देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही. पण या कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी रिलेशन आहे हे बहुदा गृहित धरल्यामुळे कर्मकांडांविरूध्द असलेला रोष हा देवाविरूध्द असलेल्या रोषात कधी बदलतो हे समजत नाही.तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का? उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही पण निदान या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा अशी नम्र विनंती.
अनेकांना असे वाटते की कोणत्यातरी गोष्टीची भिती दाखविल्याशिवाय किंवा कसलेतरी प्रलोभन दाखविल्याशिवाय आपण चांगले वागूच शकत नाही का?माझ्या मुद्द्याचा नेमका हाच गाभा आहे. मनुष्य स्वभावच (in general) असा आहे की आपल्याला पाहिजे असलेली एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करवून घेण्यासाठी कसलेतरी प्रलोभन किंवा भिती दाखवावीच लागते.लहान मुलांनाही तुला चॉकलेट देईन हे प्रलोभन किंवा ते चालले नाही तर मार देईन ही भिती दाखवावीच लागते ना?दोन-तीन वर्षाची लहान मुले वागण्यात/ विचारात कोणतीही भेसळ न झालेली म्हणजेच मनुष्यस्वभाव आहे त्याचे अगदी निरागस रूप असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.तरीही त्यांनाही एक तर चॉकलेटचे प्रलोभन नाहीतर माराची भिती यापैकी एक काहीतरी दाखवावे लागतेच ना?बरं मोठे झाल्यानंतर वेगळी परिस्थिती असते का?कारखान्यांमधून प्रदूषण होते आणि त्या प्रदूषणाचे वाईट परिणाम होतात हे सर्वमान्य आहे.पण किती कारखानदार स्वत:हून प्रदूषण कमी करायचा प्रयत्न करतात?त्यांनाही प्रदूषण कमी केल्याबद्दल करांमध्ये सवलतींचे प्रलोभन नाहीतर दंडाची भिती दाखवावीच लागते ना?मी भारतातील माझ्या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शिक्षणसंस्थेचा विद्यार्थी होतो आणि अमेरिकेतही reputation च्या बाबतीत मध्यम असलेल्या शिक्षणसंस्थांचा मी विद्यार्थी राहिलो आहे.या संस्थांमध्ये पर्यवेक्षक नसलेली एकही in-class परिक्षा मी अजूनपर्यंत बघितलेली नाही. Take home परिक्षांमध्येही turn-it-in नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दोन विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून किंवा आंतरजालावरील कोणत्याही संकेतस्थळावरून कॉपी केली आहे का हे समजू शकते.मी नाकासमोर चालणारा मनुष्य असल्यामुळे मी अगदी टेक-होम परिक्षांमध्येही कॉपी करायच्या भानगडीत कधीच पडलो नाही.अमेरिकेत आमच्या विद्यापीठातच दोन भारतीय विद्यार्थ्यांना असे पकडून त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यापर्यंत वेळ गेली होती हे मी स्वत: बघितले आहे.म्हणजे टेक-होम परिक्षांमध्येही त्या सॉफ्टवेअरच्या रूपातून पर्यवेक्षक असतोच.
आता एक गोष्ट सांगा की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये हे जगातील अगदी सगळ्या शिक्षणसंस्थांच्या संचालकांना वाटत असेल आणि कॉपी करणे अयोग्य आहे याविषयीही दुमत नसावे.पण तरीही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पर्यवेक्षकांशिवाय परिक्षा होऊ शकत नाही याचे काय कारण असावे?पकडले जायची भिती नसेल तर किती विद्यार्थी "कॉपी करणे वाईट आहे" याच एका कारणावरून कॉपी करणार नाहीत?जर एखाद्या परिक्षेच्या वेळी पाहिजे तितकी तयारी झाली नसेल तर कदाचित माझ्यासारखा मनुष्यही कॉपी करायला उद्युक्त होऊ शकेल.पण पकडले गेल्यास परिणाम वाईट होतील त्यापेक्षा कमी मार्क मिळालेले परवडले असे वाटून माझ्यासारखे अनेक त्यापासून परावृत्त होतील. म्हणजे "पकडले जायची भिती" या स्वरूपात भिती आलीच.
