Skip to main content

देवाला रिटायर का करा?

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 24/11/2012 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही. पण या कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी रिलेशन आहे हे बहुदा गृहित धरल्यामुळे कर्मकांडांविरूध्द असलेला रोष हा देवाविरूध्द असलेल्या रोषात कधी बदलतो हे समजत नाही.तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का? उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही पण निदान या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा अशी नम्र विनंती. अनेकांना असे वाटते की कोणत्यातरी गोष्टीची भिती दाखविल्याशिवाय किंवा कसलेतरी प्रलोभन दाखविल्याशिवाय आपण चांगले वागूच शकत नाही का?माझ्या मुद्द्याचा नेमका हाच गाभा आहे. मनुष्य स्वभावच (in general) असा आहे की आपल्याला पाहिजे असलेली एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करवून घेण्यासाठी कसलेतरी प्रलोभन किंवा भिती दाखवावीच लागते.लहान मुलांनाही तुला चॉकलेट देईन हे प्रलोभन किंवा ते चालले नाही तर मार देईन ही भिती दाखवावीच लागते ना?दोन-तीन वर्षाची लहान मुले वागण्यात/ विचारात कोणतीही भेसळ न झालेली म्हणजेच मनुष्यस्वभाव आहे त्याचे अगदी निरागस रूप असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.तरीही त्यांनाही एक तर चॉकलेटचे प्रलोभन नाहीतर माराची भिती यापैकी एक काहीतरी दाखवावे लागतेच ना?बरं मोठे झाल्यानंतर वेगळी परिस्थिती असते का?कारखान्यांमधून प्रदूषण होते आणि त्या प्रदूषणाचे वाईट परिणाम होतात हे सर्वमान्य आहे.पण किती कारखानदार स्वत:हून प्रदूषण कमी करायचा प्रयत्न करतात?त्यांनाही प्रदूषण कमी केल्याबद्दल करांमध्ये सवलतींचे प्रलोभन नाहीतर दंडाची भिती दाखवावीच लागते ना?मी भारतातील माझ्या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शिक्षणसंस्थेचा विद्यार्थी होतो आणि अमेरिकेतही reputation च्या बाबतीत मध्यम असलेल्या शिक्षणसंस्थांचा मी विद्यार्थी राहिलो आहे.या संस्थांमध्ये पर्यवेक्षक नसलेली एकही in-class परिक्षा मी अजूनपर्यंत बघितलेली नाही. Take home परिक्षांमध्येही turn-it-in नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दोन विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून किंवा आंतरजालावरील कोणत्याही संकेतस्थळावरून कॉपी केली आहे का हे समजू शकते.मी नाकासमोर चालणारा मनुष्य असल्यामुळे मी अगदी टेक-होम परिक्षांमध्येही कॉपी करायच्या भानगडीत कधीच पडलो नाही.अमेरिकेत आमच्या विद्यापीठातच दोन भारतीय विद्यार्थ्यांना असे पकडून त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यापर्यंत वेळ गेली होती हे मी स्वत: बघितले आहे.म्हणजे टेक-होम परिक्षांमध्येही त्या सॉफ्टवेअरच्या रूपातून पर्यवेक्षक असतोच. आता एक गोष्ट सांगा की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये हे जगातील अगदी सगळ्या शिक्षणसंस्थांच्या संचालकांना वाटत असेल आणि कॉपी करणे अयोग्य आहे याविषयीही दुमत नसावे.पण तरीही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पर्यवेक्षकांशिवाय परिक्षा होऊ शकत नाही याचे काय कारण असावे?पकडले जायची भिती नसेल तर किती विद्यार्थी "कॉपी करणे वाईट आहे" याच एका कारणावरून कॉपी करणार नाहीत?जर एखाद्या परिक्षेच्या वेळी पाहिजे तितकी तयारी झाली नसेल तर कदाचित माझ्यासारखा मनुष्यही कॉपी करायला उद्युक्त होऊ शकेल.पण पकडले गेल्यास परिणाम वाईट होतील त्यापेक्षा कमी मार्क मिळालेले परवडले असे वाटून माझ्यासारखे अनेक त्यापासून परावृत्त होतील. म्हणजे "पकडले जायची भिती" या स्वरूपात भिती आलीच. आता एक गोष्ट सांगा की देवाची संकल्पना तरी नक्की काय वेगळी आहे?एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचे पाप मला लागेल (आणि देव त्याची शिक्षा मला करेल ही भिती) आणि एखादी चांगली गोष्ट केल्यास त्याचे पुण्य मला मिळेल (आणि कोणत्यातरी स्वरूपात त्याचे बक्षिस मला मिळेल हे प्रलोभन) या कारणामुळे का होईना योग्य त्या गोष्टी केल्या जात असतील तर त्याच वाईट काय?ज्यावेळी आपण काय करत आहोत हे कोणीही बघत नसतो तेव्हा आपण कसे वागतो/काय करतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे.पण कोणीही बघत नसले तरी देव बघत आहे या जाणिवेतून का होईना जर चांगली कृत्ये केली जात असतील तर त्यात काय वाईट आहे?जर असे कोणतेही प्रलोभन किंवा भिती नसतानाही जर कोणी चांगले वागत असेल तर अती उत्तम पण बहुसंख्य लोक तसे असतात का?आणि अशांसाठी देव ही संकल्पना असणे हे महत्वाचे आहे. आता एक प्रश्न नक्कीच उभा राहिल की चांगले काय आणि वाईट काय याची व्याख्या प्रत्येक माणसापरत्वी बदलेल.तेव्हा नक्की चांगले काय आणि वाईट काय हे ठरविणार कोण?या दृष्टीने धर्म या संकल्पना महत्वाची आहे असे मला वाटते.म्हणजे नक्की चांगले काय आणि वाईट काय हे (मुळातल्या) धर्मात सांगितले असावे/आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात दुर्बलता आहे असे अनेकांना का वाटते हे समजत नाही.अमेरिकेत असे असते आणि तसे असते असे इथेच अनेकदा लिहिले जाते.तर मग देवाविषयी त्याच अमेरिकेत काय बोलले/लिहिले जाते हे लिहितो.अमेरिकेच्या सरकारचा अधिकृत मोटो आहे---"In God we trust". अमेरिकेतल्या नाण्यांवर आणि नोटांवर हा मोटो लिहिलेला असतो. अमेरिकेचे अध्यक्ष शपथ घेतात तेव्हा ती शपथ आहे: "I, XYZ, do solemly affirm that I will faithfully execute the office of President of United States and to the best of my ability preserve, protect and defend the constitution of United States. So help me God". जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा शपथ घेतल्यानंतर हे So help me God हे चार शब्द अनवधनाने उच्चारले आणि त्यानंतर हे शब्द शपथेचाच भाग करण्यात आले. (२० जानेवारी २०१३ ला बराक ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतील तेव्हा हे बघायला मिळेल). तसेच अमेरिकेचे राष्ट्रगीत आहे: God bless America my home sweet home. आमचा देवावर विश्वास आहे हे (अजून तरी) महासत्ता असलेल्या देशाला म्हणण्यात कसलेही वैषम्य वाटत नाही तेव्हा देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात काहीही दुर्बलता नाही हे समजून यायला हरकत नाही. (अमेरिकेत जर काही नसले तर देवाच्या नावावर रस्यावर चाललेला धांगडधिंगा ---जो आपल्याकडे गणेशोत्सव आणि अमक्यातमक्या महाराजांच्या जयंत्यांच्या दिवशी चालू असतो.) माणसाला subconscious mind म्हणून एक अत्यंत सामर्थ्यवान असलेले एक मन असते.कोणत्याही औषधाची चाचणी घेताना नेहमी दोन वेगळ्या गटांवर चाचणी घेतली जाते असे वाचनात आले आहे.पहिल्या गटाला ते औषध देतात तर दुसऱ्या गटाला औषध देत आहे असे सांगून निरुपयोगी आणि निरूपद्रवी असे placebo देतात.आता असे placebo द्यायचे कारण काय असावे? आपल्यावर काही उपचार केले जात आहेत या भावनेतून एक मनाची उभारी येते आणि रूग्णाला बरे करण्यात या मनाच्या उभारीचाही भाग असतोच.तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासून बघताना मनाची उभारी आणि त्यातून बरे वाटणे हा factor बाजूला काढून केवळ औषधाची standalone उपयुक्तता तपासून बघण्याच्या दृष्टीने placebo देतात. Napoleon Hill या लेखकाचे एक खूप सुंदर वाक्य आहे (आणि मला या वाक्याचा स्वत:ला खूपच उपयोग झाला आहे):"Whatever the human mind can conceive and believe it can achieve". आता ही मनाची उभारी द्यायचे काम देव ही संकल्पना करत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? देव आपल्याबरोबर आहे तेव्हा आपले कोणी वाकडे करू शकत नाही या भावनेतून मनाची उभारी मिळत असेल तर त्यात चुकीचे काय?अनेक लोक सर्वकाही सुरळीत चालू असते तेव्हा आम्ही हे करू आणि ते करू असे दावे जरूर करत असतात.पण एखाद्या संकटाच्या वेळी मात्र त्यांचे हात देवासमोर आपोआप जोडले जातात हे पण अनेकदा बघायला मिळते. मला स्वत:ला देव या संकल्पनेचा खूपच फायदा झाला आहे.चार-पाच वर्षांपूर्वी मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले.लेखकाने लिहिले आहे की देवाचे आपल्या आजूबाजूला अस्तित्व आहे हे नुसते मानू नका तर ते feel करा.तसेच "I can do all things through Christ who strengthens me" अशा स्वरूपाची वाक्ये म्हणा.या गोष्टी मी केल्या आणि त्याचा नक्कीच फायदा मला झाला.मी त्या संकटातून बाहेर पडलो त्यात या prescription मुळे मला मिळालेल्या मनाच्या उभारीचा वाटा मी केलेल्या कष्टांइतकाच आहे असे मला वाटते. हे वाचणाऱ्या अत्यंत rational आणि पुरोगामी मंडळींनाही मी सांगतो की तुम्ही कोणत्याही संकटात पडावे ही अजिबात इच्छा नाही पण समजा अशा संकटात सापडलात तर या prescription चा उपयोग करून बघा नक्की फायदा होईल.अर्थातच या गोष्टींचा उपयोग होण्यासाठी थोडेतरी सश्रध्द मन हवे.जर देव अस्तित्वातच नाही असेच गृहित धरून चालले तर या prescriptions चा अजिबात उपयोग होणार नाही. देवाच्या आणि धर्माच्या नावाने अवडंबर करून रस्त्यावर धांगडधिंगा करणे, कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर कान फाटायची वेळ येईपर्यंत बोंबलणे,देवा-धर्माच्या नावाने लोकांना लुबाडणे इत्यादी गोष्टींचा मला मनस्वी तिटकारा आहे हे मी याच व्यासपीठावर अनेक वेळा लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.या गोष्टी होतात म्हणून देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्यांना मी एक प्रश्न परत एकदा विचारतो की तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? देव या संकल्पनेला की देवाच्या नावावर केल्या जात असलेल्या धांगडधिंग्याला? देव आणि धर्म या संकल्पनेची उपयुक्तता याविषयी माझे मत वर लिहिलेच आहे.तरी आपण अमक्या धर्मात जन्माला आलो याचा अभिमान आणि "आमचाच" धर्म कसा श्रेष्ठ या गोष्टी मला अजिबात समजलेल्या नाहीत.पण हा मुळातला विषय नसल्यामुळे याविषयी काही लिहित नाही. त्याचप्रमाणे काय हा देव, समाजातले अन्याय आणि इतर वाईट गोष्टी तो थांबवू शकत नाही म्हणून त्याला रिटायर करा असे म्हणणारे लोक असतात.म्हणजे कुठेतरी देव हा या गोष्टी थांबवू शकेल हे त्यांनीही मान्य केलेले असते का अशी शंका वाटल्यावाचून राहत नाही.अशा मंडळींना माझे सांगणे एकच की देव ही एक उपयुक्त संकल्पना माणसानेच निर्माण केली असली तरी त्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर आहे.अणुउर्जेचा वापर वीज निर्माण करायला करायचा की बॉम्ब बनवायला हे आपणच ठरवायचे.तीच गोष्ट काहीशी देवाच्या संकल्पनेबाबत.जर समाजात अन्याय करणारे लोक असतील तर त्याचे खापर देव या संकल्पनेवर का फोडता? तेव्हा देव रिटायर करायचा की त्याच्या नावाने चाललेला धांगडधिंगा रिटायर करायचा याचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेल्यांनी शोधल्यास बरे होईल. Amen.

