चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. या वास्तूमध्ये अंधाराची शिंपडणी करत तिच्या तेजोमय अस्तित्वाला नष्ट करण्याचा जीवघेणा प्रयत्न मी करत होतो. एकीकडे स्वत:भोवती असंबद्ध तांडवामध्ये मग्न मी आणि दुसरीकडे माझ्या शब्दांमुळे गर्भगळीत झालेली ती.
माझ्या दुधारी शब्दांच्या आघाताने तिच्या अतिसूक्ष्म मनावर संवेदनशील जखमा होत होत्या. प्रत्येक जखमेतून स्त्रवणारी अतिसंवेदनशील आठवण तिच्या तपश्चर्येचा बांध आणखीन कमकुवत करण्यासाठी हातभार लावत होती. समोर चाललेला पडझडीचा खेळ पाहताना विकृती नेमकी फेर धरून नाचू लागते. मग सबंध वातावरण एका विचित्र मंत्राघोषाने भरून जाते. मघाशी, वादळी बरसातीला कारणीभूत ठरलेली बेताल वीज माझ्या रक्तामध्ये मिसळून मेंदुमधील कटू वाटांच्या सहाय्याने मुखाद्वारे बाहेर पडते ती अधिक तीव्र होवूनच, ब्रम्हस्त्राप्रमाणे. आता यास परतीचा मार्ग नाही. विनाशाचे भाग्य असलेला हा प्रलयास कारणीभूत ठरणार हे वास्तव. त्याचा परिणाम मला वातावरणामध्ये जाणवत होता. विचारांच्या वार्याचा वेग अचानक वाढला आणि या वावटळीमध्ये समोरचा औदुंबर मुळासकट उन्मळून पडला.त्याच्या आदिम मुळांनी घट्ट धरून ठेवलेल्या मातीची धूळ सार्या आसमंतामध्ये भरून गेली.
आणि अचानक माझी नजर तिच्या डोळ्यांवर स्थिर झाली. माझ्या खवळलेल्या समुद्राला तिच्या अश्रूंचा किनारा पुरेसा होता. आसमंत व्यापून टाकणारी ती आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवर. त्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकले. अंधाराला ग्रहण लागावे त्या प्रमाणे संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली. माझ्या अहमतेचा बुरूज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्या चार भिंतीच्या आतमध्ये तिच्या आणि माझ्यामधील अंतर वाढत चालले होते. हे वेळीच थोपवण्यासाठी मी वेगाने तिच्या दिशेने धाव घेतली. मघाशी उन्मळून पडलेल्या औदुंबरच्या मुळावर पुरातन काळामधील वेदनेच्या खुणा मला स्पष्ट दिसत होत्या. मुळावर घाव घालणे चुकीचेच. कणखर प्रहरांनी न तुटलेला तपश्चर्येचा बांध माझ्या नाजुक स्पर्शाने मात्र क्षणार्धात फुटला. त्या नंतर येणारा भावनांचा आवेग थोपवण्याकरिता मी तिला कवेत घेतले. तिथे माझी सावरण्याची असमर्थ धडपड.
माझ्या अस्तित्वाला कारणीभूत ती
माझ्या अस्तित्वासाठी झगडणारी ती
माझ्या अस्तित्वासाठी कष्टणारी ती
माझ्या अस्तित्वासाठी तपश्चर्यामग्न ती
आदिमकाळात तुटलेली नाळ आज पुन्हा जोडली गेली. मनाचा मनाशी संवाद झाला अश्रुंद्वारे.
हे ईश्वरा, माझ्या प्रार्थनेची सुरुवात तिच्या शब्दांनी व्हावी.
माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा शक्तिपात होवून सतत तिच्या चरणाशी लोळण घेण्याचे सामर्थ्य तू मला दे.
त्या मातृत्वरूपी तेजचा अंश असलेल्या मला त्या तेजसामर्थ्याकडे झुकल्या नजरेने का होईना मात्र पाहण्याचे सामर्थ्य मला दे.
ही प्रार्थना.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दबंबाळ !
शब्दबंबाळ !
??¿
काय आहे हे?
घरगुती त्सुनामी.
In reply to ??¿ by मनिम्याऊ
घरगुती हवामान खात्याचा, त्सुनामीचा, अंदाज.
नाय गो.......
In reply to ??¿ by मनिम्याऊ
नाय गो मनिम्याऊ हे तुझ्यासाठी नाई...
अवघड आहे.
मराठीतील बरेच शब्द माहित आहेत हो तुम्हाला. शेवटी 'क्रमशः' टाकले असते तर पुढच्या धाग्यात अजून ५०० ते ६०० शब्दांना वाट ढसाढसा मोकळी करून देता आली असती.
अगागागा
In reply to अवघड आहे. by प्रभाकर पेठकर
ढसढसा =)) =)) =)) =)) =))
घाबल्लो
घाबल्लो
मी पण...!
In reply to घाबल्लो by स्पा
मी पण...!
पळा पळा !
In reply to मी पण...! by अत्रुप्त आत्मा
प्रलय आला शब्दांचा...
तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की
In reply to पळा पळा ! by सस्नेह
तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की वाचले आहे का..?
खर्रं खर्रं सांगा. एका वाक्यात उत्तरे द्या टाईप प्रश्न विचारेन मी. ;-)
भले !
In reply to तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की by मोदक
आमाला प्रलयात बुडायचं नाही !
एका वाक्यात?
In reply to तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की by मोदक
एका शब्दात उत्तरे द्या टाईप हवं खरं तर.
हाट रे....
In reply to घाबल्लो by स्पा
हाट रे घाबरवतो काय स्पा ला..रक्तपिसासू थेयरपी आहे का ओ तुमच्याकडे????
हाट रे घाबरवतो काय स्पा ला
In reply to हाट रे.... by गोरा सौमित्र
अच्च नाय
हाट ले घाबल्वतो काय स्पा ला
अच्चे हवे
अच्च होय..
In reply to हाट रे घाबरवतो काय स्पा ला by स्पा
अच्च होय...
मला वाटलं स्पा च वय जरा जास्त असेल पण हे तर जरा जास्तच कमी आहे असं दिसतय...
होय
In reply to अच्च होय.. by गोरा सौमित्र
तुमच्या सारख्या अगाध लिहिणाऱ्या जेष्ठ माणसापुढे आम्ही लहानच हो .. अगदीच तान्हुले .. काहीच समजले नाही आम्हास
-- पिवळे गोमुत्र
स्पावड्या अन लहान??????
In reply to होय by स्पा
स्पावड्या अन लहान??????
त्येची तर आख्खी टीम हाय म्हणं. भल्लीभल्ली माणसे आम्ही टीममध्ये आहे ते अभिमानाने मिरवतेत आणि त्या टीमचा कर्णधार लहान होय?
मग त्यापुढे आम्ही तर काय?
.
.हिरवे जनित्र
(फक्त किर्लोस्कराचेच)
कोण माणसे? धन्यवाद!
In reply to स्पावड्या अन लहान?????? by अभ्या..
कोण माणसे?
धन्यवाद!
सह्या (आणि मते) बदलतात हो
In reply to कोण माणसे? धन्यवाद! by कवितानागेश
सह्या (आणि मते) बदलतात हो सारख्या सारख्या.
घालू नका वाद!
शैलीदार....
प्रायोगिक नाटकातील पात्रे किंवा पुराण्/इतिहास कालावर आधारित आर्ट फिल्मवाल्यांची पात्रे मोठे परिच्छेद बोलून जो माहौल बनवतात, तोच बनवायचा उद्देश असेल तर सफल झाला आहे.
बरोबर !!!
In reply to शैलीदार.... by मन१
बरोबर !!! :)
एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे
एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे सौमित्र यांचा "जैसे भडबुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात जाहला" तद्वत शब्दच्छल पाहोन डोळियांचे लोणार सरोवर जाहले असोन ऐसियास उतारा म्हणोन बुधवारात द्विपञ्चाशत-कोष्ठात जावयाचे योजिले आहे.
हे "मशारनिल्हे" काय असतं रे?
In reply to एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे by बॅटमॅन
हे "मशारनिल्हे" काय असतं रे?
उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड.
In reply to हे "मशारनिल्हे" काय असतं रे? by आदूबाळ
उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड. जुन्या मराठी कागदपत्रांतून लै वेळेस वापरतात.
ओह हो
In reply to उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड. by बॅटमॅन
ते मशारनिल्हे आहे होय. मला कायमच ते मल्हारनिशे अस वाटत आलय. म्हणजे मल्हाराच्या निशेने, इचिभैनं पोपट झाला म्हणायचा !
