Skip to main content

सकाळची गोष्ट-(१ प्रासंगिका )

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/05/2011 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची गोष्ट आहे, साक्षीला एस.पी.च पोष्ट आहे. अशीच एक रिक्षा,एम.८०ला येऊन धडकली, सवयीनेच रिक्षा आधी,एम८०वाली भडकली... काय रे मेल्या,कुठे बघतोस?डोळे तुझे फुटले का? रागाऊ नका गोखलेकाकु,गाडीचे काही तुटले का? खरंतर चुक काकुंचीच होती,अचानक ब्रेक मारलेला पण, गर्दीनेही कल पाहुन,रिक्षावाल्याला धरलेला... लांबुनच मी पाहात होतो,रिक्षातही १काकु होत्या... कदाचीत त्याही 'अपटे' असाव्यात,कारण लांबुनच पाहात होत्या... रिक्षावालाही भलताच शुर,पन्नास जणांशी लढत होता. त्यामुळे काकुंचा आवाज,एरवी पेक्षा चढत होता. माघार कोणिच घेईना,एवढ्यात कोणितरी पोलिस धाडला. ह्यांचं भांडण लांबच,पोलिसाचाच अवाज वाढला.... चढ्या अवाजात पोलिस बोलला,ए...बाकिच्यांनी दूर व्हा... मी मनात म्हणालो,अता पोलिसाचा डाव पहा... चुक काकुंचीच होती,पण पोलिस रिक्षावर धावला. काकुंनाही चुक कळली होती,पण त्यांना पोलिस पावला... पोलिसानी मग शिताफीनी,दोघांचाही बोका केला. दोन्ही कडलं लोणी खाऊन,यांच्या हाती तराजु दिला... मग दोघं म्हणाले,पोलिसानी आपल्याला लुटलं...? त्याचा फायदा झाल्यावर,आपलं भांडण सुटलं... मग कशाला भांडत बसलो?समजुन घेतलं असतं तर? म्हणुनच दोन वहानात,राखावं सुरक्षित अंतर. पराग दिवेकर..........
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3575
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता छान आहे. अवांतरः
कदाचीत त्याही 'अपटे' असाव्यात
तुम्हाला आपटे म्हणायचे आहे कां? हो का रे स्पावड्या? आमच्या वहिनी तिथे भांडत होत्या कां? ;)

कसली भारी कविता. कसले भारी यमक. . >>>>>>राखावं सुरक्षित अंतर. पराग दिवेकर. वा वा वा वा एकदम सुपर्ब :-D

वाह बुवा वाह... प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा केलात.

बुवा, अ‍ॅक्टिव्हावर होतात का? *yahoo*

इतुके आले जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण इतुके आले जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन __ इति मंगुअण्णा