✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेडा कायें (म्हणोन) लपविता... ???

ब — बॅटमॅन, Tue, 10/15/2013 - 20:45
प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच. लिङ्क. धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे. नकळितां न्हाण आलें ग बायें म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें म्हैशीसि लागियलें जुगतपिसें नुमगे मज कैसे हे अपैसें नेवोनि रेडा जवळी, येर्‍हवीं ओरडा हाकाळोंनि का वो परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्‍हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''

प्रतिक्रिया द्या
11756 वाचन

💬 प्रतिसाद (53)

खपल्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 10/15/2013 - 20:52 नवीन
खपल्या गेले आहे...... =)) =))
  • Log in or register to post comments

१० मिनीटे झाली...

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 21:07 नवीन
हसतोय...
  • Log in or register to post comments

रेडियासि जरि हंबरैल महिशी

मदनबाण
Tue, 10/15/2013 - 21:38 नवीन
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्‍हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' हॅ.हॅ.हॅ... ;) रेड्याला आयता पिकलेला फणस मिळतो. ;)
  • Log in or register to post comments

भाषाप्रभू आहेस रे. _/\_

प्रचेतस
Tue, 10/15/2013 - 21:39 नवीन
Image removed.Image removed.Image removed. भाषाप्रभू आहेस रे. _/\_ Image removed.
  • Log in or register to post comments

वा माउली वा.

अभ्या..
Wed, 10/16/2013 - 11:02 नवीन
वा माउली वा. तुम्हाला तुमचे भाषा प्रभुत्व सिध्द करण्यासाठी रेडाच मिळाला. धन्य तो हाल्या. त्याचे पूर्व्जन्मीचे संचित. अजुन काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@तर्‍हीं म्या निजमनीं हासेन

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/15/2013 - 22:04 नवीन
@तर्‍हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''>>> =)) __/\___/\___/\___ =)) ठ्ठार झालो आहे! =))
  • Log in or register to post comments

(No subject)

मोदक
Tue, 10/15/2013 - 22:36 नवीन
:-))
  • Log in or register to post comments

कहर

धन्या
Tue, 10/15/2013 - 22:48 नवीन
भाषाप्रभू दंडवत स्विकारा. :)
  • Log in or register to post comments

बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा

प्यारे१
Tue, 10/15/2013 - 23:21 नवीन
बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा शब्द आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) आहे. ;)
  • Log in or register to post comments

इथे खरा वेगळा शब्द आहे

धर्मराजमुटके
Wed, 10/16/2013 - 11:13 नवीन
तो खरोखर वेडा नसतो मात्र ती कृती वेडेपणासारखी करतो त्यामुळेच तो खरा शब्द तयार झाला असावा हे नमुद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

"जुगतपिसें" हा शब्दालाच १०

आदूबाळ
Wed, 10/16/2013 - 02:40 नवीन
"जुगतपिसें" हा शब्दालाच १० मिनिटं हसलो :)) प्यारे यांच्या प्रतिक्रियेला +१०००
  • Log in or register to post comments

नकळत

चौकटराजा
Wed, 10/16/2013 - 05:11 नवीन
नकळत धागे दिसले काहीजण उघड पणे तर काही जण मनांत हसले !
  • Log in or register to post comments

महाकवि,

पैसा
Wed, 10/16/2013 - 08:31 नवीन
महिषी महिष प्रणयप्रसंग उत्कटतेने रंगवला आहे. धनाजीराव आणि बुवांची माफी तुम्हाला मिळाली असे दिसते आहे. या पुढच्या अध्यायात महिष आणि महिषी वृंदावन गार्डनात झाडाभोवते फेरे मारणार का?
  • Log in or register to post comments

होय

तिमा
Wed, 10/16/2013 - 11:16 नवीन
या पुढच्या अध्यायात महिष आणि महिषी वृंदावन गार्डनात झाडाभोवते फेरे मारणार का? हो आणि तिथे ते , जाशील कोठे म्हशी तू नेशील तेथे रेड्या तू हे गाणेही म्हणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/16/2013 - 13:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

