देवाला रिटायर का करा?
In reply to हा ही एक पैलु आहे. by अर्धवटराव
In reply to देव हा कारण नसून 'कर्ता' आहे by सस्नेह
In reply to विचारप्रवर्तक लेख by श्रीरंग_जोशी
आपल्यावर संकटे आली असताना जर असा विचार केला की एकतर आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या इतर मोठ्या संकटाला सामोरे जायची क्षमता विकसीत करण्यासाठी म्हणूनकृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे.
आपल्यावर संकटे आली असताना जर असा विचार केला की एकतर आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत म्हणून किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या इतर मोठ्या संकटाला सामोरे जायची क्षमता विकसीत करण्यासाठी म्हणून'म्हणून' हा शब्द टंकताना गाळला गेल्याने वाक्याचा अपेक्षित परिणाम साधला जात नव्हता...
In reply to विचारप्रवर्तक लेख by श्रीरंग_जोशी
माणसाला subconscious mind म्हणून एक अत्यंत सामर्थ्यवान असलेले एक मन असते.कोणत्याही औषधाची चाचणी घेताना नेहमी दोन वेगळ्या गटांवर चाचणी घेतली जाते असे वाचनात आले आहे.पहिल्या गटाला ते औषध देतात तर दुसऱ्या गटाला औषध देत आहे असे सांगून निरुपयोगी आणि निरूपद्रवी असे placebo देतात.आता असे placebo द्यायचे कारण काय असावे? आपल्यावर काही उपचार केले जात आहेत या भावनेतून एक मनाची उभारी येते आणि रूग्णाला बरे करण्यात या मनाच्या उभारीचाही भाग असतोच.तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासून बघताना मनाची उभारी आणि त्यातून बरे वाटणे हा factor बाजूला काढून केवळ औषधाची उपयुक्तता तपासून बघण्याच्या दृष्टीने देतात.प्रचंड श्रद्धा आणी पुरेसा आत्मविश्वास एखाद्या मानसाला खोटेच सांगीतले कि तुला असाध्य आजार झाला आहे,तरी तो अर्धमेला होउन जातो.अन आजार झालेला असताना देखील तो न कळल्याने (न सांगितल्याने)त्याच्या मनावर यत्कींचीतही परीणाम होत नाही,(निदान दोन दिवस तर जास्त जगतो)
In reply to दगड कि देव. by प्रभाकर पेठकर
In reply to देवपण by तिमा
पण त्याचे अवडंबर माजवून, कामापेक्षा वा लोकांची सेवा करण्यापेक्षा जर कर्मकांडाला जास्त महत्व प्राप्त झाले तर त्याला आमच्यासारख्यांचा विरोध असतो. तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना विरोध असणारच, कारण त्यामुळे आवाज, धांगडघिंगा, दादागिरी, रहदारीला अडथळे असले त्रास विनाकारण सहन करावे लागतात.या प्रकारांना माझा प्रचंड विरोध आहे नव्हे तिटकारा आहे हे इथेच मी अनेक वेळा लिहिले आहे.मी तर म्हणतो की गणेशोत्सवात किंवा इतर कोणत्याही प्रसंगी रस्त्यावर धांगडधिंगा करून पब्लिक न्युसन्स करणाऱ्यांविरूध्द अगदी कडक कारवाई व्हायला हवी.ज्यांना गणपती उत्सव साजरा करायचा आहे त्यांनी त्यांच्या घरी साजरा करावा लाऊडस्पीकरवर बोंबलून त्रास देऊ नये हेच माझेही मत आहे. अनेक लोकांचा अशा धांगडधिंग्यामुळे देवावरील विश्वास उडतो ही अगदी नेहमी सामान्यपणे दिसणारी गोष्ट आहे.पण ते योग्य आहे का?म्हणजे कर्मकांडांचा फोलपणा लक्षात येऊन देवावरचा विश्वास उडत असेल तर कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी कोरिलेशन आहे हे मुळातच गृहित धरल्यासारखे झाले.हे गृहितक मुळातच बरोबर आहे का? माझा मुद्दा स्पष्ट करायला आणखी काही उदाहरणे देतो: १. महात्मा गांधींचे नाव घेत सत्तेवर आलेल्यांपैकी अनेकांनी भ्रष्टाचार/गुंडगिरी वगैरे केली.हे किळसवाणे प्रकार बघून मुळातच महात्मा गांधींवरचा आणि त्यांच्या विचारांवरचा विश्वास उडणे कितपत योग्य आहे? २. संसदेत निवडून आलेले खासदार हे एक नंबरचे लफंगे आणि भ्रष्टाचारी आहेत म्हणून ज्या व्यवस्थेतून ते निवडून येतात (लोकशाही) त्यावरील विश्वास उडणे कितपत योग्य आहे? ३. शिवाजी महाराज आणि शंभूराजांचे नाव घेत संभाजी ब्रिगेडवाली मंडळी उघड-उघड गुंडगिरी करतात.म्हणून मुळातच शिवाजी महाराज किंवा शंभूराजे वाईट ठरतात का? तेव्हा देवाच्या नावाने जो धांगडधिंगा घातला जातो त्यावरून देवावरचाच विश्वास उडत असेल तर अशाच मंडळींना माझा मुळातला प्रश्न आहे--तुमची तक्रार देवाविरूध्द आहे की देवाच्या नावाने चाललेल्या धांगडधिंग्याविरूध्द आहे हे तुम्ही तपासून बघितले आहे का?
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to देवपण by तिमा
In reply to द मिथ ऑफ सिसिफस by आबा
आयुश्य ही सिसिफसची शोकांतिका आहेमी आधी चुकून सिफीलसची शोकांतिका असे वाचले आणि हापिसात दुपारी डोळ्यावर हमखास येणारी झोप उडली.... पण मग संजयकाकांचे प्रतिसाद वाचून परत आली ;-)
In reply to देवाला रिटायर करा म्हणजे by दादा पेंगट
देवाला रिटायर करा म्हणजे नेमक्या कोणत्या देवाला रिटायर करायचे ? ब्रह्माला ? विष्णूला ? शंकराला ? इंद्रला ? वरूणाला ? नेमक्या कोणत्या ?या प्रश्नाचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेलेच देऊ शकतील :)
In reply to देवावर विश्वास की सोपा उपाय? by आनंद घारे
In reply to उत्तम लेख! by पैसा
बहुतेक सगळ्या मोठमोठ्या डॉक्टर्स आणि सर्जन्सच्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समधे, अनेकदा डॉक्टर्सच्या टेबलावर मी साईबाबा, गणपती किंवा इतर देवांची चित्रे किंवा पुतळे पाहिले आहेत. पेशंटच्या जीवन मरणाची जबाबदारी थेट ज्यांच्यावर असते त्या डॉक्टर्सना ही भावना सुखावह वाटते तर सामान्य माणसांची काय कथा!सुखावह वाटते का माहित नाही पण सोयीची नक्कीच आहे. हुश्य! बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to उत्तम लेख! by पैसा
तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का?परमेश्वराला रिटायर करा असे म्हणताना ' परमेश्वर ही संकल्पनाच मोडीत काढा' असा अर्थ अभिप्रेत आहे. श्रीराम लागूंनी मटा मधे लिहिलेल्या लेखाला हे संपादकांनी शीर्षक दिले होते; लागूंनी नाही. शीर्षक सनसनाटी असल्याने हा लेख गाजला. परमेश्वर ही संकल्पना आम्ही मानीत नाही व तुम्हीही मानू नका असा तो संदेश आहे. एक वर्ग असा आहे कि त्याचा देव या संकल्पनेला विरोध नाही पण त्यानावाखाली चाललेल्या शोषण व कर्मकांडाला विरोध आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेत समिती देवाधर्माबद्दल तटस्थ आहे असेच मांडले आहे. हा काहींना स्ट्रॅटीजिकल मुद्दा वाटतो व तो तसा आहे देखील. समिती जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकवादाचा अंगीकार करा अशी भूमिका मांडते. पण जीवनातील अनिश्चिततेला सामोरे जाताना प्रत्येकाला ही भूमिका आयुष्यातील सर्व टप्प्यांवर आधार देईलच याची शाश्वती नाही असे मला व्यक्तिशः वाटते. श्रद्धा ही माणसाला आत्मिक बळ देते या विषयी दाभोलकरांचे देखील दुमत नाही. मग ती श्रद्धा देवावर असेल विचारांवर असेल, तत्वावर असेल, माणुसकीवर असेल त्याने फरक पडत नाही. मानवी मन हे अजून विज्ञानाला संपूर्णपणे उमगलेले नाही. यावर दुमत नसावे. ईश्वर या संकल्पनेचा उगम मानवी मनात आहे. या मनाचे स्थान मेंदूत आहे हे आजतरी विज्ञानाला मान्य आहे. ईश्वर ही संकल्पना प्रत्येकाची वेगळी असू शकते. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन वगैरे वगैरे. मानवी मनाला कधी ना कधी आधाराची गरज लागतेच. मग तो अस्तिक असो वा नास्तिक. मनुष्य हा काही जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे कि ज्याला विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन वगैरे गोष्टीचा प्रोग्राम फिड केला आहे. त्याला भावना आहेतच की. आता राहिला मुद्दा उपयुक्ततेचा. जोपर्यंत ईश्वर या संकल्पनेची उपयुक्तता मानवी जीवनात आहे तो पर्यंत ईश्वर ही संकल्पना राहणारच. ज्यावेळी ही उपयुक्तता संपेल त्यावेळी ईश्वर ही संकल्पना आपोआप हद्दपार होईल. कारण ईश्वर ही संकल्पना मानवानेच निर्माण केली आहे.
