पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०९ : तिसरी महाआपत्ती आणि वांशिक विलगन (२२,००० ते १९,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
युरोपातील refuges खालीलप्रमाणे होती...
१. पायरेनीज पर्वताच्या दोन्ही बाजूस असलेला आताच्या स्पेनमधील बास्क विभाग: आजही बास्क लोक जनुके, भाषा आणि संस्कृतीने आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळे आहेत. स्पेनपासून वेगळे होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या चळवळीने ते मधून मधून बातम्यात असतात. तेथील प्राचीन टोकदार दगडी हत्यारे (Solutrean) दक्षिण रिफुजेसमधील मानवांच्या हत्यारांपेक्षा (Epi-Gravettian) खूप वेगळी होती. ही कारागिरी त्यांना बहुतेक उत्तरपश्चिम युरोपातून हवामानाच्या फरकाबरोबर दक्षिणेकडे सरकलेल्या मानवांपासून मिळालेली होती.
२. आताच्या इटलीमध्ये अनेक छोट्या पण एकमेकाशी संबद्ध असलेल्या टोळ्यांच्या स्वरूपात.
३. आताच्या युक्रेनमध्ये काळ्या समुद्राच्या व कार्प्याथियन पर्वताच्या उत्तरेस आणि Dnepr व Don या नद्यांच्या काठावरच्या प्रदेशात.
४. कार्प्याथियन पर्वताच्या दक्षिणेस असलेला आताच्या स्लोवाकियातला एक छोटा भाग.
५. मोल्डावियातल्या Dnestr नदीच्या खोर्याचा भाग.
हवामानाचा प्रभाव उत्तरेकडच्या भागात खूप प्रखर असला तरी तो त्या भागापुरताच मर्यादित नव्हता. धृवप्रदेशात अडकलेल्या पाण्यामुळे कमी झालेल्या पावसामुळे बहुतेक सर्व पृथ्वीच्या जीवनावर परिणाम झाला. दाट वर्षारण्ये असलेल्या भागांच्या ठिकाणी जेथे थोडाबहुत पाऊस टिकून होता तेथे झुडुपे असलेले गवताळ प्रदेश निर्माण झाले आणि जेथे पावसाचे मोठा अभाव झाला तेथे रखरखीत उष्ण वाळवंटे निर्माण झाली.
आफ्रिकेचा उत्तर भाग उष्ण ओसाड वाळवंट झाले; पश्चिम किनार्यावरिल विषुववृत्तावरचा थोडासा भाग पुरेश्या पावसामुळे वर्षारण्य टिकवून होता; आणि उर्वरित सर्व आफ्रिकेचे फार तर खुरटी झुडुपे असलेल्या गवताळ (कालाहारी) प्रदेशात रूपांतर झाले. या खुरट्या झुडूपे असलेल्या गवताळ भागांत एकमेकापासून संबद्ध तुटलेल्या मानवी वस्त्या (scrubby refuges) तयार झाल्या. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतल्या मानवांचा संबंध तर सहारा वाळवंटाच्या प्रसरणाने पूर्णपणे तुटला.
५५ अंश अक्षांशाच्या दक्षिणेकडच्या इतर सर्व आशियाचे गवताळ जमिनीत रूपांतर झाले. फक्त दक्षिणपूर्व आशिया आणि चीनच्या दक्षिण भागातील वर्षारण्ये पावसामुळे टिकून राहिली. संपूर्ण भारतातील अरण्ये नष्ट होऊन तेथेही गवताळ प्रदेश झाला. या सर्व गवताळ प्रदेशांत जागोजागी एकमेकापासून संबद्ध तुटलले मानवांचे गट (scrubby refuges) निर्माण झाले.
हिमयुगाच्या प्रभावाने खाली गेलेल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील समुद्रकिनार्यांवर मोठमोठे नवीन भूभाग उघडे झाले. अर्थातच थंडीपासून दूर पळणारे मानव तेथे पसरले. थंडीच्या कडाक्यापासून बचाव करत मध्य आशियातील काही मानव पुर्वीच्याच चार महानद्यांच्या काठावरच्या मार्गांनी पण आता उलट दिशेने दक्षिणेकडे परत फिरले. पण यातले फार थोडेच हा प्रवास यशस्वीपणे करू शकले. कारण जनुकीय पुरावा सांगतो की दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील बहुतेक सर्व मानव या निसर्गाच्या प्रकोपातून उरलेल्या मूळ स्थानिक लोकांपासूनच आलेले आहेत.