वाचने 42451
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

उपयुक्ततावादाच्या दृष्टीकोनातुन देव-धर्म संकल्पनेचं विवरण आवडलं. पण देवपण इथेच संपत नाहि. "मी कोण?" या सनातन प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेकांना "सर्व कारणांचं मूळ कारण" म्हणुन देव सापडला. असो. अर्धवटराव

म्हंटला तर एक क्लिष्ट विषय पण मांडणीमधल्या सहजपणामुळे एकदम सोपा झालेला. गुणवान टेनिसपटू याच्या 'व्हाय मी?' या प्रसिद्ध प्रेरणादायी विधानाचे मला स्मरण झाले. तत्त्वज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी हि एक महत्त्वाची संकल्पना आहे. आपल्यावर संकटे आली असताना जर असा विचार केला की एकतर आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या इतर मोठ्या संकटाला सामोरे जायची क्षमता विकसीत करण्यासाठी म्हणून देवाने / दैवाने / परिस्थितीने दिलेली एक संधी म्हणून बघितले तर 'आपल्यावर अन्याय झालाय' ही भावना नष्ट होऊन त्या संकटाला तोंड देण्यासाठी खिलाडूवृत्ती निर्माण होते. देव या संकल्पनेवर माझ्या एक आवडत्या शिक्षिका आमचे बौद्धिक घ्यायच्या. अन शालेय वयात ते आचरणशुद्धीसाठी फारच सहाय्यक ठरले. त्यांचे म्हणणे होते की प्रत्यक्षात देव तर कधी आपल्याला अनुभवता येत नाही. पण भोवताली असणाऱ्या माणसांच्या चांगुलपणालाच आपण देव असे समजू शकतो. बरेचदा इतर वेळी तुसडेपणाने किंवा स्वार्थाने वागणाऱ्या व्यक्तीही कधी कुणा गरजवंताला मदत करतात. त्यांच्या या प्रकारच्या कृती म्हणजेच देवाचे अस्तित्व. माझ्या मनातले अनेक गोंधळ या संकल्पनेमुळे दूर झाले. कारण त्या वयात काही लक्षवेधी उदाहरणांमुळे काही प्रसिद्ध व्यक्तींबाबत माझे अत्यंत नकारात्मक मत बनत असे. उदा. टाडा कायद्याद्वारे अनेक महिने तुरुंगात असणारा एक प्रसिद्ध अभिनेता त्याला मी पूर्णपणे देशद्रोही ठरवून मोकळा झालो होतो अन त्यासोबत इतर कुणा प्रसिद्ध व्यक्तीचे छायाचित्र छापून आले की मला फार वाईट वाटत असे. एकदा त्याच्याबरोबर सचिन तेंडुकलर व कपिल देव यांचे चित्र छापून आले. त्या वयात हा संभ्रम की देशासाठी नायक असणारे दोन आघाडीचे खेळाडू एका देशद्रोह्याबरोबर कसे काय दिसू शकतात माझ्यासाठी फारच वेदनादायक ठरला होता... पण वरील संकल्पनेमुळे त्यावर योग्य ती मलमपट्टी झाली.

In reply to by श्रीरंग_जोशी

आपल्यावर संकटे आली असताना जर असा विचार केला की एकतर आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या इतर मोठ्या संकटाला सामोरे जायची क्षमता विकसीत करण्यासाठी म्हणून
कृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे.
आपल्यावर संकटे आली असताना जर असा विचार केला की एकतर आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत म्हणून किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या इतर मोठ्या संकटाला सामोरे जायची क्षमता विकसीत करण्यासाठी म्हणून
'म्हणून' हा शब्द टंकताना गाळला गेल्याने वाक्याचा अपेक्षित परिणाम साधला जात नव्हता...

माणसाला subconscious mind म्हणून एक अत्यंत सामर्थ्यवान असलेले एक मन असते.कोणत्याही औषधाची चाचणी घेताना नेहमी दोन वेगळ्या गटांवर चाचणी घेतली जाते असे वाचनात आले आहे.पहिल्या गटाला ते औषध देतात तर दुसऱ्या गटाला औषध देत आहे असे सांगून निरुपयोगी आणि निरूपद्रवी असे placebo देतात.आता असे placebo द्यायचे कारण काय असावे? आपल्यावर काही उपचार केले जात आहेत या भावनेतून एक मनाची उभारी येते आणि रूग्णाला बरे करण्यात या मनाच्या उभारीचाही भाग असतोच.तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासून बघताना मनाची उभारी आणि त्यातून बरे वाटणे हा factor बाजूला काढून केवळ औषधाची उपयुक्तता तपासून बघण्याच्या दृष्टीने देतात.
प्रचंड श्रद्धा आणी पुरेसा आत्मविश्वास एखाद्या मानसाला खोटेच सांगीतले कि तुला असाध्य आजार झाला आहे,तरी तो अर्धमेला होउन जातो.अन आजार झालेला असताना देखील तो न कळल्याने (न सांगितल्याने)त्याच्या मनावर यत्कींचीतही परीणाम होत नाही,(निदान दोन दिवस तर जास्त जगतो)

गतीरोधक (ब्रेक) बिघडल्याने दरीच्या दिशेने सरकणारी एक बस एका दगडाला अडून थांबली. सगळे प्रवासी सुखरूप वाचले. त्या दगडात सर्वांन देव दिसला.

In reply to by प्रभाकर पेठकर

देव कशासाठी हवा यावर ह्याचे उत्तर अवलंबून आहे.. ;) असो. मुळात देवामुळे जीव वाचतो म्हणून देवाचा उदो करायचा ही कल्पनाच चुकीची आहे. [त्याच्यामुळे वाचू शकतो हे मान्य असले तरीही.] कारण तसे नेहमी होत असते तर कुणी मेलेच नसते. न तो जन्माला घालतो, न तो जीव घेतो. ते कर्माचे-कर्मफलाचे काम आहे. हे मान्य केले तर त्यात पुनर्जन्माचा मुद्दा येतो अन् वाद निर्माण होतो. आता ते पुराव्यानिशी सिद्ध कुणी करू शकेल असे वाटत नाही [इथे संतांबद्दल बोलत नाही. देवावरच विश्वास नाही तर संतांवर कुठे असणार?]. आपापल्या श्रद्धेचा भाग आहे. ज्याचा विश्वास आहे त्याचा आहे, नाही त्याचा नाही. माझं म्हणणं इतकंच की शाश्वतावरचा विश्वास कोणत्याही अशाश्वत गोष्टीवर अवलंबून असू नये. त्यास तडा जाण्याचा संभव असतो. राघव

आपण काही देवाला नोकरीवर ठेवला नाही मग रिटायर कसा करणार? :D पण लेख आवडला आहे. सविस्तर प्रतिक्रिया एक ब्रेक के बाद!

'परमेश्वराला रिटायर करा' असे जेंव्हा काही लोक म्हणतात तेंव्हा, त्यांचा देव या संकल्पनेवर विश्वास नसतोच असे नाही. पण लोकांनी अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर यावे, देवाची भीति दाखवून त्याच्या नांवावर धंदा करणार्‍यांना प्रतिबंध व्हावा, हीच मुख्य इच्छा असते. निसर्गाचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा तुमचा या अदृश्य शक्तीवर विश्वास दृढ होईल. पण त्याचे अवडंबर माजवून, कामापेक्षा वा लोकांची सेवा करण्यापेक्षा जर कर्मकांडाला जास्त महत्व प्राप्त झाले तर त्याला आमच्यासारख्यांचा विरोध असतो. तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना विरोध असणारच, कारण त्यामुळे आवाज, धांगडघिंगा, दादागिरी, रहदारीला अडथळे असले त्रास विनाकारण सहन करावे लागतात. बाकी लेखात लिहिलेला मुद्दा पटला व सामान्य, भोळ्याभाबड्या लोकांसाठी देव ही संकल्पना आवश्यक आहेच.

