✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लंच बॉक्स !

स
सुधीर मुतालीक यांनी
Sun, 09/22/2013 - 20:50  ·  लेख
लेख
… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.  photo 2.jpg इरफान खान मला जाम आवडतो. त्यामुळे त्याचा सिनेमा बघायला जायच्या आधी आज काही तरी चांगले बघायला मिळणार याची खात्रीच असते. इरफान भोवती फिरते लंच बॉक्सची गोष्ट. हा साजन फर्नांडीस - म्हंजे इरफान - मुंबईत एका सरकारी खात्यात नोकरी करत असतो. जवळपास निवृत्तीला पोहोचलेला. सहाच महिन्यांनी रिटायर होणार असतो. विधुर असतो. बायको काही वर्षांपूर्वी वारलेली. लोकलचा प्रवास, हॉटेलचा डबा, सरकारी खाते, फायली, दृष्टीक्षेपात निवृत्ती, वगैरे … एकूण रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो. निम्रत कौर आठवते … ? बहुतेकांना नसेलच! २००२ साली कुमार साणु याच्या (त्याला घरघर लावलेल्या दिवसात) "तेरा मेरा प्यार" नामक एका विडीयो मध्ये दिसली होती. तो तिचा पहिला प्रयत्न! त्यानंतर अलीकडे डेरी मिल्कच्या जाहिराती मध्ये . निम्रत लंच बॉक्स मध्ये इला ची भूमिका करते आहे . इला टिप्पिकल मुंबईची गृहिणी. सक्काळी लवकर उठून पोरीला तयार करून तिचा डबा तयार करून शेकडो सूचना देत पोरीला शाळेत पाठवणारी. पोरीला टाटा करणारे हात खाली येताच ऑफिसला गेलेल्या नवा-याचा डबा तयार करायला पळणारी. डबेवाला डबा घेऊन गेला की लगेच घरातल्या अन्य कामांकडे वळणारी. वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकताना करमणूक म्हणून रेडीओवर लागणा -या पाककृती ऐकत पुढल्या डब्याचे प्लानिंग करणारी. तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या देशपांडे बाईंबरोबर स्वयंपाक करता करता साधलेला संवाद ही तिची आणखी एक करमणूक. संध्याकाळी नवरा घरी आला की तिला त्याच्याशी बोलायचे असते. नटून दाखवायचे असते. पण नवरा ना तिच्याशी गप्पा मारतो ना तिची दखल घेतो. एकूण चरफड, रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो.  photo 1.jpgस्टोरी मध्ये मज्जा येते ती मुंबईतल्या डबेवाल्यांमुळे हार्वर्डने नावाजलेले आणि इंग्लंडच्या राणीचा पाहुणचार झोडून आलेले डबेवाले इलाने पाठविलेला डबा तिच्या नवा-याला न देता न चुकता साजन फर्नाडीसला देतात. खानावळीचे जेवण जेवून पकलेल्या साजनच्या आयुष्यात इलाकडून चुकून न चुकता येणा-या डब्यामुळे खमंग मसाला भरला जातो आणि मग सुरु होतो इला आणि साजन मधला संवाद . डब्यांमधून चिठ्या पाठवून सुरु झालेला संवाद त्या दोघांनाच काय पण सिनेमा बघणा-यांना ही सतत अधीर ठेवतो आणि त्या अधिरतेतून उमलत जाते प्रेम, पडद्यावर इला साजन मध्ये आणि पडद्या समोर इला साजन विषयी प्रेक्षकांमध्ये. पडद्यावरली आणि पडद्या समोरची ही गुंतवणूक कमालीची बहरत जाते. इरफानवर मी पुनश्च फिदा. कसला इनोसंट अभिनय केलाय गड्याने, लाजवाब. पडद्यावर इला - निम्रत कौर आली की तिच्या विषयी असं खूपखूप, म्हंजे असं भरभरून वाटत रहातं. म्हंजे असं काहीही. म्हंजे तिच्याशी जाऊन खूप गप्पा माराव्यात. वगैरे. कम्माल केलीय पोरीने. क-स-दा र ! नवाजुद्दिन सिद्दिकीची भूमिका पण एकदम चाबूक आहे. नवाजुद्दिन आला ना लक्षात? बिद्या बालनच्या कहानी मधला आय बी अधिकारी किंवा आमिरच्या तलाशमधला लंगडा तेहमुर.  photo 3.jpg सिनेमाची तांत्रिक बाजु मस्त आहे. विशेषत: एडिटिंगने मी पागल झालो. संपूर्ण सिनेमा दोनच गोष्टींनी नटवलाय - संवाद आणि शांतता. शब्द नि:शब्दांच्या खेळात आपण एकतास पन्नास मिनिटे मश्गुल होऊन जातो. चुकीची गाडी सुद्धा कधीकधी योग्य ठिकाणी पोहोचवते या संवादावर पूर्ण चित्रपटाचा रोख आहे. …मला या सिनेमाची एकूण संकल्पना भावली कारण आयुष्यात संवादाचे महत्व अधोरेखित करणारी या सिनेमाची साधी सोपी लुसलुशीत कथा. अन्न वस्त्र निवारा वगैरे ठीक आहे, त्याची गरज माणसाला जगण्यासाठी आहेच. पण जगणा-या माणसाला माणूस म्हणून जगायला आवश्यकता असते ती व्यक्त होता येईल अशी जागा. संवाद ही प्रेमाची सुरुवात तर असतेच पण प्रेम जिवंत ठेवायला संवादाचे इंधन नसेल तर माझ्या मते प्रेम ही नादुरुस्त थांबलेली गाडी आहे. आहे पण निरुपयोगी !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
20059 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

