पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : १० : अमेरिकेवर वर्चस्व आणि भारतीय प्रस्तरकला (१९,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
१५,००० वर्षांनंतर हवामान जरा सुधारू लागल्यावर बेरिंगियाच्या दक्षिणेकडील रिफुजमध्ये अडकलेल्या टोळ्या हालचाल करू लागल्या. त्यातले काही मानव पूर्व किनारपट्टीने दक्षिणेकडे स्थलांतर करू लागले. १५,००० ते १२,५०० या केवळ अडीच हजार वर्षांत त्यांनी दक्षिण चिलीच्या किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. पूर्वेच्या किनार्यावरून स्थलांतर करणारे मानवही या वेळेत ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या किनार्याने थेट अमेरिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचले होते. त्यांच्यातले काही धाडसी मानव किनारपट्टीचा पारंपरिक ओळखीचा आणि तुलनेने निर्धोक मार्ग सोडून अमेरिका खंडाच्या मध्यभागातही पसरले.
हे मार्गक्रमण खालच्या चित्रात दाखवले आहे...
या स्थलांतराचे एक विशेष म्हणजे ह्या मानवांच्या टोळ्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करत राहिल्या. त्यामुळे जसजसे ते कायम वस्ती करू लागले तसतश्या वेगवेगळे शारीरिक आणि सांस्कृतिक रूप असलेल्या मानव संस्कृती जागोजागी स्वतंत्रपणे विकसीत होत गेल्या. हे वेगळेपण आजच्या काळातही शाबूत आहे. मुख्य म्हणजे या वेगळेपणाचे पुरावे त्यांच्या जनुकांत अजूनही सापडतात... या प्रत्येक जमातीत त्यांनी त्यांच्या आशियातील मूळ भूमीतून बेरिंगियामार्गे बरोबर आणलेली जनुके सरमिसळ न होता अजून शाबूत आहेत. तसेच उत्खननात सापडलेली त्यांची हत्यारे त्यांच्या आशियाई पूर्वजांच्या हत्यारांशी जुळतात.
खालील चित्र जनुकशास्त्रिय दृष्टीने स्वतंत्र टोळ्यांचे अमेरिकेतले मार्गक्रमण दाखवते (www.bradshawfoundation.com च्या सौजन्याने)...
हे का झाले याबद्दल शास्त्रज्ञांत अजून एकमत नाही. याची बरीच कारणे असू शकतात, पण दोन सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. पहिले कारण असे की ह्या टोळ्या अमेरिकन भूमीच्या अफाट पसार्यामुळे एकमेकापासून विभागून राहिल्या असाव्या आणि त्यांच्या संख्येच्या मानाने मुबलक अन्नपुरवठ्यामुळे त्यांना एकमेकाशी झगडण्याची गरज भासली नसावी. दुसरे कारण असे की या टोळ्या वेगवेगळ्या काळात दक्षिणेकडे सरकल्या आणि त्यामुळे त्यांचा एकमेकाशी संबद्ध आला नाही. त्या काळचा स्थलांतराचा वेग पाहिला तर १०-१५ वर्षांच्या किंवा कमी फरकाने निघालेल्या टोळ्या एकमेकाबद्दल पूर्ण अनभिज्ञ असू शकतात. या दोन कारणांपैकी एकामुळे किंवा दोन्हींमुळे तसे झाले असावे. परंतु सद्या यातील पहिल्या कारणाचे पुरावे जरा जास्त सबळ आहेत.
दक्षिण अमेरिकेत प्रथम पाय ठेवणार्या मानवांबद्दलही अनेक सिद्धांत प्रचलित होते.
त्यातल्या एका सिद्धांताप्रमाणे दक्षिण अमेरिकेत प्रथम पाऊल ठेवणारे मानव ऑस्ट्रेलिया अथवा पॉलिनेशियामधून समुद्रमार्गे आले. कारण तेथे सापडलेल्या जुन्या मानवी कवट्यांचे अवशेष प्राचीन आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियातील कवट्यांशी मिळते जुळते आहेत. त्यामानाने नवीन कवट्यांच्या अवशेषांचे चीन आणि मंगोलियातील मंगोलियन वंशाच्या कवट्यांशी जास्त साधर्म्य आहे.
