✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ब्रिटिश वृत्तपत्रांच्या आधारे शिवचरित्रावर प्रकाश टाकण्याचा अनोखा उपक्रम.

L
llपुण्याचे पेशवेll यांनी
गुरुवार, 09/18/2008 - 14:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4186 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

आश्चर्य...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 14:47 नवीन
इतके असून आजतागायत आपल्या इतिहास संशोधकांनी ही माहिती कशी नाही मिळविली? आजवरच्या इतिहासाच्या कादंबर्‍यांच्या संदर्भसूचींमध्ये इंग्रजी वर्तमानपत्रांचा दाखला कोणी दिलेला आढळला नाही.
  • Log in or register to post comments

उपक्रमामु

भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/18/2008 - 15:17 नवीन
उपक्रमामुळे शिवचरित्रावर आणखी प्रकाश नक्कीच पडेल असे वाटते. मीहे संशोधकांचे अभिनंदन करतो..परंतु यातून नवीन काय माहिती हाती लागली आहे किंवा लागणार आहे, याबद्दल मी खूप साशंक आहे... काल बातम्या पाहताना मलाही आधी खूप आनंद झाला.. पण आनंद का बुवा झाला असा विचार करता करता मला थोडे वाईटही वाटले की फक्त त्यांनी मान्यता दिली म्हणून राजे मोठे असं आपल्याला वाटतंय की काय? गॅझेटात उल्लेख नसता तर राजे छोटे होतात की काय? किंवा उद्या त्यात राजांचा शत्रू या अर्थाने काही वाईट उल्लेख असला तर आपण तो अर्थातच मानणार नाहीच्....मग संशोधनाचं कौतुक का बरं? यातून इतके एक्साईट होण्यासारखे काय आहे तेच मात्र समजत नाही...... शिवाजी महाराज की जय...! ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आपण म्हणता ते बरोबर पण..

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/18/2008 - 15:25 नवीन
खरेतर एक्साईट होण्याचे कारण नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे. पण एक्साईट होण्याचे कारण म्हणजे १. शिवाजी महाराज शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूच्या खोट्या अफवा उठवत आणि शत्रूची सावधानता थोडी जरी कमी झली तरी संधी साधून त्याला चारीमुंड्या चीत करत. इंग्रजी वृत्तपत्रातून शिवरायांच्या मृत्यूची बातमी एकापेक्षा अधिक वेळा प्रसारित होणे हे यशस्वी कूटनीतिचे लक्षण आहे असे वाटते. २. शिवाजीमहाराजांबद्दलचा आदर उत्तरोत्तर इंग्रजांच्यात वाढत गेला कसा याचेही उदाहरण मिळाले. एक्साईटमेंटचे खरे कारण वरील सर्व गोष्टीना एका अर्थाने पुरावे उपलब्ध झाल्यासारखेच आहे हे आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

माझे मत

पंकज
गुरुवार, 09/18/2008 - 15:40 नवीन
त्यांनी मान्यता दिली म्हणून राजे मोठे असं आपल्याला वाटतंय की काय? शत्रूकडून मान्यता मीळणे...तीदेखील ब्रिटिशांसारख्या...एक्साईट होण्यासारखे नाहि का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

तीदेखील

भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/18/2008 - 15:53 नवीन
तीदेखील ब्रिटिशांसारख्या नाही बुवा वाटत.... ... अशा मान्यतेची त्यांना गरज आहे असे आपल्याला का वाटावे ? असो... आमचे मत आम्ही मांडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