परीक्षण ,रसग्रहण का काय म्हणतात ते आवडले.

भ ट क्या खे ड वा ला
Sun, 09/22/2013 - 21:26 नवीन
बाकी पर ते क्ष पाहिल्यावर लिहू यादीत समाविष्ट केला आहे.
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण !

जॅक डनियल्स
Sun, 09/22/2013 - 21:48 नवीन
"नवाजुद्दिन आला ना लक्षात ? बिद्या बालनच्या कहानी मधला आय बी अधिकारी किंवा आमिरच्या तलाशमधला लंगडा"..... वासेपुरच्या "फैजल खान" ला कसे काय विसरला तुम्ही ? बदल घेईल तो तुमचा...;)
  • Log in or register to post comments

sabakA badalA legA ye phaijal

बॅटमॅन
Mon, 09/23/2013 - 00:50 नवीन
sabakA badalA legA ye phaijal!!!! sala marathi type hoina gelay mayla :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

तात्पुरता गुगलचा हात पकड

मालोजीराव
Mon, 09/23/2013 - 17:40 नवीन
तात्पुरता गुगलचा हात पकड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सहीच!

लॉरी टांगटूंगकर
Sun, 09/22/2013 - 21:52 नवीन
उत्तम परीक्षण, सिनेमा नक्की पाहिला जाईल.
  • Log in or register to post comments

बघणार आहेच

चाणक्य
Sun, 09/22/2013 - 22:31 नवीन
तुम्ही उत्सुकता वाढवलीत
  • Log in or register to post comments

पहाणार होतोच...! आणी आता तर

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/22/2013 - 22:49 नवीन
पहाणार होतोच...! आणी आता तर नक्कीच...!
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले

पैसा
Sun, 09/22/2013 - 23:02 नवीन
सिनेमा इर्फांनखान साठी बघितला असताच. आता तिहेरी कारण आहे.
  • Log in or register to post comments

Cinema baghaNarach.

रेवती
Mon, 09/23/2013 - 02:00 नवीन
Cinema baghaNarach.
  • Log in or register to post comments

नक्की बघणार.

शिल्पा ब
Mon, 09/23/2013 - 03:41 नवीन
नक्की बघणार.
  • Log in or register to post comments

kaalach aikala maitreeNee

स्पंदना
Mon, 09/23/2013 - 03:46 नवीन
kaalach aikala maitreeNee kaDun yaa baddal. aataa pahaaNaarach. (winglish?)
  • Log in or register to post comments

बघणार म्हंजे बघणारच!