दुसर्या सिद्धांताप्रमाणे यातले पहिले मानव दक्षिण आशिया-ऑस्ट्रेलिया-दक्षिण चीन-बेरिंगिया मार्गे हिमयुगाचा कहर सुरू होण्याअगोदर अमेरिकेत शिरले आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे दक्षिण अमेरिकेत पोचले असावेत व त्यानंतरच्या हिमयुगाचा कहर कमी झाल्यावर मंगोलियन वंशाचा पगडा असणारे मानव तेथे पोचले असावे.
यातल्या दुसर्या मताला आजच्या घडीला जास्त पुष्टी मिळत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक नविन पुरावे हे सिद्ध करतात की बेरिंगियाला पूर्वीच्या समजाप्रमाणे एक सरळसोट किनारा नव्हता. तेथे अनेक बेटे, दलदलीचे भाग आणि उथळ पाण्याचे भूभाग होते. या सगळ्यांचा आशियाच्या किनारपट्टीने पुढे सरकणार्या पट्टीच्या बीचकोंबरनी मॅमथ आणि इतर प्राण्यांचा मागोवा घेत अमेरिकेत प्रवेश करायला नक्कीच फायदा घेतला असणार. त्यामानाने ऑस्ट्रेलियापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेपर्यंत समुद्रप्रवास करण्याइतपत त्या काळच्या बीचकोंबर्स कडे असलेल्या होड्या प्रगत नव्हत्या.
=====================================================================
या सगळ्या जनुकीय गडबडीत अजून एक महत्त्वाचा घोळ होता. तो म्हणजे अतीउत्तरेकडच्या अमेरिकन जमातींची जनुके दक्षिणेकडच्या जमातींकडून येणार्या जनुकांच्यापेक्षा खूपच वेगळी आहेत. आणि ही जनुके हवामान सुधारल्यावर आशियातून आलेल्या नवीन मानवी लाटांबरोबर आली असे म्हणावे तर तसेही नव्हते, कारण ती नजीकच्या भूभागातील आशियाई जमातींच्या जनुकांपेक्षा बरीच वेगळी आहेत.
सन १९९६ मध्ये या सगळ्या रहस्याचा उलगडा पीटर फोस्टर, अंतोनिओ तोरिनि आणि हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञांच्या गटाने केला. बेरिंगिया हिमयुगात कमी झालेल्या समुद्राच्या पाण्यामुळे आशिया व अमेरिकेला जोडणारा भूभाग होता हे अगोदरपासून माहिती होते. पण या गटाच्या पुराव्यांनी दाखवले की २५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इथला १३ लाख चौ किमी चा भूभाग हिमाच्छादित नसून गवताळ टंड्रा प्रदेश होता आणि तेथे शाकाहारी प्राण्यांचे कळप होते. त्या काळचा तेथला उन्हाळा हल्लीपेक्षा थंड होता पण आश्चर्यकारकरीत्या त्या काळचा हिवाळा हल्लीपेक्षा जास्त गरम होता ! आणि हा मानवासाठी रहायला तुलनेने सुसह्य भूभाग (रेफुज) २२,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इतर जगापासून (पूर्व आशिया व अमेरिकेपासून) त्याच्या चारहीबाजूस असलेल्या बर्फाळ वाळवंटाने पूर्णपणे अलग झालेला होता. याचमुळे अतीउत्तर अमेरिकेतल्या ना-देने आणि ईन्विट-अल्युट या जमातीत आशियातून आलेली A1 / A2 मूळ जनुके आहेत पण त्यांची इतर उत्परिवर्तने सर्व आशियाई व अमेरिकन लोकांपेक्षा फार वेगळी आणि जास्त तरुण आहेत.