ऑस्ट्रेलियातील सर्व अरण्ये नष्ट झाली आणि त्यांचे वाळवंट किंवा फार तर गवताळ प्रदेशात रूपांतर झाले. तेथील उरलेल्या मानवी जथ्यांचा संबद्ध एकमेकापासून तुटला.
अमेरिका खंडाला हवामानाचा मोठा फटका बसला. तेथील सर्व जंगले नष्ट झाली आणि रखरखीत उष्ण अथवा बर्फाळ थंड वाळवंटे निर्माण झाली. मात्र आश्चर्यकारकरीत्या ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेस असलेल्या बेरिंगियामध्ये दोन glacial refuges तगून राहू शकली ! मात्र त्यांच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या पूर्वकिनार्यावरील थोडेसे मानव सोडता इतर सर्वजण नष्ट झाले.
...दुसरा मार्ग पहिल्याच्या उत्तरेकडून आणि पूर्णपणे जमिनीवरून अथवा बर्फावरून प्रथम सरळ पश्चिमेकडे गेला आणि नंतर खाली वळून १९,००० ते १६,००० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर पेन्सिल्वानिया आणि दक्षिण कॅरोलायना येथे पोहोचला.
तिसरी महाआपत्ती
इतक्या मोठ्या प्रवासात सगळे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आणि जेवढा प्रवास मोठा तेवढे प्रचंड उलथापालथ घडविणारे प्रसंगही येणारच हे पण अपेक्षित आहेच. मात्र अश्या महाआपत्ती मानववंशावर दर वेळेस काही खास फार दूरगामी परिणाम करून जात होत्या. अश्याच एका महाआपत्तिची सुरुवात २२,००० वर्षांपूर्वी झाली आणि अर्थातच तिच्यात नेहमीप्रमाणेच हवामानाने मुख्य खलनायकाची भूमिका बजावली. २२,००० वर्षांपूर्वी आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाचा शेवटचा अतिथंड कालखंड ((Last Glacial Maximum) सुरू झाला. जसजसा थंडीचा कडाका वाढू लागला, तसतसे जमिनीचे स्वरूपही बदलू लागले. उत्तरेकडची अतिथंड प्रदेशाची रेखा खाली सरकत ५५ अंश अक्षांशापर्यंत खाली आली (सद्याच्या काळात ही रेखा, जिला आर्क्टिक वर्तूळ म्हणतात, ६६ अंश अक्षांशावर आहे). तिच्या उत्तरेकडील सर्व जमीन बर्फाच्या जाड थराने झाकून गेली आणि तेथे आर्क्टिक (बर्फाळ) वाळवंट झाले. अर्थातच तेथील बहुतेक सर्व वनस्पती आणि प्राणी जीवन उद्ध्वस्त झाले. हाच प्रकार सर्व उंच पर्वतराजी असलेल्या (हिमालय, आल्प्स आणि पायरेनेस) प्रदेशांत होऊन तेथील अतीथंड भूभाग विस्तारले. ज्यांना थोड्यांना जमले ते मानव दक्षिणेकडे सरकत राहिले. पण निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या या अतीथंड भागांतील मानवासकट बहुतेक सर्व जीवन नष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या या मानवांतील काही छोटे मानवसमूह काही मोजक्या ठिकाणी (मुख्यतः ५५ अंश अक्षांशाच्या जवळपास) त्याच्या मेंदूच्या ताकदीवर थंडीपासून संरक्षण करत आणि मिळेल त्या अन्नावर गुजराण करत तगून राहिले... हे उत्तरेकडचे निर्वासित मानव (refugees) जेथे तगून राहिले त्या ठिकाणांना glacial refuges असे म्हणतात. या प्रत्येक रिफुज मधल्या मानवांचा संबद्ध इतर रेफुजेसमधल्या मानवांपासून पूर्णपणे तुटला होता. हवामानाच्या प्रभावामुळे बर्फाळ प्रदेशात बनलेली जी रेफुजेस (refuges) खूप संकुचित आणि स्पष्ट सीमा असणारी होती, ती खालच्या नकाश्यात तांबड्या ठिपक्यांनी दर्शविली आहेत...