वटवाघळा जाण पां
In reply to एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे by बॅटमॅन
टकल्यांच्या शहरामध्ये कंगवा विकायला आलोय असं वाटतय मला
.
आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवरबापरेमनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा'स्वतहा' ह नवा शब्द मिळाला मराठीलाअहमभावाचाआणखी एक नवा शब्दत्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकलेम्हणजे काय ?बा द वे
भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.
(No subject)
In reply to . by आशु जोग
:))
म्हणीचा अर्थ
In reply to . by आशु जोग
@भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.
तुम्ही 'फ' तुकडे मध्ये होता वाटत...
.
In reply to म्हणीचा अर्थ by गोरा सौमित्र
'फ' तुकडेम्हणजे ?बा द वे
गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ?
गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही
In reply to . by आशु जोग
गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ?
नसावे बहुतेक. ते सौमित्र पक्क्या रंगाचे आहेत.
@माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा
@माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा शक्तिपात होवून सतत तिच्या चरणाशी लोळण घेण्याचे सामर्थ्य तू मला दे.>

:)
लेख वाचून हृदय पिळवटून निघाले…. उत्तराखंडनंतर व तितक्याच क्षमतेचा परंतु शब्दाचा महाप्रलय मनामध्ये उसळला …. मगजामध्ये विचारांचा आगडोंब उसळला …. मनावरचा असलेला ताबा सुटून आज आश्रुंचा बांध फुटला…. "गोरा" तुझ्या चरण स्पर्शाने हि भूमी पवित्र झाली …. तुमचे असे ज्ञानाने ओतप्रोत झालेले लेख आमच्या सारख्या क्षुद्र मानवास वाचावयास मिळणे हे आमचे परमभाग्य …अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल द्या रे
अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल
In reply to :) by देवांग
अश्रू वेचायचे आहेत? मोत्ये झाली की काय त्यांची? असेल तर तुम्ही आहात तिथे थांबा, मी आलोच टोपल्या-बॅगा-ट्रक इ. घेऊन.
आटोपलं ???
आता मुद्द्याचं काय ते बोला.
अवांतरः जे काहि टंकलय... वाचायला लय भारी वाटतय :)
अर्धवटराव
रामाची सीता...
In reply to आटोपलं ??? by अर्धवटराव
:))
रामाची सीता...:))
काय भयंकर लिहीलय सगळं!,,
काय भयंकर लिहीलय सगळं!,,
समोरचा प्रकाश हरला तर हरला तुम्ही का इतकं मनाला लाउन घेतलंय?.
संपादक
संपादक
काही अर्थ असेल तर हा धागा ठेवा. अन्यथा केवळ मजा पहायला लोक हे धागे टाकतात असा अंदाज आहे.
कोल्ह्याला द्राक्षे अंबट
In reply to संपादक by आशु जोग
या म्हणिचा अर्थ आत्ता कळला.
आशु जोग यांचा पक्षपाति प्रतिसाद त्वरित उडवावा अशी मंडळाला नम्र विनंती आहे.
"काही अर्थ असेल तर हा धागा
In reply to संपादक by आशु जोग
"काही अर्थ असेल तर हा धागा ठेवा"
हायला, हा निकष लावला तर "गुणुगुणू रे" चे पुढचे भाग कसे निघणार?
मरतय आज हसुन!
In reply to "काही अर्थ असेल तर हा धागा by रामपुरी
:))
मरतय आज हसुन!
हे तरी कळलं का??????
In reply to संपादक by आशु जोग
चिरागा करके दिल बहला रहे हो दुनियावालो
अंधेरा चाहे कितना भी रोशन हो जाये
उजाला तो उजाला है !!!!!
हे तरी कळलं का??????
नाही.
In reply to हे तरी कळलं का?????? by गोरा सौमित्र
नाही.
कॅप्टन स्पावड्याला कळाले असेल तर (आमच्यासारख्या) गोरगरीब रयतेला कळेल.
हाण त्येज्याआयला !
हाण त्येज्याआयला ! :)
हाट लेका...
In reply to हाण त्येज्याआयला ! by आबा
हाट लेका... नेम चुकला की!!!!
ये हाथ मुझे दे दे ठाकूर!!
ये हाथ मुझे दे दे ठाकूर!!
ओ मॅडम
In reply to ये हाथ मुझे दे दे ठाकूर!! by स्पंदना
ठाकुर ने तुमको हाथ दिये तर तो पाककृती कशे टाकेंगा मिपाके थल्ले ?
असं काही वाचणं माझ्याच्याने
In reply to ओ मॅडम by इरसाल
असं काही वाचणं माझ्याच्याने झेपत नाही हल्ली ! ;)
घे घे...
In reply to ये हाथ मुझे दे दे ठाकूर!! by स्पंदना
ठाकूरचे हात घे, माझे हात घे, त्या स्पावड्याचे हात घे...अन आठ आठ हात घेऊन हो शेरांवाली माँ!
म्हणजे काय?
म्हणजे काय?
बाकी लेखाचा शब्दबंबाळपणा दोनच ओळीत आटोपणारा शेर आठवला. (कदाचित मुनावर राणांचा आहे.)
"वो कुछ इस तरह मेरे गुनाह धो देती है,
माँ जब गुस्से में होती हैं तो रो देती हैं !"
उत्तम!!!!!
In reply to म्हणजे काय? by चिगो
मुनावर राणांनी 2 ओळीत सांगितलं आणि 100.. फरक एवढाच.. अर्थ तुम्हाला कळाला आहे.. :)
"वो कुछ इस तरह मेरे गुनाह धो देती है,
माँ जब गुस्से में होती हैं तो रो देती हैं !"
उत्तम!!!!!
आवडले
स्फुट लेखन म्हणजे काय हे बहुधा हल्ली मराठी वाचकच विसरले आहेत तिथे मराठी आंतरजालावर तेवढी समज कुठून सापडणार? हरवू पाहणार्या वाटेवरचा हा प्रयत्न नक्कीच आवडला.
खरोखरच कळलं नाही हो.
In reply to आवडले by रमताराम
खरोखरच कळलं नाही हो.
पृथ्वीला उद्द्येशून आहे की काय असं वाटलं एकदा... पण.. :(
त्यातून स्पा घाबल्ल्यावर मीपण घाबल्ले आणि अर्थ शोधणं सोडून दिलं! ;)
+०.५
In reply to आवडले by रमताराम
पण वाट हरवू लागलेली आहे वगैरे असे काही नाही.
पुण्यात असाल तर समीप रंगमंच वगैरे चळ्वळ कुठे सुरु आहे ह्याचा शोध घेतला तर ह्या वाटेवरचे प्रयत्न दिसतील.
ह्या वआटा तशाही कधीच मेनस्ट्रीमवर दीर्घ काळ आरुढ नव्हत्या.
तुटक तुटक लेखाला तुम्ही स्फुट म्हणताय ते मान्यच आहे. पण सहसा अशी स्फुट लिखाणं पात्रांच्या तोडी स्वगत म्हणून तरी येतात किंवा निवेदक मह्णून तरी. (काही उदहरणे पाहिली आहेत, विविध स्फुट जशास तसे कॉपी पेस्ट करुन त्या लेखकाने स्वतःच्याच नाटकात वापरलेले.) निनित चंदरकांत देसाई ह्यांच्या एका मुलाकह्तीतही त्याचा उल्लेख होता. "बहरत एक खोज " च्या वेळेस ते तुलनीन नवीन होते. तेव्हाचा तो किस्सा आहे. एक प्रभावी पॅरा श्याम बेनेगलांच्या हाती लगला आणी अश्वत्थामा का कृष्णाचे मनोगत म्हणून चपखल बसला.
असो. सहमत आहेच.
+.२५
In reply to +०.५ by मन१
इतर संपुर्ण प्रतिसादाशी सहमत. पण मला असं वाटतं, भाषेचा बाज पकडताना थोडंसं वरखाली झालंय. म्हणजे मधूनच पल्लेदार वाक्यं आणि मधूनच अगदी सर्वसाधारण वापरातली भाषा...त्यामुळं वाचताना थोडंसं ट्रॅक बदलताना खडखडल्यासारखं होतंय इतकंच.
राइट्ट....
In reply to +.२५ by धमाल मुलगा
मधूनच पल्लेदार वाक्यं आणि मधूनच अगदी सर्वसाधारण वापरातली भाषा...त्यामुळं वाचताना थोडंसं ट्रॅक बदलताना खडखडल्यासारखं होतंय इतकंच.