आता एक गोष्ट सांगा की देवाची संकल्पना तरी नक्की काय वेगळी आहे?एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचे पाप मला लागेल (आणि देव त्याची शिक्षा मला करेल ही भिती) आणि एखादी चांगली गोष्ट केल्यास त्याचे पुण्य मला मिळेल (आणि कोणत्यातरी स्वरूपात त्याचे बक्षिस मला मिळेल हे प्रलोभन) या कारणामुळे का होईना योग्य त्या गोष्टी केल्या जात असतील तर त्याच वाईट काय?ज्यावेळी आपण काय करत आहोत हे कोणीही बघत नसतो तेव्हा आपण कसे वागतो/काय करतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे.पण कोणीही बघत नसले तरी देव बघत आहे या जाणिवेतून का होईना जर चांगली कृत्ये केली जात असतील तर त्यात काय वाईट आहे?जर असे कोणतेही प्रलोभन किंवा भिती नसतानाही जर कोणी चांगले वागत असेल तर अती उत्तम पण बहुसंख्य लोक तसे असतात का?आणि अशांसाठी देव ही संकल्पना असणे हे महत्वाचे आहे.
आता एक प्रश्न नक्कीच उभा राहिल की चांगले काय आणि वाईट काय याची व्याख्या प्रत्येक माणसापरत्वी बदलेल.तेव्हा नक्की चांगले काय आणि वाईट काय हे ठरविणार कोण?या दृष्टीने धर्म या संकल्पना महत्वाची आहे असे मला वाटते.म्हणजे नक्की चांगले काय आणि वाईट काय हे (मुळातल्या) धर्मात सांगितले असावे/आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात दुर्बलता आहे असे अनेकांना का वाटते हे समजत नाही.अमेरिकेत असे असते आणि तसे असते असे इथेच अनेकदा लिहिले जाते.तर मग देवाविषयी त्याच अमेरिकेत काय बोलले/लिहिले जाते हे लिहितो.अमेरिकेच्या सरकारचा अधिकृत मोटो आहे---"In God we trust". अमेरिकेतल्या नाण्यांवर आणि नोटांवर हा मोटो लिहिलेला असतो. अमेरिकेचे अध्यक्ष शपथ घेतात तेव्हा ती शपथ आहे: "I, XYZ, do solemly affirm that I will faithfully execute the office of President of United States and to the best of my ability preserve, protect and defend the constitution of United States. So help me God". जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा शपथ घेतल्यानंतर हे So help me God हे चार शब्द अनवधनाने उच्चारले आणि त्यानंतर हे शब्द शपथेचाच भाग करण्यात आले. (२० जानेवारी २०१३ ला बराक ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतील तेव्हा हे बघायला मिळेल). तसेच अमेरिकेचे राष्ट्रगीत आहे: God bless America my home sweet home. आमचा देवावर विश्वास आहे हे (अजून तरी) महासत्ता असलेल्या देशाला म्हणण्यात कसलेही वैषम्य वाटत नाही तेव्हा देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात काहीही दुर्बलता नाही हे समजून यायला हरकत नाही. (अमेरिकेत जर काही नसले तर देवाच्या नावावर रस्यावर चाललेला धांगडधिंगा ---जो आपल्याकडे गणेशोत्सव आणि अमक्यातमक्या महाराजांच्या जयंत्यांच्या दिवशी चालू असतो.)