युरोपातील refuges खालीलप्रमाणे होती...
१. पायरेनीज पर्वताच्या दोन्ही बाजूस असलेला आताच्या स्पेनमधील बास्क विभाग: आजही बास्क लोक जनुके, भाषा आणि संस्कृतीने आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळे आहेत. स्पेनपासून वेगळे होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या चळवळीने ते मधून मधून बातम्यात असतात. तेथील प्राचीन टोकदार दगडी हत्यारे (Solutrean) दक्षिण रिफुजेसमधील मानवांच्या हत्यारांपेक्षा (Epi-Gravettian) खूप वेगळी होती. ही कारागिरी त्यांना बहुतेक उत्तरपश्चिम युरोपातून हवामानाच्या फरकाबरोबर दक्षिणेकडे सरकलेल्या मानवांपासून मिळालेली होती.
२. आताच्या इटलीमध्ये अनेक छोट्या पण एकमेकाशी संबद्ध असलेल्या टोळ्यांच्या स्वरूपात.
३. आताच्या युक्रेनमध्ये काळ्या समुद्राच्या व कार्प्याथियन पर्वताच्या उत्तरेस आणि Dnepr व Don या नद्यांच्या काठावरच्या प्रदेशात.
४. कार्प्याथियन पर्वताच्या दक्षिणेस असलेला आताच्या स्लोवाकियातला एक छोटा भाग.
५. मोल्डावियातल्या Dnestr नदीच्या खोर्याचा भाग.
हवामानाचा प्रभाव उत्तरेकडच्या भागात खूप प्रखर असला तरी तो त्या भागापुरताच मर्यादित नव्हता. धृवप्रदेशात अडकलेल्या पाण्यामुळे कमी झालेल्या पावसामुळे बहुतेक सर्व पृथ्वीच्या जीवनावर परिणाम झाला. दाट वर्षारण्ये असलेल्या भागांच्या ठिकाणी जेथे थोडाबहुत पाऊस टिकून होता तेथे झुडुपे असलेले गवताळ प्रदेश निर्माण झाले आणि जेथे पावसाचे मोठा अभाव झाला तेथे रखरखीत उष्ण वाळवंटे निर्माण झाली.
आफ्रिकेचा उत्तर भाग उष्ण ओसाड वाळवंट झाले; पश्चिम किनार्यावरिल विषुववृत्तावरचा थोडासा भाग पुरेश्या पावसामुळे वर्षारण्य टिकवून होता; आणि उर्वरित सर्व आफ्रिकेचे फार तर खुरटी झुडुपे असलेल्या गवताळ (कालाहारी) प्रदेशात रूपांतर झाले. या खुरट्या झुडूपे असलेल्या गवताळ भागांत एकमेकापासून संबद्ध तुटलेल्या मानवी वस्त्या (scrubby refuges) तयार झाल्या. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतल्या मानवांचा संबंध तर सहारा वाळवंटाच्या प्रसरणाने पूर्णपणे तुटला.
५५ अंश अक्षांशाच्या दक्षिणेकडच्या इतर सर्व आशियाचे गवताळ जमिनीत रूपांतर झाले. फक्त दक्षिणपूर्व आशिया आणि चीनच्या दक्षिण भागातील वर्षारण्ये पावसामुळे टिकून राहिली. संपूर्ण भारतातील अरण्ये नष्ट होऊन तेथेही गवताळ प्रदेश झाला. या सर्व गवताळ प्रदेशांत जागोजागी एकमेकापासून संबद्ध तुटलले मानवांचे गट (scrubby refuges) निर्माण झाले.