मला स्वत:ला देव या संकल्पनेचा खूपच फायदा झाला आहे.चार-पाच वर्षांपूर्वी मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणलेउत्तम!
तेव्हा देव रिटायर करायचा की त्याच्या नावाने चाललेला धांगडधिंगा रिटायर करायचा याचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेल्यांनी शोधल्यास बरे होईल.प्रश्न इतका सोपा नाही.
अमेरिकेच्या सरकारचा अधिकृत मोटो आहे---"In God we trust"तुम्ही त्यांना विचारा `विच गॉड?' मग तुम्हाला कळेल त्यांचा गॉड, तुमच्या गॉडपेक्षा ( किंवा इतरांच्या गॉडपेक्षा) वेगळा आहे. या भिन्न गॉडसमुळे जगाच विभाजन आहे आणि प्रत्येकाला `आपल्या गॉडच' साम्राज्य प्रस्थापित व्हावं असं वाटतय. जगातला फार मोठा कलह गॉड या निव्वळ कल्पनेमुळे आहे. मग तुमच्या लक्षात येईल की जी स्थिती जगाची तीच देशांतर्गत आहे. खुद्द आपल्या देशातली अशांतता देवाबरोबर आपसूक येणार्या जातीमुळे आहे. पर्सनल लेवलला कुणी काहीही मानून सुखानं जगावं, आनंद आहे. पण तसं होत नाही कारण प्रत्येकाला आपलाच गॉड खरा वाटतो. गॉड एकटा येत नाही तो अनेक धर्म, पंथ आणि जाती बरोबर घेऊन येतो. गॉड या कल्पनेनं एकसंध मानवता निष्कारण विभागली गेलीये आणि मानवी कलहाच ते एक प्रमुख कारण आहे. व्यक्तीगत श्रद्धेबद्दल बोलायच झालं तर देव ही आपणच केलेली कल्पना आहे हे लक्षात आल्यावर तिच्यावर विसंबणं किंवा भार टाकणं म्हणजे `खुदही खुदको च्युतिया बनाना है!' त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे. तुम्ही नेहमी वस्तुनिष्ठ राहता आणि भावनिक गोंधळापासून मुक्त होता.
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
या भिन्न गॉडसमुळे जगाच विभाजन आहे आणि प्रत्येकाला `आपल्या गॉडच' साम्राज्य प्रस्थापित व्हावं असं वाटतय. जगातला फार मोठा कलह गॉड या निव्वळ कल्पनेमुळे आहे.हा दोष कोणाचा?गॉडचा की आपलाच गॉड सर्वश्रेष्ठ असे मानणाऱ्यांचा? अमेरिकेतील एनरॉन कंपनीत गैरव्यवहार करून अनेक लोकांची आयुष्यभराची पुंजी बुडवायला कारणीभूत असणारे लोक कोण आणि त्यांचे शिक्षण कुठे झाले? केनेथ ले हा युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनचा, जेफ स्किलिंग हावर्ड बिझनेस स्कूलचा आणि ऍन्ड्र्यू फॅस्टॉ नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचा. मध्यंतरी शिक्षा झालेला रजत गुप्ता आय.आय.टी दिल्ली आणि हावर्ड बिझनेस स्कूलचा, वल्डकॉम च्या गैरव्यवहारातील बर्नी एबर्स युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचा, स्कॉट सुलिव्हान युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कचा. निदान एनरॉन आणि वल्डकॉममध्ये तर इतका गैरव्यवहार झाला की जनरलचे तिकिट काढून ए.सी.फर्स्ट क्लासचे पैसे घेणाऱ्या (सामान्य लोक यापेक्षा फार जास्त गैरव्यवहार करू शकतील असे वाटत नाही) लाखो लोकांनी केलेला गैरव्यवहार त्यापेक्षा कमीच असेल. या सगळ्या युनिव्हर्सिटींमध्ये त्यांना गैरव्यवहार करायचे प्रशिक्षण मिळाले का?नक्कीच नाही.गैरव्यवहार करायचा स्वभाव असेल तर असे लोक चांगल्या कल्पनेचाही चुथडा बनवू शकतात आणि तसा चुथडा करतातही.हे लोक जरा डोकं बरं मिळालं म्हणून अशा विद्यापीठांमध्ये जाऊन शिकले.त्यांना डोकं बरं मिळालं नसतं तर ते प्रत्यक्ष चोरामाऱ्या करताना पकडले गेले असते असे म्हटले तरी फार चुकीचे ठरू नये. आता त्यांनी गैरव्यवहार केला हा दोष कोणाचा? त्या विद्यापीठांचा की त्या माणसांचा? तेव्हा वड्याचे तेल वांग्यावर काढू नका.माझा कर्मकांडे, देवाच्या नावावर लोकांना लुबाडायचे या प्रकारांना आणि धर्माच्या (किंवा अन्य कोणत्या) नावावर त्याचे समर्थन करायच्या प्रकारांना तुमचा असेल तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त विरोध आहे.पण याचा अर्थ देव या मुळातल्या संकल्पनेशी या कर्मकांडांचे खरोखर काही रिलेशन आहे असे म्हणायची चूक मी तरी करणार नाही.
त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे.असे स्वतःविषयी दावे करणारे अनेक लोक संकटप्रसंगी मात्र देवापुढे हात जोडताना दिसतात :)
In reply to वड्याचे तेल वांग्यावर काढू नका by क्लिंटन
In reply to वड्याचे तेल वांग्यावर काढू नका by क्लिंटन
देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?म्हणजे देव ही कल्पना आहे हे तुम्हाला मंजूर आहे. आता तुमच्या लेखाचा उद्देश पाहा :
पण या कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी रिलेशन आहे हे बहुदा गृहित धरल्यामुळे कर्मकांडांविरूध्द असलेला रोष हा देवाविरूध्द असलेल्या रोषात कधी बदलतो हे समजत नाही.तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का?तुम्ही सर्व मंदीरे, मशिदी, गुरूद्वार, चर्चेस, सर्व प्रार्थना, आरत्या, नमाज, मुर्त्या, तसबीरी काढून टाका... कुठे राहिला तुमचा देव? पुढे तर तुमचा तर्क पारच गंडलाय,
आता एक गोष्ट सांगा की देवाची संकल्पना तरी नक्की काय वेगळी आहे?एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचे पाप मला लागेल (आणि देव त्याची शिक्षा मला करेल ही भिती) आणि एखादी चांगली गोष्ट केल्यास त्याचे पुण्य मला मिळेल (आणि कोणत्यातरी स्वरूपात त्याचे बक्षिस मला मिळेल हे प्रलोभन) या कारणामुळे का होईना योग्य त्या गोष्टी केल्या जात असतील तर त्याच वाईट काय?आपणच केलेल्या कल्पनेला आपण घाबरतो? याला बालिशपणा म्हणतात. कल्पनेची भीती ती काय? प्रतिसादात शेवटी तुम्ही म्हटलय:
त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे>असे स्वतःविषयी दावे करणारे अनेक लोक संकटप्रसंगी मात्र देवापुढे हात जोडताना दिसतात = ते बहुदा देव ही निव्वळ कल्पना आहे हे न समजलेले आणि तुमच्यासारखे स्वतःच्याच कल्पनेला घाबरणारे लोक असतील.
In reply to @ क्लिंटन : तुम्हाला तुमच्या तर्काचा फोलपणा लक्षात येत नाहीये by संजय क्षीरसागर
In reply to व्यक्तिगत जीवनात तुम्ही देव माना अगर मानू नका तो वेगळा विषय आहे by संजय क्षीरसागर
मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले.लेखकाने लिहिले आहे की देवाचे आपल्या आजूबाजूला अस्तित्व आहे हे नुसते मानू नका तर ते feel करा.यावरून रामदासांचे मला, "सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे, कृपाळू पणे अल्प धारीष्ट पाहे" या मनाच्या श्लोकांमधील ओळींची आठवण झाली. भग्वद्गीतेचे मराठीकरण केल्यावर त्याच्या सुरवातीस बिनोबांनी लिहीले आहे ज्याचा देखील असाच काहीसा संबंध आहे. ते म्हणतात, "गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". देव या संकल्पनेबाबत मला टोकाच्या आस्तिक अथवा नास्तिक पुरस्कर्त्यांपेक्षा agnostic (अज्ञेय?) अर्थात a person who holds the view that any ultimate reality (as God) is unknown and probably unknowable; भुमिका जास्त योग्य वाटते. अर्थात याचा अर्थ सर्वांनी त्या भुमिकेचा पुरस्कार करावा असे नाही. बाकी कर्मकांड, फसवणूक, अवडंबर यांच्या मुळे देव संकल्पनेस विरोध करणे अनेकांना इष्ट वाटत असावे असे वाटते. असो, अधिक नंतर.