In reply to by तिमा

पण त्याचे अवडंबर माजवून, कामापेक्षा वा लोकांची सेवा करण्यापेक्षा जर कर्मकांडाला जास्त महत्व प्राप्त झाले तर त्याला आमच्यासारख्यांचा विरोध असतो. तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना विरोध असणारच, कारण त्यामुळे आवाज, धांगडघिंगा, दादागिरी, रहदारीला अडथळे असले त्रास विनाकारण सहन करावे लागतात.
या प्रकारांना माझा प्रचंड विरोध आहे नव्हे तिटकारा आहे हे इथेच मी अनेक वेळा लिहिले आहे.मी तर म्हणतो की गणेशोत्सवात किंवा इतर कोणत्याही प्रसंगी रस्त्यावर धांगडधिंगा करून पब्लिक न्युसन्स करणाऱ्यांविरूध्द अगदी कडक कारवाई व्हायला हवी.ज्यांना गणपती उत्सव साजरा करायचा आहे त्यांनी त्यांच्या घरी साजरा करावा लाऊडस्पीकरवर बोंबलून त्रास देऊ नये हेच माझेही मत आहे. अनेक लोकांचा अशा धांगडधिंग्यामुळे देवावरील विश्वास उडतो ही अगदी नेहमी सामान्यपणे दिसणारी गोष्ट आहे.पण ते योग्य आहे का?म्हणजे कर्मकांडांचा फोलपणा लक्षात येऊन देवावरचा विश्वास उडत असेल तर कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी कोरिलेशन आहे हे मुळातच गृहित धरल्यासारखे झाले.हे गृहितक मुळातच बरोबर आहे का? माझा मुद्दा स्पष्ट करायला आणखी काही उदाहरणे देतो: १. महात्मा गांधींचे नाव घेत सत्तेवर आलेल्यांपैकी अनेकांनी भ्रष्टाचार/गुंडगिरी वगैरे केली.हे किळसवाणे प्रकार बघून मुळातच महात्मा गांधींवरचा आणि त्यांच्या विचारांवरचा विश्वास उडणे कितपत योग्य आहे? २. संसदेत निवडून आलेले खासदार हे एक नंबरचे लफंगे आणि भ्रष्टाचारी आहेत म्हणून ज्या व्यवस्थेतून ते निवडून येतात (लोकशाही) त्यावरील विश्वास उडणे कितपत योग्य आहे? ३. शिवाजी महाराज आणि शंभूराजांचे नाव घेत संभाजी ब्रिगेडवाली मंडळी उघड-उघड गुंडगिरी करतात.म्हणून मुळातच शिवाजी महाराज किंवा शंभूराजे वाईट ठरतात का? तेव्हा देवाच्या नावाने जो धांगडधिंगा घातला जातो त्यावरून देवावरचाच विश्वास उडत असेल तर अशाच मंडळींना माझा मुळातला प्रश्न आहे--तुमची तक्रार देवाविरूध्द आहे की देवाच्या नावाने चाललेल्या धांगडधिंग्याविरूध्द आहे हे तुम्ही तपासून बघितले आहे का?

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब, देवाचा माह्रीत नाही, पण ब्रिगेडचा कोप होइल.. :D

In reply to by तिमा

"निसर्गाचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा तुमचा या अदृश्य शक्तीवर विश्वास दृढ होईल" बर्‍याच जणांचा प्रवास विरुद्ध दिशेने सुद्धा होतो. टॉलस्टॉयचं उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही,,, नास्तिक झाल्यावर, आयुश्य ही सिसिफसची शोकांतिका आहे असं त्याला वाटायला लागलं तेंव्हा त्याने परत देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि असं निरर्थक आयुश्य मी जगूच शकत नाही या कारणाने तो परत आस्तिक झाला होता. आपण ज्या चांगल्या वाईट गोष्टी करतो त्याच्यावर लक्ष ठेवणारं कोणीतरी आहे, या गृहीतकाची त्याला गरज होती. सांगायचा मुद्दा म्हणजे जसा जसा आपण विचार करत जातो, तसंतसं नास्तिक म्हणून जगणं किती असह्य आहे याची जाणीव होत जाते. यातून लोक परत आस्तिक होत जातात. विश्वास दृढ झाल्यामुळे नाही...

In reply to by आबा

आयुश्य ही सिसिफसची शोकांतिका आहे
मी आधी चुकून सिफीलसची शोकांतिका असे वाचले आणि हापिसात दुपारी डोळ्यावर हमखास येणारी झोप उडली.... पण मग संजयकाकांचे प्रतिसाद वाचून परत आली ;-)

संपूर्ण लेख " देवाला रिटायर करा म्हणणारे " कन्फ्यूझ्ड आहेत या गृहितकावर आधारित आहे. " देवाला रिटायर करा " हे वाक्य सहजासहजी ओठावर येणे शक्य नाही. किंबहुना अनेकांना त्याचा उच्चार तर सोडाच, हे वाक्य कानावर आले तरी कानाचे पडदे बंद व्हावे असेच वाटते. लेखात असा उल्लेख आहे की देव एका मॉडरेटरचे काम करतो. प्रत्यक्षात जे देवधर्माच्या नावाखाली जे गैरव्यवहार करतात त्या व्यक्तींना कधीच रिटायर केले आहे.

अगदी हेच म्हणणे आहे माझेही. बर्‍याचवेळा लोकांना मी हा प्रश्न विचारतो तेव्हा जरा गडबडतात असा अनुभव आहे :)

देवाला रिटायर करा म्हणजे नेमक्या कोणत्या देवाला रिटायर करायचे ? ब्रह्माला ? विष्णूला ? शंकराला ? इंद्रला ? वरूणाला ? नेमक्या कोणत्या ?

In reply to by दादा पेंगट

देवाला रिटायर करा म्हणजे नेमक्या कोणत्या देवाला रिटायर करायचे ? ब्रह्माला ? विष्णूला ? शंकराला ? इंद्रला ? वरूणाला ? नेमक्या कोणत्या ?
या प्रश्नाचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेलेच देऊ शकतील :)

‘देव’ ही संकल्पना उपयुक्त आहे, याच्याशी सहमत. काही प्रश्न पडले आहेत. ‘देवाला रिटायर करा’ म्हणणारे लोक म्हणजे नास्तिक की कर्मकांडविरोधी ? ‘नास्तिक’ कुणाला म्हणावे ? विज्ञानवाद्यांना नास्तिक म्हणावे का ? शास्त्रज्ञ देवाचे अस्तित्व नाकारतात का ? शास्त्रज्ञांनी मूलकणांना ‘गॉड’ पार्टिकल्स असे नाव का दिले असावे ?

आपल्याला ज्या गोष्टींचे आकलन होत नाही किंवा स्पष्टीकरण देता येत नाही त्यांच्या बाबतीत "देवाला ठाऊक" किंवा "देवाची मर्जी" असे म्हणून आपण तो विषय संपवतो. खरोखरच देव आहे आणि त्याला ती गोष्ट ठाऊक आहे किंवा ती गोष्ट खरोखरच त्याच्या मर्जीमुळे घडली आहे असा त्याचा अर्थ नसतो. कोंडीतून निसटण्याची ही एक सोपी पळवाट असते. विज्ञानाच्या मार्गावर जाणारे कर्मकांडांच्या विरोधात असतात कारण त्यांची निरर्थकता स्पष्टपणे दिसते. देव ही संकल्पना ऐसपैस आणि अस्पष्ट आहे. "आपल्याला जे कळले नाही ते दैवी" अशीच त्याची व्याख्या केली तर त्याला नाकारता येणारच नाही, कारण माणसाची आकलनशक्ती किती कमी आहे याची वैज्ञानिकांना चांगली जाणीव असते.

In reply to by आनंद घारे

अ) पोरं सुद्धा देवाच्या कृपेमुळं होतात असं म्हणत म्हणत एवढि पोरं होतात, की मग "तुच सांभाळ रे देवा" म्हणावं लागतं.. ब) बागुलबुवा येउन घेउन जाईल अस सांगुन मुलाला झोपवायलाच लागतं.. अगदि बरोबर. पण काय आयुष्यभर हेच सांगणार त्याला? खरं काय ते कळु दे की त्याला.. हां?? दिल तो बच्चा है म्हणुन कायमच अंधारात ठेवयच असेल तर ठेवा बाबा.. आमचं काय जातय?? गोड ब्लेस्स यु ऐन्ड युवर चाइल्ड.. क) power of mind - मान्य आहे.. placebo works - सहमत. पण कधीकधी देवावर इतका विश्वास ठेवतात काही माणसं, की, "असेल हरी तर देइल खाटावरी" म्हणत काही प्रयत्नच नाही करत. श्रद्दा आणी अंधश्रद्धा यात रेघ खुप बारीक आहे.. ड) आणी हो, "मनगटातली ताकद संपली की माणुस हातामध्ये भविष्य शोधु लागतो". (FB वरुन साभार). भविष्य आणि देवाचा खरच काही संबंध आहे कि नाहि माहित नाहि, पण बरेच जण लावतात. ज्याला माहीती आहे कि महिन्या अखेरीस पगर मिळणार आहे, तो नवस बोलतच नाही. ज्याचा धंदा राम भरोसे आहे, तो बोलतो. हुशार मुलाला कॉपी करायची गरजही नाही, हौसही नाही मग भीतीचा प्रश्नच उरत नाही.. इ)तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. (पै). जे काही बरं-वाईट घडेल त्याला देव जबाबदार आहे असं न म्हणता, कारणं शोधा.. गरज असेल अन शक्य असेल तर परिस्थिती बदला. आणी बदलता येत नसेल तर just chill.. स्बीकारा जे वाढून ठेवलय ते. "तो" सुद्धा काही नाही मदत करु शकणार. बाकी विषय आवडला.. कुणीतरी लिहलं होतं, आजकाल ज्याचा स्वत:वर विश्वास नाही त्याला नास्तीक म्हणता येइल (एक आस्तिक)- टिमकी.