हिमयुगाच्या प्रभावाने खाली गेलेल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील समुद्रकिनार्यांवर मोठमोठे नवीन भूभाग उघडे झाले. अर्थातच थंडीपासून दूर पळणारे मानव तेथे पसरले. थंडीच्या कडाक्यापासून बचाव करत मध्य आशियातील काही मानव पुर्वीच्याच चार महानद्यांच्या काठावरच्या मार्गांनी पण आता उलट दिशेने दक्षिणेकडे परत फिरले. पण यातले फार थोडेच हा प्रवास यशस्वीपणे करू शकले. कारण जनुकीय पुरावा सांगतो की दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील बहुतेक सर्व मानव या निसर्गाच्या प्रकोपातून उरलेल्या मूळ स्थानिक लोकांपासूनच आलेले आहेत.
ऑस्ट्रेलियातील सर्व अरण्ये नष्ट झाली आणि त्यांचे वाळवंट किंवा फार तर गवताळ प्रदेशात रूपांतर झाले. तेथील उरलेल्या मानवी जथ्यांचा संबद्ध एकमेकापासून तुटला.
अमेरिका खंडाला हवामानाचा मोठा फटका बसला. तेथील सर्व जंगले नष्ट झाली आणि रखरखीत उष्ण अथवा बर्फाळ थंड वाळवंटे निर्माण झाली. मात्र आश्चर्यकारकरीत्या ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेस असलेल्या बेरिंगियामध्ये दोन glacial refuges तगून राहू शकली ! मात्र त्यांच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या पूर्वकिनार्यावरील थोडेसे मानव सोडता इतर सर्वजण नष्ट झाले.
वांशिक विलगन
हवामानाच्या या सगळ्या उलथापालथी काही शतके चालू होत्या. काही ठिकाणी हे परिणाम प्रखर आणि फार कमी वेळेत तर काही ठिकाणी हळू हळू झाले. बहुतेक वनस्पती, प्राणी आणि मानव नष्ट होत राहिले. ज्यांना जमले ते जीव दक्षिणेकडे स्थलांतर करत राहिले. या शिल्लक उरलेल्या (उत्तरेकडच्या स्थलांतरित आणि अगोदरच दक्षिणेत वसलेल्या) जीवांत तगून राहण्यासाठी अर्थातच जीवनमरणाची स्पर्धा झाली असणार... यात प्राणी-मानवात ही स्पर्धा जितकी झाली असणार तेवढीच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्तच स्पर्धा सुपीक मेंदू असणार्या मानव-मानवांत झाली असणार. या सगळ्याची परिणती जीवांची संख्या कमी होण्यात झाली... यात जैविक प्रजाती कमी होण्याबरोबर शिल्लक उरलेल्या प्रत्येक प्रजातितील सदस्यांची संख्या चिंताजनक म्हणावे इतकी कमी होण्यात झाली. उरलेले मुठभर मानवी समूह केवळ छोट्या संखेचे झाले इतकेच नाही तर एकमेकापासून मोठ्या भौगोलिक अंतराने पूर्णपणे विभागले गेले... ते अगदी काही हजार वर्षांनी हवामान सुधारेपर्यंत. अर्थातच या प्रत्येक छोट्या समुहातली जनुकीय उत्परिवर्तने स्वतंत्रपणे होत गेली आणि त्यांचे बाह्यरूप एकमेकापासून वेगळे करत राहिली. आफ्रिकेतून बाहेर पडलेला मानव पूर्वी हळू हळू पुढे सरकत असताना एक प्रकारची मानवी साखळी बनत गेली होती. मागे स्थायिक झालेल्या आणि पुढे गेलेल्या मानवांचा संपर्क पूर्णपणे तुटत नव्हता... किंबहुना एकमेकाचे नातेवाईक असल्याने त्यांची देवाण घेवाण चालूच असणार. त्याचबरोबर आफ्रिकेतून एकामागोमाग एक बाहेर पडणार्या जथ्यांच्या पुढे जाण्याबरोबर ही सरमिसळ अधिकच होत गेली असणार. