सकाळची गोष्ट-(१ प्रासंगिका )
सकाळची गोष्ट आहे,
साक्षीला एस.पी.च पोष्ट आहे.
अशीच एक रिक्षा,एम.८०ला येऊन धडकली,
सवयीनेच रिक्षा आधी,एम८०वाली भडकली...
काय रे मेल्या,कुठे बघतोस?डोळे तुझे फुटले का?
रागाऊ नका गोखलेकाकु,गाडीचे काही तुटले का?
खरंतर चुक काकुंचीच होती,अचानक ब्रेक मारलेला
पण, गर्दीनेही कल पाहुन,रिक्षावाल्याला धरलेला...
लांबुनच मी पाहात होतो,रिक्षातही १काकु होत्या...
कदाचीत त्याही 'अपटे' असाव्यात,कारण लांबुनच पाहात होत्या...
रिक्षावालाही भलताच शुर,पन्नास जणांशी लढत होता.
त्यामुळे काकुंचा आवाज,एरवी पेक्षा चढत होता.
माघार कोणिच घेईना,एवढ्यात कोणितरी पोलिस धाडला.
ह्यांचं भांडण लांबच,पोलिसाचाच अवाज वाढला....
चढ्या अवाजात पोलिस बोलला,ए...बाकिच्यांनी दूर व्हा...
मी मनात म्हणालो,अता पोलिसाचा डाव पहा...
चुक काकुंचीच होती,पण पोलिस रिक्षावर धावला.
काकुंनाही चुक कळली होती,पण त्यांना पोलिस पावला...
पोलिसानी मग शिताफीनी,दोघांचाही बोका केला.
दोन्ही कडलं लोणी खाऊन,यांच्या हाती तराजु दिला...
मग दोघं म्हणाले,पोलिसानी आपल्याला लुटलं...?
त्याचा फायदा झाल्यावर,आपलं भांडण सुटलं...
मग कशाला भांडत बसलो?समजुन घेतलं असतं तर?
म्हणुनच दोन वहानात,राखावं सुरक्षित अंतर.
पराग दिवेकर..........
छान आहे
मजेशीर आहे.
कसली भारी कविता.
अंतरा'वर बरच दुरून लक्ष गेलं
वाह बुवा वाह...
वा वा!
नाय.... M80 ही गाडि जेंव्हा
बुवा हि कविता 'पुणे ट्राफिक'
टाकली.
चचाचे (लील्याचे) बंधू शोभलात
जवळपणाचे झाले बंधन
डोळ्यात पाणी आनलत गुर्जि !