In reply to सदा सर्वदा by विकास
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी".हा बाळबोध अॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे. अस्तित्व निर्वैयक्तिक आहे. ते गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासारखं आहे. प्रत्येक वेळी ते आपल्याला फेवर करेल ही अशा फोल आहे. आणि तरीही प्रत्येक घटनेमागे इतके अनाकलनीय घटक आहेत की त्यांचा उलगडा होणं असंभव आहे. त्याही पुढे जाऊन एका घटनेचा अॅनॅलिसिस करेपर्यंत दुसरी घटना घडते! अस्तित्वाची रहस्यमयता मंजूर झाली की जगायला सॉलिड मजा येते. `माझ्याविरूद्ध काही घडलं' असं वाटणंच बंद होतं.
In reply to अज्ञेयपेक्षा `रहस्यमय' हा अॅटिट्यूड जास्त काव्यात्मक by संजय क्षीरसागर
अज्ञेयपेक्षा `रहस्यमय' हा अॅटिट्यूड जास्त काव्यात्मक आणि वास्तविक आहे.ही चर्चा मला वाटत नाही, जास्त काव्यात्मक काय आहे ह्यावर चालू आहे. अर्थात तुम्हाला रहस्यमयता आवडत असली तर ती तुमची तुमच्यापुरती आवड झाली, त्यात बरोबर चूक असे मी काही ठरवू इच्छित नाही.
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". हा बाळबोध अॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे.मला तसा (बाळबोध) वाटत नाही. त्याचा रहस्यवादाशी काही संबंध देखील नाही, त्यामुळे रहस्यवादाच्या विपरीत असण्याचा काही प्रश्न नाही.
अस्तित्वाची रहस्यमयता मंजूर झाली की जगायला सॉलिड मजा येते.मजेत जगण्याच्या संदर्भात मला तुकाराम आठवले... आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥ .... तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥ आनंदाने जगणे हे वृत्तीत असावे लागते, बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवर ते अवलंबून नसते. त्यामुळे तशी वृत्ती असलेली व्यक्ती मग अस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी, रहस्यवादी अथवा अजून कसला काही असुंदेत मज्जेत जगू शकते. जिची वृत्ती तशी नसते ती व्यक्ती भयाने, नकारात्मक वृत्तीने, संशयाने अथवा अजून कशाने का होईना, पण आनंदात जगू शकत नाही. असो.
In reply to -१ by विकास
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". हा बाळबोध अॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे.
आनंदाने जगणे हे वृत्तीत असावे लागते, बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवर ते अवलंबून नसतेयेस! `आपल्याला कुणी कडेवर घेईल' हेच तर बाह्यावर (देवावर) अवलंबित्व आहे. रहस्यवादाचा अर्थ : अस्तित्व विस्मयकारक आहे आणि जे घडेल ते मंजूर आहे. `मला कुणीही कडेवर घेण्याची गरज नाही'.
In reply to `कुणी तरी मला कडेवर घेईल' आणि `मी अज्ञाताला बिंधास्त सामोरा जाईन by संजय क्षीरसागर
आपल्याला कुणी कडेवर घेईल' हेच तर बाह्यावर (देवावर) अवलंबित्व आहे" तुम्हाला फक्त वाक्याचा शब्दार्थ समजला असे दिसतयं. ही मर्यादा आहे, असो,
In reply to ,,, by विकास
लहान मुलांनाही तुला चॉकलेट देईन हे प्रलोभन किंवा ते चालले नाही तर मार देईन ही भिती दाखवावीच लागते ना?दोन-तीन वर्षाची लहान मुले वागण्यात/ विचारात कोणतीही भेसळ न झालेली म्हणजेच मनुष्यस्वभाव आहे त्याचे अगदी निरागस रूप असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.देव ही संकल्पना काही हजार वर्षापुर्वी जेंव्हा देश, घटना, कायदे अस्तित्वात नव्हते त्यावेळी काही हुशार (वासरात लंगडी...) लोकांनी याची सामाजिक सलोखा रहावा यासाठी निर्मिती केली. त्यांच्या औकाती प्रमाणे तात्कालिक आणि आजुबाजूची परिस्थिती बघून काही 'डूज आणि डोंट्स' तयार केले. पुढे काही सो कॉल्ड धर्मांना राजाश्रय मिळाला आणि फोफावला. त्या नंतर समाजातल्या धुर्त लोकांनी (वर्गानी?) याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. एक उदाहरण म्हणून जवळजवळ प्रत्येक धर्मात पुरषी वर्चस्व दिसते. एका मोठ्या स्केलवरती या समाजाचे ते बालपण होते असं समजायला हरकत नाही. आता या माणसाची उत्कांती झाली आहे असे मानले आणि देशापुरते आणि समस्त मानवजातीचा विचार करून ग्लोबल कायदे अस्तित्वात आले तर या सकल्पनेची गरज भासू नये.
In reply to व्यक्तिश : मला लेख आवडला , by स्पा
In reply to +१ by अमोल खरे
मी ईंजिनिअरिंग चा बथ्थड विद्यार्थी होतो" हे त्याचं पेटंट वाक्य लिहिलं नाहीये.तो तर मी होतोच.त्यात वेगळे काय सांगायचे? :)
In reply to लेख छान आहे by चेतन माने
In reply to एकत्रित प्रतिसाद by क्लिंटन
तेव्हा पाप लागेल या भितीने का होईना जर कोणी वाईट गोष्ट करण्यापासून परावृत्त होत असले तर त्यात काय चुकीचे आहे हा मला अगदी अनाकलनीय प्रकार आहे.मुळात पाप आणि पुण्य म्हणजे काय ठरवणार कोण? हे रिलेटीव्ह आहे असं वाटत नाही का? एक उदाहरण: तुम्ही वरती दिलेल्या उदाहरणाला समांतर. मुक्या प्राण्यांना मारणं म्हणजे पाप. म्हणजे इजा करणं की ठार मारणं? मुके म्हणजे नक्की कुठ्ले प्राणी? कसाई, मच्छिमार पापी आहेत का? प्राण्यांच्या आकाराची थ्रिशोल्ड काय? डास मारले तर पाप लागेल का? एक हत्ती मारल्यावर कमी पाप लागेल की मुंग्यांच्या वारूळात डीडीटी टाकल्यावर? :)
In reply to परत एकदा असहमत... by दादा कोंडके
मुळात पाप आणि पुण्य म्हणजे काय ठरवणार कोण?आपणच ठरवायच. मला यावरुन एक सुभाषित आठवले. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं| परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनं|| शेवटी पापपुण्य हे सापेक्ष आहे. एकाच्या दृष्टीने असलेले पाप दुसर्याच्या दृष्टीने पुण्य असू शकते. तुम्ही कुठल्या संस्कारात वाढला आहे. तुमच्या पिंडाने त्यातल काय स्वीकारल यावर बरच काही अवलंबून आहे.
In reply to पाप पुण्य by प्रकाश घाटपांडे
In reply to पाप पुण्य by प्रकाश घाटपांडे
कसाब किंवा अन्य कोणी दहशतवादी/गुन्हेगार देवाला घाबरत नाही असे तुम्ही म्हणता तेव्हा तो कायद्यालाही घाबरत नाही हे विसरता त्याचे काय?कसाबची इन्सपेक्टरनी घेतलेली जबानी तुम्ही ऐकलेली नाही. गरीबी (खरं तर दारिद्र्य) हा दहशतवादाला उद्युक्त करणारा एकमेव घटक आहे. धर्माच्या नांवावर दहशतवादी तयार केले जातात आणि त्यांच्या मनावर ते पवित्र धार्मिक कृत्य आहे असं बिंबवलं जातं. तुमचा संपूर्ण लेख मॉरल पोलिसिंगवर आधारित आहे. ज्याला स्वाभिमान आहे तो कधीही गैरकृत्य करत नाही. देवाच्या भीतीनं नैतिक राहणं माझ्या मते बालिश आहे.
In reply to ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का? by संजय क्षीरसागर
In reply to ज्याला स्वाभिमान आहे तो कधीही गैरकृत्य करत नाही. by अर्धवटराव
In reply to अंतीम विश्लेषणात - तुमचं मनच तुम्हाला लज्जित करतं by संजय क्षीरसागर
In reply to ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का? by संजय क्षीरसागर
गरीबी (खरं तर दारिद्र्य) हा दहशतवादाला उद्युक्त करणारा एकमेव घटक आहेएकमेव घटक आहे असं नाही वाटत. अजूनही असतील. काय म्हंता?
In reply to करेक्शन पाहीजे का? by यसवायजी
In reply to मी काय म्हननार? by संजय क्षीरसागर
In reply to मग प्रश्नच मिटला. कसाब by विश्वनाथ मेहेंदळे
निती-अनितीच्या कल्पना या मनाच्याच असतात. तेंव्हा त्यांच्या पलिकडे जर कोणि जात असेल तर मनच होय..नाही. आपण मनाचे जाणते आहोत.