देव शब्दाच्या व्युत्पत्तीपर्यंत गेले तर "दिव" म्हणजे प्रकाशमान हा अर्थ सापडतो. लाकडे घासून अग्नी तयार करणार्‍या लोकांना सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे "प्रकाशमान" देव असे वाटले तर आश्चर्य नाही. त्याच्या काळात अंधारातून प्रकाश उत्पन्न करणार्‍या शक्ती या देव समजल्या गेल्या. आदिमानवाला निसर्गातल्या शक्ती, ज्यांच्यापुढे माणूस थिटा भासतो त्या देवतास्वरूप वाटल्या. म्हणजेच आपल्यापेक्षा सामर्थ्यवान अशी शक्ती जी श्रद्धेय वाटते ती आपल्यासाठी देव असते. नास्तिक माणूस मूर्तीस्वरूपातल्या देवावर श्रद्धा ठेवणार नाही पण ज्या निसर्गनियमानुसार हे जग चालू आहे त्यावर ठेवील. कोणी माणसातल्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवील. मग त्यातून कोणाकोणाला साईबाबांसारखे व्यक्तीविशेष देवतास्वरूप वाटायला लागतील. ज्याच्यावर आपला भार टाकावा त्याचे काही चित्र डोळ्यासमोर असणे सामान्य माणसाला जरुरीचे असते. निर्गुण निराकाराची उपासना करणे हे कठीण काम आहे. म्हणूनच मग देवांची वेगवेग़ळ्या रूपात पूजा केली जाते. मग ती शब्दश: असो की मानसरूपात. कोणाला एखादा दगड पूजनीय वाटेल तर कोणाला एखादे पुस्तक, कोणाला एखादी व्यक्ती, तर कोणाला एखादी संकल्पना. मूर्तीपूजेच्या निमित्ताने रस्त्यावर गोम्धळ घालणे, नाना प्रकारे देह कष्टवणे, धर्माचे अवडंबर, कर्मकांडाचे अवडंबर या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे बरोबरच आहे. पण जे लोक जास्त विचार करू शकत नाहीत त्यांना देवाबद्दल भीती किंवा प्रेम यापैकी कोणत्याही भावनेने देवामुळे आयुष्य सुसह्य होत असेल तर मी त्यांना तसे काही केले म्हणून नावे ठेवणार नाही. माझी श्रद्धा कुठे आहे हे मी माझ्यापुरते ठेवीन पण दुसर्‍याच्या श्रद्धेला हसण्याचा मला काही हक्क नाही. पाश्यात्य जगात God-fearing असा शब्दप्रयोग जास्त वापरला जातो. तिथे देव ही भिण्याची गोष्ट समजली जात असेल पण आपल्या भारतीय पद्धतीत देवाला सखा, जवळचा मानण्याची पद्धत आहे. आपल्याकडे "देवभोळा" असा एक शब्दप्रयोग आहे तो जास्त लोकांना लागू होतो असं मला वाटतं. अर्थातच 'मी चांगला वागलो नाही तर मला शिक्षा करणारा कोणीतरी आहे' ही भावना ज्याच्यात असेल तो आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होऊ नये याची काही प्रमाणात तरी काळजी घेईल. तसंच मी संकटात सापडलो किंवा काही दु:खाचा प्रसंग आला, तर जो मला आधार देईल, मला सावरून घेईल असा कोणीतरी माझ्या जवळचा आहे ही भावनाही जगण्याला बळ देते. माणूस वयाने किंवा कर्तृत्त्वाने कितीही मोठा झाला तरी आपल्या डोक्यावरून हात फिरवणारा कोणीतरी आहे ही भावना नक्कीच सुखकारक असते. आपल्या सगळ्या कर्मांची आणि चुकांची जबाबदारी दुसर्‍या कोणाबरोबर वाटून घेतली की बराच ताण कमी होतो. बहुतेक सगळ्या मोठमोठ्या डॉक्टर्स आणि सर्जन्सच्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समधे, अनेकदा डॉक्टर्सच्या टेबलावर मी साईबाबा, गणपती किंवा इतर देवांची चित्रे किंवा पुतळे पाहिले आहेत. पेशंटच्या जीवन मरणाची जबाबदारी थेट ज्यांच्यावर असते त्या डॉक्टर्सना ही भावना सुखावह वाटते तर सामान्य माणसांची काय कथा! कोणी कितीही प्रयत्न केला तरी देव ही संकल्पना पुसून टाकणे शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला रिटायर केल्यानंतर त्या जागी दुसरे कोणीतरी येतेच. नाहीतर काम बंद पडते. देवाला रिटायर करा असे कोणी म्हटले, तरी त्या जागी त्यांच्याही नकळत असेच दुसरे काहीतरी येऊन बसलेले असते. त्या अर्थाने हा केवळ शब्दच्छल ठरतो. जोपर्यंत माणसात आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे काही असेल त्याचा आदर करायची भावना शिल्लक राहील तोपर्यंत देव ही संकल्पना शिल्लक राहीलच. त्या अर्थाने 'देवत्व' अमर आहे. आपण जन्माला यायच्या आधीपासून ते आहे आणि आपण मेल्यानंतरही असेल. ज्याला आपण नोकरीवर ठेवलेले नाही, त्याला रिटायर कसे करणार?

In reply to by पैसा

बहुतेक सगळ्या मोठमोठ्या डॉक्टर्स आणि सर्जन्सच्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समधे, अनेकदा डॉक्टर्सच्या टेबलावर मी साईबाबा, गणपती किंवा इतर देवांची चित्रे किंवा पुतळे पाहिले आहेत. पेशंटच्या जीवन मरणाची जबाबदारी थेट ज्यांच्यावर असते त्या डॉक्टर्सना ही भावना सुखावह वाटते तर सामान्य माणसांची काय कथा!
सुखावह वाटते का माहित नाही पण सोयीची नक्कीच आहे. हुश्य! बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

In reply to by पैसा

अर्थात डॉक्टर्स सुद्धा जीवन्-मृत्यूची जबाबदारी घेत नाहीत, यातच शिक्षण अन बुद्धी यांची मर्यादा आली. अन तथाकथित अश्रद्धांनी कितिही नाकारले तरी सामान्य माणसाच्या मनातून देव ही संकल्पना कधी रिटायर होणार नाही हे सत्य आहे.

तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का?
परमेश्वराला रिटायर करा असे म्हणताना ' परमेश्वर ही संकल्पनाच मोडीत काढा' असा अर्थ अभिप्रेत आहे. श्रीराम लागूंनी मटा मधे लिहिलेल्या लेखाला हे संपादकांनी शीर्षक दिले होते; लागूंनी नाही. शीर्षक सनसनाटी असल्याने हा लेख गाजला. परमेश्वर ही संकल्पना आम्ही मानीत नाही व तुम्हीही मानू नका असा तो संदेश आहे. एक वर्ग असा आहे कि त्याचा देव या संकल्पनेला विरोध नाही पण त्यानावाखाली चाललेल्या शोषण व कर्मकांडाला विरोध आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेत समिती देवाधर्माबद्दल तटस्थ आहे असेच मांडले आहे. हा काहींना स्ट्रॅटीजिकल मुद्दा वाटतो व तो तसा आहे देखील. समिती जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकवादाचा अंगीकार करा अशी भूमिका मांडते. पण जीवनातील अनिश्चिततेला सामोरे जाताना प्रत्येकाला ही भूमिका आयुष्यातील सर्व टप्प्यांवर आधार देईलच याची शाश्वती नाही असे मला व्यक्तिशः वाटते. श्रद्धा ही माणसाला आत्मिक बळ देते या विषयी दाभोलकरांचे देखील दुमत नाही. मग ती श्रद्धा देवावर असेल विचारांवर असेल, तत्वावर असेल, माणुसकीवर असेल त्याने फरक पडत नाही. मानवी मन हे अजून विज्ञानाला संपूर्णपणे उमगलेले नाही. यावर दुमत नसावे. ईश्वर या संकल्पनेचा उगम मानवी मनात आहे. या मनाचे स्थान मेंदूत आहे हे आजतरी विज्ञानाला मान्य आहे. ईश्वर ही संकल्पना प्रत्येकाची वेगळी असू शकते. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन वगैरे वगैरे. मानवी मनाला कधी ना कधी आधाराची गरज लागतेच. मग तो अस्तिक असो वा नास्तिक. मनुष्य हा काही जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे कि ज्याला विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन वगैरे गोष्टीचा प्रोग्राम फिड केला आहे. त्याला भावना आहेतच की. आता राहिला मुद्दा उपयुक्ततेचा. जोपर्यंत ईश्वर या संकल्पनेची उपयुक्तता मानवी जीवनात आहे तो पर्यंत ईश्वर ही संकल्पना राहणारच. ज्यावेळी ही उपयुक्तता संपेल त्यावेळी ईश्वर ही संकल्पना आपोआप हद्दपार होईल. कारण ईश्वर ही संकल्पना मानवानेच निर्माण केली आहे.

जोपर्यंत माणूस 'प्रमादशील' आहे, तोपर्यंत अशी कुठली तरी भिती दाखवणे चालू रहाणारच मग ते 'देव शिक्षा करेल' असे असो अथवा 'Big Brother is watching you' असो.

क्लिंटनच्या लेखाचे दोन भाग करता येतील. एक बौध्दिक विषयावरची कसरत म्हणजे देव काय आहे आणि त्याचा विपर्यास इत्यादी. दुसरा भाग म्हणजे व्यावहारिक उपयोग म्हणजे एखाद्या कल्पनेचा आपल्या उद्दीष्ट प्राप्तिसाठी केलेला उहापोह आणि तो भाग आणि सौदाहरण मला विलक्षण आवडला. खरे तर असे म्हणायला हवे की देवा अथवा या कल्पनेचा मला कधी आणि कसा प्रत्यय आला आणि त्याबद्दलची माझी कृतड्यता.

