Skip to main content

शत'शब्द शोधिताना...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 07/08/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्द कथा हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला! ======================================================== शत'शब्द शोधिताना शत रात्री व्यर्थ गेल्या कथिता तुला व्यथा ही त्या रात्री धन्य झाल्या! खर्ची पडे वह्यांची एक थप्पी एका पाठी कशी साधना तुझी ही हातात अंती "वाटी" हाय हाय..जमे न काही ठेव पाने तू मिटोनी प्रतिभा नभातं गेली घरट्यातूनी उडोनी!
लेखनविषय:

वाचने 6601
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या | शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या || तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी | सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी || हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी | क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी || कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचा "शत शब्द अनुभव" आवडला बर्का! काव्य झक्कास! या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! एवढे बोलून मी माझे २४ शब्द संपवते.

In reply to by पैसा

या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

मला तर बुवा एक ओळ पटकन सुचली. शत लुब्ध शीधताना फिल्डिंग व्यर्थ गेल्या शत लेख काव्य माला किती त्वदर्थ लिहिल्या हाय हाय करू मी काय ही सांज गे उदास चिती चितारलेल्या स्माईली उडून गेल्या

In reply to by चौकटराजा

छान प्रयत्न आहे ! जागलेल्या रात्रींचे चीज झाले ! चिती चितारलेल्या स्माईली उडून गेल्या हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे ! +D

In reply to by बॅटमॅन

हम्म लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत. फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.;-) गुरजी तुस्सी ग्रेट हो.

In reply to by अभ्या..

लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत.
हा हा हा =))
फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.
अगदी अगदी.

वाचकांना एक विनंती- हे सावरकरांच्या काव्याचे विडंबन नाही. फक्त रचनेचे आधारभूत प्रतीरूप आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

विडंबनात मूळ काव्याची चेष्टा नसतेच. खरे तर त्याचा फॉर्म विडबन कर्त्याने स्वीकारला यात मूळ काव्याचा सन्मानच होतो.

अपितु सहजीचि म्हणोनी धागा उघडुनि पाहो तो आपुली काव्यशलाका आमुचिये मनास स्पर्शून गेली असे ऐसे लिहावयासि मात्र मिपामाजी आज प्रवेशकर्ता झालो आहो.