आदूबाळ
Mon, 09/23/2013 - 09:22 नवीन
बघणार म्हंजे बघणारच! . अवांतर: नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं दर्शन "सरफरोश" मध्ये झालं होतं. कोणाला 'तो' शीन आठवतोय का?
  • Log in or register to post comments

chhaapyaat pakaDlelyaa majooraaMpaikee ek?

जे.पी.मॉर्गन
Mon, 09/23/2013 - 10:41 नवीन
jo insapekTar saleemanee goLee chaalavlyaavar bhaDaabhaDaa maahitee saaMgato. aayalaa! aajaparyaMta kadhee lakShaat aala navhata :) je.pee.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

Ek number, JP!

आदूबाळ
Mon, 09/23/2013 - 11:13 नवीन
Ek number, JP!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

हा बघा नवाज सरफरोश मधला

जॅक डनियल्स
Mon, 09/23/2013 - 20:42 नवीन
हा बघा नवाज सरफरोश मधला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अगदी हेच वाटलं

भुमन्यु
Mon, 09/23/2013 - 12:17 नवीन
....डब्यांमधून चिठ्या पाठवून सुरु झालेला संवाद त्या दोघांनाच काय पण सिनेमा बघणा-यांना ही सतत अधीर ठेवतो सिनेमा बघतांना अगदी हेच वाटलं.... रोजच lunch-box मध्ये जेवणारा इर्रफान (Irrfan) भक्त राहुल
  • Log in or register to post comments

परीक्षण वाचून सुमारे पाच

rain6100
Mon, 09/23/2013 - 15:18 नवीन
परीक्षण वाचून सुमारे पाच वर्ष नंतर हा पहिला चित्रपट पाहण्याचे ठरले . आम्ही बाकी हॉलीवूड आणि अंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट ( torrent ) च्या कृपेने बघतो
  • Log in or register to post comments

शेम हिअर

सुधीर
Mon, 09/23/2013 - 16:39 नवीन
फक्त ५ वर्ष नाही पण फार महिने झालेत हिंदी शिणेमा पाहून. परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याचे ठरविले आहे. तसेच "अ गुड रोड" विषयी पण उत्सुकता आहे. कुणीतरी जमल्यास परिक्षण लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rain6100

ek number

सानिकास्वप्निल
Mon, 09/23/2013 - 20:29 नवीन
attach baghitlay.... Nimrat Kaurcha abhinay sundar , Irfaan Khan tar BESTACH....prachanda aawadla avaantar: marathi type hot nahiye.........
  • Log in or register to post comments

खुसखशीत परिक्षण

सस्नेह
Mon, 09/23/2013 - 20:45 नवीन
लंच बॉक्स टेस्टी असणार. अवश्य खाल्ला...आपलं, पाहिला जाईल !
  • Log in or register to post comments

चाबुक परीक्षण!

शिवोऽहम्
Mon, 09/23/2013 - 20:54 नवीन
चाबुक परीक्षण! इरफानमुळे बघितलाच असता हा पिक्चर, पण आता नक्की बघणार लवकर.
  • Log in or register to post comments

भारती आचरेकरांचा आवाज आहे का

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 09/24/2013 - 06:55 नवीन
भारती आचरेकरांचा आवाज आहे का यात?कालच त्या रेडीओ एफ एम वर आपल्या न दिसणार्‍या भुमिकेबद्दल बोलत होत्या.आणी त्या रितेशचा चित्रपट आहे मी लगेच हो म्हणाले असेही म्हणाल्या. म्हणजे ह्या दिग्दर्शकाने अजुन काही चित्रपट केलेत का दिग्दर्शीत? नक्की बघणार.
  • Log in or register to post comments

भारतीचा.....?