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शेजारच्या मानवा-मानवात एकदम वेगळे बाह्यरूप दिसण्याइतपत बदल न दिसता असा बदल फार मोठ्या अंतरावर असलेल्या आणि फार मोठा काळ संबद्ध नसलेल्या मानवांमध्येच होत होता. या पद्धतीला प्रथम धक्का दिला तो तोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने... त्याने मानवजमातिची पौरात्य आणि पाश्चिमात्य अशी खूप वेगळे बाह्यरूप असलेल्या मानवांत विभागणी केली. शेवटच्या हिमयुगाच्या तडाख्याने तर मानवी स्थलांतराची पद्धतीच पूर्णपणे बदलून टाकली. जनुकशास्त्रिय पुरावे असे सांगतात की या हिमयुगाच्या तडाख्याने वेगळे झालेले मानवी समूह हवामान सुधारू लागल्यानंतरही फार दूर जाण्याचे टाळत आपापल्या खंडांत फक्त आजूबाजूलाच विस्तारले आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण केल्या. अगदी ५०० वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी आपल्या भूभागात येऊ पाहणार्या नवख्या लोकांचा यशस्वी सामना केला... किमान इतपत की त्यामुळे स्थानीक जमातींत जनुकीय आणि बाह्यरुपात फार सरमिसळ होऊ दिली नाही. म्हणजे अगदी आधुनिक वसाहतवादाचा उदय होईपर्यंत एका खंडाचे/उपखंडाचे लोक मोठ्या संख्येने दुसर्या खंडात/उपखंडात स्थलांतरित होऊ शकले नाहीत. अशा तर्हेने स्वतंत्रपणे होणार्या जनुकीय उत्परिवर्तनांमुळे व स्वतंत्र सामाजिक विकासामुळे प्रत्येक मानवी समूहाचे बाह्य (शारीरिक), भाषिक आणि सांस्कृतिक वेगळेपण वाढत जाऊन आज अस्तित्वात असणारे वेगवेगळे मानव वंश निर्माण झाले. मात्र हे जनुकीय फरक स्वतंत्र जीनस/स्पेसीज (genus/species) तयार होण्याच्या जवळपासही पोहोचत नाहीत. त्यामुळे देश, भाषा, वंश, रंग, चेहेरपट्टी, अंगकाठी, इ. वरवरची आवरणे जरी वेगवेगळी "दिसत" असली तरी थोडीशी कातडी खरवडली की आपण सगळेच आफ्रिकेतून बाहेर पडून निसर्गाच्या कुंभमेळ्यांत एकमेकापासून दुरावलेले Homo sapien sapien भाऊबंदच आहोत ! गंमत अशी की "थोडीशी कातडी खरवडणे" हा एक वाक्प्रचार असला तरी जनुकशास्त्रिय तपासणीसाठी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे !!! (क्रमशः ) .माहितीची सलगता कायम ठेवण्यासाठी हा भाग जरा लहान ठेवला आहे. मानवाच्या सफरीचा पुढचा महत्वाचा अध्याय दोन भागात विभागला जाऊ नये याकरिता हे आवश्यक होते.
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
वाचने
32908
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
हा पडाव देखील मस्त.
In reply to हा पडाव देखील मस्त. by अर्धवटराव
या भागातल्या कालखंडाच्या
✴✴✴✴✴ mast
सुरेख
In reply to सुरेख by सुनील
बहुतेक होय. हजारो वर्षे एकाच
In reply to बहुतेक होय. हजारो वर्षे एकाच by डॉ सुहास म्हात्रे
कृपया, "हजारो वर्षे एकाच
अतिशय सुरेख प्रवास.
In reply to अतिशय सुरेख प्रवास. by प्रचेतस
हेच म्हणतो.. वाचतोय.
आजवरचे सगळे भाग वाचले. मधले
In reply to आजवरचे सगळे भाग वाचले. मधले by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to आजवरचे सगळे भाग वाचले. मधले by विश्वनाथ मेहेंदळे
+१
भारी चाललाय हो प्रवास.
धन्यवाद !
+१
अक्षांश आणि रेखांश
In reply to अक्षांश आणि रेखांश by अमेरिकन त्रिशंकू
हेच
अनेकानेक धन्यवाद !