स्वाभिमान देखील मनाचीच भावनाशब्द आणि अनुभव यात फरक आहे. `स्व' गवसल्यावर स्वतःबद्दल येणारी निश्चिंतता म्हणजे स्वाभिमान. ती व्यक्तीगत श्रेष्ठत्वाची भावना नाही. `आपण मनापासून वेगळे आहोत' हे लक्षात आल्यावर पुढे प्रतिसादात लिहिलेल्या गोष्टी या आकलनातल्या त्रुटीमुळे आहेत हे लक्षात येईल.
In reply to ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे by संजय क्षीरसागर
In reply to ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे by संजय क्षीरसागर
In reply to एक प्रश्न / निरीक्षण by विकास
In reply to एकत्रित प्रतिसाद-२ by क्लिंटन
माझी देवविषयक संकल्पना म्हणजे आपण कोणालातरी (देवाला) अकाऊंटेबल आहोत (म्हणजे आपण जे काही करू त्याचे चांगले-वाईट परिणाम आपल्यावरच होणार आहेत) ही जबाबदारीची जाणीव. आपण चांगली कृत्ये केली तर आपले चांगले होईल आणि वाईट कृत्ये केली तर वाईट होईल ही गोष्ट माझ्यासाठी तरी न्यूटनचा तिसरा नियम जितका obvious आहे तितकीच obvious आहे.माझ्या चांगल्या-वाईट कृत्यासाठी मी कुणाला जवाबदार असण्यात काहीही अर्थ नाही. आणि तेही अस्तित्वात नसलेल्या किंवा मीच केलेल्या देव या `कल्पनेला'! तर नाहीच नाही. `माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागेल असं मी काहीही करणार नाही' हा सर्वात सोपा निश्चय आहे!
In reply to अब आगए लाईनपे! by संजय क्षीरसागर
अब आगए लाईनपे!सहमत. एव्ह्ड्या प्रतिसादानंतर का होइना पण शेवटी मान्य केल्याबद्दल विल्यमचे आभार्स! ;)
In reply to +१ by दादा कोंडके
अब आगए लाईनपे! सहमत. एव्ह्ड्या प्रतिसादानंतर का होइना पण शेवटी मान्य केल्याबद्दल विल्यमचे आभार्स!अहो दादा, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे हे समजले का तुम्हाला? आपण दोघेही आपण केलेल्या कृतीचे परिणाम आपल्यावरच होतील हे समजतो आणि या जबाबदारीची जाणीव आपल्या दोघांकडेही आहे.पण मी देवाला मानतो आणि तुम्ही (कदाचित) मानत नाही.आता हा फरक का? मी जन्मलो तेव्हा मला खाता-पिता येत नव्हते, लिहिता-वाचता येत नव्हते.मला स्वतःच्या हाताने खाता येईपर्यंत कोणीतरी भरवले, मला कोणीतरी पहिल्यांदा अ-आ-इ आणि नंतर ए,बी,सी लिहायला-वाचायला शिकविले.अशा अनेक गोष्टी सांगता येतील.मी आज म्हणत असलो की मी आज प्रवेश मिळवायला भारतातल्या एका अत्यंत कठिण अशा शिक्षणसंस्थेतून बाहेर पडलो, त्या परिक्षेसाठीचा अभ्यास इतर कोणाचीही मदत न घेता माझा मीच केला इत्यादी इत्यादी, तरी त्यामागे कितीतरी ज्ञात-अज्ञात लोकांनी मला केलेल्या मदतीमुळेच मला ते शक्य झाले.तेव्हा "मी" जर का काही केलेच असले तर केवळ त्यासाठी कष्ट करणे.बाकी सगळे इतरांनी केलेल्या मदतीमुळे मला करता येणे शक्य झाले.आणि जेव्हा जेव्हा "मी" एखादी गोष्ट केली हा अहंकार चिकटतो तेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवनतीला सुरवात होते.आणि "मी" एक साधा माणूस आहे कोणी संत-सत्पुरूष नव्हे.तेव्हा असा अहंकार चिकटू नये यासाठी कायम जागृत असायची गरज मला वाटते.अनेकदा मोहाचा एखादा क्षण अत्यंत चांगल्या आणि सज्जन माणसाचीही अवनती करू शकतो.पिंजरा चित्रपटात श्रीराम लागूंना (तेच "देवाला रिटायर करा" फेम :) ) मोहाच्या एका क्षणी आपल्यावरचा ताबा ठेवता आला नाही आणि पुढे काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे. तेव्हा विवेक जागृत असला की अशी वेळ कधीच येणार नाही वगैरे गोष्टी बोलायला ठिक आहेत.पण प्रत्यक्षात पिंजरा मध्ये श्रीराम लागूंचे झाले ते एखाद्या क्षणी मोमेन्टरी आपल्यावरचे नियंत्रण सुटल्यावर कोणाचेही होऊ शकेल.एक चित्रपट म्हणून बरीच अतिशयोक्ती त्यात दाखवली आहे हे मान्य.पण अशी अवनती थोड्याफार प्रमाणात कोणाचीही होऊ शकेल. तेव्हा असे होऊ नये म्हणून मला भावलेला मार्ग कोणता?की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे ही (भले काल्पनिक असली तरी) जाणीव.यात नक्की काय चुकीचे आहे हे इतके हिरीरीने कडाडून विरोधी प्रतिसाद देणार्यांपैकी एकानेही सांगितलेले नाही.आता काही लोक तसे लक्ष ठेवत असलेल्यावर पूजा-अर्चारूपी "लाच" देऊन आपण काही केले तरी सुटून जाऊ असे समजत असतील किंवा काही लोक "माझ्यावर लक्ष ठेवणाराच" तुझ्याहून लक्ष ठेवणार्यापेक्षा जास्त चांगला आहे असे म्हणून हिंसाचाराला उतरत असतील तर तो दोष तसे लक्ष ठेवणार्याचा नाही तर असे चुकीचे इंटरप्रीटेसन करत असलेल्यांचा आहे.
In reply to फरक by क्लिंटन
आपण दोघेही आपण केलेल्या कृतीचे परिणाम आपल्यावरच होतील हे समजतो आणि या जबाबदारीची जाणीव आपल्या दोघांकडेही आहे.पण मी देवाला मानतो आणि तुम्ही (कदाचित) मानत नाही.आता हा फरक का?यावर सोपं उत्तर आहे : माझ्या चांगल्या-वाईट कृत्यासाठी मी कुणाला जवाबदार असण्यात काहीही अर्थ नाही. आणि तेही अस्तित्वात नसलेल्या किंवा मीच केलेल्या देव या `कल्पनेला'! तर नाहीच नाही. `माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागेल असं मी काहीही करणार नाही' हा सर्वात सोपा निश्चय आहे आता तुमचा बदलेला स्टँड हा आहे :
जेव्हा "मी" एखादी गोष्ट केली हा अहंकार चिकटतो तेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवनतीला सुरवात होते.त्यावर बुद्ध म्हणतो : कुणाच्याही आत कुणीही नाही! बुद्धाचा शून्यवाद आपल्याला मान्य होत नाही. आपलं आकलन कमी आहे म्हणून आपण `देव' ही बालिश कल्पना निर्माण केली आहे. खरं तर `मी आहे' हाच अहंकार आहे आणि त्याचाच परिणाम `तू आहेस' हा आहे (इथे देव). तुमच्या लक्षात येईल की `देव' किंवा `तू' हेच द्वैत आहे! भक्तीमार्गी मोठे चलाख आहेत. `भक्त आणि देव' हे द्वैत नाही का? असं त्यांना विचारल्यावर ते म्हणतात `जो विभक्त नाही तो भक्त!' हा किती भंपकपणा आहे ! तुम्ही स्वतःच्या कल्पनेनं देव निर्माण करता आणि मग म्हणता `तो आणि मी एकच आहे'. ही `स्वतःच्या कल्पनेशी एकरूपता' पुढे भ्रमिष्टपणाकडे नेते. `मी आहे' हा स्वतःला व्यक्ती समजल्यामुळे झालेला भ्रम आहे. एकदा व्यक्तीमत्वातून मुक्तता झाली की `मी नाही आणि मग तू ही नाही'. कारण तुमच्या `मी'ला सपोर्ट करायला, आपलं अस्तित्व नाहिसं होईल ही तुमची भीती दूर करायला, तुम्ही `तू' या देवरूपी संकल्पनेचा आधार घेतलाय. अशी कोणतीही कल्पना कुणालाही तारू शकत नाही आणि तिचा काहीही उपयोग नाही.
In reply to . by क्लिंटन
In reply to बालिश हे मी कल्पनेला म्हटलय by संजय क्षीरसागर
In reply to बालिश हा उल्लेख तशी कल्पना by गवि
व्यक्तिगत अवमानाचा हेतू नाही हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.धन्यवाद.