माणसाला subconscious mind म्हणून एक अत्यंत सामर्थ्यवान असलेले एक मन असते.कोणत्याही औषधाची चाचणी घेताना नेहमी दोन वेगळ्या गटांवर चाचणी घेतली जाते असे वाचनात आले आहे.पहिल्या गटाला ते औषध देतात तर दुसऱ्या गटाला औषध देत आहे असे सांगून निरुपयोगी आणि निरूपद्रवी असे placebo देतात.आता असे placebo द्यायचे कारण काय असावे? आपल्यावर काही उपचार केले जात आहेत या भावनेतून एक मनाची उभारी येते आणि रूग्णाला बरे करण्यात या मनाच्या उभारीचाही भाग असतोच.तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासून बघताना मनाची उभारी आणि त्यातून बरे वाटणे हा factor बाजूला काढून केवळ औषधाची standalone उपयुक्तता तपासून बघण्याच्या दृष्टीने placebo देतात. Napoleon Hill या लेखकाचे एक खूप सुंदर वाक्य आहे (आणि मला या वाक्याचा स्वत:ला खूपच उपयोग झाला आहे):"Whatever the human mind can conceive and believe it can achieve". आता ही मनाची उभारी द्यायचे काम देव ही संकल्पना करत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? देव आपल्याबरोबर आहे तेव्हा आपले कोणी वाकडे करू शकत नाही या भावनेतून मनाची उभारी मिळत असेल तर त्यात चुकीचे काय?अनेक लोक सर्वकाही सुरळीत चालू असते तेव्हा आम्ही हे करू आणि ते करू असे दावे जरूर करत असतात.पण एखाद्या संकटाच्या वेळी मात्र त्यांचे हात देवासमोर आपोआप जोडले जातात हे पण अनेकदा बघायला मिळते.
मला स्वत:ला देव या संकल्पनेचा खूपच फायदा झाला आहे.चार-पाच वर्षांपूर्वी मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले.लेखकाने लिहिले आहे की देवाचे आपल्या आजूबाजूला अस्तित्व आहे हे नुसते मानू नका तर ते feel करा.तसेच "I can do all things through Christ who strengthens me" अशा स्वरूपाची वाक्ये म्हणा.या गोष्टी मी केल्या आणि त्याचा नक्कीच फायदा मला झाला.मी त्या संकटातून बाहेर पडलो त्यात या prescription मुळे मला मिळालेल्या मनाच्या उभारीचा वाटा मी केलेल्या कष्टांइतकाच आहे असे मला वाटते. हे वाचणाऱ्या अत्यंत rational आणि पुरोगामी मंडळींनाही मी सांगतो की तुम्ही कोणत्याही संकटात पडावे ही अजिबात इच्छा नाही पण समजा अशा संकटात सापडलात तर या prescription चा उपयोग करून बघा नक्की फायदा होईल.अर्थातच या गोष्टींचा उपयोग होण्यासाठी थोडेतरी सश्रध्द मन हवे.जर देव अस्तित्वातच नाही असेच गृहित धरून चालले तर या prescriptions चा अजिबात उपयोग होणार नाही.
देवाच्या आणि धर्माच्या नावाने अवडंबर करून रस्त्यावर धांगडधिंगा करणे, कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर कान फाटायची वेळ येईपर्यंत बोंबलणे,देवा-धर्माच्या नावाने लोकांना लुबाडणे इत्यादी गोष्टींचा मला मनस्वी तिटकारा आहे हे मी याच व्यासपीठावर अनेक वेळा लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.या गोष्टी होतात म्हणून देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्यांना मी एक प्रश्न परत एकदा विचारतो की तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? देव या संकल्पनेला की देवाच्या नावावर केल्या जात असलेल्या धांगडधिंग्याला?
देव आणि धर्म या संकल्पनेची उपयुक्तता याविषयी माझे मत वर लिहिलेच आहे.तरी आपण अमक्या धर्मात जन्माला आलो याचा अभिमान आणि "आमचाच" धर्म कसा श्रेष्ठ या गोष्टी मला अजिबात समजलेल्या नाहीत.पण हा मुळातला विषय नसल्यामुळे याविषयी काही लिहित नाही.