मला स्वत:ला देव या संकल्पनेचा खूपच फायदा झाला आहे.चार-पाच वर्षांपूर्वी मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले
उत्तम!
तेव्हा देव रिटायर करायचा की त्याच्या नावाने चाललेला धांगडधिंगा रिटायर करायचा याचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेल्यांनी शोधल्यास बरे होईल.
प्रश्न इतका सोपा नाही.
अमेरिकेच्या सरकारचा अधिकृत मोटो आहे---"In God we trust"
तुम्ही त्यांना विचारा `विच गॉड?' मग तुम्हाला कळेल त्यांचा गॉड, तुमच्या गॉडपेक्षा ( किंवा इतरांच्या गॉडपेक्षा) वेगळा आहे. या भिन्न गॉडसमुळे जगाच विभाजन आहे आणि प्रत्येकाला `आपल्या गॉडच' साम्राज्य प्रस्थापित व्हावं असं वाटतय. जगातला फार मोठा कलह गॉड या निव्वळ कल्पनेमुळे आहे. मग तुमच्या लक्षात येईल की जी स्थिती जगाची तीच देशांतर्गत आहे. खुद्द आपल्या देशातली अशांतता देवाबरोबर आपसूक येणार्‍या जातीमुळे आहे. पर्सनल लेवलला कुणी काहीही मानून सुखानं जगावं, आनंद आहे. पण तसं होत नाही कारण प्रत्येकाला आपलाच गॉड खरा वाटतो. गॉड एकटा येत नाही तो अनेक धर्म, पंथ आणि जाती बरोबर घेऊन येतो. गॉड या कल्पनेनं एकसंध मानवता निष्कारण विभागली गेलीये आणि मानवी कलहाच ते एक प्रमुख कारण आहे. व्यक्तीगत श्रद्धेबद्दल बोलायच झालं तर देव ही आपणच केलेली कल्पना आहे हे लक्षात आल्यावर तिच्यावर विसंबणं किंवा भार टाकणं म्हणजे `खुदही खुदको च्युतिया बनाना है!' त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे. तुम्ही नेहमी वस्तुनिष्ठ राहता आणि भावनिक गोंधळापासून मुक्त होता.

In reply to by संजय क्षीरसागर

या भिन्न गॉडसमुळे जगाच विभाजन आहे आणि प्रत्येकाला `आपल्या गॉडच' साम्राज्य प्रस्थापित व्हावं असं वाटतय. जगातला फार मोठा कलह गॉड या निव्वळ कल्पनेमुळे आहे.
हा दोष कोणाचा?गॉडचा की आपलाच गॉड सर्वश्रेष्ठ असे मानणाऱ्यांचा? अमेरिकेतील एनरॉन कंपनीत गैरव्यवहार करून अनेक लोकांची आयुष्यभराची पुंजी बुडवायला कारणीभूत असणारे लोक कोण आणि त्यांचे शिक्षण कुठे झाले? केनेथ ले हा युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनचा, जेफ स्किलिंग हावर्ड बिझनेस स्कूलचा आणि ऍन्ड्र्यू फॅस्टॉ नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचा. मध्यंतरी शिक्षा झालेला रजत गुप्ता आय.आय.टी दिल्ली आणि हावर्ड बिझनेस स्कूलचा, वल्डकॉम च्या गैरव्यवहारातील बर्नी एबर्स युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचा, स्कॉट सुलिव्हान युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कचा. निदान एनरॉन आणि वल्डकॉममध्ये तर इतका गैरव्यवहार झाला की जनरलचे तिकिट काढून ए.सी.फर्स्ट क्लासचे पैसे घेणाऱ्या (सामान्य लोक यापेक्षा फार जास्त गैरव्यवहार करू शकतील असे वाटत नाही) लाखो लोकांनी केलेला गैरव्यवहार त्यापेक्षा कमीच असेल. या सगळ्या युनिव्हर्सिटींमध्ये त्यांना गैरव्यवहार करायचे प्रशिक्षण मिळाले का?नक्कीच नाही.गैरव्यवहार करायचा स्वभाव असेल तर असे लोक चांगल्या कल्पनेचाही चुथडा बनवू शकतात आणि तसा चुथडा करतातही.हे लोक जरा डोकं बरं मिळालं म्हणून अशा विद्यापीठांमध्ये जाऊन शिकले.त्यांना डोकं बरं मिळालं नसतं तर ते प्रत्यक्ष चोरामाऱ्या करताना पकडले गेले असते असे म्हटले तरी फार चुकीचे ठरू नये. आता त्यांनी गैरव्यवहार केला हा दोष कोणाचा? त्या विद्यापीठांचा की त्या माणसांचा? तेव्हा वड्याचे तेल वांग्यावर काढू नका.माझा कर्मकांडे, देवाच्या नावावर लोकांना लुबाडायचे या प्रकारांना आणि धर्माच्या (किंवा अन्य कोणत्या) नावावर त्याचे समर्थन करायच्या प्रकारांना तुमचा असेल तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त विरोध आहे.पण याचा अर्थ देव या मुळातल्या संकल्पनेशी या कर्मकांडांचे खरोखर काही रिलेशन आहे असे म्हणायची चूक मी तरी करणार नाही.
त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे.
असे स्वतःविषयी दावे करणारे अनेक लोक संकटप्रसंगी मात्र देवापुढे हात जोडताना दिसतात :)

In reply to by क्लिंटन

माणसाने आपल्या दुष्कृत्याकरता देव-धर्म, वा इतर कुठल्याही गोष्टीला जबाबदार ठरवणे हा निव्वळ अप्पलपोट्टेपणा आहे. मुळात मनुष्यप्राण्याला दुष्कृत्य करायची खाज आहे, हौस आहे. उद्या जर जगातले सगळे धर्म अगदी १००% बाद केले तरी गुन्हेगारी तसुभरही कमी होणार नाहि.... माणुस इतर कुठल्या बहाण्याने आपली रक्तपिपासा भागवेल. अर्धवटराव

In reply to by क्लिंटन

तुमच्या लेखाची सुरूवात पाहा :
देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?
म्हणजे देव ही कल्पना आहे हे तुम्हाला मंजूर आहे. आता तुमच्या लेखाचा उद्देश पाहा :
पण या कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी रिलेशन आहे हे बहुदा गृहित धरल्यामुळे कर्मकांडांविरूध्द असलेला रोष हा देवाविरूध्द असलेल्या रोषात कधी बदलतो हे समजत नाही.तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का?
तुम्ही सर्व मंदीरे, मशिदी, गुरूद्वार, चर्चेस, सर्व प्रार्थना, आरत्या, नमाज, मुर्त्या, तसबीरी काढून टाका... कुठे राहिला तुमचा देव? पुढे तर तुमचा तर्क पारच गंडलाय,
आता एक गोष्ट सांगा की देवाची संकल्पना तरी नक्की काय वेगळी आहे?एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचे पाप मला लागेल (आणि देव त्याची शिक्षा मला करेल ही भिती) आणि एखादी चांगली गोष्ट केल्यास त्याचे पुण्य मला मिळेल (आणि कोणत्यातरी स्वरूपात त्याचे बक्षिस मला मिळेल हे प्रलोभन) या कारणामुळे का होईना योग्य त्या गोष्टी केल्या जात असतील तर त्याच वाईट काय?
आपणच केलेल्या कल्पनेला आपण घाबरतो? याला बालिशपणा म्हणतात. कल्पनेची भीती ती काय? प्रतिसादात शेवटी तुम्ही म्हटलय:
त्या पेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे
>असे स्वतःविषयी दावे करणारे अनेक लोक संकटप्रसंगी मात्र देवापुढे हात जोडताना दिसतात = ते बहुदा देव ही निव्वळ कल्पना आहे हे न समजलेले आणि तुमच्यासारखे स्वतःच्याच कल्पनेला घाबरणारे लोक असतील.

In reply to by संजय क्षीरसागर

परत परत तेच तेच लिहायचा कंटाळा आला आहे मला. थोड्या वेळापूर्वी लिहिलेला प्रतिसाद वाचा. त्यात सगळ्या मुद्द्यांची उत्तरे आहेत. आणि हो व्यक्तिगत रोखाच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष.

In reply to by संजय क्षीरसागर

खुदको कर बुलंद इतना.. खुदको कर बुलंद इतना.. के खुदा खुद आकर बंदेसे पुछे, "मी रिटायर होऊ?" :O

मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले.लेखकाने लिहिले आहे की देवाचे आपल्या आजूबाजूला अस्तित्व आहे हे नुसते मानू नका तर ते feel करा.
यावरून रामदासांचे मला, "सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे, कृपाळू पणे अल्प धारीष्ट पाहे" या मनाच्या श्लोकांमधील ओळींची आठवण झाली. भग्वद्गीतेचे मराठीकरण केल्यावर त्याच्या सुरवातीस बिनोबांनी लिहीले आहे ज्याचा देखील असाच काहीसा संबंध आहे. ते म्हणतात, "गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". देव या संकल्पनेबाबत मला टोकाच्या आस्तिक अथवा नास्तिक पुरस्कर्त्यांपेक्षा agnostic (अज्ञेय?) अर्थात a person who holds the view that any ultimate reality (as God) is unknown and probably unknowable; भुमिका जास्त योग्य वाटते. अर्थात याचा अर्थ सर्वांनी त्या भुमिकेचा पुरस्कार करावा असे नाही. बाकी कर्मकांड, फसवणूक, अवडंबर यांच्या मुळे देव संकल्पनेस विरोध करणे अनेकांना इष्ट वाटत असावे असे वाटते. असो, अधिक नंतर.

In reply to by विकास

आणि वास्तविक आहे. अज्ञेयमधे कधी तरी ज्ञेय होईल किंवा ज्ञेय करण्याचा प्रयत्न आहे. `रहस्यमय' ही मानसिकता आपल्याला ओपन ठेवते. माझ्या मनासारखं घडावं किंवा मला संकटातून तारून न्यावं यापेक्षा `जे घडेल ते मंजूर करेन किंवा त्याच्या निरसनासाठी प्रयत्न करेन' कमालीच स्वातंत्र्यदायी आहे.
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी".
हा बाळबोध अ‍ॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे. अस्तित्व निर्वैयक्तिक आहे. ते गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासारखं आहे. प्रत्येक वेळी ते आपल्याला फेवर करेल ही अशा फोल आहे. आणि तरीही प्रत्येक घटनेमागे इतके अनाकलनीय घटक आहेत की त्यांचा उलगडा होणं असंभव आहे. त्याही पुढे जाऊन एका घटनेचा अ‍ॅनॅलिसिस करेपर्यंत दुसरी घटना घडते! अस्तित्वाची रहस्यमयता मंजूर झाली की जगायला सॉलिड मजा येते. `माझ्याविरूद्ध काही घडलं' असं वाटणंच बंद होतं.