सुधीर मुतालीक
Tue, 09/24/2013 - 10:30 नवीन
भारतीचा आवाज आहे का ? मस्त !! खुपच मजा आणलीय या अदृश्य व्यक्तिरेखेने. दिग्दर्शकाची कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

हो तो आवाज भारती आचरेकरांचाच

क्रेझी
Wed, 10/02/2013 - 16:10 नवीन
हो तो आवाज भारती आचरेकरांचाच आहे :) खूप दिवसांनी ऐकला पण अगदी खणखणीत आणि प्रत्येक एक्सप्रेशन एकदम ठळक! म्हणजे पहिल्यांदा डब्यासोबत आलेल्या चिठ्ठीमधे 'थँक्स' लिहीलेलं नाही म्हणून रागवणं असो किंवा अंकलबद्दल केलेले जोक्स असो, खरंच लंचबॉक्स मधे मोजून ४-६ व्यक्तिरेखा आहेत पण सगळ्या अगदी चपखल बसवल्या आहेत. इरफान च्या शेजारी बसणा-या माणसाचे डब्याकडे आणि इरफानकडे बघणे सुध्दा भारी दाखवले आहे lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं

garava
Tue, 09/24/2013 - 10:34 नवीन
नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं दर्शन "सरफरोश" मध्ये झालं होतं. कोणाला 'तो' शीन आठवतोय का?.. नाही आठवते. कुठल्या रोलमधे होता?
  • Log in or register to post comments

कम्माल आहे...

सुधीर मुतालीक
Mon, 09/30/2013 - 17:37 नवीन
हा लेख गायब झाला होता !
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/30/2013 - 17:46 नवीन
मीही नक्कीच पाहीन. चित्रपट परीक्षण आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अतिषय सुंदर परिक्षण

प्रसाद गोडबोले
Mon, 09/30/2013 - 17:52 नवीन
अतिषय सुंदर परिक्षण !! चित्रपट उत्तमच आहे !! ४.५ / ५
  • Log in or register to post comments

दोन तारखेच्या सुट्टीत पाहून

सूड
Mon, 09/30/2013 - 18:22 नवीन
दोन तारखेच्या सुट्टीत पाहून घ्यावा म्हणतोय!!
  • Log in or register to post comments

अतिषय सुंदर परिक्षण !!

मुक्त विहारि
Tue, 10/01/2013 - 05:55 नवीन
नक्की बघणार.
  • Log in or register to post comments

परीक्षण

स्वाती दिनेश
Tue, 10/01/2013 - 12:41 नवीन
परीक्षण आवडले, सिनेमा बघेन. स्वाती
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले... इर्फानचा अभिनय आवडतोच!

अग्निकोल्हा
Wed, 10/02/2013 - 01:06 नवीन
आधि यु हॅव गॉट अ मेलचे मॉडिफाय वर्शन असावे का असा प्रश्न मनात होता. परिक्षण वाचले अन मना ब्लु प्रिंट तयार झाली (होते होते... अति चित्रपट पाहिले की हे ही होते) अन ठरवुन टाकलं चित्रपट हमखास टिवीवर बघितल्या जाइल. याच्यासाठि थेटरात जाणे होणार नाही!
  • Log in or register to post comments

मलाही राहून राहून वाटत होतं

धन्या
गुरुवार, 10/03/2013 - 15:14 नवीन
मलाही राहून राहून वाटत होतं की अशा मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत कुठलातरी इंग्रजी चित्रपट पाहीला आहे. फक्त नाव आठवत नव्हते. रच्याकने, तुम्ही आत्मशून्य किंवा ग्लिफ किंवा शिवाजी द बॉस यापैकी कुणाला ओळखता काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुम्ही आत्मशून्य किंवा ग्लिफ

अग्निकोल्हा
Mon, 10/07/2013 - 01:06 नवीन
तुम्ही आत्मशून्य किंवा ग्लिफ किंवा शिवाजी द बॉस यापैकी कुणाला ओळखता काय?
ग्लिफ बद्दल माझे प्रोफाइलच काहि बोलुन जाते. परंतु आत्मशून्यसारख्या बावळट माणसाशी ओळख वगैरे असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. (प्रतिसाद एखाद्या सदस्यावर वैयक्तिक हल्ला वाटत असल्यास जरुर उडवावा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

भयंकर घोळ आहे....

