अशीच असते गं! पहा पहा, कमळदळावर विश्रांती घेत असलेल्या त्या बेडकाने आताच पाण्यात हलके सूर मारला आणि त्यामुळे उत्पन्न झालेले तरंग माझ्याच मनात जणू काही पसरत आहेत असा मला भास होतो आहे. प्रेयसी: राजा, त्या बेडकाने पाण्यात नाही माझ्या मनाच्या डोहात सूर मारला. एक चुकार विचार मनात आला की तो बेडुक तू असतास तर रे प्राणसख्या! प्रियकरः लावण्यलतिके, तुझ्यासाठी बेडुक होणंही मला मान्य आहे. त्या बेडकाच्या बटबटीत डोळ्यांनी तुला डोळेभरून पाहतानाचा आनंद अवर्णनीय असेल. त्या बेडकाच्या आवाजात तुझ्याशी प्रेमालाप करण्यासाठी जीव कासाविस होतो आहे. प्रेयसी: बेडकाच्या आवाजात, लाडक्या? प्रियकरः हो हो, बेडकाच्या... हे बघ असे हृदयेश्वरी...रिबिट रिबिट रिबिट! प्रेयसी: आता मलाही साद द्यायला हवी ना राजा, ड्रांव ड्रांव ड्रांव! प्रियकरः रिबिट रिबिट रिबिट! प्रेयसी : ड्रांव ड्रांव ड्रांव! प्रियकरः रिऽब्बिट...रिऽब्बिट प्रेयसी: डरांव...डरांव रखवालदारः ए फुटा लेकांनो... क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा. ;)

In reply to by प्रियाली

रखवालदारः ए फुटा लेकांनो... क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा. या संवादावर हा कळस आहे... अतीउत्तम ! मी गडबडा लोळून हसतो आहे. --लिखाळ.

In reply to by प्रियाली

रिबिट्..रिबिट्..ड्रांव..ड्रांव.. ए फुटा लेकांनो, क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा!! प्रेमालापाचे एकदम भयालापात झालेले रुपांतर बघून थक्क झालो! :O (खुद के साथ बातां : प्रतिभा, प्रतिभा म्हणतात ती हीच का रे रंग्या? B) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

(खुद के साथ बातां : प्रतिभा, प्रतिभा म्हणतात ती हीच का रे रंग्या? ) नाही नाही, ही प्रतिभा नाही, ही तर आपली 'खत्तरनाक' भयाली, आपलं ... प्रियाली!

In reply to by भडकमकर मास्तर

>>पाल बेडूक आणि ट्रक एकदा नदीकाठी क्रिप्टिक बोलत बसलेले असतात... :) प्रियकराने असे (म्हणजे प्रेमालापात लिहिले आहेत तसे शाब्दिक) तारे तोडल्यावर पालीकडे चुकचुकण्याशिवाय काय पर्याय राहणार !! --लिखाळ.