Skip to main content

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 04/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती. कोणतेही डावे उजवे करणे कठीण असले तरी परीक्षक मंडळींनी आपले काम चोख बजावले. बहुमताने तयार झालेला निकाल इथे प्रसिद्ध करत आहोत. ज्यांना पुरस्कार जाहीर झाला नाही त्यांनी नाउमेद होऊ नये. केवळ तुमच्या सहभागामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. फारच थोड्या फरकाने क्रमांक दिले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे. १. रिकामटेकडा pic1 २. जातीवंत भटक्या pic2 ३. स्मिता चावरे pic3 सर्वच स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन! पहिले तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांचे खास अभिनंदन! तसेच परीक्षकाचे काम पाहणार्‍या मंडळींचेही खास आभार! पुरस्काराची पुस्तके स्पर्धकांना लवकरच पाठवण्यात येतील. त्यांनी आपले नाव, पूर्ण पत्ता संपादक मंडळाला व्यनिद्वारे कळवावा ही विनंती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7788
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

पन त्या विजेत्यांच्या नावापुढं त्यांचा गणपतीबी दाखवा की... म्हण्जे कोनत्या गनपतीला बक्षीस मिळालं ते कळंल..

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. विजेत्यांनी पेढ्यांऐवजी मोदक वाटावेत असा प्रस्ताव ठेवतो.

In reply to by प्यारे१

चुलबुल प्यारे यांच्या प्रस्तावाला जोरदार हनुमोदन देते...

विजेत्यांचे अभिनंदन आणि हरलेल्यांना टुक टुक माकड! :))

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढच्या वर्षी अजून कलात्मकता दिसून येऊन सजावटींची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा..!

अरे वा! सुंदर सजावटी! मलाही आवडल्या होत्या. सर्व विजेत्यांचे अभिनंदन! चला आता दिवाळीचे आकाश कंदिल बनवायला घ्या. अन रांगोळ्यांचा थाट मांडा!

आतिशय मस्त धागा होता. खुप छान सजावटी बघावयास मिळाल्या. सर्वांचे कौतुक...

तुमची आहे त्या जागेत केलेली गणपती सजावट आणि कौशल्य बघुन तुम्हाला आता एखाद्या मंदिराचे काम द्यावे असे वाटते आहे.