उत्परिवत्नांचे पुरावे वापरून जनुकीय नकाशे बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञाचा सिंहाचा वाटा आहे.
=====================================================================
...गंमत अशी की "थोडीशी कातडी खरवडणे" हा एक वाक्प्रचार असला तरी जनुकशास्त्रिय तपासणीसाठी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे !!!
अमेरिकेत दक्षिण दिशेने स्थलांतर (१९,००० ते १२,५०० वर्षांपूर्वीपर्यंत)
मागच्या भागात आपण पहिले की हिमयुगामुळे पृथ्वीचा जवळ जवळ सर्व उत्तर गोलार्ध थंडीच्या कडाक्याने एकतर थंड वाळवंट किंवा पावसाच्या कमतरतेने रखरखीत उष्ण वाळवंट झाल्यामुळे काही मानव बर्फाळ, काही गवताळ तर फार थोडे जंगली रेफुजेसमध्ये छोट्या छोट्या टोळ्यांच्या स्वरूपात अडकून पडले. या सगळ्या बदलांत मानवांना जीवनमरणाच्या संघर्षाला तोंड द्यावे लागले आणि प्रचंड जीवहानी झाली. परत एकदा मानव जमात सर्वनाशाच्या जवळ पोहोचून कशीबशी तग धरून राहिली. मात्र एका भूभागातील स्थलांतर जरा वेगळे होते... तो भूभाग म्हणजे अमेरिका खंड. हिमयुगाचा तडाखा सुरू होण्यापूर्वी उत्तर अमेरिकेत सहा फुटांपर्यंत मोठी शिंगे असलेले मोठे गवे, उंट, स्लॉथ, चितळ, बैल, मांजर प्रजातितील मोठ्या जाती, मॅमथ आणि मॅस्टॉडॉन (मॅमथ आणि हत्तींचे चुलत भाऊबंद) यांचे मोठे रानटी कळप होते. अर्थात उत्तरेकडचे हवामान जसजसे थंड होऊ लागले तसे हे प्राणी आणि मानव दक्षिणेकडे सरकू लागले. फार पूर्वी बेरिंगिया ओलांडून अमेरिकेत आलेल्या या मानवांची संख्या मुळातच मूठभर होती. त्यातच हवामानामुळे त्यात घट झाली. मात्र दक्षिणेकडे सरकणार्या या मानवांना विरोध करायला तेथे अगोदरपासून अस्तित्वात असलेले मानव नव्हते. या दृष्टीने ते इतरांपेक्षा नशीबवान होते, हे एक दु:खात सुख ! १९,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात बेरिंगियातील रिफुजेसमधल्या मानवांना बर्फाने आणि थंडीने जखडून ठेवले होते. त्यांना हालचाल करायला हवामान सुधारण्याची वाट पाहणे भाग होते. पूर्व किनार्यावरून आणि उत्तर अमेरिकेत मार्गक्रमण करणार्या टोळ्या नष्ट झाल्या होत्या. १९,००० वर्षांपूर्वी जास्तीत जास्त दक्षिणेकडे पोहोचलेल्या अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरच्या मानवांना या हवामानाच्या फरकाचा तडाखा जरासा कमी आणि उशीरा बसला. शिवाय बेरिंगियातील रिफुजेसमधील मानवांप्रमाणे ते चारही बाजूंनी बर्फाने घेरले गेले नव्हते. अर्थातच या कालखंडात तेच काय ते स्थलांतर करू शकले. ते किनारपट्टीचा मार्ग चोखाळत मध्य अमेरिकेत आणि नंतर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्यावर पसरले.