किंवा

सूड
Wed, 10/16/2013 - 14:29 नवीन
>>धूसर काळा पद अवजड हा पदात तुझिया देते नेशील तेथे येते, रेड्या नेशील तेथे येते<< असंही काहीसं ती महिशी गाऊ शकेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

एवढं सगळं काव्य झाल्यावर पद

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/16/2013 - 17:16 नवीन
एवढं सगळं काव्य झाल्यावर पद अव'जड' होणारच आणि ते नेमके शब्दात पकडण्याची कवीची हातोटी वाखाणणीय आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद तिमा सर

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 14:39 नवीन
महिषमहिषीयुगुलगीत आवडले !!! एक "हम्मा" वाले ध्रुवपद टाकले की खंप्लीट प्याकेजच होईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ए ए हम्मा

इरसाल
Wed, 10/16/2013 - 17:22 नवीन
हम्मा हम्मा हम्मा ए ए हम्मा, इक हो गये हम और तुम..... चालुन जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.

उद्दाम
Wed, 10/16/2013 - 11:19 नवीन
नवरात्रीची देवी उठली त्याचा रेड्याला आनंद झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

:)

अग्निकोल्हा
Wed, 10/16/2013 - 11:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

रसाळ कविता

चित्रगुप्त
Fri, 10/18/2013 - 22:11 नवीन
अद्भुत रस, शृंगार रस, हास्यरस, आणखी जे कोणकोणते रस असतात, ते सर्व एकवटून भलतीच रसाळ जाहली आहे कविता. च्यामारी, 'कविता' मधेही 'विता' आले.
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
Fri, 10/18/2013 - 23:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कविता क विता?

बॅटमॅन
Sat, 10/19/2013 - 04:15 नवीन
कविता क विता? =)) जबराट हो चित्रगुप्तजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

क्या बात!

साती
Fri, 10/18/2013 - 22:22 नवीन
भारी आहे. तू भाषाप्रभू आहेस.
  • Log in or register to post comments

विता कविता

चित्रगुप्त
Sun, 10/20/2013 - 14:46 नवीन
कष्टी बहुतचि जाला, गवळी त्याची महीष न-विता होई मुदित बहुत जो, रेड्यासंगे त्रिवार ती स्त्रविता सत्वर बॅटे रचिली नाना छंदी रसाळ जी कविता स्तंभित होति मिपाकर बॅटे ती कविता-ऐकविता
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/20/2013 - 14:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बघुनी कविता साची, लेखणी

बॅटमॅन
Sun, 10/20/2013 - 15:45 नवीन
बघुनी कविता साची, लेखणी सरसोनि चित्रगुप्त, पंतांसम रचती आर्या, होती काढोनि चित्र गुप्त; पाहुनि शीघ्रकवित्वा, होई मिपाकरां कळणें बंद, चित्रांचा आधिच लाहो, देखुनि त्यासवें काव्यछंद. नित्य तुम्ही आम्हाते, चित्रांचा की मजा दाखवावा तरि पैं एके दिवशी, कवितारस पुर्ताचि दाखवावा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बाकी ते महिष च्या जागी महिषी

प्रचेतस
Sun, 10/20/2013 - 15:53 नवीन
बाकी ते महिष च्या जागी महिषी असे हवेय. एकदम बैलाचे दूध आठवल्या गेले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी

बॅटमॅन
Sun, 10/20/2013 - 16:04 नवीन
बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी यादवाची कथा होती ना रे ती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. आता नेमकी आठवत नै पण.

