… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.
इरफान खान मला जाम आवडतो. त्यामुळे त्याचा सिनेमा बघायला जायच्या आधी आज काही तरी चांगले बघायला मिळणार याची खात्रीच असते. इरफान भोवती फिरते लंच बॉक्सची गोष्ट. हा साजन फर्नांडीस - म्हंजे इरफान - मुंबईत एका सरकारी खात्यात नोकरी करत असतो. जवळपास निवृत्तीला पोहोचलेला. सहाच महिन्यांनी रिटायर होणार असतो. विधुर असतो. बायको काही वर्षांपूर्वी वारलेली. लोकलचा प्रवास, हॉटेलचा डबा, सरकारी खाते, फायली, दृष्टीक्षेपात निवृत्ती, वगैरे … एकूण रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो.
निम्रत कौर आठवते … ? बहुतेकांना नसेलच! २००२ साली कुमार साणु याच्या (त्याला घरघर लावलेल्या दिवसात) "तेरा मेरा प्यार" नामक एका विडीयो मध्ये दिसली होती. तो तिचा पहिला प्रयत्न! त्यानंतर अलीकडे डेरी मिल्कच्या जाहिराती मध्ये . निम्रत लंच बॉक्स मध्ये इला ची भूमिका करते आहे . इला टिप्पिकल मुंबईची गृहिणी. सक्काळी लवकर उठून पोरीला तयार करून तिचा डबा तयार करून शेकडो सूचना देत पोरीला शाळेत पाठवणारी. पोरीला टाटा करणारे हात खाली येताच ऑफिसला गेलेल्या नवा-याचा डबा तयार करायला पळणारी. डबेवाला डबा घेऊन गेला की लगेच घरातल्या अन्य कामांकडे वळणारी. वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकताना करमणूक म्हणून रेडीओवर लागणा -या पाककृती ऐकत पुढल्या डब्याचे प्लानिंग करणारी. तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या देशपांडे बाईंबरोबर स्वयंपाक करता करता साधलेला संवाद ही तिची आणखी एक करमणूक. संध्याकाळी नवरा घरी आला की तिला त्याच्याशी बोलायचे असते. नटून दाखवायचे असते. पण नवरा ना तिच्याशी गप्पा मारतो ना तिची दखल घेतो. एकूण चरफड, रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो.
स्टोरी मध्ये मज्जा येते ती मुंबईतल्या डबेवाल्यांमुळे हार्वर्डने नावाजलेले आणि इंग्लंडच्या राणीचा पाहुणचार झोडून आलेले डबेवाले इलाने पाठविलेला डबा तिच्या नवा-याला न देता न चुकता साजन फर्नाडीसला देतात. खानावळीचे जेवण जेवून पकलेल्या साजनच्या आयुष्यात इलाकडून चुकून न चुकता येणा-या डब्यामुळे खमंग मसाला भरला जातो आणि मग सुरु होतो इला आणि साजन मधला संवाद . डब्यांमधून चिठ्या पाठवून सुरु झालेला संवाद त्या दोघांनाच काय पण सिनेमा बघणा-यांना ही सतत अधीर ठेवतो आणि त्या अधिरतेतून उमलत जाते प्रेम, पडद्यावर इला साजन मध्ये आणि पडद्या समोर इला साजन विषयी प्रेक्षकांमध्ये. पडद्यावरली आणि पडद्या समोरची ही गुंतवणूक कमालीची बहरत जाते.
इरफानवर मी पुनश्च फिदा. कसला इनोसंट अभिनय केलाय गड्याने, लाजवाब. पडद्यावर इला - निम्रत कौर आली की तिच्या विषयी असं खूपखूप, म्हंजे असं भरभरून वाटत रहातं. म्हंजे असं काहीही. म्हंजे तिच्याशी जाऊन खूप गप्पा माराव्यात. वगैरे. कम्माल केलीय पोरीने. क-स-दा र ! नवाजुद्दिन सिद्दिकीची भूमिका पण एकदम चाबूक आहे. नवाजुद्दिन आला ना लक्षात? बिद्या बालनच्या कहानी मधला आय बी अधिकारी किंवा आमिरच्या तलाशमधला लंगडा तेहमुर.
