लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..
इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!
थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
गर्दीला मागे सारत पांढर्याशुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले.. अन त्या तरुणाला सोबत घेऊन गेले..
सुदैवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता !
- तुमचा अभिषेक
वाचने
6028
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाडस !
वेडे लोकंच धाडस करण्याचा
सुंदर!!!
मस्त !!!
@तुमच्या सगळ्या शतशब्दकथा
In reply to मस्त !!! by राघवेंद्र
मस्तच
मस्त!
नक्कीच... पुढेमागे या
In reply to मस्त! by पैसा
जींकलस मित्रा.
मस्तच लिहिलय.
सुंदर.
१०० कथा म्हणजे आठवड्याला एक
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
मस्त..
मस्त!
*****
सर्व प्रतिसादांचे धन्यवाद
मस्त लिहिलंयस !!
लई भारी राव
मस्त !
तसे आमच्या मुंबईतून लाकडी
In reply to मस्त ! by विटेकर
जम्या..
छानच … कहाणी मधला ट्विस्ट
मस्त
झक्कास! - (धाडसी) सोकाजी
छान
छान
+७८६
इतक्या कमी शब्दात इतकी
संजीवनीजी, या प्रकारात हि