प्रचेतस
Sun, 10/20/2013 - 16:06 नवीन
हो. आता नेमकी आठवत नै पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सकलगोपालचमूत कवणाची धेनू

बॅटमॅन
Sun, 10/20/2013 - 16:10 नवीन
सकलगोपालचमूत कवणाची धेनू बहुदुग्धदायिनी ऐशी स्पर्धा लागते. कवण येक बादली, कवण दोन बादल्या येणेप्रमाणे गायी दोहताती. मगधवासी यादवो आलियावेरी प्रहरभराने वाटीभरी दोहुनी येतो, समस्त जनलोक थट्टा करिताती, तेव्हा रागेजून वरीलप्रमाणे बोलतो ऐसी कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Sun, 10/20/2013 - 16:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

प्रसाद गोडबोले
Sun, 10/20/2013 - 19:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मग

चौकटराजा
Sun, 10/20/2013 - 18:27 नवीन
ही शेलेब्रेट करायला कविता कधी साहेब, चपटी मागविता ..... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

=))

सुहास झेले
Sun, 10/20/2013 - 16:23 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

चपटी मागविता...

चित्रगुप्त
Sun, 10/20/2013 - 18:42 नवीन
काय हे ऐकविता ? चपटी मागविता अंतुरी रागविता धुणि-भांडि करविता सासूसि बोलाविता सुचेल काय कविता ?
  • Log in or register to post comments

व्वा नरवाघूळ भाऊ !!

इष्टुर फाकडा
Sun, 10/20/2013 - 19:24 नवीन
भाषाप्रभुत्वाची एक पुनःप्रचीती आली :) आवडेश
  • Log in or register to post comments

जबराट्ट कविता!

जडभरत
Wed, 07/15/2015 - 16:14 नवीन
जबराट्ट कविता! इतकी धुमाकूळ घालणारी कविता आज प्रथमच वाचली! काय खत्तरनाक! ग्रामीण पाचकळपणा आणि मोरोपंती भाषा! हे एक नवीन जुगाड! सह्ही रे सह्ही बॅट भाऊ!
  • Log in or register to post comments

आईच्चा...कहर म्हणजे अगदी कहर

टवाळ कार्टा
Wed, 07/15/2015 - 16:23 नवीन
आईच्चा...कहर म्हणजे अगदी कहर आहे
  • Log in or register to post comments

दुसरी गोष्ट आत्ता

नाखु
Wed, 07/15/2015 - 17:07 नवीन
कळलं बॅट्या कधीही रेड्यांच्या झुंजी पहायला का जात नाही ते !!! न जाणो बहीर्गमन झाले तर ?? आता पहिली गोष्ट : जोड काव्य अद्भुत. याचकांची पत्रे वाला
  • Log in or register to post comments

@याचकांची पत्रे वाला>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/15/2015 - 17:25 नवीन
@याचकांची पत्रे वाला>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कविता आणि प्रेरणेची लिङ्क

प्रचेतस
Wed, 07/15/2015 - 17:11 नवीन
कविता आणि प्रेरणेची लिङ्क पाहून पुनरेकवार त्या आठवणींनी भडभडून आले.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/15/2015 - 17:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गेले ते दिवस.. राहिल्या त्या

अस्वस्थामा
Wed, 07/15/2015 - 17:35 नवीन
गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खल्लास! लै जबरी :)

पॉइंट ब्लँक
Wed, 07/15/2015 - 17:34 नवीन
खल्लास! लै जबरी :)
  • Log in or register to post comments

निजधामाला गेलो आहे वाचुन =))!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 07/15/2015 - 18:43 नवीन
निजधामाला गेलो आहे वाचुन =))!!!
  • Log in or register to post comments

=))=))

अजया
Wed, 07/15/2015 - 19:26 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments

मग खरवसाचा बेत कधी ;)

प्रसाद गोडबोले
Tue, 07/21/2015 - 14:01 नवीन
मग खरवसाचा बेत कधी ;) 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'
  • Log in or register to post comments

ह्या बॅट्याला हाणा रे पकडुन.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/02/2017 - 22:31 नवीन
ह्या बॅट्याला हाणा रे पकडुन. जवळजवळ उर्ध्व लागला हसुन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा