Skip to main content

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस

वाचने 1034
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

हम्म. मस्त लिहिले आहे. अगदी इथल्या आरतीची आठवण झाली. परवाच तिच्या पप्पांना खड्डेदुरुस्तीचे टेंडर मिळाले अन हिला नवीन ट्याब २. एवढी हुशार न स्मार्ट नाहीये पण पप्पांनी पीडब्ल्यूडीतला ईई बघितलाय म्हणं तिच्यासाठी.