बॉस, तुमची लेखमाला अत्यंत
In reply to बॉस, तुमची लेखमाला अत्यंत by चाफा
+१
धन्यवाद !
थोडे विषयांतर होईल, पण प्रश्न
In reply to थोडे विषयांतर होईल, पण प्रश्न by शैलेंद्रसिंह
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by शैलेंद्रसिंह
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
अच्छा म्हणजे L3 भारतात आली
In reply to अच्छा म्हणजे L3 भारतात आली by शैलेंद्रसिंह
भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट
भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट आणि मदागास्कर प्लेट एकत्र असतांना M उत्परिवर्तन घडुन आले?ह्या प्लेट जोडलेल्या होत्या तो काळ २० कोटी अथवा जास्त वर्षांपूर्वीचा आहे. त्यामानाने माणसाचा सगळा काळ गेल्या दोन लाख वर्षांचा आहे आणि तो अफ्रिकेतून बाहेर पडून आशियात आला तो काळ जास्तीत जास्त ९०,००० वर्षांपूर्वीचा आहे आणि M उत्परिवर्तन ६०,०००वर्षांपूर्वी आस्तित्वात आले. अर्थात मानवाचा एकूण इतिहास भूपृष्टांच्या हालचालींच्या मानाने यकश्चित आहे... त्यांचा एकमेकाशी काहिही संबद्ध नाही. M भारतातून M1 मध्य आशियात सुपीक चंद्रकोरीच्या भागात व तेथून परत आफ्रिकेत उतरलेल्या एका छोट्या जथ्यातून तेथे गेले. मात्र हा मानवाच्या एकूण प्रवासातला मोठा टप्पा नाही. आफ्रिकेतली मूळ उत्परिवर्तने L आणि त्याचे उपभाग आहेत... त्यातले फक्त L3 हे आफ्रिकेबाहेर पडलेल्या आणि आज आस्तित्वात असणार्या मानवांत आहे. खालील चित्रात उत्परिवर्तनांचा एकूण प्रवास दाखवला आहे (जालाच्या सौजन्याने) ...In reply to भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट by डॉ सुहास म्हात्रे
खुप खुप धन्यवाद. हळु हळु
In reply to खुप खुप धन्यवाद. हळु हळु by शैलेंद्रसिंह
आज आस्तित्वात असणार्या
In reply to धन्यवाद ! by शैलेंद्रसिंह
ASI आणि ANI ह्यांचे admixture
ASI आणि ANI ह्यांचे admixture ही खुप अलीकडची घटना असल्याचेही वाचण्यात आले.यासंदर्भात तुम्ही दिलेल्या लिंकपेक्षा (जी मला उगाचच भडक केलेली आणि त्यामुळे अनेक डिस्क्लेमर्ससह असलेली आढळली) ही मी अगोदरच दिलेली सहाव्या भागातील लिंक पहा. तीच माहिती जास्त स्पष्ट आणि समतोलपणे दिलेली आहे. मात्र या दोन्हीतल्या "In ancient times, over 4000 years ago, there were two separate populations based in north and south India with no mixing." या वाक्याला अजून इंडिपेंडंट पियरची पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे ती अजूनतरी एक थियरी आहे. शिवाय हे मानले तर मग तोबानंतरच्या ७०,००० ते ४,००० वर्षांपूर्वीतच्या भल्यामोठ्या कालखंडात भौगोलिकदृष्ट्या जवळ राहणार्या ASI आणि ANI यांचा संबद्ध अजिबात का आला नाही हा प्रश्न बाकी राहतोच.एकूण एक भाग वाचते आहे आणि
तुमचा विस्तृत वाचन आहे म्हणून
In reply to तुमचा विस्तृत वाचन आहे म्हणून by स्रुजा
अनेक धन्यवाद !
लेखमाला सुरेख चालू आहे.
वाचतोय.
धन्यवाद !
मालक धन्यवाद
In reply to मालक धन्यवाद by वसईचे किल्लेदार
धन्यवाद !
वाचतोय..
In reply to वाचतोय.. by मोदक
धन्यवाद !
वाचतोय
In reply to वाचतोय by तिमा
धन्यवाद !
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
+१
धन्यवाद !