In reply to व्यक्तीगत कमेंट करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to एका by गवि
एका उत्तम चर्चेचा रोख असा व्हावा याचं दु:ख होतं.+१. पण याला जबाबदार कोण आहे?ऐसी अक्षरेवर आणि फेसबुकवरील ग्रुपवर (आणि इथेही संक्षी यांचे वैयक्तिक पोस्ट वगळता) माझ्या पोस्टवर यापेक्षाही जास्त टिका झाली आहे.पण ती टिका कुठेही वैयक्तिक नव्हती आणि त्या सगळ्या मुद्द्यांना मी माझ्या परिने उत्तरे दिलेली आहेत.पण बाय नेचर वैयक्तिक चर्चेत मला पडायला आवडत नाही. गवि, तुम्ही संपादक आहात. वैयक्तिक रोखाचे सगळे उल्लेख ताबडतोब डिलीट करावेत आणि वैयक्तिक पातळीवर चर्चा नेत असलेल्या सगळ्यांनाच एक समज द्यावी ही विनंती.मिसळपाव हे खेळीमेळीचे आणि विचार मांडायचेच व्यासपीठ असायला हवे आणि इथे कोणत्याही वैयक्तिक चर्चेला वाव नको.मी संपादक नाही पण मिसळपावच्या पहिल्या दिवसापासूनचा सदस्य आहे आणि अशी मागणी करायचा अधिकार जरूर मला आहे.
In reply to +१ by क्लिंटन
In reply to तुम्ही अहंकार नको म्हणून देव मानताय की दुष्कृत्य होऊ नये म्हणून? by संजय क्षीरसागर
तुम्ही अहंकार नको म्हणून देव मानताय की दुष्कृत्य होऊ नये म्हणून?या दोन गोष्टींमध्ये तुम्ही फरक का करत आहात? माझ्या मते स्टेपवाईज प्रोसेस अशी आहे: १. मी खूप काही केले आहे हा अहंकार २. अहंकारातून निर्माण होणारा callous attitude (मराठी शब्द?) ३. म्हणजे आपल्याला वाटेल ते करायचे त्याचे इतरांवर काय आणि किती परिणाम होतात याकडे दुर्लक्ष कारण "मी" म्हणजे कोण आणि इतर लोक क्षुल्लक. ४. एकदा आपल्या कृत्याचा इतरांवर परिणाम होत आहे/ होऊ शकतो ही जाणीव गेली की मग वाईट कृत्ये करायची शक्यता वाढते. यात १.५/१.८३ इत्यादी मधल्या स्टेप्स असतीलच पण त्या डिटेलमध्ये मी सध्या जात नाही. आणि चौथ्या स्टेपकडे जायचा हाच एकमेव मार्ग आहे असे नाही. पुण्याला जायचे तर मुंबईतून जाता येईल, सातारच्या दिशेने जाता येईल, सोलापूरच्या दिशेने जाता येईल.पण मला चौथ्या स्टेपला जायचे नाही आणि तिथे लीड करत असलेले सगळे मार्ग मला टाळायचे आहेत.पहिल्या स्टेपमधून माणूस चौथ्या स्टेपवर डायरेक्ट जाईल असे नाही किंवा मध्येही अडकेल आणि चौथ्या स्टेपपर्यंत पोहोचणारही नाही.पण मला कोणतीही गोष्ट चान्ससाठी सोडायची नाही आणि पहिल्या स्टेपमधून जाणारा मार्ग चौथ्या स्टेपपर्यंत पोहोचत असेल तर ती पहिली स्टेपही मला गाठायची नाही.आणि मी कोणालातरी अकाऊंटेबल आहे ही जाणीव मला पहिल्या स्टेपपर्यंत पोहोचू न देण्यात हातभार लावत असेल तर मी त्या जाणीवेचा नक्कीच अंगीकार करेन/करतो. बाकी बुध्द काय म्हणाला आणि आणखी कोण काय म्हणाले, जड-द्वैत्/अद्वैताचा सिध्दांत इत्यादी गोष्टी मला समजत नाहीत आणि त्यात मला इंटरेस्टही नाही.आणि इतर कोणीतरी काहीतरी लिहिले म्हणून ती गोष्ट करणारा मी नाही.तेव्हा या क्षणी मी आहे तो ठिक आहे. ज्यावेळी मला असे जाणवेल की अजून कसली तरी गरज आहे त्याक्षणी मी इतर गोष्टी एक्सप्लोर करायला सुरवात करेन आणि त्यात कदाचित असले सिध्दांत असतील. आणि त्यातीलही पटतील त्या गोष्टी मी जरूर घेईन. तेव्हा मला तरी या चार स्टेप वगळता अमुक झाले तर तमुक होईल, असेच का आणि तसेच का, पहिली स्टेपच अस्तित्वात आहे याचा पुरावा द्या, माझी देवाची संकल्पना मला त्या स्टेपपर्यंत पोहोचू देणार नाही याचा पुरावा द्या इत्यादी चर्चांमध्ये खरोखर इंटरेस्ट नाही.कारण पुरावे शोधत बसले तर पूर्ण जन्मही अपुराच पडेल आणि माझ्यासाठी तरी पुरावे शोधण्यापेक्षा इतर अनेक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासारख्या आहेत.तेव्हा अगदी पुरावा नसेल तरी माझ्यातला विवेक सांगत असेल तर त्याप्रमाणे मी कोणालातरी अकाऊंटेबल आहे आणि ते पटते.एखादे वाईट कृत्य केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील याचाही पुरावा नाही.पण पुरावा नसला तरी मला ती गोष्ट खूप ऑबव्हियस वाटते. माझी देवाची संकल्पना मला उपयुक्त वाटली आणि मी ती ज्या स्पिरिटमध्ये घेत आहे त्या स्पिरिटमध्ये घेतल्यास समाजातील वाईट प्रवृत्ती कमी झाल्या तर त्यात माझाही फायदा आहे.हा व्हेस्टेड इंटरेस्ट आहे असे समजा.आणि म्हणून कर्मकांड म्हणजेच देव असे समजून कर्मकांडांना रिटायर करण्याऐवजी देवाला रिटायर करायचा घोषा लावू नका ही विनंती.
`स्वतःच्या कल्पनेशी एकरूपता' पुढे भ्रमिष्टपणाकडे नेते.ज्याला काहीतरी अचिव्ह करायचे असते अशा लोकांपैकी अनेक जण ती गोष्ट पहिल्यांदा तयार झाली आहे अशीच मनात मनात कल्पना करतात (आणि नुसती कल्पना करून थांबत नाहीत तर त्या दृष्टीने प्रयत्न करतात). हिच एकमेव पध्दत आहे असे नाही पण ही एक पध्दत आहे हे नक्की. मी एक गोष्ट इतर कुठे फारशी सांगितलेली नाही पण इथे लिहितो. माझा आय.आय.एम चा इंटरव्ह्यू होता २४ फेब्रुवारी २००९ रोजी बंगलोरमध्ये.त्यावेळी मी पुण्यात राहायला होतो. २२ तारखेला पुण्याहून बंगलोरला जायचे बसचे तिकिटही मी काढून ठेवले होते. २१ तारखेला मुंबईला मी काही कामानिमित्त आलो असताना दुपारी मला छोटासा अपघात झाला आणि डाव्या गुडघ्याच्या जवळ पाय twist झाला. सुरवातीला वाटले की छोटी दुखापत आहे आणि मी व्हॉल्वो बसने पुण्याला यायलाही निघालो.पण बसमध्ये हळूहळू त्या दुखापतीची सिव्हिरिटी समजून यायला लागली.रात्री एक्स-रे काढल्यावर पाय फ्रॅक्चर झाला आहे हे समजले. २२ तारखेला रविवार होता त्या दिवशी मुष्किलीने डॉक्टर मिळाले.त्यावेळी मी इंटरव्ह्यूला जाऊ शकेन याची शक्यता जवळपास शून्य दिसत होती.तरीही माझ्यातला प्रत्येक अणू-रेणू मला बजावत होता की काही वाटेल ते झाले तरी मला बंगलोरला जायचे आहे. That's it. आणि मी बंगलोरला गेलो आहे आणि माझा इंटरव्ह्यू चालू आहे आणि मी व्यवस्थित उत्तरे देत आहे हे चित्र मी माझ्याच डोळ्यासमोर काही तासात शेकडो-हजारो वेळा आणले असेल.आणि त्या चित्राच्या खरेपणाविषयी कोणतीही शंका माझ्या मनात नव्हती.त्यावेळी मला बघणाऱ्यांनाही वाटले असेल की काय हा भ्रमिष्टासारखा करत आहे.पुढे २३ तारखेला विमानाने (हिलरीबरोबर) बंगलोरला जाऊन २४ तारखेचा इंटरव्ह्यू पार पाडला आणि पुण्याला परत आल्यानंतर माझ्या पायावर सर्जरी झाली. थ्री इडियट्समध्ये दाखविल्याप्रमाणे व्हिल चेअरवर माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यूसाठी मी पेन किलर घेऊन गेलो होतो. परत आल्यानंतर डॉक्टरांनी म्हटले की तू या परिस्थितीत (हाडाची जखम ओली असताना आणि सर्जरी झालेली नसताना) बंगलोरला जाऊन आलास हा चमत्कारच म्हणायचा. तिथे मला जाता येईल याची शक्यता अगदी शून्य वाटत असतानाही मी जायचेच हा घोषा लावला होता त्या सगळ्या काळात मी अगदी भ्रमिष्टासारखा वावरलो असेनही. पण who cares? मी तसा भ्रमिष्टासारखा वावरलो नसतो, अरे तिथे जायची probability किती, अमुक सिध्द कर, तमुक सिध्द इत्यादी प्रश्न विचारत बसलो असतो तर मला कदाचित तिथे जाताही आले नसते. आजही मला ते सगळे करायला कुठून एनर्जी मिळाली हा प्रश्नही पडतो. आणि त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित त्या भ्रमिष्टपणात आहे. तेव्हा आपल्या कल्पनेशी एकरूप होऊन असला भ्रमिष्टपणा येत असेल तर मला त्याविषयी काहीही वैषम्य वाटत नाही.