१५,००० वर्षांनंतर हवामान जरा सुधारू लागल्यावर बेरिंगियाच्या दक्षिणेकडील रिफुजमध्ये अडकलेल्या टोळ्या हालचाल करू लागल्या. त्यातले काही मानव पूर्व किनारपट्टीने दक्षिणेकडे स्थलांतर करू लागले. १५,००० ते १२,५०० या केवळ अडीच हजार वर्षांत त्यांनी दक्षिण चिलीच्या किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. पूर्वेच्या किनार्यावरून स्थलांतर करणारे मानवही या वेळेत ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या किनार्याने थेट अमेरिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचले होते. त्यांच्यातले काही धाडसी मानव किनारपट्टीचा पारंपरिक ओळखीचा आणि तुलनेने निर्धोक मार्ग सोडून अमेरिका खंडाच्या मध्यभागातही पसरले.
हे मार्गक्रमण खालच्या चित्रात दाखवले आहे...
या स्थलांतराचे एक विशेष म्हणजे ह्या मानवांच्या टोळ्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करत राहिल्या. त्यामुळे जसजसे ते कायम वस्ती करू लागले तसतश्या वेगवेगळे शारीरिक आणि सांस्कृतिक रूप असलेल्या मानव संस्कृती जागोजागी स्वतंत्रपणे विकसीत होत गेल्या. हे वेगळेपण आजच्या काळातही शाबूत आहे. मुख्य म्हणजे या वेगळेपणाचे पुरावे त्यांच्या जनुकांत अजूनही सापडतात... या प्रत्येक जमातीत त्यांनी त्यांच्या आशियातील मूळ भूमीतून बेरिंगियामार्गे बरोबर आणलेली जनुके सरमिसळ न होता अजून शाबूत आहेत. तसेच उत्खननात सापडलेली त्यांची हत्यारे त्यांच्या आशियाई पूर्वजांच्या हत्यारांशी जुळतात.
खालील चित्र जनुकशास्त्रिय दृष्टीने स्वतंत्र टोळ्यांचे अमेरिकेतले मार्गक्रमण दाखवते (www.bradshawfoundation.com च्या सौजन्याने)...
उत्तर अमेरिकेत मानवाचे पुनःप्रसरण (१२,५०० ते १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
सर्वसाधारणपणे प्रवासात मूळ जागी असलेली असलेली जनुके आणि उत्परिवर्तने घेऊन प्रवासी जथे पुढे जातात आणि त्यांच्यात नवीन "तरुण" उत्परिवर्तने तयार होत जातात. म्हणजे अमेरिकेत उत्तरेला जास्त मूळ जनुके आणि नवीन उत्परिवर्नांचा अभाव असायला पाहिजे. उत्तर अमेरिकेतली जनुकीय विभागणी याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचे कारण हिमयुगाच्या कहरात दडले आहे. हवामानात होणार्या बदलाने मानवांना उत्तर अमेरिका सोडून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कसे जायला भाग पाडले हे आपण पाहिले. त्या काळात उत्तर अमेरिकेत असलेल्या लहानसहान वस्त्या नाहीश्या होऊन त्यांचा काही पूर्व किनार्यावरचे अपवाद वगळता मागमूसही उरला नाही हे आपण अगोदर पाहिले आहेच. साधारण १२,५०० वर्षांपूर्वी हवामान सुधारू लागले आणि बर्फ वितळू लागला तसे बेरिंगियातले आणि उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागातले लोक उत्तर अमेरिकेतल्या उत्तरेकडच्या निर्मनुष्य भागांत पसरू लागले. अर्थातच या भागांतल्या मानवांत दक्षिणेकडील मानवांपेक्षा जास्त 'तरुण' उत्परिवर्तने आढळतात ! हे उत्तर अमेरिकेतले ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेकडचे पुनःप्रसारण खालच्या चित्रात दाखवले आहे...
या सगळ्या जनुकीय गडबडीत अजून एक महत्त्वाचा घोळ होता. तो म्हणजे अतीउत्तरेकडच्या अमेरिकन जमातींची जनुके दक्षिणेकडच्या जमातींकडून येणार्या जनुकांच्यापेक्षा खूपच वेगळी आहेत. आणि ही जनुके हवामान सुधारल्यावर आशियातून आलेल्या नवीन मानवी लाटांबरोबर आली असे म्हणावे तर तसेही नव्हते, कारण ती नजीकच्या भूभागातील आशियाई जमातींच्या जनुकांपेक्षा बरीच वेगळी आहेत.