त्याचप्रमाणे काय हा देव, समाजातले अन्याय आणि इतर वाईट गोष्टी तो थांबवू शकत नाही म्हणून त्याला रिटायर करा असे म्हणणारे लोक असतात.म्हणजे कुठेतरी देव हा या गोष्टी थांबवू शकेल हे त्यांनीही मान्य केलेले असते का अशी शंका वाटल्यावाचून राहत नाही.अशा मंडळींना माझे सांगणे एकच की देव ही एक उपयुक्त संकल्पना माणसानेच निर्माण केली असली तरी त्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर आहे.अणुउर्जेचा वापर वीज निर्माण करायला करायचा की बॉम्ब बनवायला हे आपणच ठरवायचे.तीच गोष्ट काहीशी देवाच्या संकल्पनेबाबत.जर समाजात अन्याय करणारे लोक असतील तर त्याचे खापर देव या संकल्पनेवर का फोडता?
तेव्हा देव रिटायर करायचा की त्याच्या नावाने चाललेला धांगडधिंगा रिटायर करायचा याचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेल्यांनी शोधल्यास बरे होईल.
Amen.
वाचने
42395
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा ही एक पैलु आहे.
देव हा कारण नसून 'कर्ता' आहे
In reply to हा ही एक पैलु आहे. by अर्धवटराव
त्यात फरक नाहि
In reply to देव हा कारण नसून 'कर्ता' आहे by सस्नेह
विचारप्रवर्तक लेख
एक दुरुस्ती
In reply to विचारप्रवर्तक लेख by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to विचारप्रवर्तक लेख by श्रीरंग_जोशी
माणसाला subconscious mind
दगड कि देव.
हाहाहा
In reply to दगड कि देव. by प्रभाकर पेठकर
रिटायर कसा करणार?
खुप खुप धन्यवाद. पुन्हा एक
देवपण
प्रतिसाद
In reply to देवपण by तिमा
जरा जपुन
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
द मिथ ऑफ सिसिफस
In reply to देवपण by तिमा
आयुश्य ही सिसिफसची शोकांतिका
In reply to द मिथ ऑफ सिसिफस by आबा
संपूर्ण लेख " देवाला रिटायर
अगदी हेच म्हणणे आहे माझेही.
देवाला रिटायर करा म्हणजे
कोणास ठाऊक
In reply to देवाला रिटायर करा म्हणजे by दादा पेंगट
लेखाचा आशय आवडला.
देवावर विश्वास की सोपा उपाय?
बराबर छे,,
In reply to देवावर विश्वास की सोपा उपाय? by आनंद घारे
उत्तम लेख!
सोयीची
In reply to उत्तम लेख! by पैसा
अतिशय समर्पक प्रतिसाद.
In reply to उत्तम लेख! by पैसा
तेव्हा देवाला रिटायर करा असे
जोपर्यंत माणूस 'प्रमादशील'
बौध्दिक विषय.
व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे
+१११
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
पूर्णपणे सहमत.
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
वड्याचे तेल वांग्यावर काढू नका
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to वड्याचे तेल वांग्यावर काढू नका by क्लिंटन
@ क्लिंटन : तुम्हाला तुमच्या तर्काचा फोलपणा लक्षात येत नाहीये
In reply to वड्याचे तेल वांग्यावर काढू नका by क्लिंटन
.
In reply to @ क्लिंटन : तुम्हाला तुमच्या तर्काचा फोलपणा लक्षात येत नाहीये by संजय क्षीरसागर
खुदको कर बुलंद इतना..
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
सदा सर्वदा
अज्ञेयपेक्षा `रहस्यमय' हा अॅटिट्यूड जास्त काव्यात्मक
In reply to सदा सर्वदा by विकास
-१
In reply to अज्ञेयपेक्षा `रहस्यमय' हा अॅटिट्यूड जास्त काव्यात्मक by संजय क्षीरसागर
`कुणी तरी मला कडेवर घेईल' आणि `मी अज्ञाताला बिंधास्त सामोरा जाईन
In reply to -१ by विकास
,,,
In reply to `कुणी तरी मला कडेवर घेईल' आणि `मी अज्ञाताला बिंधास्त सामोरा जाईन by संजय क्षीरसागर
शब्दांच जाऊ द्या, `त्या पलिकडे' काय अर्थ आहे
In reply to ,,, by विकास
माझं मत
एक मुद्दा राहुन गेला की आलाय
देवाला रिटायर न करता त्याचा
धांगडधिंगा या शब्दाची ......
