काल घरी गेल्यावर चॅनेल सर्फिंग करताना स्टार माझावर अत्यंत महत्वाची बातमी दाखवत होते. त्यात सायली दातार व श्री. मेहेंदळे यानी लंडन मधील जुन्या वृत्तपत्रांच्या अर्काईव्ह मधील शिवाजीमहाराजांच्या काळात प्रकाशीत झालेल्या प्रतींमधून शिवाजीराजांविषयी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा मागोवा घेण्याच्या उपक्रमाबद्दल माहीती दाखवित होते. हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यामुळे शिवरायांबद्दल त्यावेळच्या इंग्लंडमधील लोकांचे (त्रयस्थ देशातील)काय मत होते ते कळेल. सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल दोन्ही संशोधकांचे अभिनंदन. यात दोन्ही संशोधकांनी प्रकर्षाने व्यक्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे.
१. ग्रेगरीयक कॅलेंडरमुळे तारखा वेगळ्या असण्याची शक्यता आहे.
२. शिवाजी महाराजांचा तेथील बातम्यांमधे कायम बंडखोर (rebel) असा उल्लेख केला आहे.
३. शिवाजी महाराजांचा शम्भूकालात राजा शिवाजी असा आणि संभाजीराजांचा प्रिन्स असा उल्लेख केला गेलेला आहे.
४. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी १ पेक्षा अधिकवेळा दिली गेलेली आहे.
५.शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेतील जनता शिवाजीला भिते असा उल्लेक केला आहे. पण आग्र्याहून सुटून आल्यानंतर मात्र शिवाजी हेच खरे भूमिचे राजे आहेत असा उल्लेखही केला आहे.
६. शिवाजी महाराजांनी सुरत एकूण ३ वेळा लुटल्याच्या बातम्याही दिल्या गेलेल्या आहेत.
७. शिवाजी महाराजाना औरंगजेबाने कैद केल्याची बातमी आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमीही दिली गेलेली आहे.
८. विषेश म्हणजे टोपीकर इंग्रज शिवराज्याभिषेकाला उपस्थित असूनही याबद्दलची बातमी कोठेही नसल्याचे संशोधकाना आढळले आहे.
यावृत्तपत्रांतील बातम्यांसाठी सुरत वखारीचा प्रेसिडेंट, दिल्लीतील इंग्रज वकील अशा विविध अधिकार्यांच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. या उपक्रमात 'लंडन गॅझेट' या वृत्तपत्राच्या तत्कालीन आवृत्त्यांचा आधार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक वृत्तपत्रांचा अभ्यासही या दृष्टीकोणातून होत आहे. त्या काळात इंग्लंडमधे एकूण ४२ वृत्तपत्रे असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे. या उपक्रमामुळे शिवचरित्रावर आणखी प्रकाश नक्कीच पडेल असे वाटते. दोन्ही संशोधकाना पुढील संशोधनासाठी अनेक शुभेच्छा.
वाचने
4209
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आश्चर्य...
उपक्रमामु
आपण म्हणता ते बरोबर पण..
In reply to उपक्रमामु by भडकमकर मास्तर
माझे मत
In reply to उपक्रमामु by भडकमकर मास्तर
तीदेखील
In reply to माझे मत by पंकज
माझी मते
या पेपर ची प्रत माझे कड आहे
स्कॅन करा.
In reply to या पेपर ची प्रत माझे कड आहे by प्रविन नामदेव सोनवने
येथे
In reply to स्कॅन करा. by प्रभाकर पेठकर
महाराजांच्या महानतेला
**** महानतेला??
In reply to महाराजांच्या महानतेला by प्राजु
धन्यवाद..
In reply to **** महानतेला?? by आजानुकर्ण
माझे जवल पीदीअफ फाईल आहे