हे असू शकतं. पण इतक्या खोलात लक्ष देउ शकलो नव्हतो.
( "एकूणात काहीतरी त्या तसल्या प्रायोगिक धाटणीचं दिसतय" एवढच लक्षात राहिलं. तपशिलात शिरलो नव्हतो हा प्रतिसाद वाचण्यापूर्वी.)
कोणत्या पात्राच्या तोंडी
In reply to +०.५ by मन१
सध्या दुनियादारी जोरात आहे. मग त्यातल्या कोणत्या पात्राच्या तोंडी हा प्यारा शोभून दिसेल ?
+१
In reply to आवडले by रमताराम
धन्यवाद ररा!
कोणीतरी ह्या धाग्यावर एक चांगला प्रतिसाद देईल ह्याची वाट बघत होतो.
- (प्रयत्न नक्कीच आवडलेला) सोकाजी
be the change you want to see
In reply to +१ by सोत्रि
तुम्हाला प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही उल्लेख केलेला "ह्या धाग्यावर एक चांगला प्रतिसाद" तुम्हीच का नाही दिलात? ह घ्या ;)
हहपुवा!
=))
चल सोडा प्यायला जाऊया
असाच होतो रस्त्याने एकदा मी जात
वरून पडला भात
मी विचारलं वरण कुठाय ?
कविता संपली
कवितेचं नाव - चल सोडा प्यायला जाऊया
असाच होतो रस्त्याने एकदा मी
In reply to चल सोडा प्यायला जाऊया by सुबोध खरे
वरून आठवलेले अतिअतिअवांतरः मराठीचे संस्कृतात शब्दशः भाषांतर "त्याची माझी रस्त्यात गाठ पडली" हे "तस्य च मम रथ्यां ग्रन्थि: पपात" असे एका महाभागाने केलेले होते कधीकाळी.
माझी न(व)कविता...
In reply to चल सोडा प्यायला जाऊया by सुबोध खरे
कवितेचे नांव आहे : 'तळं'.
तळं, तळं, तळं.
तळं, तळं, तळं.....
डुबुक..!
(संपली कविता)
केवढा हा तळतळाट
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
केवढा हा तळतळाट =))
अर्थात यावरून मेघपीडावर्णन* आठवले हेवेसांनल ;)
* ढगाला लागली कळ.... *
पेठकर काका तुम्ही एका
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
पेठकर काका तुम्ही एका त्सुनामीची नांदी तर नाहीत ना करत?
आधीच काय अगम्य काव्य जिलब्या कमी पडाय्य्ल्यात. ह्याने अजून स्फुरण येइल ;-)
नाही हो..
In reply to पेठकर काका तुम्ही एका by अभ्या..
हा:..हा:..हा:... प्रत्यक्षात ही माझी कविता (?) नाही. एका 'बैठकीत' एका मित्राने पीडलं होतं. त्याची, ही मला आवडलेली, कविता आपल्या आस्वादासाठी इथे टाकली. त्यासाठी नवीन धागा काढल्यास मिपाकर मला फासावर लटकवतील.
पानात पानम पानात पाम, पानात
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
पानात पानम पानात पाम, पानात पान
पानात पान ,पानात पान,,पानात पान,,,!!
कवितेचं नाव आहे कोबी...
सालात साल, सालात साल, सालात
In reply to पानात पानम पानात पाम, पानात by आनन्दिता
सालात साल, सालात साल, सालात साल,
सालात साल, अजून एक साल, अजून एक साल.
कवितेचं नाव आहे: कांदा
गुंता
माझी ही एक क.वीता.
एक होता दोरा.
एक होती दोरी
दोघे प्रेमात पडले.
प्रेम केल्यावर दोघाना कळले
अर्र गुंता झाला की.......
एके दिवशी...
In reply to गुंता by विजुभाऊ
ह्या कवीतेची सुरुवात 'एके दिवशी काय झालेSSSS!' अशी पाहिजे.
ओके
लेखक मिपावर नवीन आहेत. ररांशी सहमत. स्फुट लिहिण्याचा चांगला प्रयत्न आहे. शब्दबंबाळ? वाटू शकते. पण लेखकाकडे स्वतःची शैली आहे हे नक्कीच. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
रमताराम यांच्याशी पूर्ण सहमत.
रमताराम यांच्याशी पूर्ण सहमत.