In reply to by संजय क्षीरसागर

अज्ञेयपेक्षा `रहस्यमय' हा अ‍ॅटिट्यूड जास्त काव्यात्मक आणि वास्तविक आहे.
ही चर्चा मला वाटत नाही, जास्त काव्यात्मक काय आहे ह्यावर चालू आहे. अर्थात तुम्हाला रहस्यमयता आवडत असली तर ती तुमची तुमच्यापुरती आवड झाली, त्यात बरोबर चूक असे मी काही ठरवू इच्छित नाही.
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". हा बाळबोध अ‍ॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे.
मला तसा (बाळबोध) वाटत नाही. त्याचा रहस्यवादाशी काही संबंध देखील नाही, त्यामुळे रहस्यवादाच्या विपरीत असण्याचा काही प्रश्न नाही.
अस्तित्वाची रहस्यमयता मंजूर झाली की जगायला सॉलिड मजा येते.
मजेत जगण्याच्या संदर्भात मला तुकाराम आठवले... आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥ .... तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥ आनंदाने जगणे हे वृत्तीत असावे लागते, बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवर ते अवलंबून नसते. त्यामुळे तशी वृत्ती असलेली व्यक्ती मग अस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी, रहस्यवादी अथवा अजून कसला काही असुंदेत मज्जेत जगू शकते. जिची वृत्ती तशी नसते ती व्यक्ती भयाने, नकारात्मक वृत्तीने, संशयाने अथवा अजून कशाने का होईना, पण आनंदात जगू शकत नाही. असो.

In reply to by विकास

या दोन वृत्तीत कमालीचा फरक आहे. या अर्थानं मी म्हटलय
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". हा बाळबोध अ‍ॅटिट्यूड आहे आणि तो रहस्यवादाच्या विपरित आहे.
आनंदाने जगणे हे वृत्तीत असावे लागते, बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवर ते अवलंबून नसते
येस! `आपल्याला कुणी कडेवर घेईल' हेच तर बाह्यावर (देवावर) अवलंबित्व आहे. रहस्यवादाचा अर्थ : अस्तित्व विस्मयकारक आहे आणि जे घडेल ते मंजूर आहे. `मला कुणीही कडेवर घेण्याची गरज नाही'.

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्याला कुणी कडेवर घेईल' हेच तर बाह्यावर (देवावर) अवलंबित्व आहे
" तुम्हाला फक्त वाक्याचा शब्दार्थ समजला असे दिसतयं. ही मर्यादा आहे, असो,

लहान मुलांनाही तुला चॉकलेट देईन हे प्रलोभन किंवा ते चालले नाही तर मार देईन ही भिती दाखवावीच लागते ना?दोन-तीन वर्षाची लहान मुले वागण्यात/ विचारात कोणतीही भेसळ न झालेली म्हणजेच मनुष्यस्वभाव आहे त्याचे अगदी निरागस रूप असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.
देव ही संकल्पना काही हजार वर्षापुर्वी जेंव्हा देश, घटना, कायदे अस्तित्वात नव्हते त्यावेळी काही हुशार (वासरात लंगडी...) लोकांनी याची सामाजिक सलोखा रहावा यासाठी निर्मिती केली. त्यांच्या औकाती प्रमाणे तात्कालिक आणि आजुबाजूची परिस्थिती बघून काही 'डूज आणि डोंट्स' तयार केले. पुढे काही सो कॉल्ड धर्मांना राजाश्रय मिळाला आणि फोफावला. त्या नंतर समाजातल्या धुर्त लोकांनी (वर्गानी?) याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. एक उदाहरण म्हणून जवळजवळ प्रत्येक धर्मात पुरषी वर्चस्व दिसते. एका मोठ्या स्केलवरती या समाजाचे ते बालपण होते असं समजायला हरकत नाही. आता या माणसाची उत्कांती झाली आहे असे मानले आणि देशापुरते आणि समस्त मानवजातीचा विचार करून ग्लोबल कायदे अस्तित्वात आले तर या सकल्पनेची गरज भासू नये.

एक मुद्दा राहुन गेला की आलाय तुमच्या लिखाणात? पैसाताई म्हणते तस अग्नी मध्ये शक्ती दिसली म्हणुन त्याला देवत्व दिल जात तसच आणखी एक आहे, की जगातल्या सार्‍या आदिम वंशांमध्ये 'देव' ही संकल्पना आहेच आहे. तो सर्व शक्तीमान आहे, त्याच्या आधारावर आपण जगतो आहोत, वा हा त्याचा पुत्र आहे. सार्‍यांचाच देव आकाशात असतो. म्हणजे आकाशाकडे बोट दाखवुन त्याच सर्वव्यापकत्व ठसवल जात. एक मात्र आहे, हा जो कोणी देव आहे, त्याला कोणत्याही कर्मकांडांची गरज नसते. या कर्मकांडांची गरज असते, ती लुच्च्यांना. दुसर्‍यांना फसवायला. तुम्ही ज्या पद्धतीने देव या संकल्पनेला सामोरे गेलात, तोच सर्वोत्तम मार्ग वाटतो मला तरी. माझा देव माझ्यापुरता. माझा देव माझ्यासाठी एक आरसा. ज्या आरश्यात बघताना मला स्वतःची लाज वाटणार नाही.

व्याख्या करणे आवश्यक आहे. एखाद्या आजारी किंवा संवेदनाशील व्यक्तीला ध्वनीप्रदूषण करणारी देवळातील किंवा घरातील आरती, चर्चमधील व्याख्यान किंवा मास, मशिदीतून दिली जाणारी बांग वगैरे देखील धांगडधिंगा वाटू शकते. ध्वनीप्रदूषण किती डेसिबेलला होते याबद्दल कायदे आहेतच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही एकच आहेत. अस्तित्त्वात नसलेल्या किंवा तारिकदृष्ट्या, गणितदृष्ट्या, वैज्ञानिकली सिद्ध न झालेल्या गोष्टींवरचा निराधार, अवास्तव विश्वास अशी माझी श्रद्धेची व्याख्या आहे. आज वैज्ञानिक रीत्या सिद्ध झालेले एखादे वैज्ञानिक सत्य किंवा नियम निरंतर, अंतिम सत्य आहे असे मानणे म्हणजे देखील विज्ञानावरील अंधश्रद्धा. सत्य किंवा नियम हे ज्ञात असलेल्या माहितीवर किंवा ज्ञानावर आधारित असते आणि उद्या नवीन नियम सापडल्यावर जुने चुकीचे आहे हे स्वीकारायलाच हवे. धार्मिक सत्य हे निरंतर, अंतिम सत्य आहे असे त्या त्या धर्मातील लोक मानतात ही धर्मातली मोठी त्रुटी आहे. उदा. जेनिसिसचा सिद्धांत ख्रिस्ती लोक अपरिवर्तनीय मानतात. मुस्लीम लोक अजून त्यांचे वर्ष (सुमारे) ३६५ दिवसांचे मानीत नाहीत. विज्ञानाने स्वतःतील त्रुटी स्वीकारून जुने नियम टाकून किंवा बदलून ज्ञात माहितीची गतिशीलता, परिवर्तनशीलता स्वीकारली. असहिष्णुता ही धरमातली दुसरी मोठी त्रुटी आहे. शेकडो वर्षे पुराण्या झालेल्या धर्मग्रंथातला एखादा नियम आज नवीन वैज्ञानिक माहितीच्या आधारे चुकीचा ठरला तर नवीन माहिती किंवा नियम शोधणार्‍यांचा (उदा. कोपर्निकस, गॅलिलीओ) तत्कालीन धर्ममार्तंडांनी छळच केला आहे. पुन्हा फक्त धर्ममार्तंडाना सोयिस्कर असेच धर्मनियम स्वीकारले जातात. इस्लाममध्ये व्याज घेऊ नये असे जर म्हटले असेल तरी व्याज घेतले जाते. तरी प्रथम धर्मामुळे समाजाला, अखिल मानव जातीला काय काय फायदे झालेले आहेत आणि कायकाय तोटे झालेले आहेत यावर व्यापक पाहाणी - सर्व्हे - करून फायदे आणि तोटे याचे गणित मांडायला पाहिजे. परंतु तसे न करता केवळ मतामतांचे वादविवाद करून कालापव्यय केला जातो. या कालापव्ययाचा एकच फायदा म्हणजे तो करणारे हे इतर समाजविघातक कामांपासून दूर राहातात.

व्यक्तिश : मला लेख आवडला , आणि पटला (क्लिंटन कडून surprise आहे हे ;) ) बाकी ह्या वादात पडायला मला आवडत नाही... मी दुसर्यांच्या श्रद्धेला बोल लावत नाही, किंवा त्याच्या श्रद्धास्थानाची निंदाही करत नाही ज्याला जमेल तसं त्याने वागाव , आपल्यामुळे दुसर्याला त्रास होत नाही ना , एवढे जरी जमले तरी खूप बाकी चालू द्या

In reply to by स्पा

>>क्लिंटन कडून surprise आहे हे ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन. मला तर बिचा-या क्लिंटनचा आयडी हॅक झाला की काय असं पण वाटुन गेलं. ती शंका अजुनही कायम आहे, कारण अजुन त्याने "मी ईंजिनिअरिंग चा बथ्थड विद्यार्थी होतो" हे त्याचं पेटंट वाक्य लिहिलं नाहीये. :) पण जोक्स अपार्ट, लेख तर उत्तम झालाय ह्यात वाद नाही.

In reply to by अमोल खरे

मी ईंजिनिअरिंग चा बथ्थड विद्यार्थी होतो" हे त्याचं पेटंट वाक्य लिहिलं नाहीये.
तो तर मी होतोच.त्यात वेगळे काय सांगायचे? :)

गीतेमध्ये श्री कृष्णाने वारंवार "जो मला तत्वतः जाणतो " असे का म्हटले असावे ???

