Skip to main content

धाडस ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 14/08/2013 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता.. मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते.. त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू.. खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती.. इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला.. काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला.. वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!! थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती.. इतक्यात कोणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला.. गर्दीला मागे सारत पांढर्‍याशुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले.. अन त्या तरुणाला सोबत घेऊन गेले.. सुदैवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता ! - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6028
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

तिसरी कथा लिहायचे धाडस करतोय.. :)

एकदम मस्त व छान कथा. तुमच्या सगळ्या शतशब्दकथा मस्त आहेत.

In reply to by राघवेंद्र

@तुमच्या सगळ्या शतशब्दकथा मस्त आहेत.>>> +++१११ यहिचा बोल्ता है। एकदम खटक्यावर बोट देऊन चाल्लय! असच चालू र्‍हांऊंद्या! :)

छानच लिहिता आहात ... ( आणि हा फॉर्मॅट लईच आवडला बुवा आपल्याला ...)

असलं धाडस वेडेच करणार! तुमच्या कथांचा कलाटणीचा साचा मस्त जमतोय पण तोही एकदा बदलून बघा!

In reply to by पैसा

नक्कीच... पुढेमागे या फॉर्ममध्ये लिखाण झाले तर नक्कीच... जेव्हा सारे कलाटणी अपेक्षित धरतील तेव्हाच ती टाळण्यात खरी मजा :)

सुंदर. कमीत कमी शब्दांचं धावतं कथानक, वाढती उत्कंठा आणि अनपेक्षित शेवट. अप्रतिम. लहानपणी चांदोबा मासिकात एक पानाची एक कथा असायची आणि त्याच्या शेवटी त्यातून घ्यायचा बोध दिलेला असायचा. खूप आवडायच्या त्या कथा. त्याच्या सुबक आकारामुळे, रंजकतेमुळे, कथेच्या अव्याहतपणे वाहात जाऊन शेवटास पोहोचण्याच्या पद्धतीमुळे. १०० शतशब्दकथा लिहून त्याचे एक पुस्तक छापा. लोकांना आवडेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

१०० कथा म्हणजे आठवड्याला एक प्रमाणे देखील २ वर्षे जातील.. अर्थात हे गणित असेच केले.. सध्या तर डोक्यात चौथी काय लिहिणार आहे हे देखील नाही.. :) आयुष्यात पुढेमागे कुठल्याही प्रकारचे पुस्तक छापायला आवडेलच, तुर्तास हे लेखन इथे तुम्हाला आवडतेय यातच समाधान :)

*****

ही पण आवडली .... फक्त लकडी पूलाचा आणि पूराच्या पाण्याचा संबंध संपून काही शतके ( हो, पुण्यात मोजमापाची अशीच पद्धत आहे ) लोटली . हल्ली लकडीपूलाखालून फक्त गटार वाहाते.

In reply to by विटेकर

तसे आमच्या मुंबईतून लाकडी चाळी देखील गायब होऊन आता शतके उलटलीत .. बाकी ते लाकडी पूल एखाददुसर्‍या शब्दांत डोळ्यांसमोर घटनास्थळाचे चित्र उभारण्यास मदत करेल याच अपेक्षेने होते :)

जमलीय कथा.. कलाटणीपण मस्तच. आवडली..

आवडेश पु.क्.प्र.

.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती.. ... ?

वॉव...! कथेची कलाटणी आवडली. -दिलीप बिरुटे

+७८६

इतक्या कमी शब्दात इतकी उत्कंठा वाढवणारी कथा!!!!शेवट पण तितकाच मनाला भिडणारा जुन्या कथांचे धागे दिले तर उपयोगी ठरेल

संजीवनीजी, या प्रकारात हि तिसरीच, तरी आधीच्या दोघांच्या लिंका माझ्या खात्यात किंवा इथे पहिल्या पानावरच सापडतील.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)