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to देवाला रिटायर करू नये असं by निवांत पोपट
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
In reply to `पॅकेज' हे `डील' या अर्थी by संजय क्षीरसागर
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
In reply to देवाचं "पॅकेज" काय असेल असा by गवि
In reply to देवाचा CTC कोण ठरवत असेल हो by खबो जाप
In reply to छान चर्चा आणि प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छान चर्चा आणि प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्टीफन हॉकिंग्जला मधे आणतो. लाईफ या गेमचं उदाहरण देऊन त्याने हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की "देव" अशी कोणतीही एंटिटी मधे न आणताही आधी सेट झालेल्या नियमांनुसार अनेक घडामोडी जणू आपसूक होत आहेत अशा रितीने अनंतकाळ घडत राहताना दिसतात.येस! अस्तित्व स्वयंसिद्ध आहे. इट इज अ सेल्फवर्किंग अँड सेल्फसपोर्टींग ऑरगॅनिक एंटीटी.
या लेखात देव या कल्पनेचं अस्तित्व असावं की नाही असा प्रश्न मांडला आहे. मुळात हा नॉन इश्यू आहे. कारण जोपर्यंत "का?" या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोवर (म्हणजे बहुधा अनंतापर्यंत) देव ही कन्सेप्ट एक कन्सेप्ट म्हणून मनात राहणारच. आणि मोठ्या समूहाच्या फक्त मनात काही राहात नाही. ते कर्मकांड ऑर अदरवाईज बनून बाहेर येतंच.एकदम सही. तेच माझं म्हणणय.
आपण त्या कन्सेप्टला रिटायर करणारे किंवा न करणारे कोणी लागून गेलेलो नाही.इथे प्रचंड फारकत आहे कारण देव या कल्पनेनं मानवी जीवनात काय गोंधळ घातलाय हे माझ्या वरच्या सर्व प्रतिसादात लिहिलय. आणि इथला प्रत्येक विरोधी प्रतिसाद तेच सांगतोय. इन फॅक्ट, या लेखाचा ज्याच्याकडे रोख आहे तो `ओ माय गॉड' पिक्चर केवळ या एका गोष्टीसाठी काढलाय. जनजागृती झाल्याशिवाय कलह आणि साधन-संपत्तीचा अपव्यय थांबणार नाही. टू बी वेरी पर्सनल, (हे एवढ्यासाठी लिहितोय की तुम्हाला अनुभव घेता यावा). देव ही एकमेव संकल्पना रद्द केल्यानं माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ, (अनाठाई) श्रम आणि पैसा यांची अमाप बचत झाली आहे. यू कॅन इमॅजीन वॉट अ सेवींग इट वील ब्रींग ऑन युनिवर्सल स्केल!
संक्षी.. द ग्रँड डिझाईनमधल्या एका वाक्याचा सारांश असा की इव्हन देव मान्य केला तरी ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. ते फक्त प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे.येस! कारण तो फंडाच गंडेल! एकदा अस्तित्व स्वयंचलित आहे म्हटल्यावर देव मान्य करण्याची गरज नाही, हे एक. आणि देवानं अस्तित्व निर्माण केलं म्हटलं तर `देवाला कुणी निर्माण केला?' हा प्रश्न येतो. अँड इट लिडस नोव्हेअर, हे दुसरं.
माझा प्रश्न वेगळ्याच दिशेत आहे. क्षणभर देव म्हणजे क्रिएटर असं धरु.. तर असा देव म्हणा किंवा कोणीही इनिशियल प्लॅनर असा असेलच तर त्याचं या सगळ्या व्यापाबद्दल पॅकेज, अर्थात ईषणेसाठी प्रेरणा, मोबदला, ध्येय, फळ काय असेल..? की आपलं उगाच करुन ठेवलंय झालं?नाही! असा कुणीही निर्माता नाही आणि म्हणूनच जगणं ही निव्वळ मजा आहे. बुद्धाचं कौतुक हेच आहे तो म्हणतो `जग शून्य आहे, कुणाच्याही आत कुणीही नाही'! जस्ट इमॅजीन हिज कॅलिबर! `कुणाच्याही आत कुणीही नाही' कसलं ट्रीमेंडस स्वातंत्र्य आहे! हे आयुष्य, इट इज अ प्युअर मॅजिक, इट इज जस्ट अ फन! वॉट अ क्लासिक क्रिएशन! `कुणाच्याही आत कुणीही नाही' म्हणून कुणी मरत नाही, मरणाचं भय `आपण शरीरात आहोत' या भासामुळे आहे. `मी असा कुणीही नाही' ही मुक्ती आहे. ती मुक्ती कुणापासून नाही फक्त आपल्या भ्रामक धारणांपासून आहे.
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
In reply to एक्स्क्युज मी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आता जरा बायको बरोबर फिरायला जातोय by संजय क्षीरसागर
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
देव ही एकमेव संकल्पना रद्द केल्यानं माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ, (अनाठाई) श्रम आणि पैसा यांची अमाप बचत झाली आहे. यू कॅन इमॅजीन वॉट अ सेवींग इट वील ब्रींग ऑन युनिवर्सल स्केल!आणि देव ही एकमेव संकल्पना मी लिहिले आहे त्या स्पिरिटमध्ये घेतल्यामुळे माझ्या स्वत:च्या आयुष्यात प्रचंड फायदा झाला आहे.यू कॅन इमॅजीन वॉट अ ब्लेसिंग इट वील ब्रींग ऑन युनिवर्सल स्केल! असो. Perspectives differ.
In reply to गवि, आजपर्यंतच्या जालीय संवादात तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला by संजय क्षीरसागर
इथे प्रचंड फारकत आहे कारण देव या कल्पनेनं मानवी जीवनात काय गोंधळ घातलाय हे माझ्या वरच्या सर्व प्रतिसादात लिहिलय. आणि इथला प्रत्येक विरोधी प्रतिसाद तेच सांगतोय. इन फॅक्ट, या लेखाचा ज्याच्याकडे रोख आहे तो `ओ माय गॉड' पिक्चर केवळ या एका गोष्टीसाठी काढलाय. जनजागृती झाल्याशिवाय कलह आणि साधन-संपत्तीचा अपव्यय थांबणार नाही. टू बी वेरी पर्सनल, (हे एवढ्यासाठी लिहितोय की तुम्हाला अनुभव घेता यावा). देव ही एकमेव संकल्पना रद्द केल्यानं माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ, (अनाठाई) श्रम आणि पैसा यांची अमाप बचत झाली आहे. यू कॅन इमॅजीन वॉट अ सेवींग इट वील ब्रींग ऑन युनिवर्सल स्केल!माझं म्हणणं असं होतं / आहे, की देवाला रिटायर करणं हे व्यक्तिगत पातळीवरच शक्य आहे. कारण प्रत्येकाच्या मनात या संकल्पना पक्क्या होत जाणं हे ज्याच्या त्याच्या आयुष्यातल्या घटनांवर अवलंबून आहे. तुमचं, माझं, क्लिंटनचं, धुळ्यातल्या एका शेतकर्याचं, सांगलीतल्या दुसर्या शेतकर्याचं, अनिल अंबानींचं, मलालाचं, कसाबचं, घाना देशातल्या एका दुकानदाराचं, एका एस्किमोचं अशी आयुष्यं पूर्णपणे वेगवेगळ्या नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, अरिष्टांनी भरलेल्या अथवा विहित पार्श्वभूमींवर घडत असतात. अशा वेळी सर्वांना एकाच चमच्याने बोध पाजून देवाची कन्सेप्ट होलसेलमधे, जागतिक पातळीवर, युनिव्हर्सली रद्द किंवा फिकट करणं आपल्याला शक्य नाही. .. अशा अर्थाने मी ते म्हटलं होतं. याच धाग्यावर प्रतिसादात "पर्स्पेक्टिव्ह्ज डिफर" असं क्लिंटनने म्हटलंय ते पुरेसं बोलकं आहे. एकाला ज्या कारणमीमांसेने देव रद्द होणं योग्य वाटेल त्याच मीमांसेने एखाद्याला तो टिकणं योग्य वाटेल. एकाचा ज्या अनुभवाने देवावरचा विश्वास उडेल, त्या अनुभवानेच दुसर्याचा बसेल किंवा दृढ होईल.. मुळात देव आहे की नाही या प्रश्नाच्याही वरचा प्रश्न की देव असला तरी तो माझ्या वैयक्तिक आयुष्यात कशाला हस्तक्षेप करेल? हा बर्याच जणांना पडतच नाही. निव्वळ तात्विक दृष्ट्या हे युनिव्हर्सल लेव्हलवर घडवणं शक्य असेलही, पण "कौन कहेता है की आसमान में सुराख नही होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यार" टाईपच्या रोमांचक काव्यात्मकतेखेरीज त्यात काही जास्त सबस्टन्स नाही असं वाटतं.