सिनेमाची तांत्रिक बाजु मस्त आहे. विशेषत: एडिटिंगने मी पागल झालो. संपूर्ण सिनेमा दोनच गोष्टींनी नटवलाय - संवाद आणि शांतता. शब्द नि:शब्दांच्या खेळात आपण एकतास पन्नास मिनिटे मश्गुल होऊन जातो. चुकीची गाडी सुद्धा कधीकधी योग्य ठिकाणी पोहोचवते या संवादावर पूर्ण चित्रपटाचा रोख आहे. …मला या सिनेमाची एकूण संकल्पना भावली कारण आयुष्यात संवादाचे महत्व अधोरेखित करणारी या सिनेमाची साधी सोपी लुसलुशीत कथा. अन्न वस्त्र निवारा वगैरे ठीक आहे, त्याची गरज माणसाला जगण्यासाठी आहेच. पण जगणा-या माणसाला माणूस म्हणून जगायला आवश्यकता असते ती व्यक्त होता येईल अशी जागा. संवाद ही प्रेमाची सुरुवात तर असतेच पण प्रेम जिवंत ठेवायला संवादाचे इंधन नसेल तर माझ्या मते प्रेम ही नादुरुस्त थांबलेली गाडी आहे.
आहे पण निरुपयोगी !!

वाचने
20135
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
परीक्षण ,रसग्रहण का काय म्हणतात ते आवडले.
मस्त परीक्षण !
sabakA badalA legA ye phaijal
In reply to मस्त परीक्षण ! by जॅक डनियल्स
तात्पुरता गुगलचा हात पकड
In reply to sabakA badalA legA ye phaijal by बॅटमॅन
सहीच!
बघणार आहेच
पहाणार होतोच...! आणी आता तर
परीक्षण आवडले
Cinema baghaNarach.
नक्की बघणार.
kaalach aikala maitreeNee
बघणार म्हंजे बघणारच!
chhaapyaat pakaDlelyaa majooraaMpaikee ek?
In reply to बघणार म्हंजे बघणारच! by आदूबाळ
Ek number, JP!
In reply to chhaapyaat pakaDlelyaa majooraaMpaikee ek? by जे.पी.मॉर्गन
हा बघा नवाज सरफरोश मधला
In reply to Ek number, JP! by आदूबाळ
अगदी हेच वाटलं
परीक्षण वाचून सुमारे पाच
शेम हिअर
In reply to परीक्षण वाचून सुमारे पाच by rain6100
ek number
खुसखशीत परिक्षण
चाबुक परीक्षण!
भारती आचरेकरांचा आवाज आहे का
भारतीचा.....?
In reply to भारती आचरेकरांचा आवाज आहे का by भाग्यश्री कुलकर्णी
हो तो आवाज भारती आचरेकरांचाच
In reply to भारतीचा.....? by सुधीर मुतालीक
नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं
कम्माल आहे...
धन्स.
अतिषय सुंदर परिक्षण
दोन तारखेच्या सुट्टीत पाहून
अतिषय सुंदर परिक्षण !!
परीक्षण
परीक्षण आवडले... इर्फानचा अभिनय आवडतोच!
मलाही राहून राहून वाटत होतं
In reply to परीक्षण आवडले... इर्फानचा अभिनय आवडतोच! by अग्निकोल्हा
तुम्ही आत्मशून्य किंवा ग्लिफ
In reply to मलाही राहून राहून वाटत होतं by धन्या
भयंकर घोळ आहे....
उत्तम !
धन्यवाद.
In reply to उत्तम ! by सुधीर मुतालीक
मला बाबा 'जमला' नाही हा
खुप सुंदर समीक्षा केली हो
थोडा कमी रिलेट होतो.
अहो प्रभाकर काका
धन्यवाद.
In reply to अहो प्रभाकर काका by निनाद मुक्काम …
सिनेमा पाहून आपल्याला
In reply to अहो प्रभाकर काका by निनाद मुक्काम …
सिनेमा पाहून आपल्याला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर सिनेमाच्या व त्यावर परीक्षण लिहिण्याच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळेच आहोत.:)तुझा आवडता खान कोणता असा
-
काही लोकांना प्रमोशन ची गरज नाही एवढे मोठे ब्र्यांड ते बनतात
काल बघितला
भीषण नुकसान !
भावपुर्ण श्रद्धांजली...
आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
सिनेमा पाहिला. शेवट कळला
चांगल्या सिनेमाची एक खुण आहे,