सन १९९६ मध्ये या सगळ्या रहस्याचा उलगडा पीटर फोस्टर, अंतोनिओ तोरिनि आणि हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञांच्या गटाने केला. बेरिंगिया हिमयुगात कमी झालेल्या समुद्राच्या पाण्यामुळे आशिया व अमेरिकेला जोडणारा भूभाग होता हे अगोदरपासून माहिती होते. पण या गटाच्या पुराव्यांनी दाखवले की २५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इथला १३ लाख चौ किमी चा भूभाग हिमाच्छादित नसून गवताळ टंड्रा प्रदेश होता आणि तेथे शाकाहारी प्राण्यांचे कळप होते. त्या काळचा तेथला उन्हाळा हल्लीपेक्षा थंड होता पण आश्चर्यकारकरीत्या त्या काळचा हिवाळा हल्लीपेक्षा जास्त गरम होता ! आणि हा मानवासाठी रहायला तुलनेने सुसह्य भूभाग (रेफुज) २२,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इतर जगापासून (पूर्व आशिया व अमेरिकेपासून) त्याच्या चारहीबाजूस असलेल्या बर्फाळ वाळवंटाने पूर्णपणे अलग झालेला होता. याचमुळे अतीउत्तर अमेरिकेतल्या ना-देने आणि ईन्विट-अल्युट या जमातीत आशियातून आलेली A1 / A2 मूळ जनुके आहेत पण त्यांची इतर उत्परिवर्तने सर्व आशियाई व अमेरिकन लोकांपेक्षा फार वेगळी आणि जास्त तरुण आहेत.
उत्परिवत्नांचे पुरावे वापरून जनुकीय नकाशे बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञाचा सिंहाचा वाटा आहे.
=====================================================================
भारतीय प्रस्तरकला (Indian Rock Art)
"फार महत्त्वाच्या प्राचीन भारतीय ठेव्यांबद्दल (नेहमीचीच) कमालीची अनास्था" हे वर्णन भारतीय प्रस्तरकलेला तंतोतंत लागू होते. जगात एकूण तीन ठिकाणी महत्त्वाचे प्रस्तरकलेचे खजिने आहेत... भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. यातल्या भारत सोडून इतर ठिकाणच्या कलांच्याबद्दल भरभरून वाचायला मिळते आणि त्यांचा पर्यटनासाठीही कल्पक उपयोग झालेला आहे. केवळ भारतीय प्रस्तरकलेचा उल्लेख अभावानेच आढळतो. गंमत म्हणजे यांत शात्रज्ञांच्या सो कॉल्ड कंपूबाजीचा अजिबात हात नाही, कारण पाश्चिमात्य संशोधकांच्या लेखनात या अनास्थेबाबत सतत आश्चर्य व्यक्त केले जाते ! भारतातील ही प्राचीन कलाक्षेत्रे इतर खंडांतील कलेपेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठ्या भूभागावर आहेत... आतापर्यंत एकूण तेरा राज्यांत ७०० पेक्षा जास्त ठिकाणी ही कला सापडली आहे. ही कलाक्षेत्रे जवळ जवळ सर्व भारतभर पण प्रामुख्याने भारताच्या मध्य भागात आहेत. फार मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर असूनसुद्धा उत्तरेकडच्या कुमाऊ पासून आंध्रप्रदेशातल्या चंद्रमौली पर्यंत या कलेतील विषय, आकार आणि संकल्पनांत आश्चर्यकारक समानता आहे (Kumar 1992: 56). ही कला बहुतांशी प्रस्तरचित्रांच्या स्वरूपात तर फार थोड्या ठिकाणी प्रस्तरावरच्या कोरीवकामाच्या स्वरूपात आहे. अश्या कलेच्या व्यवस्थापनाबद्दलचा आपला पूर्वेतिहास बघता अजून बरीच कला कोठेतरी कडेकपारीत पडून असली किंवा कोणत्या तरी "विकासाच्या" बांधकामांत नष्ट झाली असली तरी आश्चर्य वाटायला