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
एखादा धावपटू कुबडी घेऊन चालायचा प्रयत्न करत असेल तर..तर तो लंगडाच आहे, धावपटू नाही असं समजावं.. आपण लंगडे नाहीच आहोत मुळी, इतकी तरी जाणीव धावपटूला असली पाहिजे, तरच तो धावपटू... :)
In reply to अगदी सुंदर उदाहरण दिलंत. इथे by गवि
In reply to प्रथमदर्शनी मलाही उदाहरण by बाळ सप्रे
In reply to उदाहरण हे एक्झॅक्टली by गवि
In reply to उदाहरण हे एक्झॅक्टली by गवि
एखादी कल्पना ही स्वनिर्मित, भासमान आहे हे "स्वतःला" नीट कळूनही केवळ समाजात ती आहे म्हणून आपणही तिचा "उपयोग" (कन्स्ट्रक्टिव्हली ऑर अदरवाईज) करुन घेणं हे दुरित नव्हे तर आत्मवंचना करणारं, व्याख्येत बाधित होणारं तत्वज्ञान वाटतं.बरं मग तुमचे यावर सोल्युशन काय? माझी देवविषयक संकल्पना काय हे मी आतापर्यंत अनेक वेळा याच चर्चेत स्पष्ट केले आहे.देव निर्मिक आहे, त्यानेच सगळे विश्व निर्माण केले वगैरे गोष्टी मी लिहिलेल्या नाहीत.त्यामुळे देव जर निर्मिक असेल तर त्याची निर्मिती कोणी केली हे इनफाईनिट लूप माझ्या म्हणण्याला लागू पडत नाही.देव ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे हे पण मूळ लेखातच लिहिले आहे.आणि ही संकल्पना का निर्माण करण्यात आली असावी? काही लोक म्हणतात की कायदे करून आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करून समाजातील अनैतिक गोष्टी टाळल्या जातील.शेवटी कायदा सगळ्या ठिकाणी सगळ्या वेळी जाऊ शकणार नाही.आज जगातील प्रत्येक देशात गुन्हे घडतातच.अमेरिकेतले कायदे आणि त्याची अंमलबजावणी भारतात होते त्यापेक्षा अधिक कडक आहे हे वेगळे सांगायला नको.तरीही तिथेही गुन्हे घडतातच.याचे कारण काय्? त्यांना कदाचित कायद्याची भिती वाटत नसावी. अशा प्रकारच्या लोकांना नुसती अंमलबजावणी कडक करून आवरता येणार नाही.लोकांना गुन्हे करणे हे वाईट आहे हे वाटायला लागणे हे अधिक महत्वाचे नाही का? शिक्षणातून काही प्रमाणावर हा परिणाम घडेल पण पूर्ण प्रमाणात नाही. पूर्ण प्रमाणात का नाही किंवा कदाचित उलटा परिणामही घडेल. असे का? अनेकदा अधिक शिकलेले लोक अधिक सॉफिस्टिकेटेड पध्दतीने गुन्हे करतात हे दिसतेच.म्हणजे भुरटी चोरी करून पाच-दहा हजार मिळविण्यापेक्षा शिकून-सवरून कॉर्पोरेटमध्ये जाऊन कोट्यावधी रूपये खाणे हे अधिक मानाचे आणि रिवार्डिंग नाही का?तेव्हा शिक्षण विदाऊट मॉरल्स हे अत्यंत जहाल कॉम्बिनेशन आहे. त्यापेक्षा शिक्षण नसलेले परवडले. (महात्मा गांधींनी काही पापे सांगितली आहेत त्यात कष्टाशिवाय मिळालेल्या पैशाचा उपभोग घेणे, मॉरल्सशिवाय शिक्षण इत्यादींचा समावेश आहे). तेव्हा मॉरल्स सगळ्यात महत्वाची.आणि ही मॉरल्स प्रस्थापित करण्यासाठी जे काही उपयोगी पडेल ते डिझायरेबल आहे.आता यात "देव सर्वत्र आहे तो तुझ्यावर लक्ष ठेऊन आहे" किंवा "तू आता काही वाईट काम केलेस तर ते कधीनाकधी (अगदी पुढच्या जन्मीसुध्दा) भरावे लागेल" अशा कल्पनांमध्येही आपण वाईट कृती करू नये असे लोकांना वाटायला लावायची क्षमता आहे. बाय द वे, इमरान खानच्या पुस्तकातील एक उदाहरण दिले आहे त्याविषयी कोणीच काही का लिहिले नाही? परत एकदा लिहितो की एखादी गोष्ट वाईट आहे म्हणून मी ती करणार नाही किंवा एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून मी ती करणार असे वाटणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे लोक खरोखरच सर्वोच्च पातळीचे लोक असतात.पण बहुसंख्य लोक तसे नसतात ही गोष्ट उघड आहे.कायदा आणि शिक्षणाचाही पूर्ण उपयोग होणार नाही हे वर लिहिले आहेच.तेव्हा पुण्याचे प्रलोभन किंवा पापाची भिती दाखवून चांगल्या गोष्टी घडवून आणायची आणि वाईट गोष्टी टाळायची क्षमता या संकल्पनेत आहे आणि असे प्रलोभन्/भिती हे मानवी स्वभावाला अनुसरूनच आहे हे पण लिहिले आहे.जर गाड्यांना पी.यु.सी न केल्यास दंड नसेल तर किती लोक पी.यु.सी करतील?तेव्हा दंडाची भिती नसेल तर प्रदूषण वाढेल तितके वाढू द्यायचे का?देवाची भिती हा त्याचाच पुढचा भाग आहे.म्हणजे समोर पी.यु.सी चेक करायला कोणी नसेल तरी मी पी.यु.सी केले आहे की नाही हे देवाला माहित आहे आणि देव मला त्याबद्दल दंड करेल ही भावना पण त्याचाच पुढचा भाग आहे. तेव्हा माझ्या म्हणण्याचा उद्देश हा सोशल आहे फिलॉसॉफिकल नाही हे लक्षात घ्यावे ही विनंती. या मुद्द्यांवर कोणीच काहीही म्हटले नाही आणि चर्चा बरीच टॅन्जशिअल चालली आहे असे वाटते.
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
बरं मग तुमचे यावर सोल्युशन काय?सोल्युशनचा संबंधच नाही मी जे म्हटलंय त्यात. "सोल्युशन" हवंच आणि तेही बाहेरुन हा मूळ विचारच चॅलेंज करण्याची गरज आहे. यातलं काहीही न करताही कितीही मोठ्या संकटातून पार जाता येतं हे पटणं अवघड, पण ते सत्य आहे. ज्यांना देव या कल्पनेत आधार सापडतो त्यांना तो घेऊ द्यावा. पण ती काल्पनिक आहे हे स्पष्ट माहीत असतानाही त्याच व्यक्तीने त्या कल्पनेचा आधार घ्यावा याला सोल्युशन म्हणता येणार नाही..
In reply to बरं मग तुमचे यावर सोल्युशन by गवि
पण ती काल्पनिक आहे हे स्पष्ट माहीत असतानाही त्याच व्यक्तीने त्या कल्पनेचा आधार घ्यावा याला सोल्युशन म्हणता येणार नाही..मूळ लेखात म्हटले आहे की "लोकांना" वाईट कृत्यांपासून दूर ठेवण्यासाठी देव या संकल्पनेचा उपयोग होऊ शकतो. आता "लोक" म्हणजे कोण? मी सोडून सगळे का?तसे नक्कीच नाही.मी पण त्याच "लोकसमूहाचा" म्हणजे एका अर्थी समाजाचा भाग आहे. मुळातच अनेक वेळा लिहिले आहे की एखादी गोष्ट चांगली म्हणून (कोणत्याही प्रलोभनाशिवाय) करणारी किंवा एखादी गोष्ट वाईट म्हणून (कोणत्याही शिक्षेच्या धाकाशिवाय) ती टाळणारी मंडळी सगळ्यात महान असतात.स्वतःचे आत्मपरिक्षण केल्यावर माझ्या काय लक्षात येते?मी त्यात मोडतो का?नक्कीच नाही.काही प्रसंगी माझ्या हातूनही वाईट कृत्य घडू शकते. स्वतःविषयी मोठे मोठे दावे करणारे खूप लोक असतात. विवेकबुध्दी जागृत असली की झाले वगैरे म्हणणारेही अनेक असतात.पण प्रत्यक्षात त्यांची विवेकबुध्दी कायम जागृत असते का, कधीकाळी त्यांचा पायही घसरायची शक्यता आहे का या गोष्टी मला माहित नाहीत.त्या त्यांनाच माहित असाव्यात.तेव्हा इतरांविषयी भाष्य करत नाही.पण मी कधीच चूक करूच शकणार नाही असे मोठे पण आधार नसलेले दावे मी माझ्याविषयीही करणार नाही. ज्यांनी आतापर्यंत एकही पाप केलेले नाही त्यांनाच दगड मारायचा अधिकार असेल तर मला वाटते दगड मारायचा अधिकार असलेले किती लोक आहेत हे माहित नाही.पण मी त्यातला नाही हे मलाही जाणवते. तेव्हा मी कोणाला तरी अकाऊंटेबल आहे ही भावना असणे मलाही गरजेचे वाटते. तेव्हा जे काय करायचे ते इतरांनी करावे मला त्याची गरज नाही असे दांभिक दावे मी करणार नाही.