माझी मते

सुनील
गुरुवार, 09/18/2008 - 15:28 नवीन
१. ग्रेगरीयक कॅलेंडरमुळे तारखा वेगळ्या असण्याची शक्यता आहे. इंग्लंडने ग्रेगरिअन कॅलेंडर १७५२ ला म्हणजे जवळ जवळ २०० वर्षांनंतर स्वीकारले. तोवर त्यात ११ दिवसांचा फरक पडला होता. माझ्या माहितीनुसार सर्व भारतीय इतिहासकारांनी याची नोंद घेतली होती. त्यामुळे यापुढे तत्कालीन तारखांत फरक पडेल असे वाटत नाही. २. शिवाजी महाराजांचा तेथील बातम्यांमधे कायम बंडखोर (rebel) असा उल्लेख केला आहे. ३. शिवाजी महाराजांचा शम्भूकालात राजा शिवाजी असा आणि संभाजीराजांचा प्रिन्स असा उल्लेख केला गेलेला आहे. क्रमांक २ आणि ३ यांचा एकत्र विचार केलात तर अर्थ लागू शकेल. राज्याभिषेक होण्यापूर्वी इंग्रजांनी शिवाजीचा उल्लेख "रेबेल" असा करण्यात गैर वाटत नाही. राज्याभिषेकानंतर मात्र त्यांचा उल्लेख "राजे" असा केला आहे, हे उत्तम. ४. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी १ पेक्षा अधिकवेळा दिली गेलेली आहे. अशा वावड्या मुद्दामून उठवल्या गेल्या, असे वाचल्याचे आठवते. ५.शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेतील जनता शिवाजीला भिते असा उल्लेक केला आहे. पण आग्र्याहून सुटून आल्यानंतर मात्र शिवाजी हेच खरे भूमिचे राजे आहेत असा उल्लेखही केला आहे. उत्तम! ६. शिवाजी महाराजांनी सुरत एकूण ३ वेळा लुटल्याच्या बातम्याही दिल्या गेलेल्या आहेत. कल्पना नाही. ७. शिवाजी महाराजाना औरंगजेबाने कैद केल्याची बातमी आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमीही दिली गेलेली आहे. वृत्तपत्राचे कामच आहे ते, नाही का? ८. विषेश म्हणजे टोपीकर इंग्रज शिवराज्याभिषेकाला उपस्थित असूनही याबद्दलची बातमी कोठेही नसल्याचे संशोधकाना आढळले आहे. आश्चर्य आहे! असो, ब्रिटिश वृत्तपत्रे हेदेखिल इतिहासाचे एक उत्तम साधन आहे, हे यानिमित्तने लक्षात आले. यापूर्वीच्या इतिहासकारांनी ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नोंदी, इस्ट इंडिया कंपनी तसेच ब्रिटिश सरकारी कागद्पत्रे यावर संशोधन केले होतेच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

या पेपर ची प्रत माझे कड आहे

प्रविन नामदेव सोनवने
Fri, 09/19/2008 - 22:31 नवीन
या पेपर ची प्रत माझे कड आहे pnsonavane@yahoo.co.in
  • Log in or register to post comments

स्कॅन करा.

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 22:33 नवीन
स्कॅन करून मिपावर टाका. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रविन नामदेव सोनवने

येथे

ब्रिटिश टिंग्या
Sat, 09/20/2008 - 01:02 नवीन
येथे वाचायला मिळतील -> http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3499849.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

महाराजांच्या महानतेला

प्राजु
Fri, 09/19/2008 - 22:36 नवीन
कोण्याही वृत्तपत्राच्या पुराव्याची गरज नाही मग ते इंग्रजांचे असले तरी. उपक्रम स्तुत्य इतकंच मी म्हणेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

**** महानतेला??

आजानुकर्ण
Sat, 09/20/2008 - 01:15 नवीन
चुकून झाले असावे असे वाटते. 'महाराजांच्या महानतेला' असे हवे. आपला, (मुद्राराक्षस) आजानुकर्ण (संपादक - मूळ प्रतिसाद संपादित करुन योग्य दुरुस्ती केली आहे. कशावरुन गदारोळ उठेल सांगता येत नाही त्यामुळे प्रोऍक्टिव!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धन्यवाद..

प्राजु
Sat, 09/20/2008 - 03:26 नवीन
मी आत्ताच पाहिले. पण टायपो काय होती कळले नाही. असो.. ते महराजांच्या च आहे आणि हवे होते. धन्यवाद ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

माझे जवल पीदीअफ फाईल आहे

प्रविन नामदेव सोनवने
Fri, 09/19/2008 - 22:42 नवीन
माझे जवल पीदीअफ फाईल आहे ति मीपा वर कसी देऊ
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा