फायनान्शिअल टूल्स, सिक्युरिटिज् आणि डेरिव्हेटिव्हज् यांच्या गुंतागुंतीत सध्याच्या आर्थिक उलथापालथीची (काही) मुळे सापडतील. "फ्रॅनि" काय किंवा "आयबी"ज् काय सार्यांनी हा प्रॉब्लेम मल्टिप्लाय केला आहे.
असो... मूळ कारणे आणखी वेगळेच जग पुढे आणतील.
वेगळ्या विषयावर नेटके लिखाण केल्याबद्दल अभिजित यांचे आभार. मांडणी आवडली - अभिनंदन.
आपला माहिती आणि अभ्यासपूर्ण लेख आवडला.
पण आमच्यासारख्यांसाठी अजून थोडी जास्त आणि सविस्तर माहिती येऊदेत. पेशवे म्हणतात त्याप्रमाणे भारतावर, भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होईल? मध्यमवर्गाचं काय, नव्या आय.टी.वर्गाचं काय वगैरे ... शिवाय सब-प्राईम हे तत्कालिक कारण आहे का खरं कारण, इत्यादी!
लेखाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
मिसळपाव चा मंच उपलब्ध केल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचेही आभार.
जाता जाता -
भारतीय अर्थव्यवस्थेची अमेरिकेवरील भिस्त विकसीत देश, चीन, रशिया, जपान वगैरे पेक्षा कमी आहे. या आर्थिक गोंधळाचे आपल्यावर पडणारे परिणाम हे दीर्घकालीन आणि संस्थात्मक असण्याची शक्यता आहे. यावरिल 'विश्लेशण' पुढे कधी तरी .. :H
मिसळपाव चा मंच उपलब्ध केल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचेही आभार.
अहो त्यात आभार कसले? इन फॅक्ट, आय ऍम ऑनर्ड! :)
सुंदर लेख, भारताबद्दलही अजून विवेचन येऊ द्या...
तात्या.
अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आलेल्या अरिष्टाचे विवेचन आवडले.
भारतीय अर्थव्यवस्था ह्यातून कितपत तग धरु शकेल? तसेच ह्या अमेरिकन आर्थिक मंदिचा एकंदरीत जगावर काय परिणाम होईल,
ह्यावरहि काहि माहिती वाचायला आवडेल.
अभिज्ञ.
अभिजीत,
मोजक्या शब्दांत लिहिलेला माहितीपूर्फ्ण लेख आवडला. अभिनंदन.
>>यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती. अर्थातच यात या सर्व मंडळींचे हितसंबंध गुंतलेले होते.
जागतिक दिवाळखोरीला कारणीभूत ठरणार्या काही मूळ कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण. या उच्चाधिकार्यांचा गाफीलपणा व भविष्यातील जोखमींचे चुकीचे अंदाज यामुळे काही प्रमाणात आर्थिक घसरणीला सुरुवात झाली. एवढे असूनही या अधिकार्यांना वर्षाला लक्षावधी-कोट्यावधी डॉलर्सचा पगार मिळतो.
>> ऑगस्ट ०८ मधे 'फ्रेडी मॅक' आणि''फेनी मे' या गॄहक्षेत्रात काम करणार्या' अतिविशाल कंपन्या अमेरिकी सरकार ने २०० अब्ज डॉलर्स घालून राष्ट्रीयिकृत केल्या.
या कंपन्या कोसळण्याचा हा धक्का त्यातल्या त्यात जबर मोठा होता. या दोन कंपन्या अमेरिकेच्या (आणि जगाच्या) अर्थव्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. यांच्या आर्थिक उलाढाली हजारो अब्ज डॉलर्सच्या घरात जातात. त्यामुळे यांचे 'राष्ट्रीयीकरण' ही अमेरिकेच्या आर्थिक इतिहासातील मोठी घटना म्हणावी लागेल.
जाताजाता...
सप्टेंबर २००८: इंग्लंडमध्ये 'हॅलिफॅक्स बँक ऑफ स्कॉटलंड' (HBOS) या मोठ्या आर्थिक कंपनीला लॉइड्स टी.एस्.बी. (Lloydes TSB) या ग्रुपने अंदाजे २२ अब्ज डॉलर्सला विकत घेतले.
प्रतिक्रिया
गुंतागुंत
अभिजीत...
लेख आवडला
छान लेख
लेख
सुरेख
माहिती आणि अभ्यासपूर्ण
सहमत. (पुढी
हेच म्हनतो!!
भारताबद्दल अधिक
धन्यवाद
मिसळपाव चा
छान लेख
लेख आवडला
लेख आवडला.
माहितीपूर्ण
अर्थपूर्ण लेख