In reply to by चेतन माने

गीतेमध्ये श्री कृष्णाने वारंवार "जो मला तत्वतः जाणतो " असे का म्हटले असावे ??? मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥७- ३॥ भाषांतरः--- हजारों मनुष्यात एखादाच सिद्धि मिळवण्याचा प्रयत्न करतो,आणि सिद्धि मिळविणार्‍या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला सत्यत्त्वाने जाणतो. तात्पर्य :--- सामान्यपणे मानवजात आहार,निद्रा,भय्,मैथुन या पशुवॄत्तीतच केवळ आसक्त झालेली असते आणि बहूतकरुन कोणत्याही मनुष्याला पारमार्थिक ज्ञानाची आवड नसते. मोठ्या मोठ्या देवांना देखील कधी कधी श्रीकॄष्णा बद्धल संभ्रम निर्माण होतो. "मुह्यन्ति यत्सूरयः,मां तु वेद न काश्चन" भगवंत म्हणतात "मला तत्त्वतः कोणीही जाणत नाही" आणि जर कोणी भगवंताला जाणणारा असला,तर "स महात्मा सुदुर्लभः" म्हणजे "असा महात्मा अतिशय दुर्मिळ आहे" म्हणून मनुष्याने जर भगवद्वभक्ति केली नाही,तर तो मनुष्य मोठा पंडित किंवा दार्शनिक जरी असला तरी तो श्रीकॄष्णाला तत्त्वतः जाणु शकत नाही. जे कॄष्णभावनाभावित भक्त आहेत अशांनाच कॄष्णाचे ज्ञान होउ शकते. अतः श्रीकॄष्णनामादि न भवेद् ग्राह्यमिन्द्रियै: | सेवान्मुखे हि जिह्वादौ स्वयमेव स्फुरत्यदः || श्रीकॄष्णाचे मूळ यथार्थ स्वरुप,मंद प्राकॄत इंद्रियांच्या द्वारे कोणीही जाणु शकत नाही.परंतु जे त्याची दिव्य प्रेममय भक्ति करतात अशा भक्तांना तो प्रसन्न होउन त्यांना स्वतःच्या मूळ यथार्थ स्वरुपात प्रकट होतो.(पद्मपुराण) संदर्भ :--श्रीमद्भभगवत गीता अध्याय ७ वा श्लोक ३ रा (श्रीमद्भभगवत गीता जशी आहे तशी) (भगवंताचा दास)

"देवाला रिटायर का करा" हे शीर्षक वाचून मला हा लेख सचिनवर आहे कीं काय आधी कांहीं भलतीच शंका आली होती, पण सुटलो!!

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि चर्चेत सहभाग घेतल्याबद्दल आभारी आहे.हीच चर्चा एकाच वेळी दोन मराठी संकेतस्थळे आणि एक फेसबुक ग्रुप यावर चालू आहे त्यामुळे अनेकविध मुद्दे मांडले जात आहेत आणि त्या बऱ्याचशा मुद्द्यांना एकत्रच उत्तर देऊन सर्व ठिकाणी ते कॉपी-पेस्ट करणार आहे. समाजात सर्व प्रकारचे लोक असतात.अगदी भारतात सोन्याचा धूर निघत होता, भारत अत्यंत पुढारलेला होता त्याकाळी सुध्दा चाणक्याने लिहिलेल्या चाणक्यनितीत कोणत्या गुन्ह्याबद्दल कोणती शिक्षा द्यावी याबद्दलचे उल्लेख आहेत.याचा अर्थ तेव्हाही गुन्हे होतच होते.म्हणजे समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असणारच आणि हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. एक उदाहरण म्हणून (मूळ लेखात घेतलेले) परिक्षेत कॉपी करायचे उदाहरण घेऊ.असे समजू की कॉपीविरोधी कायदा आहे आणि परिक्षा चालू असताना पर्यवेक्षकही आहेत. वर्गातल्या विद्यार्थ्यांना ढोबळ मानाने पुढील श्रेणींमध्ये विभागता येईल. श्रेणी १: काही वाटेल ते झाले तरी कॉपी न करणारे विद्यार्थी कारण कॉपी करणे हे वाईट आहे!! श्रेणी २: कॉपी करणे हे वाईट आहे हे मला तत्वत: मान्य असणारे पण पर्यवेक्षकाचे लक्ष नसेल तर कधीतरी कॉपी करणारे विद्यार्थी. श्रेणी ३: पर्यवेक्षकाचे कधी लक्ष नसेल यावर टपून बसणारे विद्यार्थी म्हणजेच पर्यवेक्षकाचे जेव्हा जेव्हा लक्ष नसेल तेव्हा तेव्हा कॉपी करणारे विद्यार्थी. श्रेणी ४: पर्यवेक्षकाचे लक्ष असले तरी कधीतरी कॉपी करणारे विद्यार्थी. श्रेणी ५: पर्यवेक्षकाचे लक्ष असले तरी त्याला न जुमानता कायम कॉपी करणारे विद्यार्थी. पहिल्या श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना कायदा/देव इत्यादी कशाचीही गरज नाही कारण कॉपी करणे वाईट आहे असे त्यांना कळलेले आहे.दुसऱ्या श्रेणीतील विद्यार्थी क्वचितप्रसंगी (नेहमी नव्हे) कायदा अंमलात आणताना काही ढिलाई झाली तर त्याचा गैरफायदा घेतील.तिसऱ्या श्रेणीतील विद्यार्थी कायदा अंमलात होत असलेल्या प्रत्येक ढिलाईचा गैरफायदा घेतील.चौथ्या श्रेणीतील विद्यार्थी कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत असली तरी कधीतरी अयोग्य कृती करतील.पाचव्या श्रेणीतील विद्यार्थी मात्र कायद्याची अंमलबजावणी कितीही व्यवस्थित होत असली तरीही अयोग्य कृती करू पाहतील. या श्रेणी मी अत्यंत ढोबळ मानाने घेतलेल्या आहेत. प्रत्यक्षात या श्रेणी खूपच जास्त finer असतील.आता एक समाज म्हणून आपले ध्येय काय असले पाहिजे?दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या श्रेणींमधील प्रत्येक माणूस सध्या आहे त्यापेक्षा वरच्या श्रेणीत जावा आणि कोणीच आहे त्यापेक्षा खालच्या श्रेणीत जाऊ नये, बरोबर?ते ध्येय १००% साध्य होणार नाही पण जितके साध्य होईल तितके चांगले. आता माझा एक प्रश्न विशेष करून राजेश घासकडवी आणि इतर सर्वांनी ज्यांनी आकडेवारी मागितली त्यांना आहे.आकडेवारीचा विषय मी काढला नव्हता तरीही इतरांनी हा विषय काढलाच आहे म्हणून मी पण त्याच भाषेत उत्तर देतो.कायदा प्रभावी आहे हे आकडेवारीनिशी कसे सिध्द करता येईल?चौथ्या आणि विशेषत: पाचव्या श्रेणीतला विद्यार्थी पर्यवेक्षकाला आणि कायद्याला घाबरून कॉपी करणार नाही,बरोबर? तुमच्या सॅम्पलमधला एखादा कॉपी न करणारा विद्यार्थी पहिल्या श्रेणीतला असेल तर कॉपीविरोधी कायदा असला काय आणि नसला काय, पर्यवेक्षक समोर असला काय किंवा नसला काय तो कॉपी करणार नाही. म्हणजे एखादा कॉपी न करणारा विद्यार्थी आढळला तर तो नक्की कोणत्या श्रेणीतला विद्यार्थी आहे हेच जर माहित नसेल तर त्या विद्यार्थ्याने कॉपी केली नाही यावरून कायदा किती परिणामकारक आहे याविषयी कोणतेच अनुमान शास्त्रीयदृष्ट्या काढता येणार नाही. विशेषत: राजेश, तुम्ही जेव्हा कायद्याच्या बडग्याचा उल्लेख करता तेव्हा कसला तरी डिटेरन्ट असला पाहिजे हे तुम्हालाही मान्य आहे हे समजते.पण तुमच्याच संख्यांच्या भाषेत तो डिटेरन्ट किती पॉवरफुल आहे हे सांगता येण्यासाठी प्रत्येक मनुष्य (निदान सॅम्पलमधला) कोणत्या श्रेणीतला आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. आता कोणता मनुष्य कोणत्या श्रेणीत आहे हे कसे समजावे?ते व.पु.काळ्यांच्या "स्टॅटिस्टिक मराठे" प्रमाणे लोकांना हॅन्डबिले पाठवून नक्कीच कळणार नाही.आणि कोणाला विचारायला गेले तर एक तर प्रश्न ज्याला विचारला जात आहे त्याला आपण नक्की कोणत्या श्रेणीत आहोत याचाच पत्ता नसेल आणि असला तरी "हो मी पाचव्या श्रेणीतलाच आहे हो. हा कायदा नसता तर मी नक्कीच गुन्हा केला असता" असे प्रामाणिकपणे कोणी सांगेल याची शक्यता फारच थोडी.तेव्हा तुमच्या सॅम्पलचे कॅरॅक्टिरिस्टिक बरोबर मोजले गेले आहे याची गॅरन्टी काय? आणि ते मुळातलेच मोजमाप चुकले तर पुढचे सगळेच चुकेल. याचे कारण इथे आपला खेळ वेव्हलेन्थसारख्या मोजता येणाऱ्या गोष्टीशी नाही तर अत्यंत गुंतागुंतीच्या अशा मानवी भावभावनांशी आहे. तेव्हा राजेश, हा क्ष-य-झ ऍनॅलिसिस आधी कायद्यावर करा आणि त्याची परिणामकारकता तपासा. मग पुढचे बघू. कसाब किंवा अन्य कोणी दहशतवादी/गुन्हेगार देवाला घाबरत नाही असे तुम्ही म्हणता तेव्हा तो कायद्यालाही घाबरत नाही हे विसरता त्याचे काय?आणि त्या अर्थी कोणत्याही कायद्याची परिणामकारकता कधीच सिध्द करता येणार नाही कारण कायदा नसता तर किती जणांनी गुन्हा केला असता ही population मुळातच observable नाही.तेव्हा थत्तेचाचा, देवाला घाबरून लोक गुन्हे करणार नाहीत हे विधान प्रचंड धाडसी वाटत असले तरी त्याच न्यायाने कायद्याला घाबरूनही लोक गुन्हे करणार नाहीत हे पण विधान तितकेच धाडसी वाटू शकते. तेव्हा माझा मुद्दा हा की समाजातील लोकांना वरच्या श्रेणीत जावेसे वाटायला लावायची शक्यता असलेली प्रत्येक गोष्ट ही desirable आहे.आणि त्या दृष्टीने आपण कोणालातरी (म्हणजे देवाला) अकाऊंटेबल आहोत ही भावना रूजणे महत्वाचे आहे. क्वचितप्रसंगी पाचव्या श्रेणीतला एखादा वाल्याचा पहिल्या श्रेणीतला वाल्मिकी होईलही पण ती शक्यता फार थोडी.पण सगळ्यांनाच "अरे इतर कोणी नाही तरी देव बघत आहे आणि तू पाप केलेस तर देव नक्कीच शिक्षा करेल" ही एका प्रकारची टोचणी लावणारी भावना सर्वांच्याच मनात रूजणे महत्वाचे आहे. त्या भावनेचा कोणावर किती परिणाम होईल हे नक्की सांगता येणार नाही पण अगदी थोड्या लोकांवर जरी त्या भावनेचा परिणाम होऊन अनुचित प्रकार कमी झाले तर ते चांगलेच असेल.असा परिणाम झालेले काही लोक मी स्वत: बघितले आहेत. त्यातल्या एका व्यक्तीविषयी मी लिहितो. आमच्या डॉर्ममध्ये इस्त्रीचे कपडे नेऊन इस्त्री करून आणून देणारी एक मध्यवयीन बाई होती.आणि आमच्या डॉर्ममध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असायचा.ती बाई कुत्र्यांनी कपडे फाडू नये किंवा घाण करू नये म्हणून खूप दक्ष असायची.एकदा ती म्हणाली होती--"कुत्र्यांनी कोणाचे कपडे फाडले तर मी (अर्थातच परवडत नसताना) माझ्या पैशाने भरून देईन पण कुत्र्यांना मारणार नाही. कारण कुत्र्यांना मारले तर मला पाप लागेल"!! अशी माणसे डोळे उघडे ठेवले तर सगळ्यांना कुठे ना कुठे दिसतील (किंवा आपण स्वत:ही त्याच कॅटेगिरीमधले असू). तेव्हा पाप लागेल या भितीने का होईना जर कोणी वाईट गोष्ट करण्यापासून परावृत्त होत असले तर त्यात काय चुकीचे आहे हा मला अगदी अनाकलनीय प्रकार आहे. आता सांगा या प्रकारात कुठे कर्मकांडे आली?आपण कोणाला तरी (म्हणजे देवाला) अकाऊंटेबल आहोत हीच एक भावना.इथे काहींनी म्हटले आहे की कर्मकांडे होतात म्हणून देवाला रिटायर करा.याचा अर्थ एक तर असे म्हणणाऱ्यांनी माझा मुळातला लेख वाचला नाही किंवा त्यांना तो समजला नाही किंवा देव हा शब्द वाचताक्षणी त्याला रिटायर करायची त्यांना इतकी घाई लागून गेली की नक्की काय लिहिले आहे हे समजून घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. अशी ईश्वरावर आपण डोळस श्रध्दा ठेऊ शकत नाही का?