प्रभाकर पेठकर
Wed, 10/02/2013 - 01:58 नवीन
परिक्षणात (की चित्रपटांत?) भयंकर घोळ आहे.
ऑफिसला गेलेल्या नवा-याचा डबा तयार करायला पळणारी.... ...मुंबईतल्या डबेवाल्यांमुळे हार्वर्डने नावाजलेले आणि इंग्लंडच्या राणीचा पाहुणचार झोडून आलेले डबेवाले इलाने पाठविलेला डबा तिच्या नवा-याला न देता न चुकता साजन फर्नाडीसला देतात.
रोज रोज डबा चुकून साजन फर्नांडिसला जातो. मग तिचा नवरा घरी तिला विचारत नाही की डबा का पाठवला नाही? ह्या चित्रपटात अनेकवेळा डबा पाठवला आणि परत आला असणार. त्यातून म्हणे त्यांची चिठ्यांची देवाणघेवाण होते. म्हणजे आज 'चुकून' कुणा भलत्याला डबा पोहोचून त्याने चिठ्ठी पाठविली त्याला तिने उत्तर दिले असेल तर रोजच डबेवाला चुकणार हे तिने गृहीत धरलेले दिसते आहे. एखाद दिवशी 'चुकून' डबा बरोबर पत्त्यावर पोहोचला असता तर तिची चिठ्ठी नवर्‍याचा हाती पडली असती. मग काय झाले असते?
डब्यांमधून चिठ्या पाठवून सुरु झालेला संवाद त्या दोघांनाच काय पण सिनेमा बघणा-यांना ही सतत अधीर ठेवतो आणि त्या अधिरतेतून उमलत जाते प्रेम, पडद्यावर इला साजन मध्ये
पण विवाहीत महिलेने परपुरुषा बरोबर प्रेम केले (भलेही फक्त चिठ्या-चपाट्यातून असेल) तर त्याला प्रेम म्हणावे की 'व्यभिचार'? की 'व्यभिचारालाच' उदात्त रुप दिले आहे? ह्याची उत्तरे परिक्षणातून मिळत नाहीत. कदाचित चित्रपट पाहिल्यास चित्र अधिक स्पष्ट होईल. पण परिक्षण लिहीताना ह्यावर भाष्य अपेक्षित होते.
  • Log in or register to post comments

उत्तम !

सुधीर मुतालीक
Wed, 10/02/2013 - 12:19 नवीन
प्रभाकर बरोबर आहेत तुमच्या शंका . मला आवडले तुमचे प्रश्न. धन्यवाद . उर्वरीत शंकाचे उत्तर चित्रपटात आहे, पण लग्न आणि प्रेम या संबंधातील उत्तर मला मोह होऊनही इथे देता येत नाही. कधी भेटायचा वा बोलायचा प्रसंग आला तर हा मुद्दा मी मुद्दाम ध्यानात ठेवेन. माझ्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन मैत्रिणीने याच विषयावर मला झापलंय, ( त्याची गोड आठवण या निमित्ताने झाली. )
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/02/2013 - 15:47 नवीन
धन्यवाद सुधीर मुतालीक साहेब, लग्न आणि प्रेम हा विषय २-४ वाक्यात संपणारा नाही. बहुआयामी आहे तसेच प्रत्येक केस मध्ये त्यातील सामाजिक आणि नैतिक प्रभाव वेगळे असतात असे मलाही वाटते. असो. प्रत्यक्ष भेटीचा योग आल्यास मलाही चर्चा करायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

मला बाबा 'जमला' नाही हा

वेल्लाभट
Wed, 10/02/2013 - 16:36 नवीन
मला बाबा 'जमला' नाही हा चित्रपट. अपेक्षा खूप होत्या; पूर्ण थोड्याच झाल्या.
  • Log in or register to post comments

खुप सुंदर समीक्षा केली हो

मारवा
Wed, 10/02/2013 - 17:37 नवीन
खुप सुंदर समीक्षा केली हो तुम्ही आता बघितला च पाहिजे हा चित्रपट!
  • Log in or register to post comments

थोडा कमी रिलेट होतो.