In reply to थोडे अधिक by क्लिंटन
तेव्हा माझ्या म्हणण्याचा उद्देश हा सोशल आहे फिलॉसॉफिकल नाही हे लक्षात घ्यावे ही विनंती. या मुद्द्यांवर कोणीच काहीही म्हटले नाही आणि चर्चा बरीच टॅन्जशिअल चालली आहे असे वाटते.देव हा विषय म्हटल्यावर चर्चा अशा अंगाने जाईल हा मुद्दा माझ्या लक्षात यायला हवा होता आणि तो वेळीच लक्षात न आल्यामुळे ही चर्चा बरीच टॅन्जशिअल चालू राहिली.असो.खरं म्हणजे या अंगाने चर्चा जावी असे मला वाटत नव्हते आणि चर्चा सोशल अंगानेच राहावी अशी माझी अपेक्षा होती.त्यामुळे काही प्रश्नांना उत्तरे मिळालेलीच नाहीत. उदाहरणार्थ इमरान खानने लिहिलेला अनुभव, आपण कोणाला तरी अकाऊंटेबल आहोत ही कल्पना कायद्यापेक्षा अधिक पॉवरफुल ठरू शकेल इत्यादी.असो. पुढच्या वेळी अशी स्फोटक चर्चा सुरू करताना हा मुद्दा नक्कीच लक्षात ठेवेन. असो. सगळ्यांचे चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
In reply to कुबडी ही लंगड्याकरताच by हुप्प्या
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
In reply to अगदी.. +१ by गवि
In reply to उगाच आता फाटे फोडू नका.. by स्पा
In reply to अगदी.. +१ by गवि
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
In reply to प्रत्येक मनुष्याला जीवनात by बाळ सप्रे
In reply to +२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एवढे विचार करायला मला कधी by ५० फक्त
In reply to एवढे विचार करायला मला कधी by ५० फक्त
In reply to सगळ्यांशीच सहमत. by कवितानागेश
In reply to क्लिंटनचे लेखाबद्दल, गविचे समन्वयाबद्दल आणि by संजय क्षीरसागर
In reply to आभार by नाना चेंगट
त्यामुळे पेशंटसना प्लासेबो देणं हे डॉक्टरच्या दृष्टीने समजण्यासारखं आहे, पण स्वतः त्या डॉक्टरने, ही गोळी केवळ साखरगोळी आहे हे माहीत असूनही स्वतःच्या आजारामधे त्याचा स्वतःवरच उपयोग करावा हे काय आहे..?
ज्यांना देव या कल्पनेत आधार सापडतो त्यांना तो घेऊ द्यावा. पण ती काल्पनिक आहे हे स्पष्ट माहीत असतानाही त्याच व्यक्तीने त्या कल्पनेचा आधार घ्यावा याला सोल्युशन म्हणता येणार नाही..आणि सरते शेवटी
सोल्युशनचा संबंधच नाही मी जे म्हटलंय त्यात. "सोल्युशन" हवंच आणि तेही बाहेरुन हा मूळ विचारच चॅलेंज करण्याची गरज आहे. यातलं काहीही न करताही कितीही मोठ्या संकटातून पार जाता येतं हे पटणं अवघड, पण ते सत्य आहे.
आता ही मनाची उभारी द्यायचे काम देव ही संकल्पना करत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? देव आपल्याबरोबर आहे तेव्हा आपले कोणी वाकडे करू शकत नाही या भावनेतून मनाची उभारी मिळत असेल तर त्यात चुकीचे काय?अनेक लोक सर्वकाही सुरळीत चालू असते तेव्हा आम्ही हे करू आणि ते करू असे दावे जरूर करत असतात.पण एखाद्या संकटाच्या वेळी मात्र त्यांचे हात देवासमोर आपोआप जोडले जातात हे पण अनेकदा बघायला मिळते.काही लोक असे असू शकतात की ज्यांना देव या संकल्पनेच्या आधाराची आयुष्यभर गरज पडली नाही. काही लोक देव या संकल्पनेचा गरजेपुरताच ( संकट काळी) आधार घेतात पण त्यात अडकून पडत नाही. ( स्वार्थी लेकाचे! ) काही लोक सर्वकाही सुरळीत चालले आहे पण हे असेच चालू राहील याची खात्री नाही तेव्हा सुखाच्या प्रसंगी सुद्धा देवाची आठवण ठेवतात व कृतज्ञता व्यकत करतात. यावरुन एक आठवण आली.मध्यंतरी बी प्रेमानंद जे अब्राहम कोवूर यांच्या चळवळीचा वारसा चालवणारे एक निरिश्वरवादी ( विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी) चिकित्सक कार्यकर्ते. त्यांच्या आजारपणात शेवटच्या दिवसात एक अशी अफवा / बातमी पसरली कि त्यांनी ईश्वराची संकल्पना मान्य केली/ इश्वर मानला. त्यामुळे एक स्केप्टिक लोकांनी त्यांचे एक स्टेटमेंट घेतले की मी ईश्वर मानीत नाही व त्यांची सही घेतली व ते पत्रक प्रसिद्ध केले.( आता मला त्याचा दुवा देता येणार नाही पण मला मेल आले होते) त्यानंतर ते गेले. नास्तिकतेच्या टप्प्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते. ईश्वर मानणारा तो अंधश्रद्ध अशी ती थेट मांडणी आहे. ईश्वर ही अवैज्ञानिक संकल्पना जो मानतो तो विज्ञाननिष्ठ तर नाहीच नाही पण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाराही नव्हे. मानवीय नास्तिक मंच याचाच शब्दोच्छल होउन सामाजिक तडजोड म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती तयार झाली. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या. ईश्वर या संकल्पनेच्या विविधते मुळेच ईश्वर टिकून आहे. असो जय श्रीराम ( मला कुणालाही शिवी द्यायची नाही)
In reply to आता ही मनाची उभारी द्यायचे by प्रकाश घाटपांडे
नास्तिकतेच्या टप्प्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते. ईश्वर मानणारा तो अंधश्रद्ध अशी ती थेट मांडणी आहे. ईश्वर ही अवैज्ञानिक संकल्पना जो मानतो तो विज्ञाननिष्ठ तर नाहीच नाही पण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाराही नव्हे.यातच सगळी मेख आहे. ईश्वर मानणे न मानणे हा मुद्दा इतका का चर्चिला जातो त्याचे सर्वाधिक कारण हे अंहकारी आणि केवळ स्वत:च शहाणे असे समजत इररांना तुच्छ लेखणारे निरीश्वरवादी असतात, अथवा जे कुठलाच धर्म न मानणारे (अर्थात खर्या अर्थाने निरीश्वरवादी आहेत) म्हणजे चूक म्हणत स्वतःला समजणारे "शहाणे" ईश्वरवादी असतात. केवळ कर्मकांड आणि अंधश्रद्धा याला विरोध असला तर निरिश्वरवाद्यांच्या बाजूने निव्वळ सश्रद्ध (अंधश्रद्ध नव्हे) ईश्वरवादी सहज येऊ शकतात असे वाटते. पण तेथे ही स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणत इतरांना (ईश्वरवाद्यांना) कमी लेखण्याची अस्पृश्यता मानणारी वृत्ती बर्याचदा आढळते. असो.
In reply to मेख by विकास
In reply to घाबरुन राहायचं ते माणसाला, देवाला नव्हे... by योगप्रभू
In reply to आस्तिकता आणि नास्तिकता by अवतार
तेव्हा "देवाला रिटायर करा" यापेक्षा "आपल्या संकल्पना, विचारसरणी इत्यादी इतरांवर लादण्याची परंपरा रिटायर करा" असे म्हणण्याची वेळ आली आहे.हे सांगायला जालीय मिपावर पण अवतार यावा लागला तर वास्तवात काय लागेल? ;)
In reply to आस्तिकता आणि नास्तिकता by अवतार
मुळात "देवाला रिटायर करा" हेच आक्रमक स्वरूपाचे विधान आहेएकदम मान्य.. परंतु हा आक्रमकपणा वैचारीक पातळीवरच राहतो.. ते एक आवाहन राहते.
आपल्या संकल्पना, विचारसरणी इत्यादी इतरांवर लादण्याची परंपरा रिटायर करात्याचबरोबर आणि वैचारीक पातळीवरील विरोधी विचारसरणी सहन करायला शिका.. नाजूक भावनांचा वारंवार होणारा उद्रेक टाळायला शिका..
In reply to मुळात "देवाला रिटायर करा" हेच by बाळ सप्रे
In reply to कोणी Ancient Aliens पहिले by पुष्कर जोशी
हा ही एक पैलु आहे.