नको. असो. या कलेत अर्थातच मुख्यत: ती निर्माण केली गेली त्या काळची स्थिती, मानव आणि प्राणी यांचे चित्रण आहे. या सगळ्यातले वैविध्य युरोपियन कलेपेक्षा अधिक आहे हे आतापर्यंत सर्वमान्य झाले आहे. उदाहरणार्थ: १. चंबळच्या खोर्यातल्या कलेत जवळ जवळ ३० वेगवेगळे प्राणी आहेत (Badam & Prakash 1992). २. मानव आणि प्राण्यांचे आकार काही ठिकाणी फक्त बहिर्रेखांनी दर्शवले आहेत तर इतर ठिकाणी रेषा अथवा इतर प्रकारे भरीव आहेत. ३. एका चित्रात गरोदर मातेच्या पोटातले बाळ एक्स रे मध्ये दिसावे त्या प्रकारे दाखवले आहे ! ४. या कलेत मानवांच्या अनेक अवस्था... उभे, बसलेले, धावणारे, नाचणारे, शिकार करणारे, पायी अथवा घोड्यावरून शस्त्रे घेऊन लढणारे, इ... दाखवलेल्या आहेत. ही कला पाहण्यासाठी आणि अधिक माहितीकरिता या दुव्यावर पाहणी करावी. तेथून अजून काही दुवे मिळू शकतील. (क्रमशः ) ===================================================================== महत्त्वाचे दुवे १. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens २. https://genographic.nationalgeographic.com/ ३. http://www.smithsonianmag.com/ ४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration ५. http://www.bradshawfoundation.com/ ===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... =====================================================================
वाचने
25680
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
अप्रतिम मालिका एक्का काका.
मी नियमितपणे ही लेखमाला
अनेक धन्यवाद !
पुर्ण लेखमाला मनलावून वाचतो
अतियश उत्तम
धन्यवाद !
जबरदस्त प्रवास नकाशांमुळे
In reply to जबरदस्त प्रवास नकाशांमुळे by प्रचेतस
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
तरीही ही माहिती गुप्त राहणेच
In reply to तरीही ही माहिती गुप्त राहणेच by प्रचेतस
दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे
केवळ अप्रतिम!!!
In reply to केवळ अप्रतिम!!! by तिरकीट
धन्यवाद !
सुंदर लेखमाला
In reply to सुंदर लेखमाला by मालोजीराव
धन्यवाद !
In reply to सुंदर लेखमाला by मालोजीराव
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
जगातिल सर्वात जुन्या
In reply to जगातिल सर्वात जुन्या by मालोजीराव
बातमी खूपच उत्सुकतापूर्ण आहे.
In reply to बातमी खूपच उत्सुकतापूर्ण आहे. by डॉ सुहास म्हात्रे
Nat Geo
In reply to Nat Geo by मालोजीराव
धन्यवाद !
अप्रतिम लेख मालिका !!
In reply to अप्रतिम लेख मालिका !! by प्रसाद गोडबोले
सुरुवातीला संवाद करण्यासाठी
In reply to सुरुवातीला संवाद करण्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
अगोदरच्या एका भागात इथे
भारतात अशी भित्तिचित्र आहेत
धन्यवाद !
भारीये लेख मालिका इस्पिक
अगदी
पुढचे भाग वाचायला लै लेट झाला
धन्यवाद !
सगळे भाग वाचले..अप्रतिम..
In reply to सगळे भाग वाचले..अप्रतिम.. by इशा१२३
धन्यवाद !
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
धन्यवाद !