व्यक्तिश : मला लेख आवडला ,
+१
In reply to व्यक्तिश : मला लेख आवडला , by स्पा
वेगळे काय सांगायचे?
In reply to +१ by अमोल खरे
लेख छान आहे
गीतेमध्ये श्री कृष्णाने
In reply to लेख छान आहे by चेतन माने
मला आधी भलतीच शंका आली!
एकत्रित प्रतिसाद
परत एकदा असहमत...
In reply to एकत्रित प्रतिसाद by क्लिंटन
पाप पुण्य
In reply to परत एकदा असहमत... by दादा कोंडके
तेच तर...
In reply to पाप पुण्य by प्रकाश घाटपांडे
घाटपान्डे साहेब,
In reply to पाप पुण्य by प्रकाश घाटपांडे
ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का?
ज्याला स्वाभिमान आहे तो कधीही गैरकृत्य करत नाही.
In reply to ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का? by संजय क्षीरसागर
अंतीम विश्लेषणात - तुमचं मनच तुम्हाला लज्जित करतं
In reply to ज्याला स्वाभिमान आहे तो कधीही गैरकृत्य करत नाही. by अर्धवटराव
गैरकृत्य घडत नाहि???
In reply to अंतीम विश्लेषणात - तुमचं मनच तुम्हाला लज्जित करतं by संजय क्षीरसागर
करेक्शन पाहीजे का?
In reply to ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का? by संजय क्षीरसागर
मी काय म्हननार?
In reply to करेक्शन पाहीजे का? by यसवायजी
मग प्रश्नच मिटला. कसाब
In reply to मी काय म्हननार? by संजय क्षीरसागर
कसाब सारख्या या विषयातल्या
In reply to मग प्रश्नच मिटला. कसाब by विश्वनाथ मेहेंदळे
ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे
???
In reply to ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे by संजय क्षीरसागर
अजुन एक अवांतर मुद्दा.
In reply to ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे by संजय क्षीरसागर
शिर्षकावरुन वाटलं.. सचिन
एक प्रश्न / निरीक्षण
शीर्षक चुकीचय
In reply to एक प्रश्न / निरीक्षण by विकास
एकत्रित प्रतिसाद-२
अब आगए लाईनपे!
In reply to एकत्रित प्रतिसाद-२ by क्लिंटन
+१
In reply to अब आगए लाईनपे! by संजय क्षीरसागर
फरक
In reply to +१ by दादा कोंडके
तुम्ही अहंकार नको म्हणून देव मानताय की दुष्कृत्य होऊ नये म्हणून?
In reply to फरक by क्लिंटन
बालिश हे मी कल्पनेला म्हटलय
In reply to . by क्लिंटन
बालिश हा उल्लेख तशी कल्पना
In reply to बालिश हे मी कल्पनेला म्हटलय by संजय क्षीरसागर
धन्यवाद
In reply to बालिश हा उल्लेख तशी कल्पना by गवि
एका
In reply to व्यक्तीगत कमेंट करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
+१
In reply to एका by गवि
माझा रोख वैयक्तिक नाही
In reply to +१ by क्लिंटन
धन्यवाद
In reply to तुम्ही अहंकार नको म्हणून देव मानताय की दुष्कृत्य होऊ नये म्हणून? by संजय क्षीरसागर
इदं न मम
In reply to धन्यवाद by क्लिंटन
हे चित्र मी माझ्याच
In reply to धन्यवाद by क्लिंटन
Thirty Years' War
देव आणि कर्मकांडे
देवाला रिटायर करू नये असं
देवाचं "पॅकेज" काय असेल असा
In reply to देवाला रिटायर करू नये असं by निवांत पोपट
`पॅकेज' हे `डील' या अर्थी
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
पुन्हा एकदा अपरिहार्यपणे
In reply to `पॅकेज' हे `डील' या अर्थी by संजय क्षीरसागर
>
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
देवाचा CTC कोण ठरवत असेल हो
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
CTC
In reply to देवाचा CTC कोण ठरवत असेल हो by खबो जाप
छान चर्चा आणि प्रतिसाद.