प्यारे१
गुरुवार, 10/03/2013 - 03:07 नवीन
थोडा कमी रिलेट होतो. अपेक्षांपेक्षा वास्तविकता दाखवली आहे नि ती प्रत्येकानं आपापल्या मगदुरानुसार घ्यावी अथवा तशी व्यक्तिनिष्ठ असावी अशी बहुदा दिग्दर्शकाची अपेक्षा असावी.
  • Log in or register to post comments

अहो प्रभाकर काका

निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/03/2013 - 06:04 नवीन
अहो प्रभाकर काका तुम्ही विचारलेले प्रश्नांची उत्तरे त्याने परीक्षणात लिहिली तर सिनेमा काय पहायचा उलट परीक्षण वाचून डोक्यात काही प्रश्न निर्माण झाले तर सिनेमा पाहून त्याची उत्तरे आपसूक मिळवणे हा मार्ग असतो ,आणि सिनेमा पाहून आपल्याला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर सिनेमाच्या व त्यावर परीक्षण लिहिण्याच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळेच आहोत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/03/2013 - 10:32 नवीन
निनाद, मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. माझं मत असं आहे की चित्रपटाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही मुद्दे परिक्षकाने मांडावेत. चित्रपटाची संपूर्ण चिरफाड करावी असे मी म्हणत नाहीए. पण दोन्ही बाबींवर स्वतःचे मत देऊन आणि तरीही वाचकाची उत्कंठा वाढती ठेवून चित्रपट पाहायचा की नाही ह्याचा निर्णय वाचकावर सोडून द्यावा. चित्रपटाचा शेवट किंवा परमोच्च क्षण ह्या बद्दल गुप्तता बाळगावी पण तांत्रिक बाबींवर मत प्रदर्शन जरुर करावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

सिनेमा पाहून आपल्याला

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/03/2013 - 12:28 नवीन
सिनेमा पाहून आपल्याला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर सिनेमाच्या व त्यावर परीक्षण लिहिण्याच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळेच आहोत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

तुझा आवडता खान कोणता असा

निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/03/2013 - 06:06 नवीन
तुझा आवडता खान कोणता असा भारतात कुणी प्रश्न विचारला तर पूर्वी व आता मी इरफान असेच उत्तर देतो त्याच्यासाठी डी डे पहिला व त्याच्यासाठी हा सिनेमा सुद्धा पाहणार काही लोकांना प्रमोशन ची गरज नाही एवढे मोठे ब्र्यांड ते बनतात
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
गुरुवार, 10/03/2013 - 10:42 नवीन
छान परिक्षण . नक्के बघू हा सिनेमा ! अमोल
  • Log in or register to post comments

काही लोकांना प्रमोशन ची गरज नाही एवढे मोठे ब्र्यांड ते बनतात

भाते
गुरुवार, 10/03/2013 - 13:37 नवीन
+१ भारतात आवडता नट/खान कोणता यावर शा.खा. पेक्षा भारताबाहेर इरफान खान जास्त लोकप्रिय नट आहे असे ऐकुन आहे. खरे-खोटे माहित नाही.
  • Log in or register to post comments

काल बघितला

चाणक्य
Mon, 10/07/2013 - 10:39 नवीन
अभिनय , एडिटिंग, दिग्दर्शन,कथा, पटकथा,व्यक्तिरेखा सगळंच लाजवाब. पण तरीही मला शेवट विशेष कळला नाही. आता स्पॉयलर अलर्ट:- ईरफान शेवटी तिचा शोध घेत तिच्यापर्यंत पोचणार असं दाखवल आहे का? शिवाय तिचं नव-यावर फक्त शर्टच्या वासावरून त्याचं अफेअर चालू आहे निष्कर्षाप्रत येणं हे ही जरा खटकलं.
  • Log in or register to post comments

भीषण नुकसान !

सुधीर मुतालीक
Wed, 04/29/2020 - 13:30 नवीन
भीषण नुकसान !
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली...

यश राज
Wed, 04/29/2020 - 13:40 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली... वाईट बातमी. एक हरहुन्नरी अभिनेता हरपला.
  • Log in or register to post comments

आदरांजली

हेमंतकुमार
Wed, 04/29/2020 - 13:41 नवीन
एक चांगला माणूस आणि तितकाच चांगला अभिनेता गेला आदरांजली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा