Skip to main content

रीमेक बनवूयात

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 11/09/2013 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
जंजीर, डॉन, शोले, अग्निपथ, गोलमाल अशा सिनेम्यांचे रीमेक येऊन गेले. अजून काही येऊ घातले आहेत. सहज मनात विचार आला, मिसळपाव या संस्थळावर प्रतिभावान, धनवान इसमांची कमी नाही. आपणही एखादा रीमेक बनवू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रीमेक कसा बनवायचा याची सखोल चर्चा आपल्याला इथे करता येईल. चर्चाप्रस्तावासाठी दोन शिणुमाम्यांची नावे समोर ठेवत आहे. त्यांचा एकदा फडशा पडला कि दुस-या नावांचाही विचार करता येईल. सर्वांना विनंती कि त्यांनी आपापले मौलिक विचार मांडावेत. या कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा ही अपेक्षा आहेच. रीमेकसाठी विचारार्थ ओरीजिनल शिणेमे खालीलप्रमाणे : १. रामगोपाल वर्मा कि आग २. जय संतोषी मा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5177
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

जय संतोषी मां आणि रागोव चे शोले याच्या रिमेक बद्दल तुम्ही काय विचार केलाय तो आधी सांगा बघू! मराठी कलाकार घ्यायचे आहेत का हिंदीच?

विकी डोनर प्रत्येक दशकात बनलाच पाहीजे.

माझा पास तुम्हाला बीए पासचा रीमेक बनवायचा आहे का ? थेट पार्ट टू बनवा कि.. एमए पास (बा पास, मां पास ) मित्रहो मराठी, हिंदी कसाही बनवा. आपण मागे राहता कामा नये. राम और शाम वरून सीता और गीता बनला तसाही चालेल. जय संतोषी मा वरून जय आसाराम बापू बनला तरी चालेल. रीमेक बनाना तो बनता है..

In reply to by खटासि खट

रीमेक म्हंजे फक्त नावाच यमक जुळवायच का?? त्यात काय एवढं
  1. शोले=भोले=छोले
  2. शान = पान

शोले चा मराठी रीमेक प्रमुख पात्रे बसन्ती : आशा काळे वीरु : महेश कोठारे ठाकुर : शरद तळवलकर जय : लक्ष्या बेर्डे ठाकुरची सून : प्रिया बेर्डे गब्बर : निळू फुले चाचा(ए के हनगल) = श्रीराम लागू सांबा = जितेन्द्र जोशी मौसी = भारती आचरेकर रामलाल = ( जागा भरणे आहे) कालीया = भरत जाधव जेलर = विजय पाटकर सूरमा भोपाली = रवी पटवर्धन जलाल आगा( मेहबुबा चा नाच्या) = महागुरु सचिन पिळगावकर जेलमधील लोक, गाववाले,व इतर या गाळलेल्या जागा भरा.

In reply to by जेनी...

मला कै शोभतं ते मला चांगलंच म्हैत आहे. तूच जरा शिकून घेतलंस तर बरं! चार लोकांत हिला न्यायची सोय म्हणून नै!

In reply to by अत्रुप्त आत्मा

रामलाल ही अत्यंत जबाबदारीची पोस्ट आहे. दोन्ही हात नसल्याने ठाकूरसाहेबांचा जो काही खोळंबा झाला असेल त्याचा निपटारा करण्याची धमक रामलाल मध्ये हवी. अवांतर : सुहास भालेकरांना विसरू नका हो.

In reply to by खटासि खट

हीच तर शोलेची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी आहे.. साले डायरेक्टरने उसके बीबीको मार डाला.. और हात भी काट डाले.. :)) ;)

In reply to by विजुभाऊ

मेहबुबा चा नाच्या = महागुरु सचिन पिळगावकर हे लै आवडलं.. :))

गलबलुन आलं बै मला तं अगदी
अरे बापरे. चाटणं घे गं ...... सुतशेखर मात्रा विडंगारीष्ट. वावडिंग. हळीव .

In reply to by अरुण मनोहर

टारझनचा रिमेक? नक्की कुठला टारझन अभिप्रेत आहे आपल्याला ;) ;) =)) =)) (चिकित्सक) बॅटमॅन.

In reply to by अग्निकोल्हा

टारझन हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे ! पहिल्यांदा तो एक नंबरला होता आता १ नंबरची जागा पायरेट्स ने पटकावली आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण टारझनचे अ‍ॅनिमेशन "जर्कि" वाटायचे, त्यापेक्षा जॉब्सच्या पिक्सारचा "सिंदबाद" मस्त होता. पण ते हि डिस्नेने विकत घेतल्याने आता रिमेक कसा बनेल माहित नाही.

बा द वे झी आणि ई मराठीच्या कौटुंबिक मालिकांचा रीमेक बनवण्याची आयडीया कशी वाटते ! तू तिथं मी बाजीराव मस्तानी काटा रुते... चार दिवस सासूचे दामिनी स्वामिनी मानिनी असंभव सारेगमप - लिटल चँप (पल्लवी जोशी अ‍ॅंकर)

अरे मनोज कुमाच्या चित्रपटांचे मराठी रीमेक बनवा रे कोणी? व तो त्याला नेऊन दाखवा. परत कधी तो स्वताचे चित्रपट बघणार नाहीत.