In reply to by क्लिंटन

तेव्हा पाप लागेल या भितीने का होईना जर कोणी वाईट गोष्ट करण्यापासून परावृत्त होत असले तर त्यात काय चुकीचे आहे हा मला अगदी अनाकलनीय प्रकार आहे.
मुळात पाप आणि पुण्य म्हणजे काय ठरवणार कोण? हे रिलेटीव्ह आहे असं वाटत नाही का? एक उदाहरण: तुम्ही वरती दिलेल्या उदाहरणाला समांतर. मुक्या प्राण्यांना मारणं म्हणजे पाप. म्हणजे इजा करणं की ठार मारणं? मुके म्हणजे नक्की कुठ्ले प्राणी? कसाई, मच्छिमार पापी आहेत का? प्राण्यांच्या आकाराची थ्रिशोल्ड काय? डास मारले तर पाप लागेल का? एक हत्ती मारल्यावर कमी पाप लागेल की मुंग्यांच्या वारूळात डीडीटी टाकल्यावर? :)

In reply to by दादा कोंडके

मुळात पाप आणि पुण्य म्हणजे काय ठरवणार कोण?
आपणच ठरवायच. मला यावरुन एक सुभाषित आठवले. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं| परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनं|| शेवटी पापपुण्य हे सापेक्ष आहे. एकाच्या दृष्टीने असलेले पाप दुसर्‍याच्या दृष्टीने पुण्य असू शकते. तुम्ही कुठल्या संस्कारात वाढला आहे. तुमच्या पिंडाने त्यातल काय स्वीकारल यावर बरच काही अवलंबून आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

म्हणूनच काय करावं आणि काय नाही हे कायद्याला विज्ञानाच्या मदतीनं ठरवू दे आणि त्यात कालानुरूप बदल होणं आवश्यक आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी कोणी तज्ञ नाही पण, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं| परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनं|| यात परोपकार केल्याने पुण्य मिळते तसेच दुसर्याला पीडा देण्याने (परपीडनं) पाप मिळ्ते असा त्याचा भावार्थ आहे.बाकी या गोष्टि ज्याच्या त्याच्या मानण्यावर अवलम्बुन आहेत.

कसाब किंवा अन्य कोणी दहशतवादी/गुन्हेगार देवाला घाबरत नाही असे तुम्ही म्हणता तेव्हा तो कायद्यालाही घाबरत नाही हे विसरता त्याचे काय?
कसाबची इन्सपेक्टरनी घेतलेली जबानी तुम्ही ऐकलेली नाही. गरीबी (खरं तर दारिद्र्य) हा दहशतवादाला उद्युक्त करणारा एकमेव घटक आहे. धर्माच्या नांवावर दहशतवादी तयार केले जातात आणि त्यांच्या मनावर ते पवित्र धार्मिक कृत्य आहे असं बिंबवलं जातं. तुमचा संपूर्ण लेख मॉरल पोलिसिंगवर आधारित आहे. ज्याला स्वाभिमान आहे तो कधीही गैरकृत्य करत नाही. देवाच्या भीतीनं नैतिक राहणं माझ्या मते बालिश आहे.

In reply to by अर्धवटराव

ज्याला स्वतःच्या मनाला कोणतही स्पष्टीकरण द्यायला लागत नाही तो पाप-पुण्याच्या कल्पनेपार आहे. इट इज वेरी सप्रायजींग, जो निती-अनितीच्या कल्पनेपलिकडे आहे तो इतका सहज जगतो की त्याच्याकडून गैरकृत्य घडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कि त्याला स्वतःचं कुठलच कृत्य गैर असल्याची बोच जाणवत नाहि? गैरकृत्य हे सापेक्ष असते... निती अनितीच्या पलिकडे गेलेला लाख सहज जगत असेल, पण त्याचं वागणं इतरांना कधीच कष्ट्दायक ठरत नाहि असं कसं म्हणता येईल? फार फार तर तो त्या कष्टांची पर्वा करत नाहि असं म्हणता येईल... पण त्याच्यामुळे इतरांना दु:ख होत नसेलच असं कसं होईल? निती-अनितीच्या कल्पना या मनाच्याच असतात. तेंव्हा त्यांच्या पलिकडे जर कोणि जात असेल तर मनच होय.. कारण इतर कोणि निती-अनितीच्या कल्पनेच्या कक्षेत तसंही नव्हतच. तोच न्याय स्पष्टीकरणाचा. मनच मनाला स्पष्टीकरण देत असतं... इतर कोणिच मनाच्या स्पष्टीकरणाला बांधील नाहि कि विचारत देखील नाहि. पाप-पुण्य, निती-अनिती, प्रामाणीकपणा-बेईमानी... या सर्व मनाच्या धारणा. मग अशी एण्टीटी जीला या धारणांबद्दल काहिच ठाऊक नाहि ति मनाला त्याबद्दल स्पष्टीकरण कशाबद्दल मागते? आणि मनानी स्पष्टीकरण दिलं तरी तिला ते कळतं कसं? स्वाभिमान देखील मनाचीच भावना. म्हणजे, जर मनात स्वाभिमानाची भावना प्रबळ झाली तर ति निती-अनितीच्या कल्पनांना ओव्हरलॅप करते - किल करते काय? लज्जा ह देखील एक भावनाच. जर माझं मन मला लज्जीत करतं तर मनाव्यतिरिक्त भावना समजणारं एखादं वेगळं इंद्रीय मला असेल काय? (सूक्ष्म मन म्हणतात ते हेच काय? कि सबकॉन्श्स माईंण्ड वगैरे प्रकार आहे हा?) अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

अवांतर-
गरीबी (खरं तर दारिद्र्य) हा दहशतवादाला उद्युक्त करणारा एकमेव घटक आहे
एकमेव घटक आहे असं नाही वाटत. अजूनही असतील. काय म्हंता?

In reply to by संजय क्षीरसागर

मग प्रश्नच मिटला. कसाब सारख्या या विषयातल्या तज्ञाने म्हटलंय म्हणजे दुमत येताच कामा नये :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कसाब सारख्या या विषयातल्या तज्ञाने म्हटलंय म्हणजे दुमत येताच कामा नये खीक्क ! ;) तो पैगंबरवासी झालेला ओसामा सौदी अरेबियातल्या एका श्रिमंत घराण्यात जन्मला होता म्हणे !

निती-अनितीच्या कल्पना या मनाच्याच असतात. तेंव्हा त्यांच्या पलिकडे जर कोणि जात असेल तर मनच होय..
नाही. आपण मनाचे जाणते आहोत.
स्वाभिमान देखील मनाचीच भावना
शब्द आणि अनुभव यात फरक आहे. `स्व' गवसल्यावर स्वतःबद्दल येणारी निश्चिंतता म्हणजे स्वाभिमान. ती व्यक्तीगत श्रेष्ठत्वाची भावना नाही. `आपण मनापासून वेगळे आहोत' हे लक्षात आल्यावर पुढे प्रतिसादात लिहिलेल्या गोष्टी या आकलनातल्या त्रुटीमुळे आहेत हे लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

>>आपण मनाचे जाणते आहोत. -- तरी नेमकं निती-अनिती कसं कळणार? >>`स्व' गवसल्यावर स्वतःबद्दल येणारी निश्चिंतता म्हणजे स्वाभिमान. -- निश्चिती आणि अभिमान या सारख्या कशा?? >>`आपण मनापासून वेगळे आहोत' हे लक्षात आल्यावर पुढे प्रतिसादात लिहिलेल्या गोष्टी या आकलनातल्या त्रुटीमुळे आहेत हे लक्षात येईल. -- आपण मनापासनं वेगळे आहोत हे कळुन देखील आपले वागणे इतरांना गैरसोईचे नसेल, किंवा आपल्याला आपलं वागणं कितीही जस्टीफाईड वाटलं तरिही ते वाईट परिणामकारक नसेल असं कसं ? असो. अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

>>ज्याला `मन कळतय' तो मनापेक्षा वेगळा आहे -- मग ज्याला "केवळ आपण आहोत" हे कळतय तो "आपल्या"पेक्षा वेगळा असावा काय? अर्धवटराव