जो स्वत:च्या घरात, उजेड पाडू शकत नाही...
In reply to छान चर्चा आणि प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to छान चर्चा आणि प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to :) by पैसा
गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला
एक्स्क्युज मी.
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
आता जरा बायको बरोबर फिरायला जातोय
In reply to एक्स्क्युज मी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to आता जरा बायको बरोबर फिरायला जातोय by संजय क्षीरसागर
अरे बापरे
In reply to +१ by स्पा
Perspectives differ
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
इथे प्रचंड फारकत आहे कारण देव
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
जसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा
कुबडी ही लंगड्याकरताच
अगदी सुंदर उदाहरण दिलंत. इथे
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
प्रथमदर्शनी मलाही उदाहरण
In reply to अगदी सुंदर उदाहरण दिलंत. इथे by गवि
उदाहरण हे एक्झॅक्टली
In reply to प्रथमदर्शनी मलाही उदाहरण by बाळ सप्रे
सचिन तेंडुलकर आणि गांधी
In reply to उदाहरण हे एक्झॅक्टली by गवि
थोडे अधिक
In reply to उदाहरण हे एक्झॅक्टली by गवि
क्लिंटन, तू म्हणतोयस ते शंभर
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
बरं मग तुमचे यावर सोल्युशन
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
सोल्युशन?
In reply to बरं मग तुमचे यावर सोल्युशन by गवि
चर्चा
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
वाह!!! किती समर्पक उत्तर दिलत
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
समजले नाही
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
टैम प्लीज!
प्रत्येक मनुष्याला जीवनात
अगदी.. +१
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
उगाच आता फाटे फोडू नका..
In reply to अगदी.. +१ by गवि
..
In reply to उगाच आता फाटे फोडू नका.. by स्पा
आणि
In reply to अगदी.. +१ by गवि
होय...
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
+२
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
पृथ्वी,चंद्र,विविध ग्रह,
In reply to +२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढे विचार करायला मला कधी
+१
In reply to एवढे विचार करायला मला कधी by ५० फक्त
+१
In reply to एवढे विचार करायला मला कधी by ५० फक्त
देव नाही
क्लिंटनचे कौतुक करावेसे वाटते
सगळ्यांशीच सहमत.
म्हणजे ?
In reply to सगळ्यांशीच सहमत. by कवितानागेश
क्लिंटनचे लेखाबद्दल, गविचे समन्वयाबद्दल आणि
आभार
In reply to क्लिंटनचे लेखाबद्दल, गविचे समन्वयाबद्दल आणि by संजय क्षीरसागर
येस! आणि नानांचे, चर्चा संपल्यावर आल्याबद्दल.
In reply to आभार by नाना चेंगट
आता ही मनाची उभारी द्यायचे
मेख
In reply to आता ही मनाची उभारी द्यायचे by प्रकाश घाटपांडे
अस्पृश्यता मानणारी वृत्ती
In reply to मेख by विकास
घाबरुन राहायचं ते माणसाला, देवाला नव्हे...
मस्तच!
In reply to घाबरुन राहायचं ते माणसाला, देवाला नव्हे... by योगप्रभू
मग
आस्तिकता आणि नास्तिकता
तेव्हा "देवाला रिटायर करा"
In reply to आस्तिकता आणि नास्तिकता by अवतार
मुळात "देवाला रिटायर करा" हेच
In reply to आस्तिकता आणि नास्तिकता by अवतार
"ते एक आवाहन राहते."
In reply to मुळात "देवाला रिटायर करा" हेच by बाळ सप्रे
कोणी Ancient Aliens पहिले
तेच ना ते अजिंठा वेरूळची लेणी
In reply to कोणी Ancient Aliens पहिले by पुष्कर जोशी